एक बहरलेली रात्र
एक बहरलेली रात्र
रमा आपल्या छोट्याशा आयुष्यामध्ये छान असं जीवन जगत
होती. ती तिचे बाबा, आई, अाज्जी अाणि आत्या असा त्याचा परिवार होता.
बाबा पोस्टमॅन होते आई गिरणी चालवत असे.
अाणि आत्या शाळेमध्ये आंगनवाड़ीची शिक्षिका होती. पतिच्या निधानानंतर त्या आपल्या भावासोबत राहत होत्या.
आत्याचा खूप जीव होता रमावर, खूप लड़की होती सगळ्याची. शाळेत मध्ये हुशार होती.
8th ला होती. घरामध्ये छान असे वातावरण असे.
अाता रमाची परीक्षाही संपली होती. शाळेमधे अाता सुट्ट्या लागल्या होत्या.
रमाला आता 14 वं वर्ष लागणार होतं.
रमा आपल्या मामाच्या गावी जाणार होती. त्यामुळे खूप खुश होती. मामाच्या गावी तिच्या मामे-बहिणीच लग्न होते. आज ती आपल्या मामा-मामी सोबतच जाणार होती. कारन ते त्याचा गावी अाले होते लग्नाचे पत्रिका घेवून.
रमा मस्त तयार झाली. जाण्यासाठी, थोडस तिची तब्येत ठीक वाटत नव्हती. तिच्या पोटामध्ये हलके हलके दुखत होते.
ती जाणार आहे गावी म्हणून जास्त लक्ष दिलं नाही, निघता निघता उशीर झाला तस गावाचं अंतर 6 तासाचं
होते. रमा निघाली तिने कुणाला सांगितलं नव्हते तिची तब्येत ठीक नाही आहे ते.
रमा आपल्या मामाच्या गाडीमध्ये जावून बसली. मागच्या सीटवर पुढे मामी अणि ड्रायव्हरच्या सीटवर मामा. मामाने डिक्कीमध्ये सामान ठेवले. बरेचसे सामान रमाच्या बाजूच्या सीटवर होते.
रमाने मस्त असा पिवळ्या रंगांचा LONG असा ड्रेस घातला होता.
आता हळूहळू ते आपल्या गावाच्या बाहेर पडू लागले. मस्त खिडकीमधून मंद वाऱ्याची सर येते होती.
आता संध्याकाळचे साडेपाच वाजले असतील तर मामाने एका रोड साईडला असलेल्या हॉटेलवर थांबले
आणि चाय पियाले. तेव्हा रमाला झोप लागली होती मग मामा आणि मामी बाथरूमला जाऊन आले. कारण अजून पोहचायला त्यांना ३ तास होते. मग २ तासानंतर रमा उठली. तिला पोटात दुखत आहे असे वाटू लागले.
तर तिने थोडेसे पाणी प्याले आणि चिप्स घेतले होते ते खात होती. तिला फ्रेश व्हायचं होतं पण आता त्यांना मध्ये हॉटेल दिसले नाही. मग तिने मामीना सांगितले, मला वॉशरूम ला जायचे आहे.
ज्या रस्त्याने ते जात होते ती जागा काही चांगली नव्हती. तिथे काही काही ना घडायचे ती एक मसणवाट होती. पण सगळे सुशिक्षित असल्यामुळे जास्त या गोष्टीकडे लक्ष देत नव्हते. त्यांनी गाडी बाजूला लावली. रमा आपल्या मामीसोबत खाली उतरली आणि गाडीपासून लांब असे जाऊ लागली फ्रेश होण्यासाठी.
मामी बोलली, जा तिथे झाडाच्या मागे, असं बोलून त्यांना कॉल आला तर त्या तिथेच बाजूला थांबून बोलत होत्या.
रामा थोडी जास्त पुढे गेली.
ती लघुशंकेला बसली मग तिने हात सानिटीझरने क्लीन केले आणि परत जाऊ लागली तर
तिला कसला तरी भास झाला. कोणीतरी कानाच्या मागून फुंकर मारल्यासारखे झाले. ती दचकली आणि हसली उगाच काही
पण वाटत आहे असं तिला वाटलं आणि चालू लागली. पुन्हा तिची नजर झाडाच्या मागे गेली तर कोण तिला बघत आहे असं जाणवलं.
मग तिने पटकन पुढे जाऊन बघितलं कोण आहे का तर तिथे कोण नव्हते ती थोडी घाबरली आणि चालू लागली आणि तिने परत मागे वळून बघितले.
कुणी तर तिला आवाज दिल्यासारखं वाटलं तर तिथे कोणच नव्हते. मग ती पटपट पुढे गेली तिला तिची लांबून मामी दिसली तिला जरा बरं वाटले.
पुन्हा मागे फिरून तिने बघितले तर तिला झाडाच्या मागून कुणाचे तर केस हवेत उडत आहे असं दिसले आणि तेवढ्यात मामींनी आवाज दिला.
चला या पटकन मग ती जाऊन पटकन बसली सीटवर तिची नजर झाडाकडे होती.
गाडी सुरु झाली पण तिला काही तरी वेगळंच वाटत होते. कुणी तरी आपल्यासोबत आहे, बाजूला असं जाणवू लागला होते. कानामागे फुंकर कोण घालत आहे असं वाटलं पण तिला भास झाला असं समजून ती कानामध्ये एरपोड लावून गाणी ऐकू लागली. थंडी वाजत आहे म्हणून तिने सोबत आणलेले स्टॉल काढली आणि ओढून घेतली. घरी पोहचल्या वर सगळ्यांना भेटली. आजीला भेटून खूप खुश झाली तेवढ्यात तिने आपली स्टॉलकाढून फ्रेश होण्यासाठी जाऊ लागली तर तिच्या ड्रेसला मागून काही डाग लागल्यासारखे होते. आज्जीने बघितले आणि विचारले तर तिने बघितले ड्रेस खराब झाला होता. असं काय लागलं हा विचार ती करत होती. आजीला समजलं ते काय लागलं आहे ते मग, आजीने तिला अंघोळ करून घे, असं सांगितले आणि आपल्या सुनेला बोलावून सांगितले, र
मा आता मोठी झाली आहे आणि तिच्या मम्मीला पण कॉल करून सांगितले. सगळे खुश झाले चला मॅडम आता मोठ्या झाल्या, असं बोलू लागली मामे बहीण, रामाला पण समजले काय बोलत आहे आणि हा तिचा पहिला दिवस आहे आजपासून ती तारुण्यात पाय टाकणार होती. कारण शाळेमध्ये आता सगळे KNOWLDGE भेटते, पण असं अचानक होईल याची तिला कल्पना नव्हती. मग तिला तिच्या मामे बहीणीने सांगितले सविस्तर सगळे काय करायचे आणि काय नाही आणि नंतर मामेबहिणीसोबत गप्पा सुरु झाल्या.
मामाचे घर मोठे होते प्रत्येकाला रूम होते. तिला तिच्या मम्मीची रूम आवडायची जी अगोदर तिच्या मम्मीची होती तिने ती त्या रूममध्ये राहील असे सांगितले. मग तिने आपले सामान नीटनेटके लावले आणि थोडा रेस्ट केला पण काही वेळाने तिला काहीतरी बाजूला आहे, असं वाटलं तर पटकन उठून बघितले तर तिथे काहीच नव्हते. तिला घाम फुटला होता. गर्मीचे दिवस होते मग तिने आपली खिडकी खोलली आणि बाहेर बघू लागली. वाऱ्याची झुळूक हळू हळू येत होती ती त्यात हरवून बाहेर बघत होती. तेवढ्यात कोणी तर तिला जोरात चपराक लावली असे वाटले. ती दचकली असा अचानक घडलेल्या प्रसंगामुळे पण तो भास आहे असं वाटले. नंतर ती जाऊन बेडवर पडली तर तिच्यासोबत कोणीतरी बाजूला पडले असं जाणवले. आजीच्या आवाजानं ती दाराकडे बघते. आजी बोलते चल बाय जेवण करुन घे पान वाढायला घेतलेत. ती आज्जीकडे घाबरून बघते.
आज्जीला वाटले अचानक दिलेल्या आवाजाने दचकली असेल. आजी हसते आणि घेऊन जाते तिला आपल्या सोबत.
रात्री जेवण करून रमा आपल्या रूममध्ये येते आणि मोबाइलमध्ये बघत बेडवर बसते तेवढ्यात आपण कोणाच्यातरी मांडीवर बसलो आहे असे तिला वाटते. तेवढ्यात ती पटकन उठून मागे बघते तर काहीच नसते ती स्वतःलाच हसते आणि आणि झोपायची तयारी घड्याळ बघते १०.३० वाजलेले असतात मग तिला झोप लागते. रात्री ती ११.४५ ला उठते फ्रेश होते बाहेरच कडेलाच वॉशरुमम असतो आणि ती येऊन झोपायला बेडवर पडते, तिला कोणी तर आहे असं वाटत ती दुर्लक्ष करून डोळे बंद करते. तर कोण तिचेसमोर बसले आहे असं वाटते. डोळे उघडून बघते तर तिचेवर केस लटकत आहेत. एक बाई केस मोकळे सोडून तिचे बेडवर जी जागा आहे तिथे बसलीय हे आणि तिचे केस रमा तोंडाच्या थोडेसे वर लटकत आहे आणि ती तिचेकडेच नजर टाकून बसली आहे, हे दिसते रमाला. ती खूप घाबरते. तिचे तोंडातून आवाज येत नाही ती हालायचा प्रयत्न करते पण हलू शकत नाही. तेवढ्यात ती बाई तिचा जवळ जवळ येण्याचा प्रयत्न करते. रमा देवाचे नाव मनात घेऊन जोरात उठणेचा प्रयत्न करते आणि खाली पडते. पण तोंडातून आवाज फुटत नाही. तिचे दार जे तिने बंद केले नव्हते ते बंद झाले होते.अचानक रूममध्ये गारवा निर्माण झाला होता. कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज सुरु होता. १२.३० वाजले होते. ती बाई हलून तिच्यापुढे आली आणि बोलली, मी तुझीच वाट बघत होते, असं बोलून तिचा शिरते आणि तेवढ्यात रमा बेहोष होऊन खाली पडते.
आणि थोड्यावेळाने दार खोलून बाहेर जाते आणि दरवाजाच्या बाजूला जाऊन मांडी घालून बसते.
पहाटे आजी उठून अंघोळ करून देवाचे नामस्मरण करून जप सुरु करते तोच आवाज रमाच्या कानावर पडतो. तोच ती आज्जीकडे रागाने बघून रमा तिचे खोलीत न बोलता निघून जाते. आज्जी विचारते कुठे गेली होतीस ती नजर रोखून ठेवून दार लावून घेते. आज्जी आणि त्याच घरात काम करणारी शांती हे बघून चिंताग्रस्त होतात. आजीला वाटते मॉर्निंग वाल्कला गेली असेल पण शांतीला समजते हे काय तर बाहेरच आहे. कारण तिचा ड्रेस पूर्ण पणे मागून पूर्ण भिजलेला असतो रक्ताने. ती लगेच बोलते, आज्जी काय तर वेगळंच दिसतेय, असं बोलून आज्जी तिला, शांत बस काय पण बोलू नको बोलून कामाला लागतात. सकाळचा नाश्ता करणेसाठी शांती जाते बोलवायला तर ती तशीच बसलेली असते मांडी घालून, केश मोकळे सोडून खूप भयानक दिसत असते. रूममध्ये कुबट वास भरलेलं असतो. शांती नाक पकडून बोलते, बाय नाश्त्याला बोलवलंय. ती मला आता भूक नाही असे बोलते आणि जा म्हणते शांतीला.
दुपारचे बारा वाजता रमा पलंगावर केस मोकळे सोडून हवेत लटकत आहे, असे उलटी झोपलेली असती आणि जोर जोरात खिडचीचे दार बंद आणि चालू करत असते. जोराचा आवाज बघून सगळे जातात तर काय पूर्ण अंधार पसरतो भर दुपारी तिचे रूममध्ये लाल उजेड असतो आणि रमा दात काढून हसत असते आणि जोरात हे बघून
दरवाजामध्ये उभी असेलेले आज्जी मामा मामी आणि शांतीला बघून घोगरा आवाजात माझे आड नका येऊ म्हणते नाही तर आणि दरवाजा बंद करते आणि जोर जोरात हसते...