MAYA SHINDE

Horror

2  

MAYA SHINDE

Horror

एक बहरलेली रात्र - अंतिम भाग

एक बहरलेली रात्र - अंतिम भाग

4 mins
653


आजी हे बघून खूप घाबरते आणि रडायला लागते.


शांती म्हणते, बाई साहेब मी गावात जाऊन गंगा अक्काला घेऊन येते. तिला कळतं काय हाय आणि काय नाही ते...


आणि जाऊन तिला घेऊन येते. गंगा अक्काला शांती सगळं सांगते, घडलेला प्रकार.


ती बोलते ठीक आहे मी येते, तुम्ही जा पुढे आणि हो दरवाजा बाहेरून बंद करून घ्या, मी येई पर्यंत आणि जर काही संकट आलं तर गंगाजल सोबत ठेवा.


मग शांती येते घरी, सगळे टेन्शनमध्ये बसलेलं असतात. आजी म्हणते, माझी बाय... असे म्हणून रडते... माझी बाय आता तर मोठी झाली असं बोलून रडते... तेवढ्यात गंगा अक्का येते.


आणि ऐकून म्हणते, काय

ती आताच मोठी झाली आहे का????


हो, आजी म्हणते कालच समजलं, जेव्हा ती आली काल तेव्हा...


तेवढ्यात गंगा अक्का जरा ओरडुनच विचारते, कुठे रस्त्यामध्ये थांबली होती का ही...?


मामी विचार करून नाही म्हणते आणि लगेच बोलते हो फ्रेश होण्यासाठी आम्ही कोलदरीत थांबलो होतो.


गंगा अक्का डोक्याला हात लावून म्हणते, ती चांडाळीन अवदासा अाली हो... ती वाट धरूनच बसली होती... नवीन तारुण्यात पाय टाकणाऱ्या पोरीच्या...


सगळे घाबरले. कोण, कोण आहे, विचारायला लागले. तेवढ्यात दरवाजा जोरजोरात वाजू लागला आणि रक्त बाहेर येत होते. दरवाजातून उघड दार असा भेसूर आवाज येत होता. तेवढ्यात तिची मम्मी आणि पपा दोघे आले

आणि रमाकडे जायला लागले. रमाने आता दार तोडले होते आणि ती हवेतच लटकत बाहेर अाली.


केस तिचे उडत होते. खूप भयानक दिसत होती. पूर्ण रक्त माखलेली, गंगा अक्काने तिच्यावर गंगाजल टाकले तर ती खाली पडली आणि बोलली, सोड मला थेरडे... मला नादाला लागू नगं... असं बोलून तिने बाजूला असेलेले सामान उचलून गंगा अक्काकडे फेकले.


तेवढ्यात ती खाली पडली आणि रंगणे अधून तिच्यावर गंगाजल फेकू लागली. बोलली, सोड तिला.

का तिला पकडलास तू...


ती हसली आणि बोलली, मी नाही पकडलं ती स्वतःहून अाली माझाकडे. माझ्यावर येऊन तिने मला बांधनातून मुक्त केलंय, मला जे अडकून ठेवलं होतं त्यातून मी मुक्त झाले... हाहाहाहाहाहाहाहाहा असं बोलून हसू लागली भेसूर आवाजात...


रमाची आई बोलली, सोडा माझा मुलीला, सोडा...


तेवढ्यात गंगा अक्काने तिच्या अंगावर गंगाजल शिंपडले आणि ती खाली पडली आणि रडू लागली. तेवढ्यात तिला पकडून बांधून ठेवायचा हा प्लॅन होता.


गंगा अक्काने शांतीला इशारा केला. तिने तिला बांधून ठेवले आणि गोलाकार करून गंगाजल शिंपडले

आणि विचारले, का तिला धरलंयस... सांग...


ती बोलली, माझं नाव शकू. मी अकरा वरसाची होते. माझं लग्न लावून दिलं. मी मोठी पण नव्हती झाली. नवरा माझा माझा वयाने दुप्पट, त्याने मला खूप त्रास दिला. माझं लहानपण त्याने बघितलं नाही आणि मला शारीरिक त्रास दिला आणि मेला काळतोंड्या. पुढच्या वर्षीच सर्प चावला त्याला. सासू माझी लय वंगाळ, तिने लय छळ केला माझा. सगळं काम करून घ्यायची. मी पण काही नाही म्हणून जगत होते. हेच माझं आयुष्य असा विचार करून जगत होते, मी १५ वरसाची  झाले आणि मला पहिली पाळी अाली. अंगात मास नव्हतं जास्त म्हणून सगळ्यात उशिरा मला पाळी अाली. ते पण नवरा गेल्यावर त्यात थंडीचे दिवस सासूने मला बाहेर काढलं. बोलली, बाहेर बसलीयास तुला घरात नाई घेत मी... तू ८ दिवस बाहेरच राहा. माझं लुगडं फेकलं. माझ्या अंगावर सामान दिलं. बाजूला मला सगळं बाहेरचा कामच करू देत. जेवण पण एकच वकताचं दिलं. फाटकी गोधडी फेकली माझं अंगावर. कसंबसं ८ दिवस गेलं तिनं मला घरात बोलवून घेतलं. पण मला अजून पाळी सुरु होती हे तिला समजलं नाही. रातच्याला म्या झोपले होते तेव्हा तिनं बघितलं माझ्या लुगड्याला रक्त लागलेले आणि तिने लय मारलाय मला... माझं घर अशुद्ध केलंस असं... तेवढ्या थंडीत माझ्या अंगावर थंडगार पाणी ओतलं. पुरी रात बाहेर ठेवलं. थंडी न म्या जागेवर केस सोडले, केस सुकवत बसले होते. तिनं अजून पाणी टाकलं. पानात बस बोलली आणि दार बंद केले. म्या रातीच गेले थंडीने... सकाळी पूर्ण उंबरठा लाल झाला होता रक्ताने. तिने कोणाला कळण्याच्या आत आपल्या घरगड्याला बोलवून धुवून घेतला आणि मला कोलदरीत झाडाच्या मागं पुरलं...


असं बोलून रडू लागली ती, घडलेला प्रकार ऐकून सगळ्याना दया आली.


तेवढ्यात ती बोलली, म्या त्या कुत्रीला कवच सम्पवलाय पण तिच्या घर गड्याने कुण्या मांत्रिकांला बोलवून मला इथं बांधून ठेवलं होतं, जोपर्यंत मला पहिली पाळी आलेली कोणी माझ्याकडं येईल तवा मी मुक्त होईल. आता मी मुक्त झाले, असं बोलून हसू लागली. मलापण जगायचं हाय हिच्यात असं बोलून हसू लागली जोरजोरात...


तेवढ्यात पाऊस आला. त्यामुळे गंगाजल पण नष्ट झाले. ती पुन्हा हवेत तरंगू लागली. तेवढ्यात सकाळ झाली आणि बाजूच्या मंदिरातील घंटेचा ध्वनी तिच्या कानावर पडला. तेवढ्यात ती खाली पडली आणि त्याच संधीचा फायदा घेऊन

तिच्या गळ्यात एक तावीज घातला आणि रमा बेहोश झाली. सकाळी पंडितांना बोलवून सर्व विधी करून तिचा हाडाचा सापळा तिथून काढून तिला रमाने अग्नी दिला आणि ती मुक्त झाली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror