दयनीय पृथ्वी
दयनीय पृथ्वी


पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे ज्यावर सजीव सृष्टी आढळून येते. या सजीव सृष्टीत मानव हा एक असा सजीव आहे की तो स्वतःच्या स्वार्थासाठी पृथ्वीला अनेक मार्गांनी विनाशाकडे घेऊन जात आहे. मानवाने स्वार्थासाठी अनेक शोध लावले. विविध देशांत श्रेष्ठपणासाठी भांडणे सुरु आहेत. या भांडणात कधी एखादा देश जिंकतो तर कधी दुसरा. पण यात मरण होते पृथ्वीचे. यामुळेच पृथ्वी आता निःशब्दपणे सर्व पाहात आहे... एका नवीन पहाटेची की केव्हा माणूस माणसासारखा होईल.