दुसरा मधूचंद्र
दुसरा मधूचंद्र
भाग - 01
आताच रात्रीचे ठीक दहा वाजले आहेत. श्रीकांत आणि ज्योत्स्ना हे दोघे पती- पत्नी आपल्या खाजगी बेडरूम मध्ये एकमेकांना बिलगून प्रेमाने लोळत पडलेले आहेत. श्रीकांतच्या किंचितचशा फुगलेल्या पण हलक्याशा मऊ असलेल्या बलदंड दंडावर ज्योत्स्ना आपले डोके सहजच टेकवितच होती. तिच्या मऊसुत रेशमी केसांनचा संभार श्रीकांतच्या दंडावर रेंगाळत होता. तोच श्रीकांतला तिच्या मऊसुत रेशमी केसांनचा मखमली आणि काहीसा थंड स्पर्श झाला. तो थंड मखमली रेशमी स्पर्श श्रीकांतला ही हवाहवासा वाटू लागला. तो ज्योत्स्नाच्या गालांवरून आपले टपोरे बोटे हळूहळू फिरवू लागला. आणि गालांवरून रेंगाळत- रेंगाळत त्याची बोटए थेट रेशमी मुलायम केसांना मध्ये घुसली. आणि त्या मऊ- मऊ केसांत चाळा करू लागली. त्या बोटांच्या उबीच्या स्पर्शाने ज्योत्स्ना ही मोहरून मदमस्त होऊ लागली. तिचे बंद डोळे बंद झाले. आणि ओठांवर गोड स्मित खेळू लागले.
ते मनोहारी चित्र पाहून श्रीकांतच्या मनात ही कामरंगी भावना जागृत होण्यास प्रारंभ झाला. तो कामातूर होऊ लागला. आणि अधिर मनाच्या स्वाधीन झाला. त्याच्या नसानसांत एक चैतन्य निर्माण झाले. तो अनोख्या भावविश्वात गुंतून जात होता. जसा लगाम सैल सुटलेला घोडा, कसले ही बंधन नाही हे समजून बेलगामपणे जसा सैरावैरा धावत असतो. अगदी तसेच श्रीकांतचे मन त्याच्या ताब्या मधून सुटून बेफाम दौडत चालले होते. त्याच्या भावना अनावर होत चालल्या होत्या. आणि अचानक पणे त्याने आपल्या स्नेहाच्या बाहुपाशात ज्योत्स्नाला द्रतगतीने बांधुन घेण्याचा पवित्रा घेतला. तोच ज्योत्स्ना ही या अत्यंत सुखाच्या क्षणांनाची उधळण पाहून मनातून बावरून जात होती. आणि हे दोघे ही प्रेमी जीव प्रणयाच्या रंगात रंगायला सुरूवात झाली. श्रीकांत पहिल्या मधूचंद्रा नंतर खुपचं दिवसांनी आशा रोमॅन्टीक मुड मध्ये आला होता.
एका झटक्या सरशी श्रीकांतने ज्योत्स्नाला आपल्या घट्ट प्रेममयी बाहुपाशात आलवार ओढून घेतली. आणि त्या झटक्या सरशी, ज्योत्स्नाचा चेहरा अगदीच श्रीकांतच्या चेहऱ्या समोर आला. ते दोघे ही एकमेकांच्या अगदीच जवळ आले आहेत. आणि ते दोघे एवढे जवळ आले की, दोघांचे खाली-वर होणारे श्वास ही एकमेकांना सहजच जाणवत होते.
तोच ऐकाएकी श्रीकांतने ज्योत्स्नाच्या उजळ माथ्याचे हळुवार पण सलोख्याने चुंबन घेण्यासाठी आपले. ओठ तिच्या माथ्यावर टेकवण्याचा असफल प्रयत्न केला. आणि अशा या असावध, अवचित आणि बेमालूम पणाच्या कोमलशा प्रसंगाने ज्योत्स्नाला एकदमच कसली तरी जाणिव झाली. तिने श्रीकांतला हलकेच दुर लोटले. आणि ज्योत्स्ना अक्षरशः लाजेने चुर- चुर होऊन गेली. तीला ऐवढी लाज वाटली की तिने दोन्ही हाताने आपला चेहरा झाकून घेतला. आणि म्हणाली,
"ईईश्या हे काय केलं?." इति ज्योत्स्ना वदामी.
"अगं ये वेडाबाई!, अगं मी तूझा पती आहे आणि तू माझी पत्नी आहेस. तुला काय झालं आहे. आसे नव्या नवरी सारखं नाजूक- साजूक लाजायला. " श्रीकांत जोत्सनावर मनमोहीत नयनांचा तिरपा कटाक्ष टाकत बोलला.
"आहेच मुळी मी अजून ही नवी नवरी. बायको कितीही जूनी झाली तरीही नवऱ्यासाठी ती नेहमीच नवी कोरी नवरीच आसते." ज्योत्स्ना काहीशा लाजेच्या सुरांत बोलली.
"अगं लाडके माझे "ज्यो राणी"! तू एकदम खरचं बोलते आहेस. आज ही तू मला नव्या कोऱ्या नवरी सारखी नखशिखांत नवी नेली दुल्हन दिसत आहेस. हे तूझे मुलायम रेशमी केस, हे गुलाबी ओठ आज ही तेवढेच आकर्षक आहेत. आणि ही तुझी मादक अदा माझ्या दिलावर प्रिती सुमनाची सुगंधी बरसात करत आहेत." श्रीकांत जोत्सानाच्या कमरेला हताचा विळखा घालून बोलायला लागला.
"आज खूपच रंगात स्वारी दिसत आहे." ज्योत्स्ना गोड स्मित हास्य करत बोलली.
"हा रंग तुझ्या प्रेमाचा आहे." श्रीकांत प्रितीच्या रोमांचक क्षणांत धुद होत म्हणाला.
"माझ्या नाही आपल्या प्रेमाचा रंग आहे." ज्योत्स्नाने समजूतदार पत्नीचे वक्तव्य केले.
"असं म्हणतात की, लग्नाला काही वर्ष झाली की विवाहित जोडपी एकमेकांन बद्दल निरस होत आसतात." श्रीकांतवर ही आपल्या पत्नीची म्हणजे ज्योत्स्नाच्या समजूदारपणाची सावली पडली होती. तो ही तसेच बोलला.
"होणारे होत आसतील. पण आपली बात औरच आहे." ज्योत्स्ना खमक्या सुरांत म्हणाली.
"खरंच आता आपल्या लग्नाला बराच काळ लोटला आहे." श्रीकांत भुतकाळ आठवत म्हणाला.
"मग काय झालं, लग्नाला पाच वर्ष होऊन दे की पन्नास वर्षं. तरी स्त्री सुलभ लज्जा कुठे जाणार आहे. आणि मला तर बाई नेहमीच खुप लाज वाटत असते. आणि का वाटू नये, समोर नवरा असला तरी तो एक पुरुष आहे. आणि माझा हा पुरूष तर फारच हट्टी आहे. हो की नाही रे माझ्या शहाण्या लबाडा. " ज्योत्स्ना ही श्रीच्या दोन्ही खांद्यावर आपले हात ठेवत म्हणाली.
"अगं पण अजून ही तू नव्या नवरी सारखी शरमेने चुर होऊन लाजत आहेस. अगं लाडके "ज्यो राणी", आता तरी थोडी मॉर्डन हो." श्रीकांत जोत्सनाला थोडं ज्ञान देत बोलला.
"नको मला नाही मॉर्डन व्हायला आवडत." ज्योत्स्ना एका फटक्यात बोलली.
"मग रहा अशीच काकूबाई बनून?." श्रीकांत काहीशी नाराजीच्या स्थितीत म्हणाला.
" ये श्री ऐकना! असा नाराज होऊ नकोस. अरे मला नाही आवडत ते कमी कपडे, हाय हिल्स, भडक नटापटा, आणि ते सार्वजनिक रित्या लगट करने, किस करने. अरे आपण भारतीय लोक आहोत. आपल्या संस्कार आणि संस्कृतीची संपूर्ण जगावर छाप आहे. आणि ते सर्व लोक आपला आपल्या संस्कृतीचा आदर्श घेतात. मग तुच सांग माझं काय चुकलं
ही स्त्री सुलभ लज्जा सुध्दा एक संस्काराचाच भाग आहे. आणि याचा अर्थ तू असं समजू नकोस की सगळ्या स्त्रीयांना लाजे शिवाय दुसरे काहीच करू नये . आम्ही स्त्रीया अवघड प्रसंगी लाज बाजूला ठेवून शत्रूशी दोन हात ही करु शकतो. आपली झांसीची राणी, राणी लक्ष्मीबाई बघ, राणी पद्मावती बाईसा बघ, राणी चेन्नमा बघ, अहिल्याबाई होळकर बघ, जीजा माता बघ, सावित्रीबाई फुले बघ, रमाबाई रानडे, आशा नानाविध कर्तबगार हरहुन्नरी व्यक्तिमत्व लाभलेल्या महिला बघ आणि मग सांग माझे बोलणे उचित आहे का अनुचित आहे.
"ये ज्यो, तू खरचं खुपच ग्रेट आहेस हो? किती सदगूणी आणि ज्ञानदेवी आहेस तू. खूप दिवसांनी कानांवर काही तरी चांगले नावे, वचने पडले आहेत. आणि माझे कान ही तृप्त झाले आहेत असा भास होतो आहे. मला ही अशीच कर्तबगार हरहुन्नरी आकर्षक व्यक्तिमत्त्व असणारी एक गोंडस, निरागस बालिका हवी आहे. आणि त्यासाठी आपल्याला काही तरी गंमत करायला हवी आहे. ये ज्यो अगं जवळ जराशी. माझी गुणांची बाय ती." श्रीकांत अगदीच लहान मुला सारखा लाडात येऊन बोलला.
"आता समजले वाटते माझे सदगुण?." ज्योत्स्ना हताची घडी करत आणि स्वःतावर थोडासा गर्व दाखवत म्हणाली.
"हो ना ज्यो, अजून ही तू तशीच पहिल्या सारखीच अल्लड आणि सोज्वळ पण सद्गुणांची खाणचं आहेस हो. आणि तूझी हीच अदा मला जाम आवडते बरे माझ्या "ज्यो राणी". श्रीकांत लाडीकपणे बोलला.
"माझे ही कान आज धन्य-धन्य झाले आहेत." ज्योत्स्ना अत्यंत खुशीच्या स्वरात म्हणाली.
"आणि ते कसे काय बरे, ऐवढे कुठल्या खुशीने ते धन्य झाले?." श्रीकांत म्हणाला.
"तू कबुल तरी केले आहेस की, मी तूला खुप आवडते म्हणून. आणि मी ग्रेट सद्गुणांची खाणचं आहे म्हणून." ज्योत्स्ना अनोख्या गर्वाने म्हणाली.
"मग एका ग्रेट सद्गुणी राणी साहेबांनी आता काय करायचं ठरवले आहे. माझ्या राज्यावर स्वारी तर नाही ना करणार. हे पहा "महान राणी सरकार" आमचे सैन्य अजून तैय्यार नाहीये. त्यामुळे आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. कृपया आपण आम्हाला आमच्या तुच्छ प्राणांनचे अभयदान द्यावे." श्रीकांत आड विनोदाच्या माध्यमातून बोलला.
"जरुर अभयदान मिळेल माझ्या छोट्या राजा. अं हं, शरणागती पत्कारलेल्या छोट्या राज्यांच्या छोट्या राजा." ज्योत्स्ना एखाद्या महाराणीचा अभिनय करत म्हणाली.
"धन्यवाद महान राज्याच्या महान अशा राणी सरकार. आपण आमच्याशी योग्य प्रकारे वागाल ना?, आणि आम्हाला योग्य तो सन्मान ही बहाल कराल ना?." श्रीकांत एका शरणागती पत्कारलेल्या राजा सारखा ज्योत्स्ना समोर जमीनीवर गुडघे टेकून बसला आणि बोलला.
"ये श्री, आता बास झालं हं, हे नाटक." ज्योत्स्नाला मजा येत असते. तरीही ती लटक्या सुरात म्हणाली.
"अगं मी नाटक कुठं करत होतो?. मी तर छान शरणागती पत्कारलेल्या राजा सारखा डेलिसोप अभिनय करत होतो." श्रीकांत खुश होऊन बोलला.
"खरे तर तू नेहमीच अभिनय करत असतोस. कधी खरं बोलत असतोस आणि कधी खोटं! ते ही तू नाही समजून देत समोरच्या व्यक्तीला. आणि समोरची व्यक्ती आपली पत्नी असली तरीही तू तसाच वागतोस." ज्योत्स्ना रुसव्याच्या सुरात म्हणाली.
"हे बघ ज्यो, मी तर तुझ्याशी खूप छान वागत असतो. पण तू असा विचार का करत आहेस." श्रीकांत विचार करत बोलला.
"मग आता मला एक सांग की, तू नेहमी माझ्याशी असा तूसडलेपणाने का वागत आसतोस." ज्योत्स्ना सरळ प्रश्न विचारून मोकळी झाली.
"अगं मी तर तूझ्याशी नेहमीचं चांगलेच वागत असतो." श्रीकांत सफाई देण्याच्या सुरात बोलला.
"मग मला कधीच चांगले वागलेले का बरे दिसत नाही. ज्योत्स्ना भोळेपणाने बोलली.
"हे बघ आताच वागून दाखवतो." श्रीकांत जोत्सनाला एका झटक्यात जवळ ओढत बोलला.
(श्रीकांत जोत्सानाचे दोन्ही हात आपल्या हातानेच पकडतो आणि ज्योत्स्नाच्या पाठीमागे वळवतो. आणि ती पोलीसांच्या बेडीत सापडलेल्या कैद्या प्रमाणे श्रीकांतच्या बाहुपाशात बंदीस्त होते.)
"ईईश्याऽ हे काय करतोस श्री?." ज्योत्स्ना हलक्या आणि मधूर स्वरांत म्हणाली.
"आपल्या पत्नीला बंदी बनवत आहे." श्रीकांत प्रश्नार्थक भावनेने बोलला.
"मी तर अगोदरच आपली बंदीनी आहे." ज्योत्स्ना उत्तराच्या स्वरात बोलली.
"मग ही बंदीनी आता या जेलरच्या मिठीच्या बंदीशाळेत बंदीस्त होणार आहे." श्रीकांत मदहोशपणे बोलला.
"ईईश्याऽ आता हे काय भलतंच, मला बाई लाजायला येत आहे." ज्योत्स्ना लाजून बोलली.
"ज्यो तू खूप छान लाजत असतेस. तुझं असं लाजने पाहिले ना की माझं काळीज एकदमच खल्लास होत आसते बघ. आता माझा जीव तुझ्या ताब्यात आहे." श्रीकांत प्रेमात एकदमच निहाल होऊन बोलला.
"असं का? मग एका माणसाचा जीव, आता माझ्या मुठीत आहे." ज्योत्स्ना खुश होत म्हणाली.
"हो का! मग एक माणूस तर आखाच्या अखाच माझ्या मिठीत आहे." श्रीकांत जोत्सनाला मिठीत दाबत म्हणाला.
"ईईश्या पुरे झाले आता? सोडा मला?. ज्योत्स्ना गोड लाजून श्रीला स्वता पासून दुर लोटत म्हणाली.
"अगं थांब की थोडाऽ, अजून थोडा वेळ थांबलीस तर काय तुझ्या वीजेचं बिल वाढणार आहे का?." श्रीकांत जोत्सनाला परत ओढतो आणि चिडक्या स्वरात बोलतो.
"ईईश्या! पुरे हं, मला आता झोप येत आहे. सोडा मला! सोडा बरं." ज्योत्स्ना परत थोडी लाजून श्रीला स्वता पासून अजूनच दुर लोटत म्हणाली.
"जाऊ द्या आता काय करणार सगळ्या मुडच गुडगोबर झाले. बाकी काही का असेना. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की, तू अशी नाजुक- साजूक लाजल्यावर या दिवसाचे हाल बेहाल होतात. आणि तू अजूनच क्युट आणि स्वीट दिसतेस." श्रीकांत रोमॅन्टीक मुड मध्ये येऊन प्रेमाचे मोहक शब्दबाण ज्योत्स्नाच्या मोहरलेल्या मनाच्या पटलावर सहजच सोडत धूंद बोलत होता.
"ईईश्या! आता हे काय कवीता ही छान जमते की, एका बिझनेसमनला?." ज्योत्स्ना लटक्या सुरात बोलली.
"मग काय? मी तुला ईतर बिझनेसमन सारखा रूक्ष आणि निरस वाटलो आहे की काय?." श्रीकांत बोलला.
"हो! आहेसच मुळी तू रुक्ष आणि निरस स्वभावाचा." ज्योत्स्ना रुसव्याच्या सुरात बोलली.
"हे बघ ज्यो, तुला माहिती आहे की, मी कसा आहे ते?" श्रीकांत चिडक्या स्वरात बोलला.
"कसा आहेस तू , मला तर बाई काहीच माहिती नाही." ज्योत्स्ना स्वताचे हसू लपवत बोलली.
"असं का? मग आपल्या एक मुलगी कशी झाली बरं." श्रीकांत प्रश्नार्थक नजरेने बोलला.
"मुलं म्हणजे देवा घरची फुलं असतात." ज्योत्स्ना श्रीकांतवर थेट सुविचार झोडून मोकळी झाली.
"असं का? मग ये अजून थोडी जवळ!, तुला ही सुगंधी आणि सुंदर असे फुले प्रदान करतो." श्रीकांत चेष्टेने बोलला.
"श्री हे खुप जास्त होते आहे. कंट्रोल यूवर सेल्फ." ज्योत्स्ना श्रीकांतला समजावत बोलली.
"कंट्रोल! करु? थांब, आता तुला कंट्रोलच दाखवतो." श्रीकांत काही तरी शक्कल करण्याच्या दृष्टीने बोलला.
"नको- नको श्री, मला भिती वाटते आहे तूझी. आणि तसे ही तुझे सारे कंट्रोल माझ्या समोर पाणी भरतात." ज्योत्स्ना मिश्किलपणे बोलली.
"असं का? मग ये बरं थोडी जवळ!, या पाण्याच्या पातळीत अजून एक डुबकी मारून तर पहा." श्रीकांत हसत- हसत बोलला.
"नको बाई! त्या डुबकीत माझी एकदाची ओटी भरलेली आहे." ज्योत्स्ना ही हसत बोलली.
"म्हणजे आता तूला माझ्यात रस नाही." श्रीकांत आश्चर्यकारकपणे बोलला.
"तसं नाही रे श्री?, खरचं तसं काहीच नाही?. मी आपलं सहजच भावनेच्या ओघा- ओघात बोलून गेले." ज्योत्स्ना गोंधळात टाकणारे उत्तर देऊन स्वताच प्रशनात फसली गेली होती.
"तू खरं बोलत आहेस ना ज्यो!." श्रीकांत जोत्सनावर नजरेचा कटाक्ष टाकत बोलला.
"हो रे श्री, अगदी माझ्या गळ्या शप्पथ. मी खरचं खरे बोलते आहे." ज्योत्स्ना गयावया करत बोलली.
"मग थोडी अजून जवळ ये बरं." श्रीकांतने आपला असफल डाव परत टाकत बोलला.
"हं! आले जवळ! बोल, माझ्या पती प्रेमाचा काय पुरावा हवा आहे?." ज्योत्स्ना बोलली.
"पुरावा तर हवाच आहे." श्रीकांत म्हणाला. आणि श्रीकांतचा डाव सफलतेच्या जवळ पोहोचलाच होता. पण?.
"मग बोल ना? पतीव्रता नारी आसण्याचा काय पुरावा हवा आहे तूला?." ज्योत्स्ना शुर मर्दानी झाशीची राणी होऊन बोलली.
"जास्त काही करायचे नाही फक्त?." श्रीकांत बोलला. आणि श्रीकांतच्या मनात प्रेम पकवानाचे लड्डू फुटत होते.
"फक्त काय? अरे बोल ना श्री!." ज्योत्स्ना अधीर मनाने बोलली.
"ज्यो डार्लिंग! मला फक्त एक "किस" हवा होता. तो मला देना प्लीज?." श्रीकांत अधीर आणि प्रणयी भावने बरोबरच, धाडसी शूरवीराच्या मनाने अजब प्रश्न टाकत बोलला.
ईईश्या! हे काय श्री!, आस काही तरीच नाही हं!, मागायचं?. मला बाई लाज वाटते आहे." ज्योत्स्ना लाजत- लाजत बोलली.
"ज्यो, राणीऽ त्यात काय झालं एवढं लाजायला." श्री हळुवार आवाजात ज्योत्स्नाच्या काना जवळ ओठ नेऊन म्हणाला.
तोच श्रीकांतच्या उबदार ओठांचा स्पर्श ज्योत्सनाच्या मऊसूत कानाच्या पाळीवर झाला. आणि ज्योत्स्ना अक्षरशः अनंद सुखांत नाहली. आणि धूंद प्रणयाच्या सुखाने अंगा- अंगाचे गात्र- गात्र ही स्खलित होतील. त्या क्षणांच्या आनंदी सागरात असिम तृप्तीचा अनुभव घेण्यासाठी, त्या सागरा जवळ पोहचली आणि अधिर मनाने म्हणाली.
...................................
भाग-०२
"येऽ श्रीऽऽ! बास ना रे आता?." ज्योत्स्ना एकदमच मदमस्त आवाजात म्हणाली.
"अगं मी तुझा लीगल नवरा आहे. कोणी ऐरा गैरा पुरुष नाहीये?. की एखाद्या रोड रोमियो ही नाहीये." श्रीकांत सुर चढवत बोलला.
"असं का!, मग मी एक काम करते. तुमचा सर्वमान्य हक्क स्वखुशीने तुमच्या स्वाधीन करते." ज्योत्स्ना ही मदहोशपणे बोलली.
"अगं ये, "ज्यो राणी" तुझं मन मला कधीही कळतंच नाही बघ. तू कधी मुड मध्ये येतेस आणि कधी मुड मध्ये नाहीस हे कळणे पण मला अवघड आहे बाबा." श्रीकांत खूप खुश होऊन मिश्किलपणे बोलला.
"आणि मग कधी कळणार माझे मन तुला?." ज्योत्स्ना श्रीकांतला छेडण्याचा उद्देशाने म्हणाली.
"हे काय आताच तर कळाले आहे. ये ज्यो अजून जवळ ये ना आणि एक गोड-गोड पापी दे ना. हे बघ ज्यो मी तुझा नवरा आहे. तू असे नखरे करशील तर मी साधं सरळ विचारणार नाही हं." श्रीकांत ही आगदीच आवेशाच्या स्वरात म्हणाला.
"काय करशील?." ज्योत्स्ना प्रणयी रंगात रंगून म्हणाली.
"मी माझा हक्क नवरा या नात्याने कसा मिळवायचा ते चांगल्याच प्रकारे जाणतो आहे. आणि तू काहीही म्हण, पण मी तुझा सप्तपदी आणि सप्त वचन घेऊन केलेला सर्वसाक्षी नवरा आहे. चल ये अशी गुमानं जवळ" श्रीकांत चावटपणे डावा डोळा हलकासा लववत म्हणाला.
"ईईश्या!, नवरा आहे म्हणून काय झाले?. आम्ही नाही हं, जाऽ बाई. आम्हाला खूप लाज येते आहे.". ज्योत्स्ना हळूवारपणे लाजत- लाजत म्हणाली.
"ये ज्यो, आता बास झाले हं, आता जास्त लाडात नको हं येऊ? नाही तर?. श्रीकांत रागाच्या लहेजात बोलला.
"नाही तर काय?." ज्योत्स्ना झटदिशी बोलून गेली.
"नाही तर मी बघेन बाहेर ऐखादी, नाजूक बांध्याची, रसाळ ओठांची, एखादी कमनीय सौंदर्या?." श्रीकांत अत्यंत मिश्किलपणे म्हणाला.
"बाहेर बघतोस काय???!, मग खुशाल बाहेरच बघ? मला कशाला विचरतोयस? म्हणे काय तर नाजूक बांधा, रसाळ ओठ, कमनीय सौंदर्या?." ज्योत्स्ना वाकडेतिकडे तोंड फिरवून आणि नाक मुरडत म्हणाली.
"अगं वेडाबाई, असं रागावून जाऊ नकोस? अगं मी तुझी सहजच फिरकी घेतली आहे." श्रीकांत अगतिक होऊन बोलला.
"फिरकी?ऽ, मग त्या कमनीय बांध्याच्या सौंदर्यालाच माग तुझा प्रेमाचा प्रणयी किस आणि प्रणयाची देणगी. आणि मला मात्र आता शांत झोपून दे. उगाच डिस्टर्ब करू नकोस." ज्योत्स्ना म्हणाली. आणि ज्योत्स्ना मनातून खरंच खूप रागावली होती.
"अगं ज्यो, आस रागावून जाऊ नकोस? अगं मी फक्त रोमॅन्टीक क्षणांना विनोदाची झालर लावली होती." श्रीकांत त्रासिक सुरात बोलला.
"मग श्री तू आस करत, तीच झालर या चादरीला लाव आणि तू शांतपणे झोप आणि मला ही झोपू दे?. उद्या सकाळी लवकर उठायचे आहे." ज्योत्स्ना रूसव्याच्या स्वरांत म्हणाली.
"आता पुढे काय म्हणता?, मला वाटते आहे की, त्या सुरेख कमनीय बांध्याच्या सौंदर्याला लवकरच शोधायलाच हवं आहे. आणि ऐखादी छानशी शिक्षा ही तीच्या नावांवर करायला हवी आहे. नाही तर माझी ज्यो राणी, अजूनच रागावून जाईल, हो की नाही 'ज्यो राणी?'." श्रीकांत मिश्किलपणे म्हणाला.
"हे बघ श्री! तूझा असा चावटपणाचा मिश्किलपणा माझ्या सहनशीलतेची नेहमीच परिक्षा घेत असतो. आणि एक गोष्ट अशी की, आपली बायको जवळ असतांना. तुला दुसऱ्या एखाद्या कमनीय की सौंदर्या फर्गेटिईट, जाऊ दे ते. पण तुला दुसऱ्या एखाद्या स्त्रीचे विचार सुचतातच कसे?." ज्योत्स्ना त्वेषाने उदगार काढत बोलली.
श्रीकांतला गंभिर परिस्थितीचा अंदाजा येतो. आणि या गंभीर परिस्थितीला योग्य रित्या हाताळण्यासाठी श्री तो विषयच बदलून टाकतो. आणि लटक्या सांत्वनाने ज्योत्स्नाला समजाविण्याच्या सुरात म्हणतो.
"अगं पण ज्यो, मी सहजच विनोदी विषय केला आहे. आणि तू मात्र "पराचा कावळा" करत आहेस." श्रीकांत कुत्सितपणे ज्योत्स्नावर एकेरी नजर रोखीत म्हणाला.
"मी पराचा कावळा करते आहे. आणि तू काय करतोयस. तुला वाटतं मला काहीच समजत नाही आणि मला काहीच माहिती नाही?. मी ऐवढी नादान नाहीये. आणि आता परत गडे मुडदे उखाडू नकोस आणि आता मला सगळे पुनश्च वदवून नकोस." ज्योत्स्ना रागात म्हणाली.
"असं का? मग काय- काय तुला माहिती आहे?. जरा आम्हाला ही कळू देत." श्रीकांत ईरिटेईटींग मुड मध्ये येऊन बोलला.
"हो!, मला तूझी सारी रंगीन- संगीन माहिती आहे, आणि अशी माहिती तर ठेवावीच लागते." ज्योत्स्ना चिडक्या स्वरात बोलली.
"काय करणार!, अशी माहिती ठेऊन?. ही माहिती आता तू कोर्टात सादर करणार का?." श्रीकांत प्रश्नार्थक नजरेने बोलला.
"हो गरज पडली तर ते ही करावे लागेल." ज्योत्स्ना वैतागून म्हणाली.
"कोर्टात काय माझ्यावर तू केस करणार आहेस का?." श्रीकांत प्रश्नार्थक मुद्रेने चेहरा करून बोलला.
"अशी माहिती खरी निघाली तर ते ही करावे लागेल." ज्योत्स्ना सडेतोड भाषेत म्हणाली.
"मग तू आस कर की?." श्रीकांतचे अर्धवट वक्तव्य.
(श्रीकांत पुढे बोलतांनाच अर्धवट वाक्यावरच थांबतो. कारण ज्योत्स्ना त्याच वाक्य पूर्ण न होऊ देता मध्येच बोलते.)
"कसं करू म्हणतोयस?." ज्योत्स्ना गंभीर पण अधीरतेच्या भावनेने म्हणाली.
"तू मला बोलू देशील तर खरं?." श्रीकांत रागाच्या सुरांत बोलला.
"बरं बोला श्री महाराज!, काय करू शकते मी आपल्या सेवेसाठी." ज्योत्स्ना श्रीकांतला डिचवण्याच्या सुरांत म्हणाली.
"ये ज्यो, आता तू खरचं माझ्यावर केस करणार आहेस की काय?." श्रीकांत एक बाणा सारखा प्रश्न फेकून बोलला.
"तूला असं वाटतं की मी, तूझ्यावर कोर्ट केस करू शकेन?." ज्योत्स्ना प्रश्नार्थक पण उद्विग्नता पुर्ण स्वरांत म्हणाली.
"तू ज्या तथाकथित माहिती आधारे बोलत आहेस. त्या योगे तर मला असं होऊ शकते अशी शंका आताच मला येते आहे?." श्रीकांत सुध्दा उद्वेगाच्या भावनेने त्रस्त होऊन बोलला.
"बरोबर बोलला आहेस तू, अरे श्री, ती वेळ येऊच नये म्हणूनचं तर अशी गुप्त माहिती ठेवावी लागते." ज्योत्स्ना एखाद्या रहस्यभेद जाणाऱ्या जादुगारा प्रमाणे रहस्यमयी स्वरांच्या भावनेने म्हणाली.
"बरं तू ठेव तूला जशी माहिती ठेवायची ती?."...? श्रीकांत आता काढता पाय घेत बोलला.
"आणि अशी माहिती ठेवणेच योग्य आहे. नाही तर सगळेच नवरे घरा बाहेर काय- काय दिवे लावत आसतील ते आम्हा गृहिणीना घरी बसल्या- बसल्या थोडेच कळणार आहे. पण अशी गुप्त माहिती ठेवणेच उपयुक्त ठरत असते आम्हा गृहिणींना." श्रीकांतचं वाक्य पूर्ण न होऊ देता ज्योत्स्ना मध्येच बोलते.
"मग सांग तरी!, काय- काय गुप्त माहिती आहे तुम्हा बायकांना?." श्रीकांत न रहावून बळेच बोलला.
"हेच की, पुरुष मंडळी कुठं- कुठं शेण खायला जाणार आणि कुठून- कुठून शेण खाऊन येणार." ज्योत्स्ना जासूद बनुन म्हणाली.
"हे बघ ज्यो, तुझ्या जीभेला जरा लगाम ठेव. आणि शेण खायला मी काय एखादे डुक्कर वगैरे आहे का?." श्रीकांत रागाच्या भरात बोलला.
"डुक्कर आहे की नाही माहिती नाही पण! शेण खायला डुक्कर होण्याची गरज नसते पूरूषांना? पुरूष मंडळी तर आस ही शेण खायला तयार असतात आणि तसे ही शेण खायला तयार असतात.
"म्हणजे तुझ्या नजरेत मी ही एक स्त्रीलंपट पुरूष आहे. ईतर स्त्रीलंपट पुरूषांन सारखाच आहे. त्यांच्यात आणि माझ्यात काहीच फरक नाहीये. अर्थात मी स्वच्छ चारित्र्याचा एक स्वच्छ माणुष्य ही नाहीये. तुझ्या दृष्टीने मी सुद्धा एक तुच्छ प्राणी आहे." श्रीकांत त्वेषाच्या आवेशात बोलला.
"खरचं की असं असतं तर बरं झालं असतं. पण तुम्ही पूरुष मंडळी, प्राणी आहेत की नाही ते माहिती नाही पण भोगलोलुप ऐखादा पक्षी जरुर आहेत.
"आणि तो कुठला नशिबवान पक्षी आहे मी?." श्रीकांत विनोदाच्या लहेज्यात बोलला.
"तो नशिबवान कुठला?, तो तर एक नंबरचा बोलघेवड्या आणि लंपट विचारी आहे." ज्योत्स्ना ही मिश्किलपणे म्हणाली.
"म्हणजे आम्ही सगळे पुरूष लंपट आणि अविचारी आहोत तर?." श्रीकांत हेक्याच्या सुरांत म्हणाला.
"नाहीतर काय? सगळे मेले सारखेच?." एकाच माळेचे मणी." ज्योत्स्ना तिटकाऱ्याच्या भावनेने म्हणाली.
"तुला नेमकं काय म्हणायचे आहे." श्रीकांत धाडकन बोलला.
"मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की,." ज्योत्स्ना म्हणाली. पण श्रीकांत तिचे वाक्य पूर्ण न होऊ देता मध्येच फटदिशी फटक्यात बोलतो.
"काय!, म्हणायचे आहे?." श्रीकांत झटक्यात बोलला.
"तू मला बोलू देशील तर मी बोलेल ना पुढे." श्रीकांत लटक्या रागात बोलला.
"बरं! बोल काय म्हणायचे आहे तुला." श्रीकांत आपले वाक्य आटपुन घेत बोलला.
"मला असं म्हणायचे होते की, तुझ्या सारखे सगळे पुरुष रंगीला पोपट बनून कधी या मैनेशी, कधी त्या मैनैशी सारखं गुटरगू- गुटरगू करत असतात?.
"अगं ज्यो, गुटरगू पोपट नाही करत तर कबुतरे करत आसतात?." श्रीकांत मिश्किलपणे चेहरा करत म्हणाला.
"मग तू आस कर की, एक प्रेमभरी चिठ्ठी लिहून पाठव त्या गाव सटवीला. आणि मग "कबूतर जाऽ, जाऽ" करत बस." ज्योत्स्ना रागाच्या भरात म्हणाली.
(आता तर ज्योत्स्नाचे ओठ जड होतात आणि खरोखरच डोळे टचदिशी भरून येतात.)
"अगं! असं रडण्या सारखं ऐवढ काय झालं आहे. मी फक्त टाईमपास म्हणून बोललो होतो. आणि माझी गुणांची ती "ज्यो राणी" हे बघ असं रात्री- अपरात्री रडू नकोस? आईला जर हे रडणे ऐकुण जाग आली तर, ती ही तुझ्या बरोबर या वाक यूध्दात सामिल होऊन. तुम्ही दोघी ही सासू- सुना मला चारीमुंड्या चीत्त करून धरणीची धुळ खायला भाग पाडल्या शिवाय राहणार नाहीत?." श्रीकांत कसलातरी विचार करत बोलला.
"तर आम्ही सासू-सुना मिळुन नेहमीच असं करत आसतो. त्यात काय नवीन आहे. मुळातच त्या माझ्या सासूबाई नाहीत तर माझ्या दुसऱ्या आईचं आहेत."
"बरं हा रुसवा सोड ना आता!, नाहीतर मी तूला गोड - गोड पापा नाही देणार?." श्रीकांत मिश्किलपणे टाईमपास करण्याच्या मुड मध्ये म्हणाला.
"चल हटऽ! म्हणे मी पापा देणार नाही?. नकोय तूझा पापा?. तुझा पापा तू तसाच जपून ठेव. आणि हो कोणती ही व्यक्ती असो, ती असा टाईमपास व्हावा म्हणून दवंडी पिटत पापा मागत नाही?. आणि कोणती ही शहाणी व्यक्ती असे पापी द्यायचे विचारत आसते का?." ज्योत्स्ना थोडी गंभीर होत म्हणाली.
"अगं त्यात वाईट काय आहे?. एक साधा किस तर मागत आहे. या मॉर्डन जगात आज काल सगळीकडे हे तर आगदीच नॉर्मल होत चालले आहे?. काही काही प्रेमवीर तर भर चौकात चार लोकांन समोर, किंवा भर रस्त्यात एकमेकांचे चुंबन घेतात. आणि तू व मी तर आपल्या प्राइवेट बंदिस्त बेडरूम मध्ये आहोत. ईथे काय लाजायचे! आणि ते ही आपल्या नवऱ्याच्या समोर?. अगं साधं चुंबन तर जग मान्यता प्राप्त प्रेमाचा पहिला हक्क आहे." श्रीकांत खुपचं रोमॅन्टीक मुड मध्ये येऊन बोलत असतांनाच ज्योत्स्ना त्यांच्या तोंडावर हात ठेवून. त्याला गप्प करते.
"हो! जागात ज्या गोष्टीला मान्यता प्राप्त आहे. ती गोष्ट मला मान्य नाही?. बस!." ज्योत्स्ना गंमतीच्या सुरात म्हणाली.
"का? मान्य नाही?, मग असं मान्य करणारी, मी दुसरी एखादी बघू काय?." श्रीकांत मिश्किलपणे ज्योत्स्नाला डिचवण्यासाठी बोलला.
"अं हं! हे पक्कं गाठीशी बांधून ठेव की, माझ्या जवळ हे असले नसते थेरं चालणार नाहीत?. आणि असले हे बाहेरख्यालीचे चाळे करायचेच आसतील, तर मग मला विचार करावा लागेल." ज्योत्स्ना रागाच्या सुरांत म्हणाली.
"विचार करावा लागेल? म्हणजे काय?." श्रीकांत प्रश्नार्थक पणे बोलला.
"हे बघ श्री, तुला समजले आसणारच? नाही तरी ऐवढा शहाणा तर तू आहेसच की? उगाच एवढा मोठ्ठा बिझनेस असाच नाही उभा केला आहेस?." ज्योत्स्ना तत्क्षणी म्हणाली.
"हे बघ ज्यो, हे खुप जास्त होते आहे. अगं कुठली गोष्ट कुठे नेऊन मांडली आहेस तू?." श्रीकांत नाराजीच्या सुरात बोलला.️
"हे बघ श्री, सुरूवात तू केली आहेस. मी तर काहीच बोललेली नाहीये?." ज्योत्स्ना आता वाक यूध्दातून काढता पाय घेत म्हणाली.
"बरं ठीक आहे, मी तूझी माफी मागतो आहे. आणि दोन्ही कान ही पकडतो आहे. आता तर ठीक आहे ना. माझ्या "ज्यो राणी"?." श्रीकांत आपले सगळेच वाक हत्यारांचा त्याग करून बोलला.
"हे बघ श्री, आता जास्त नाटक नकोस करुस हं?. खाली कर बरे ते कानावरचे हात." ज्योत्स्ना थोडासा हिरमुसला चेहरा करत म्हणाली.
"हं 'ज्यो, राणी साहेब', खाली केले हात. हुकम करा 'ज्यो, राणी सरकार'. आपला "श्रीकांत धनराजेश्वर फडवणीस" नावाचा गुलाम आपल्या सेवेत हजर आहे." श्रीकांत गुलामाचा अभिनय करत बोलला.
"आणि हो श्री डार्लिग, उठाबशा काढायला मात्र तू साफ विसरला होतास?." ज्योत्स्ना विनोदी लटक्यात बोलते.
"'ज्यो राणी साहेब', धन्य आहेत आपले विचार आणि धन्य आहेत आपले उपकार. मला विसरलेल्या सदकर्माची आठवण करून दिली आहे आपण. खरेतर मला हे उठाबशा काढायचं गणित लक्षांतच आले नव्हते. मग काय म्हणतेस, आता काढू का उठाबशा?. हे बघ एक, दोन, तीन....?." श्रीकांत लगेचच ज्योत्स्ना समोर उठाबशा काढायला सुरुवात करु लागला.
...............................
भाग-०३
अरे श्रीऽ बास ना आता?." ज्योत्स्ना बोलली.
( श्रीकांत आणि जोत्सना दोघे ही दिलखुलासपणे हसत-हसत एकमेकांन जवळ येतात. आणि श्रीकांत ज्योत्स्नाच्या डोळ्यात डोळे घालून पाहू लागतो. ज्योत्स्ना ही श्रीकांतच्या डोळ्यांत डोळे घालून भान विसरून पाहू लागते. श्रीकांत आपला हात उचलून ज्योत्स्नाकडे वळवतो आणि तिचा हात गपकन धरतो. श्रीकांतला ज्योत्स्नाचा हात थंड लागतो. त्या स्पर्शाने तो सुखावतो. आणि जसा श्रीकांत ज्योत्स्नाचा हात पकडतो तसा ज्योत्स्नाला श्रीकांतचा स्पर्श उबदार लागत असतो. तीला तो स्पर्शाने हवाहवासा वाटू लागतो. तिला या उबदारपणा असलेल्या मायेच्या स्पर्शात, नेहमीच तीची ती पहिली मधूचंद्राची रात आठवत असते. आशा कित्येक धूंद रात्री आता पर्यंत येऊन गेल्या आहेत. पण पहिल्या मधूचंद्राची मदहोश रात्र कायम स्मरणात आहे. आणि त्या आठवणी हृदयाच्या खोल कप्प्यात सुगंधी ईत्रा प्रमाणे हृदयाच्या कोषात जपून, साठवूण ठेवलेल्या आहेत. आणि सोबतच स्मरणात आहे, तो श्रीकांतचा पहिला उबदार स्पर्श, तो त्यांचा पहिला गरम श्वास!, आजुन ही तो जसाच्या तसाच मनाच्या खोल पटलावर कोरला गेलेला आज ही आठवतो आहे. त्यांच्या त्या अधिर आणि आसुसलेल्या मनाची धुंदच वेगळी होती. आणि मधूचंद्राची ती एक वेगळीच झिंग होती. जी आज ही नसानसात मनमयूरी बनुन, प्रितीच्या वर्षावात बेधुंद होऊन चिंब पावसात नृत्याचा साज रचत होती. ती पहिली रात्र म्हणजे एक मखमली आठवण आहे. आणि खरं सांगायचं तर त्या नंतरच्या अनेक रात्री मनमुराद प्रणय झाले. पण पहिल्या मधुचंद्राच्या रात्रीची बात काही औरच होती. तशी भावना आणि ती मनाची तगमग जीवाची घालमेल परत नाही कितीही प्रयत्न करा, पण तो समय, ती वेळ परत भेटणार नाही, परत फिरणार नाही. जेंव्हा श्रीकांतने ज्योत्स्नाचा हात पकडला होता. त्या एक-दोन क्षणांत तिच्या मनात या मोरपंखी आठवणी सहजच तरळून गेल्या. ज्योत्स्नाच्या आयूष्यात असे मोहाचे क्षण फारच क्वचितच येतात. पण तिने आता स्वःताला सावरुन घेणे आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मन बनवले आहे.
श्रीकांतने ज्योत्स्नाचा हात पकडुन तिला हलकेच ओढले आणि त्या झटक्या सरशी श्रीकांतच्या दृढ बाहुपाशात ओढली गेली. श्रीकांतने लगेचच ज्योत्स्नाला घट्टपणे आवळुन धरली. तोच तिच्या कोमलांगी शरीरात एक शिरशिरी दौडत गेली. तिच तन-मन-भान हरवत चालले होते. आणि श्रीकांत सुध्दा बेभान होऊन तिला घट्ट बाहुपाशात आवळत होता. जसा नागराज आपल्या सावजाला विळखा घालत आवळत असतो. अगदी तसाच श्रीकांत जोत्सनाला आवळत होता. ज्योत्स्ना यामुळे अधिकच सुखावत होती. आणि सुखाच्या वायू लहरीवर भरारी घेत केवळ तरंगत होती. हळूहळू दोघे प्रणयात एक जीव होऊन रममाण होत होते. श्रीकांतने मदहोशपणे तिच्या रेशमी मुलायम केसांत आपल्या टपोऱ्या बोटांनी चाळा करावयास सुरुवात केली. ज्योत्स्नाच्या केसांच्या नाजूक बटा खालुन श्रीकांतचे बोटे हळूहळू फिरत होती. आणि अचानक पणे श्रीकांतच्या बोटांचा स्पर्श तिच्या मानेवर आणि कानाच्या पाळ्यांवर अलगद झाला. ती अजूनच कावरीबावरी झाली. आणि श्रीकांतला तिने अजूनच आवळून धरले. आणि श्रीकांतच्या पाठीवर ज्योत्स्नाच्या दहा बोटांची छाप उमटली आणि तिला ही सगळ्या दुनियेच्या बंधानांचा विसर पडला. ती मन मोहित झाली. आणि श्रीकांतला अजूनच घट्ट बिलगून गेली.
अशाच प्रकारे बराच वेळ जातो. आणि काही वेळाने ती श्रीकांत पासून विलग होते. तसेच श्रीकांत तिला पाहतो. ती लाजते. आणि परत आपला चेहरा हाताने झाकून लपवत-लपवत लाजू लागली. तोच श्रीकांतच्या अधुऱ्या प्रश्नाला खाडकन् जाग आली.
"आता तरी मिळेल का एक किस माझ्या लाडक्या ज्यो राणी?." श्रीकांत मिश्किलपणे म्हणाला.
ज्योत्स्ना तर लाजेने अगदीच चुर-चुर होऊन गेली. तरीही ती शांतपणे पडून राहिली.
"आता का परत भांडायचा विचार केला आहे का श्री?." ज्योत्स्ना मदहोशपणे बोलली.
"हो परत भांडायचे आहे, परत मनवायचे आहे. गेलेले सर्व क्षण परत जगायचे आहेत. तूझ्या सोबत हसायाचे आहे, आणि तूझ्या सोबत रडायचे आहे." श्रीकांत अगदीच मदमस्त होऊन बोलला.
"हसणे तर ठीक आहे, पण माझ्या सोबत तू रडणार कसा?." ज्योत्स्ना श्रीकांतची फिरकी घेण्यासाठी बोलली.
"खरं सांगू?, की खोटं सांगू? ." श्रीकांत म्हणाला.
"अगं बाई! आता हे काय? आस पण असतं का?." ज्योत्स्ना म्हणाली.
"हो तर आस ही असतं?." श्रीकांत म्हणाला.
"मग आगोदर खरं सांग पाहू?." ज्योत्स्ना म्हणाली.
"तुझ्या सोबत रडायचे झाले तर मी तुझ्या गळ्यात गळा घालून रडणे पसंत करेन?." श्रीकांत म्हणाला.
"आणि खोटं सांगायचे तर?." ज्योत्स्ना म्हणाली.
"तर मी तुझ्या सवयीच्या गळ्यात गळा घालून रडणे पसंत करेन?." श्रीकांत म्हणाला.
"श्री तू काय बोललास? परत एकदा बोल?." ज्योत्स्ना म्हणाली.
"अगं माझे लाडके "ज्यो राणी" मी विनोदाने म्हणालो. असंच सहजच म्हणालो." श्रीकांत म्हणाला.
"हे बघ श्री आता खुप रात्र झाली आहे. तू आता भांडणाला परत सुरूवात करु नकोस." ज्योत्स्ना म्हणाली.
"अंग मी भांडणाला सुरूवात करत नाही. पण तूच तर म्हणालीस की खरं सांग आणि खोटं ही सांग म्हणुन. म्हणून मी तुला खोटं-खोटं सांगितले." श्रीकांत म्हणाला.
"असं का ? मग ठीक आहे." ज्योत्स्ना म्हणाली.
"खरंच माझी "ज्यो राणी" किती भोळी भाबडी आहे." श्रीकांत म्हणाला.
( श्रीकांत मनात विचार करू लागतो," खोटं सांगितलं तर एवढी भांडते आणि प्रत्यक्षात जर मी एखादी मुलगी हिच्या समोर आनून उभी केली आणि ज्योत्सनाला मी म्हणालो की, "ज्यो राणी" माझे "ज्यो राणी" ही बघ तुझी आज पासून नवी लाडकी सवत मी आनली आहे." तर ही तेंव्हा काय गोंधळ घालून सारी दुनिया उलथापालथ करेन ते कल्पना न केलेलेच बरे आहे.")
.......................................
पुढचा भाग-०४
"काय रे काय झालं असा गप्प का झालास तू?." ज्योत्स्ना संतापलेल्या मनस्थितीत म्हणाली.
"काही नाही गं सहजच एक विचार मनात आला?." श्रीकांत जोर देत म्हणाला.
"कुठला विचार मनात आला?." ज्योत्स्ना उत्सुकतेने म्हणाली.
"जाऊ दे तो ? नाही तर परत भांडशील आणि म्हणशील तू असा घाणेरडा विचार सूध्दा करत असतोस ?. आणि परत बेडरूमचं कुरुक्षेत्र बनवशिल?." श्रीकांत भांडणाच्या सुरात म्हणाला.
"अरे श्री काय बोलतोयस तू मी का मूददामहुन तुझ्याशी भांडत आसते का?." ज्योत्स्ना उगाच भित्री मांजर होऊन म्हणाली.
"मग नाही तर तू नेहमी मुद्दामच भांडण करत असतेस?." श्रीकांत ही शेपुट घातलेला नेभळट भित्रा कुत्रा बनून म्हणाला.
"मी कधी रे तुझ्याशी मूद्दामहुन भांडण करत असते." ज्योत्स्ना रागाच्या भरात म्हणाली.
"हाताच्या कंगनाला आरशाची काय गरज आसते का?. हेच बघ ना, आताच तू या क्षणांला ही माझ्याशी भांडण करत आहेस." (श्रीकांत ज्योत्स्नाला वाकडे लावत बोलतो.) आणि म्हणे मी कधी रे तुझ्याशी भांडत असते." श्रीकांत म्हणाला.
"हे बघ श्री तू जा आता, आणि मला कसल्याही प्रकारे बोलायचा प्रयत्न करु नकोस? समजलास? गुपचूप झोप आता?." ज्योत्स्ना म्हणाली. (आणि ज्योत्स्ना दुसरीकडे तोंड फिरवून झोपण्याचा प्रयत्न करते).
"लिसन प्लीज तू ही मला कसल्याही प्रकारे बोलायचा प्रयत्न करु नकोस? समजलीस?." श्रीकांत ऑफिशियल ऑटिट्युड मध्ये म्हणाला.
"तु ही गपगुमानं झोप आता?." ज्योत्स्ना बायकोचा आदेश देत म्हणाली.
आणि श्रीकांत सुध्दा दुसरीकडे तोंड फिरवून झोपण्याचा प्रयत्न करतो. पण दोघे किती ही झोपेचे सोंग घेऊन झोपण्याचा प्रयत्न करतात पण दोघांना ही झोप काही येत नाही.
मग असाच काहीसा वेळ निघून जातो. आणि दोघे ही सोबतच डोळे मिटून घेतात. आणि शांत होतात. थोड्या वेळाने आकस्मितपणे दोघांचे ही डोळे सोबतच परत उघडतात. आणि एकमेकांना एक नजर पाहतात. आणि परत तोंड फिरवून झोपण्याचा पवित्रा घेतात.
पण यावेळी दोघे ही एकमेकांच्या विरूद्ध दिशेने तोंड फिरवून झोपण्याचा विचार करतात. पण काही केल्या झोप मात्र येत नाही. मग हळूहळू दोघे ही बोलू लागले. आणि परत शब्द भातूकलीच्या लढाईचा खेळ सुरू होतो. आणि केवळ एकमेकांच्या ओठांच्या हालचालीच सुरू होऊ लागतात. श्रीकांत ही न राहावून बोलतो.
"ये ज्यो मला उद्याला सकाळी लवकर उठव बरं. उघा महत्वाची कॉन्फरन्स मिंटींग आहे." श्रीकांत सेंन्टीमेंटल होत म्हणाला.
"हो समजलं पण उद्याला सकाळी लवकर उठायचे असेल तर आता लवकरच झोपायला हवे आहे." ज्योत्स्ना तटस्थपणे म्हणाली.
"हो समजलं मला ऐवढा शहाणा माणूस आहे मी." श्रीकांत अविचारी मनाने म्हणाला.
( ज्योत्स्ना बेडवर पडल्या- पडल्या डोळे मिटून फक्त ओठांनी बोलते. आणि श्रीकांत कडे पाहत सुध्दा नाही. )
"बरं-बरं झोप आता मी उठवेन सकाळी तूला." ज्योत्स्ना जबाबदारीने वक्तव्य करत म्हणाली.
"आणि तू ही जागी राहू नकोस हो! तू ही शांत झोप?." श्रीकांत जोत्सनाला समज देत म्हणाला.
(श्री सूध्दा बेडवर पडल्या- पडल्या डोळे मिटून घेतो. आणि फक्त ओठांनीच बोलतो. तो ज्योत्स्ना कडे साधं पाहत सुध्दा नाही. आणि तशाच स्थितीत बोलतो.)
"आता मेली कशी शांत झोप लागणार?." ज्योत्स्ना चव नसलेल्या बेचव पद्धतीने म्हणाली.
"का? नाही, शांत झोप लागणार?."श्रीकांत ऐटीत म्हणाला.
"माझी शांती तर तू पळवून लावली आहेस. आणि म्हणे शांत झोप? हंम्म." ज्योत्स्ना सुरू चढवत म्हणाली.
"मी कुठं गं तूझी शांती पळविली आहे?." श्रीकांतचा ही सूर चढला म्हणाला.
"तू नाही तर कोणी पळविली आहे?. बाहेरून का कोणी आले होते माझ्याशी भांडण करण्यासाठी." ज्योत्स्नाने लख्ख पणे उत्तर दिले.
"तुच सांग आधी माझ्याशी कोणी भांडण केले आहे?." श्रीकांत 'भिगी बिल्ली' बनत म्हणाला.
"सुरूवात तर तूच केली होतीस?." ज्योत्स्ना प्रश्नांची उत्तरे देत म्हणाली.
"आणि तू काय केले होतेस?." श्रीकांत प्रतीप्रश्न टाकत म्हणाला.
"मी जीवनाच्या वाटेवर थांबलेल्या प्रश्नांना ना उत्तरे देत होते." ज्योत्स्ना एखाद्या तत्वज्ञानी प्रमाणे विचार करत म्हणाली.
"आणि मी सुध्दा जीवनात आलेल्या मोठ्या संकटरुपी प्रश्नांना कोड्यांना सोडवत होतो." श्रीकांत ही तसेच उतर देत म्हणाला.
"आधी या रात्रीच कोड सोडवा." ज्योत्स्ना हसत म्हणाली.
"अगं मी तेच तर करत होतो." श्रीकांत ही मंद हास्य करत म्हणाला.
"श्री तु काय करत आहेस, ते चांगलेच समजते मला." ज्योत्स्ना श्रीकांतला डिचवत म्हणाली.
"अगं मी! फक्त तुझ्यासाठी रोमॅन्टीक क्षणांनाची उधळण करीत होतो." श्रीकांत हळूहळू रोमहर्षित होत म्हणाला.
"ही अशी असते का रोमॅन्टीक क्षणांनाची उधळण! अरे ही तर मेंदूची फार घुसळण केली आहेस तू?." ज्योत्स्ना म्हणाली.
"हे बघ परत बेडरूमचं रणांगण करूं नकोस ज्यो." श्रीकांत काढता पाय घेत म्हणाला.
"मी कुठे करते आहे रणांगणात. खरे तर रणांगणात तूला लढायला आवडते. मी तर बिचारी बापुडी शांत आणि आपल्याच कोषात विसावा घेत रमलेली असते." ज्योत्स्ना म्हणाली.
"आऽ हा, हा, ही पहा बिचारी बापुडी, सैन्या बरोबर राजाला ही चारीमुंड्या चीत्त करून राजमहालावर स्त्री शक्तीचा झेंडा गाडणारी. ही आहे बिचारी बापुडी?." श्रीकांत त्वेषाने तुटून म्हणाला.
"हे बघ श्री तूला जे हवं ते तू समजू शकतोस. आणि मला जे हवं आहे ते मी चांगलेच जाणते. समजलस!." ज्योत्स्ना सराईत कारागारा प्रमाणे काम उरकून म्हणाली.
"हो समजलं! आणि तूझा हा जाणतेपणा एक दिवस मला नक्कीच महागात पडणार आहे." श्रीकांत भीतीच्या सावटा खाली जात म्हणाला.
"तो तर पडणारच आहे. त्याशिवाय का मी गप्प बसणार आहे. मी पत्नी आहे म्हणटलं तूझी. देवाधर्माच्या साक्षीने केलेली आणि सर्व समाजमान्य असलेली आहे." ज्योत्स्ना गर्वाने म्हणाली.
"मग पत्नी धर्म कधी समजणार तूला?. पती तर पत्नीसाठी परमेश्वर असतो. आणि तू परमेश्वराला आस नाराज करत आहेस. त्यांच्या प्रणयी भावनेच्या चुराडा करते आहेस. पाप लागेल तूला पापं." श्रीकांत नसलेले शास्त्र ज्ञान झाडत म्हणाला.
"असं का? आणि हे कोण बोलते आहे. जो स्वतः दुसऱ्याच्या भावनांची होळी करतो. तो आशा गोष्टी करीत आहे. "अहो आश्चर्यम"." ज्योत्स्ना ही संस्कृत वचनांचा सहारा घेत म्हणाली.
.....................
भाग-०५
"मी कधी गं तूझ्या भावनांची होळी केली आहे. मी तर नेहमीचं तूझ्या सुंदर भावनांचा आदर सत्कार करण्यात आपला तन-मन-देह अर्पण करत असतो." श्रीकांत म्हणाला.
"आ हा हा म्हणे तन-मन-देह अर्पण करतो. ऐवढा वेळच असतो का साहेबांकडे. जेंव्हा बघावं तेंव्हा साहेब कधी फॅक्टरीत गेले कधी कंपनीत गेले. तर कॉन्फरन्स सुरू झाली. कधी मिटींग सुरू झाली. कधी क्लाईन्ट भेटायला आला. आणि आपली लाडाची बायको मात्र खड्यात गेली." ज्योत्स्ना म्हणाली.
"अगं काय तर करावेच लागते. त्या शिवाय का "ज्यो ची", "ज्यो राणी" बनणार आहे." श्रीकांत म्हणाला.
"ईईश्या! तू ना एक नंबरचा मनकवडा आहेस बघ." ज्योत्स्ना म्हणाली.
"मी आणि मनकवडा!, तो कधी आणि कसा काय बरं झालो?." श्रीकांत गुगली होत म्हणाला.
"हेच की तूला बरोबर कळतं की समोरच्याच हृदय कसं जिंकून घ्यायला हवं आहे." ज्योत्स्ना पती प्रेमाचं इंप्रेशन मारत म्हणाली.
"याचा अर्थ असा आहे की, मी तुझं हृदय जिंकले आहे. आता तर मला ही माझ्या कानावर अविश्वास होतो आहे." श्रीकांत म्हणाला.
"होणारच त्यांना ही गोड-गोड गोष्टीची सवय अजून तरी झालेली नाहीये." ज्योत्स्ना श्रीकांतची कळ काढत म्हणाली.
दोघे ही एकमेकांकडे पहातात. आणि एकसाथ जोरदार हसतात. आणि अचानक जाणीव होते की खूप रात्र झाली आहे. आणि परत हळूहळू आवाजात मंद हसायला लागतात.
"ये ज्यो जवळ ये ना." श्रीकांत चावटपणे म्हणाला.
"जवळच तर आहे तूझ्या मी." ज्योत्स्ना श्रीकांतला दुर झटकत म्हणाली.
"नाही गं अजून जवळ ये ना." श्रीकांत लाडात येऊन म्हणाला.
"नको जास्त जवळ आले तर मातीच्या माठाला तडा जाईल आणि तो फुटून जाईल. आयमीन माठ इशशश. फॉरेवर तेच ते फुटून जाईल." ज्योत्स्ना काही तरी आठवत म्हणाली.
"आता हे "पाण्याचे माठ" कुठून मध्येच आले आहे." श्रीकांत म्हणाला.
"हे तर युगांयुगांन पासून मध्ये आले आहे. श्रीहरी, गवळणी, मधूरा आठवते का?" ज्योत्स्ना म्हणाली.
"म्हणजे काय? आठवते तर . पण तुला नेमकं काय म्हणायचे आहे." श्रीकांत म्हणाला.
"एवढंच की, जरा सांभाळून वागावं माणसाने." ज्योत्स्ना म्हणाली.
"म्हणजे गं!." श्रीकांत भोळा होत म्हणाला.
"म्हणजे वाघाचे पंजे." ज्योत्स्ना बाललीला करत म्हणाली.
"ये जास्त भाव नको खाऊस नीट सांग आता." श्रीकांत सडेतोड जवाब मागत म्हणाला.
"अरे जास्त जवळ आले तर गडबड घोटाळा होईल." ज्योत्स्ना समजदार होत म्हणाली.
"आणि तो कसा होईल." श्रीकांत भोळासांब होत म्हणाला.
"ती म्हण आहे ना," नवरा बायको दोन गाडग्या- मडक्या सारखे असतात. त्यामुळे गाडग्याला गाडगं लागणारच, मडक्याला मडकं लागणारच. आणि आस झाले तर गाडगे-माठ फुटणार नाही का?." ज्योत्स्नाचं म्हणाली.
आणि तत्वज्ञान ऐकुण श्रीकांतला खरचं चक्करच आली. कारण ऐवढ अगाध ज्ञान समजा सहजी मिळत नसते. तो तर निहाल होऊन गेला.
"ज्यो तू खरचं ग्रेट आहेस. "क्या दूर की कौडी" शोधून काढली आहेस. तुझ्या अगाध ज्ञानी पणाचा जवाब नहीं हैं." श्रीकांत म्हणाला.
"शेवटी बायको कुणाची आहे." ज्योत्स्ना भुवया उडवत म्हणाली.
"हे मात्र तू शंभर टक्के खरे बोलली आहेस. बायकोवर नवऱ्याचे, लेकरांवर आईचे, आणि लेकरांचे संस्कार घरांवर दिसून येतातच." श्रीकांत म्हणाला.
"हो हे खरं आहे. पण इतर गोष्टीत खरं बोलण्याचं कॉन्ट्रेक्ट फक्त मीच घेतले आहे." ज्योत्स्ना गुपीत प्रशनाला उघडे करण्यासाठी म्हणाली.
"असं का मग मी कुठलं कॉन्ट्रेक्ट घेतले आहे. मला तर वाटतं. मी एका राणीला खुश करण्याचे कॉन्ट्रेक्ट घेतले आहे." श्रीकांत म्हणाला.
"पुरे पुरे हं! आता तारीफ बायकोची करता, पण राजा मात्र आपण स्वाताच रहाता." ज्योत्स्ना म्हणाली. आणि खोचक प्रश्न विचारून मोकळी झाली.
"आणि ते कसं काय बुवा मी तर नेहमीचं ज्यो राणीचा गुलाम आहे." श्रीकांत गुलामाचा अभिनय करत म्हणाला.
"हेच तर मला सारखं "ज्यो राणी" " ज्यो राणी" म्हणत असतोस. खरी गोष्ट तर ही आहे की, राणीचा पती कोण असणार? राजाच ना." ज्योत्स्ना अनोखा दाखला देत म्हणाली.
"ऐक्सलेंन्टऽ मार्वलऽ तूझ्या बुध्दीची तारीफ करावी तेवढी कमीच आहे. तू खरचं ग्रेट आहेस. माझी लाडकी "ज्यो राणी"." श्रीकांत म्हणाला.
"बरं बरं जास्त लाडात येऊ नका?." ज्योत्स्ना श्रीकांतला समजावत म्हणाली.
"ये ज्यो, जवळ ये ना गं." श्रीकांत लाडात येऊन परत म्हणाला.
"जवळच तर आहे ना मी तूझ्या." ज्योत्स्ना ही लाडीक पणे म्हणाली.
"अजून जवळ ये ना." श्रीकांत रोमॅन्टीक होत म्हणाला.
"नको झोपा आता, रात्रीचे बारा वाजले आहेत." ज्योत्स्ना भानावर येत म्हणाली.
"अगं नवरा बायको साठी रात्र ही तारुण्याने भरलेली असते. आणि खरी हीच वेळ तर आहे जागण्याची एकमेकांना अनुभवण्याची. नवरा बायकोने एकत्र रमण्याची, प्रेम करण्याची!." श्रीकांत प्रणयाच्या सुखाला अनुभवत म्हणाला.
"पुरे पुरे! आपण हे प्रेम सकाळी लवकर उठून केले तर नाही का जमणार." ज्योत्स्ना म्हणाली.
"नाही- नाही कोणी मोठ्या संताने म्हणटले आहेच की, "कल करे सो, आज, आज करे सो, अभी कर." श्रीकांत म्हणाला. आणि त्याने अपुर्ण दोहा तोडून सादरीकृत केला.
"अहो अर्धवट संत महात्मा! पहा किती उशीर झाला आहे. रात्रीचे किती वाजलेले आहेत ते पहा." ज्योत्स्ना म्हणाली.
"अगं ते सोड गं ज्यो, मी किती रोमॅन्टीक बोलत आहे. आणि किती मदभरा समय आहे हा . तुला काही जाणीवच नसते बघ. आणि अशी मिठीत ये बरं माझे लाडके. आता ना, आपण ना, एक ना, गंमत करणार आहोत." श्रीकांत डोळे आणि तोंड विचित्र करत म्हणाला.
"नकोऽ काही गंमत वगैरे नको. उद्याला सकाळी लवकर उठायचे आहे?." ज्योत्स्ना झटकून बोलली.
"सकाळी लवकर उठायचे आहे. पण रात्री जागरण करू नये असं कुठं लिहिलं आहे?." श्रीकांत अपुर्ण ज्ञान देत बोलला.
"लिहिलं तर आहे." ज्योत्स्ना शास्त्र ज्ञानी पंडीत बनतं म्हणाली.
"कुठे लिहिलं आहे." श्रीकांत मुर्खपणाचा कळस करतो आणि म्हणाला.
"धर्म शास्त्राच्या नितीसुत्रात लिहिलं आहे, "लवकर नीजे लवकर उठे त्यासी आरोग्य लाभे." ज्योत्स्ना ज्ञान दान करत म्हणाली.
"अहो पंडीतजी! आपण माझ्या बायकोच्या रुपात परत याल का?." श्रीकांत विनोदी छटेत म्हणाला.
"हो चालेल की, चालेल काय म्हणता, धो-धो पळेल." ज्योत्स्ना हसत म्हणाली.
"ये ज्यो तू किती गोड आहेस गं आस वाटत ना. तूला कडाडून मिठीत घ्यावी आणि सोडूच नये." श्रीकांत अधीर मनाने म्हणाला.
"मग वाट कसली बघताय राजे." ज्योत्स्ना ही रंगात येऊन म्हणाली.
"असं म्हणतेस मग ये जवळ." श्रीकांत ही धाडसीवीर झाला आणि म्हणाला.
"आई गंऽ आई, आई गंऽऽ अरे श्री! तू खरचं वेडा झाला आहेस का?. अरे असं कुणी आपल्या पत्नीला असं जोरात दाबत आसत का?. ज्योत्स्ना कळवळत म्हणाली.
"दूसऱ्याच तर माहिती नाही पण मी मात्र असंच करतो." श्रीकांत अनोखे हावभाव करत म्हणाला.
"अहो धसमुसळेराव जरा सबुरीने घ्या." ज्योत्स्ना त्रासिक पणे म्हणाली.
"असं म्हणतेस मी आता तर रात्रभर, तूला सोडणारच नाहीये ज्यो." श्रीकांत ईरीलाच पेटला म्हणाला.
"म्हणजे! तू रात्रभर झोपणारच नाहीस का?." ज्योत्स्ना हैराण होत म्हणाली.
"हो तर! सुवर्ण संधीचं सोनं करणे हाच तर माझा पेशा आहे." श्रीकांत म्हणाला. आणि श्रीकांतचा मनसूबा पक्का ठरला आहे.
"ओ पेशेवर खेळाडू. मला चांगलेच ठाऊक आहेत तुझे खेळ." ज्योत्स्ना भुवया उंचावून बाणेदारपणे म्हणाली.
"अगं खेळ कुठले म्हणतेस, कामा आसनाचे खेळ म्हण. आणि खरे तर खेळ कुठला आहे. यावर खऱ्या खेळाडूचे कसब अवलंबून असते." श्रीकांत म्हणाला. आणि श्रीकांतने आज वात्स्यायनाचा पाठ केला आहे असे दिसते आहे.
"असं का? मग आपलं कसदार कसब सादर करण्याची नामी संधी आज एका खेळाडूला मिळणार आहे." ज्योत्स्ना श्रीकांतला डिचवत म्हणाली.
"असं म्हणतेस! मग आता तूला माझ्या उत्कृष्ट खेळाचा नमुना बघावयास मिळणार आहे." श्रीकांत मिश्किलपणे म्हणाला.
"ईईश्या हे काय? नवीनचं!." ज्योत्स्ना लाजत म्हणाली.
"अगं ज्यो, तू शांत रहा बरं. मला माझं काम जरा मन लावून करु देत." श्रीकांत मग्न होत म्हणाला.
आणि दोन प्रेमी प्रणयी रंगी रंगले.
मग दोघांनच्या मिलनात असाच बराच वेळ जातो.
आणि दोघांना ही काळ, वेळ, समय यांचा साफ विसर पडतो. दोघांचे ही देहभान हरखुन जाते. ज्योत्स्ना आणि श्रीकांत दोघे ही एकमेकांच्या देहात देह मिसळून एक जीव झाले होते.
श्रीकांत आणि ज्योत्स्ना प्रणय सुखाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचतात. आणि प्रितीच्या स्वर्गात फक्त हवेवर तरंगत असतात.
वायू लहरी दोघांना ही गगन भरारीचा अनुभव देत असतात. दोन धूंद मने प्रित सांगतात ओले चिंब होऊन सुखात वाहुन निघतात. मधूचंद्राच्या रात्रीला ही लाजवेल अशी गंधीत धुंद मधूर रात श्रीकांत आणि ज्योत्स्नाच्या नशीबी विधात्याने लिहुण ठेवलेली होती.
दोन जीवांना प्रितीच्या खेळात असिम तृप्तीचे आणि सुवर्ण क्षणांचे बक्षिस मिळते. आणि आंबट गोड भांडणाची सांगता अशी घडेल. याची कल्पना दोघांना ही नव्हती. दोघे ही तृप्त होऊन बेडवर पडून होते.
असाच बराच वेळ जातो. रात्रीचे दोन अडीच वाजतात.
श्रीकांत आणि ज्योत्स्ना एकमेकांशी मंद आवाजात कुजबुजत आसतात.
"ये श्री चल झोप लवकर अजून किती वेळ जागणार आहेस. मला ही झोप येत आहे." ज्योत्स्ना झोपेच्या सुरात म्हणाली.
"पण माझी झोप, तर उडाली आहे." श्रीकांत अतृप्त भावनेने म्हणाला.
"आणि तू माझी झोप उडविली आहेस त्याच काय?. ज्योत्स्ना लाडीक पणे म्हणाली.
"जास्त नाटक नकोस करु झोप आता." ज्योत्स्ना म्हणाली.
"बरं ज्यो राणी आपला हुकुम शिरस्यवंदनिय आहे.
ये ज्यो सकाळी लवकर उठव हं मला." श्रीकांत म्हणाला.
हो जरूर सकाळी लवकर उठवायचे आमंत्रण देऊन स्वतःता आता ढराढुंम्म झोपणार आहेस?." ज्योत्स्ना म्हणाली.
"हे बघ ज्यो मी हे नेहमीच असं झोपत असतो. आज त्यात नवीन काय आहे?." श्रीकांत लाघवी स्वरांत म्हणाला.
"मी सुद्धा तेच म्हणत होते.?" ज्योत्स्ना शांत होत म्हणाली.
आणि दोघांचे आवाज हळूहळू शांत होतात. आणि दोघांना ही झोप लागते.
समाप्त

