STORYMIRROR

Shri kaviraj

Others

3  

Shri kaviraj

Others

स्त्री -पुरुष संबंध आणि नवरा -

स्त्री -पुरुष संबंध आणि नवरा -

3 mins
255

        पर्वाला शेजारी एका नवरा -बायकोचे भांडणं झाले होते. जेव्हा मी माझ्या छोट्याशा बगिचा मध्ये काही रोपांची लागवड करत होतो. त्यांना नवीन जीवन देत होतो . आणि शेजारी नवरा -बायको भांडणामध्ये एकमेकांचा जीव घेण्याच्या गोष्टी करीत एकमेकांना कडाडून भांडत होते. त्यांच कडाडून भांडण ऐकुण सर्व आजुबाजुचे लोक जमले होते . तसेच सर्व लोक मिळून त्यांची समजूत घालत होते पण ते दोघे ऐकायला तयारच नाहीत .

          त्याचे भांडण होते की, बायको लवकर स्वयंपाक करत नाही आणि ती बायको म्हणते हे नवरोबा लवकर उठत नाहीत स्वयंपाक थोड्या वेळाने थंड होतो, गरम -गरमच स्वयंपाक छान लागतो. मला वाटलं आता या दोघांना समजवावं तरी कसं. बहुतेक आता या दोघांचा डिव्होर्स होईल की काय अस हि मला वाटलं. आणि अस होत -होत रात्र झाली. ते बिचारे सकाळ पासून भांडूण -भांडूण दमुन गेली . अणि रात्री झोपी गेले.

      पण त्या रात्री काय माहिती काय कमाल किंवा जादू झाली . हे दोघे नवरा -बायको काल भांडणामध्ये एकमेकांचा जीव घेण्याच्या गोष्टी करीत होते आणि एकमेकांना कडाडून भांडत होते . ते आज चक्क रेडिओवर गाणी ऐकत नवरा शेपूची भाजी निवडून झटकून देत होता . आणि बायको मस्त शेपूची भाजी चिरून घेत होती . आणि सोबत ते दोघे ही मोठ्या -मोठ्या गाणी म्हणत -म्हणत . आणि ते दोघे कालच भांडण पार विसरून गेले होते. मला वाटत त्यांना हे समजल असेन कि , ते दोघेच एकमेकांचे सोबती आहेत. त्यांनां आयुष्यभर सोबत राहायचे आहे आणि सुखांचा संसार करायचा आहे. छोटी-मोठी भांडणे होत राहतात. ते मनावर घ्यावयाची नसतात. लगेच विसरून जाण्याची आसतात. प्रेम केलंच आहे ऐकमेकांवर तर निभवाव पण लागत.

         खरचं एका रात्रीत झालेला हा बदल सर्वच नवरा -बायको मध्ये व्हायला हवा आहे. अस मला वाटल आणि खरचं आपण मनसोक्त भांडा पण लगेच ऐकमेकांना समजून घ्या . भांडून मन मोकळं करा . गप -गप राहून मनासल्या मनात कुढू नका . त्यांमुळे मनांत ऐकमेकांचा द्वेष वाढतो . आणि यामुळे आपण शरीराने सोबत आसलो तरी मनाने फार दुर जातो . आणि अस नातं फार दिवस टिकत नाही आणि टिकलं तर त्यात प्रेम आणि विश्वास नसतो.

        म्हणून मनसोक्त भांडा आणि मन मोकळं करा . पण ऐखाद्याच्या मनाला लागेल अस बोलू नका वर -वर भांडा लाडीकपणे लटकेचं त्याला किंवा तिला ही कळू दे की हे भांडण खरे- खुरे नव्हते तर ते खोट खोट होतं. उगाच मन मोकळं करण्यासाठी होतं . आणि यामुळेच हे ईतर शेजार्याचे ऐकत नव्हते कारण मुळांत हे भांडण लाडीक प्रेमाचे होते . खरच मला ही वाटत नवरा बायकोचे भांडण हे आळावरच्या पाण्यासारखे असते. जास्त टेन्शन घ्यायचे नसते.

       या जगात आई -वडिलां नंतर हे एकमेव नातं अस आसत की जिथं आपण आधीकार जागवू शकतो. प्रेमात भांडणे होतच राहतात आणि एका स्त्रीला तीचा हक्काचा नवरा आसणे हे महत्त्वाचे आहे. कारण या जगात ऐकट्या स्त्रीला जीवन जगणे खुप कठीण जाते. लोक ऐकट्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने पाहत आसतात. म्हणून नवरा कसाही असेना त्याला आपला म्हणूनच स्त्रीला दिवस काढावे लागतात.

     म्हणुन यापुढे नवऱ्याला आवडेल व आपल्या मनाला पटेल तसे राहण्याचा प्रयत्न करा. यामुळे भांडण कमी होतील आणि तुमचा संसार चांगल्या रितीने चालेल आणि जर चांगले होणार असेल तर ऐक पाऊल मागे घ्यायला काय हरकत आहे ? हिचं बाब नवरोबावर ही लागू आहे.

पण या समाज मनाचे कारणही तसेच आहे . आम्हीच म्हणतो आजच्या युगात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही पण हे फक्त म्हणण्या पुरतेच असते .

     आजही आपल्याकडे पुरुष प्रधानच संस्कृती आहे . सध्याला ही परिस्थिती थोडी बदलली आहे. पण सुधारली नाही . आज बहुतेक घरांत कारभार स्त्रीयांच्या हातात आसतो . आणि हे स्त्री -पुरुष समानतेकडेचे पहिले सकारात्मक पाऊल आहे. आणि इतिहास घडविणारे बदल हे असेच हळूहळू होतात. आपण फक्त योग्य दिशेने वाटचाल करायला हवी आहे


Rate this content
Log in