Shri kaviraj

Tragedy

3.5  

Shri kaviraj

Tragedy

सुशांतची आत्महत्या

सुशांतची आत्महत्या

9 mins
150


            मी सुशांत वय - 26- 27 च्या असपास असेन टपोरे डोळे रुंद माथा सरळ नाक दाट भुवया सडसडीत बांधा आटोपशीर कपडे नेहमी सफेद शर्ट व काळी पेंट घालुन विन करनारा आणि पायात ऑफिसबुट डाव्या हातात वॉटरप्रूफ घडी उजव्याहतात सोनेरी रंगाचे बेसलेट हिऱ्यांहुन जास्त चम-चमणारी सोन्याची अंगढी अनामिकेत . मला बघताच कुणी ही म्हणावे हा बाराही महिने असाच असतो टापटिप पणे रहणारा. एकदम हॅडसम तरूण .   

            तसा माझा ऑफिसात जाण्या - येण्याचा वेळ ठरलेला आसायचा . व रस्ता हि ठरलेला असायचा . तोच समोरून चार मुली आल्या . सुंगधा , आलिया , प्रेमा , आणि कल्पना या नेहमी माझ्या वेळेतच म्हणजे ऑफिसात जाण्या - येण्याचा जो वेळ होता त्या वेळेतच या रस्त्या वरून येत . पण आता मला याची सवय झाली आहे. त्या मला पाहात - पहात जात होत्या . रस्ता अरुंद व त्या एका मागे एक अशा न येता . चार ही जणी एका बाजुला एक अशा सर्व रस्ता भरून चालत आल्या क्षणभर वाटल त्या माझा रस्ता आडवत आहेत . त्यातील एक मुलगी सुगंधा म्हणाली " ये ! कल्पना हा सुशांत बघना कसा खाली मान करून जात आहे , आणि मान वर करून मुलींकडे कधी बघतच नाही , आणी जर मुली ज्या रस्त्याने आल्या तर हा रस्ता बदलुन जातो " इट्स बॅड यु नो . " त्या हे सहज बोलल्या आाणि हसायला लागल्या. मी इग्नोर केलं. कारण हे रोजच्या रोज घडत असे . म्हणून मला त्यांना काही प्रतीक्रीया दयावी अस वाटल नाही .

            मी असाच रसत्याने चालत जात होतो . एक एक पाऊल पुढे - पुढे चालत होतो पुढे बाजार आला . त्यात डाव्या साईडला सर्व सराफा दुकाने होती मी त्या समोरून जात होता . मी स्वतःच्याच विचारात गुंग होतो . तेवढयात मला एक आवाज आला " हाय सुशांत कसा आहेस ". " आज ईकडे कुठे? " तेवढ्यात मी बोललो " काही नाही रे कल्पेश, असच फिरून याव म्हणटल " कल्पेश माझा कॉलेजचा कलासमेंट होता मित्र नव्हता केवळ तोंड ओळख होती . तेवढ्यात कल्पेश म्हणाला " सुशांत तू काय (स्टेचु )पुतळा आहेस का ? , की सेल्फ डेव्हलपमेंट चा कोर्स केलास लेका " ? . ऐवढया लहान सिटीत राहतोस, पण नेहमी टापटीप असतोस . आणि शुद्ध मराठी बोलतोस अस कस ?. मला मनात वाटल , मला जर ते कळाल असत तर मी सुद्धा तुझ्या सारखच बोललो असतो .

          एकंदर माझा स्वाभाव असा अंतर्मुखी होता. त्यातच ऑफिसातील बॉस चार वर्षा पासून खुप त्रास देत होता . त्याला कारण होत . ऑफिसच्या वार्षिक बैठकीत मी त्याचा सांस्कृतिक कार्यक्रम खर्च घोटाळा हा सर्वासमोर आणला होता . पण तो जुना कर्मचारी असल्याने त्याने सर्वांन समोर माफी मागितली आणि ते प्रकरण तातपुरत मिटल. पण मी कायम बॉसलाच शत्रू करून घेतल होतं .  तेंव्हा पासून तो माझ्यावर सुडाची एक ही संधी सोडत नव्हता . चुकां नसतांना मुद्दाम स्वताःच आकडे मोड करून चुका काढायचा , आणि मला रागवायचा . मला कळायचे नाही की मी तर व्यवस्थीत काम केल होतं. एके दिवशी मी सहज ऑफिसला लवकर गेलो. मी पाहिल की माझा बॉस माझ्या केबीन मध्ये माझ्या फाईल्स व संगणक हाताळत आहे. 

            मला समजेना हा काय करतोय मी तिथेच उभ राहून पाहिलं तर तो माझ्या फाईल्सच्या मध्ये आकड्यांत बदल करतोय . मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना की हा स्वताःच फाईल्स मध्ये खाडतोड व आकडेमोड करून डेटा बदलतो आणि मी हे काम चुकीचं केल आहे. हे सर्वांना दाखवतो . आणि मला न केल्या चुकीची नोटीस देतो . आणि बळेच सही कर म्हणतो . नाहीतर राजीनामा दे आणि निघून जा असे म्हणतो . माझा ना ईलाज होतो . मग नोटीस फाईलला बळेच सही करावी लागते. म्हणजे न केलेल्या चुकीला स्वीकाराव लागत . ते ही सर्वांच्या समोर . 

         मग मी पण धाडस करत विचारल कि, " आपण माझ्या केबीन मध्ये जाऊन संगणक व फाईल्स का बरे हताळता . मी फाईल पुर्ण करून ठेवल्या होत्या . आपण फक्त सहीच करायची बाकी राहते . आपण तीच करायची होती . पण अस माझ्या पाठीमागे संगणक क फाईल्स तपासने योग्य नाही . तर तो मला म्हणतो, " बॉस कोण आहे मी का तू . मला समजत काय करायचे आणि काय नाही करायचे? मला शिकवायचे काम तू करू नको . मी तुझा बोस आहे . आणि मी सर्व गोष्टी तपासू शकतो . तो माझा अधिकार आहे समजल?, चुपचाप या नोटीस फाईला सही कर व कामाला लाग." नाईलाजाने मी सही केली.आणि केबिन मध्ये जाऊन बसलो.

          पण हे प्रकरण एका महिन्यात 2 ते 3 वेळा घड्याला लागले . म्हणजे वर्षा भरात 14 -15 नोटीसी देत जाई असेच स्वताःच कारनामे करून त्याचा उदेश्य हा की माझे चांगले काम खराब करून माझे कामात लक्ष नाही व मी ठीक काम करत नाही . असे सर्वाना दाखवणे जेणे करून माझी बदनामी होईल. आणि त्याला माझ्यावर सुड ही घेता येईल . 

        असा मी पुरता फसलो ईकडे आड व तिकडे विहीर अशी माझी परिस्थिती झाली . यामुळे चार वर्षा पासून काम नकोस झाल आहे. त्यामुळे कामाचा ताण आणि बॉसचा वेगळाच ताण, घरचा लग्न का करत नाही याचा ताण, ताण, ताण, ताण, मन एकदम उदास झाले. वाटल काय आपल जीवन आहे ?  एक क्षण हि सुखाचा नाही. कधी स्थैर्य येईल या आपल्या जीवनाला. एकदम निराश झाल्यासारख वाटत होत.

         मी खूपच उदास होतो. जीवनात नैराश्य येणे म्हणजे काय ते मला तेंव्हा समजले. प्रत्येक गोष्ट निरर्थक वाटू लागली . अस वाटू लागलं " कुठतरी दुर निघून जाव !  दुर खुप दुर ". सर्व कामाचा व सर्व गोष्टींचा अगदी जिवनाचा पण कंटाळ आला . बालपणा पासून मला एक ही मित्र नाही. कुणाला खर ही वाटनार नाही की , या जगात असाही एक व्यक्ती आहे जो आज पर्यंत एक हि मित्र बनू शकला नाही. आता मन मोकळं कराव तरी कुठं ? 

        कधी भेटेल असा मित्र ज्याला मनातील काही सागांव असा किंवा ज्याशी आपण आपलं मन मोकळ करून बोलाव असा किंवा सतत सोबत असणारा कंटाळा येई पर्यंत बोलत राहणारा व जा म्हणटले तरी न जाणारा असा मित्र कधी भेटेले का ? असा विचार हि मनात आला. पण हे तर सोडाच पण साधा मित्र म्हणुन नावाला हि कुणी भेटला नाही . मग वाटल चला थोड फिरून याव . आणि ऑफिसातून तडक निघालो . कुठे चाललो काही पत्ता नाही . " पाय चालत होते, रस्ता मिळत होता " पायीच निघालो . झप -झप -झप पुढे - पुढे जात होतो .

         ऑफिसपासुन एक किलो मिटर अंतरावर आलो . इथे जवळचं रेल्वे फाटक आले. पुढे काही  अंतरावर वळणाचा रस्ता आला . त्या बाजुला एक छोटी टेकडी आणि टेकडी समोर बालाघाट डोंगर होता . मग सरळ चालत -चालत मी टेकडी पायीच सर केली . आणि टेकडी वर पोहचलो तिथे बसण्यासाठी ओटा होता. आणि एक कठडा हा त्या टेकडीच्या कडां वर लावला होता. टेकडी वर जाण्यासाठी दगडांत कोरलेल्या पायऱ्या होत्या तिथे मी पायऱ्या चढुन टेकडी वर गेलो . 

          समोर ओट्यावर झाडाला टेकुन बसलो . मनांत विचारांच काहूर उठल होत . सर्वाची उबग आली विराण वाटल. विचार करू लागलो .बॉस मला असच परेशान करत राहिले तर मी काय करू?  ते वेळेवर पेमेंट ही करत नाहीत .

        परिस्थितीचा गैर फायदा घेता येत मला मुद्दामहुन परेशान करतात . मी त्यांचा घोटाळा उघड केला म्हणून . वाटल दुसरी कडे जॉब पाहावा का?. अस वाटतय की , काय कराव आणि काय करू नये तेच कळत नाही .आज सहा सात वर्ष काम केली पण काही उपयोग झाला नाही . असा विचार मनात चालु होता . वाटल सर्वातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. या टेकडी वरून उडी घेऊन जीवचं दयावा ?.

             एकदाचा सर्व ताण जाईल . आणि एकदाच सुखाचं मरण हि येईल . मी उठलो आणि टेकडीच्या कड्याच्या बाजुवर बसवलेल्या कठड्याच्या जवळ गेलो . कठड्यांवर हात ठेवले . आणि डोळे मिटले . सर्व घटना क्षणार्धत डोळ्यां समोरून गेल्या आणि डोळ्यांसमोर आंधार झाला.

         तोच कुणी तरी चालतांनाचा पायांचा आवाज आला . मी डोळे उघडले . आणि मागे वळून पाहिल . तेवढ्यात तिथे एक मुलगा आला . दिसायला तो छान होता .आगपिंड भरदार दाढी मिशा व्यवस्थीत कापलेल्या टापटिप कपडे मस्त बुट हॅडसम पर्सनालटी(Personality) आकर्षक डोळे एकंदर तो दिसायला आकर्षक होता . मला तो चांगला वाटला . त्याला मी पाहिले व मनांतील सर्व विचार हवेत विरून गेले. मी सर्वच विसरून गेलो . काय झालं कळल नाही त्यांच्या डोळ्यांत एक चमक होती . तो मला माझीच कॉपी वाटला . लगेच तो माझ्या बाजुला येऊन उभा राहिला . 

           मी नेहमी सारख कोणी जवळ आल की थोड दुर जातो तसा गेलो माझा स्वभाव तसा बालपणापासून लाजाळू होता . तस त्यांन माझ्या कडे स्मित हास्याने पाहिले आणि मी दुरुनच त्याच्या कडे स्मित हस्याने पाहिले आणि टेकडी वरून दुर दिसणाऱ्या झाडी घरे बालाघाटाचा डोंगर दिसतोय का ते पाहत होतो . तेवढ्यात तो माझ्या दिशेने येत आहे मी पाहिले आणि किंचित दुर जाण्याचा पवित्रा घेतला . 

         तो माझ्या जवळ येऊन बोलू लागला .

 "कहाँ रहता है तू " ,  मी म्हणटल शिवराम चाळीत". तुम्हारा नाम क्या है। , " सुशांत भोसले" काम क्या करते हो, " ऑडीट ऑफीसात मॅनेजर आहे" और पेमेंट कितनी है। मी म्हणटले पगार, " १८००० ₹" मी टेशन मध्ये सहज सगळ बोलून गेलो मी काय बोलतोय याच भान नव्हत तो विचारत होता मी सांगत होतो . मी ऐवढ फ्रेंडली त्याच्याशी का बोललो याच कोड आज ही मला सुटत नाही . तो म्हणाला "यहाँ पे कैसे ? मी म्हटलं " असच करमत नाही म्हणुन" . कुछ प्रोबलेम है क्या ? .," मी म्हणलो प्रोबलेम माझं ऑडीट ऑफीसाच काम आहे. " वो कैसे?"  तो म्हणला, आमचे बॉस माझा साध्या स्वभावाचा फायदा घेतात . मला परेशान करतात. चुक नसतांना देखिल चुक काढतात . मी कशाला इथे जॉब वर लागलो . याचा आज मला पश्चाताप होतोय . 

          मी स्वता: ला शांत करत म्हटलं बर जाऊ दे तूझ नाव काय मी म्हणालो . तो म्हणाला ," सुरज ! " सुरज पुढ काय. मी म्हणालो .  तो बोलला , " सुरज जमादार ".  मी म्हणालो म्हणजे आपल्या गावाचा जमादार का ?  तो हसला आणि म्हणाला " वैसे तो मै दिल्ली का रहने वाला हूँ । यहाँ संत कबीर चाल के पास रहता हूँ |  मी म्हटलं संत कबीर चाळ ती कुठ आहे?  " तुझे पता नही है "। तो म्हणाला . मी म्हणालो "नाही". तो म्हणला शिवराम चाल और इंदीरा नगर के बीच जो मंदीर है उस रास्ते पर है । मी न समजुन ही " हो का? , बरं ! " , मी म्हणालो" . "हां! "  तो बोलला. " तू कसा काय इथ आलास" मी म्हणालो . तो म्हणाला " ऐसे ही यहाँ पर कुछ खास काम नही है। वैसे बीड मे कोई ढंग काम ही नही है | बीड मे ढंग के काम हि नही मिलते सोच रहा हूँ। दिल्ली को वापस जाऊँगा दुसरा काम ढूँडूगा , वहाँ आच्छे जॉब्स है।"


     मग मी म्हणालो "अस वाटतय तिकडे चांगले जॉब्स आहेत .इथे काहीच नाही? , "  बीड म्हणजे डोक्याला किड आहे " नाही का ? " मी म्हणालो. "शायद?" तो म्हणाला. "तु काय काम करत आसतोस" मी म्हणलो. तो बोलला, "यहाँ पे सारे काम फालतू है। वहाँ आच्छे है।"  मी म्हणालो, " अरे! इथेच काम कर तुझं घर इथेच आहे ना . "हाँ यार ! " तो म्हणाला .मी म्हणालो, "तिकडे तुझी सोय लागेल . तो म्हणाला, "हाँ लग तो जायेगी, वहाँ मेरे अंकल रहते है । ". मी म्हणालो, "बघ मग . मी आता जातो" . तसा तो म्हणाला, " अब हम दोस्त बन गये है ना ? अब फिर कब मिलेंगे" . मी म्हणालो, "मी इथ काही रोज येत नाही, कधी उदास वाटल की येतो, आता ईथुन पूढे येणार नाही ". 

      तो म्हणाला, "फिर तेरा फोन नंबर दे । हम दोनों फोन पर बात करेंगे ? " . मला नको वाटल . पण त्याला वाईट वाटेन म्हणुन मी फोन नंबर दिला . आणि बाय करून मी घराकडे निघालो . मन थोड हलक झाल्या सारख वाटल . शांत - शांत वाटू लागलं .पायऱ्या उतरून रोड वरून चालु लागलो. खाली दुतर्फात फळवाले ,भाजीवाले गाडे लागले होते त्यांना पार करत मी चालत जात होतो. आणि मी सहज वळून मागे पाहील तर तो मलाच पाठमोरा जाताना पाहत होता . लगेच त्याने टेकडी वरून मला हाय केल . मी एक गोड स्माईल दिली व बाय केल . 

         मी ॲटोला थांबवलं. "ओ ॲटोवाले सर थांबा ! , रिक्षा खाली आहे का?"  मी म्हणालो. तो, "हो" म्हणाला.मी पत्ता सांगितला व ॲटोत बसलो. ॲटोच्या मागच्या खिडकीतून मी मागे पाहिलं तो तिथंच उभा होता. जसा मी दूर जात होतो . तसा तो ही माझ्या पासून दुर जात होता. डावा हात उलटा करून किती वाजलेत ते मी तपासले. आता मी सरळ घराच्या दिशेन घरी येण्यासाठी निघालो.       

(क्रमश:)


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy