Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra
Participate in the 3rd Season of STORYMIRROR SCHOOLS WRITING COMPETITION - the BIGGEST Writing Competition in India for School Students & Teachers and win a 2N/3D holiday trip from Club Mahindra

Jyoti gosavi

Tragedy


4.0  

Jyoti gosavi

Tragedy


दमलेल्या बाबाची कहाणी

दमलेल्या बाबाची कहाणी

9 mins 243 9 mins 243

शेवटची पाळी संपली आणि कारखान्यातील सर्व मशिनरी बंद झाली. उद्यापासून ही मशिनरी चालू होणार नव्हती, तर कायमची थंडावणार होती. उतरलेल्या चेहऱ्याने आणि खिन्न मनाने सारे कामगार कंपनीच्या बाहेर पडले. 


कोणी नुकतेच कामाला लागले होते ,त्यांना इथे नाही तर दुसरीकडे काम करता येणार होते .जे रिटायरमेंट ला आले होते किंवा ज्यांची दोन-चार वर्षे उरली होती त्यांना फारशी पर्वा नव्हती. प्रश्न होता तो 40 ते 55 या वयोगटाचा, कारण त्यांनी वर्षानुवर्षे एकाच जागी एकाच स्टेजवर तेच ते काम पुन्हा पुन्हा केले होते ,त्या अकुशल कामगारांच्या हातात, ना कुठला ट्रेड होता, ना कुठले सर्टिफिकेट होते .बरं इतर काही काम म्हणावे, तर तेही त्यांना येत नव्हते. त्यांनी कुठे जायचं? काय करायचं? हा मोठा प्रश्नच होता. 


आयुष्याच्या  अर्ध्यामुर्ध्यावर संसार झालेला, कोणाची मुले शाळा कॉलेजात होती,तर कोणाची शेवटच्या वर्षाला डिग्री डिप्लोमा ला होती. कोणाची नुकतीच नोकरीला लागली होती . सर्वांनी पाणावलेल्या डोळ्यांनी कंपनी सोडायला सुरुवात केली. काहीनी तर आयुष्याची पस्तीस चाळीस वर्षे तिथेच येऊन रोज व्यतीत केलेली, त्यांनी निघताना त्या जमिनीला दंडवत घातला. कोणी धाय मोकलून रडले, आणि हळूहळू सर्व परिसर रिकामा झाला. 


शांताराम मिस्त्री देखील त्यामधला एक कामगार, धड तरुण नाही, धड वयस्क नाही. त्याच्या स्वाती आणि ज्योती कॉलेजमध्ये शिकत होत्या. धाकटा रोहन दहावीला होता.  आता उद्यापासून काय करायचे हा प्रश्न त्याच्यापुढे आ वासून उभा होता. कंपनी कामगारांची देणी देईल तेव्हा देईल, सगळ्याच कंपन्या मढ्याच्या टाळूवरचं लोणी खायला बसलेल्या, कामगार नेते आणि व्यवस्थापन एकत्र येऊन आपण लोणी खातात ,आणि कामगारांच्या तोंडाला  पाने पुसतात . सगळीकडे सारखंच, कुठेही जा पळसाला पाने तीनच. 


गेटच्या बाहेर पडताना त्याचे पाय जड झाले होते, काही कामगार बंधू एकमेकांना गळामिठी घालून रडत होते. एकमेकाचा निरोप घेत होते. शांताराम च्या घरात अशी कल्पना होतीच, पण तरीही माणसाला शेवटपर्यंत आशा असते .आजच्या दिवसात कंपनी काहीतरी आपला निर्णय फिरवेल, असे सर्वांना वाटत होते. तो घरी आला, कोणाशी देखील काहीच न बोलता, न खाता-पिता, उपाशीच झोपला. बाबा जेवले नाहीत म्हणून बायको-मुले पण पाणी पिऊन तसेच झोपली. केलेला स्वयंपाक तसाच पडून राहिला. 


असू दे आता एक टाईम उपाशी राहण्याची देखील सवय लागली पाहिजे. बायको मनाशी म्हणाली आपल्याला उपाशी राहिला लागले तरी चालेल पण मुलांची शिक्षणे थांबता कामा नयेत बायकोने मनात विचार केला सकाळी सकाळी सगळे आपापल्या वेळेमध्ये बाहेर पडले काल रात्री ची भाजी चपाती डब्यात घेऊन गेले शांताराम काही उठेना नवऱ्याने आपल्या जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नाही ना या विचारांती घाबरले अहो उठा उठा करत तिने त्याला गदागदा हलवलं उठून काय करू मला कुठे जायचय बायकोवर ओरडला अहो जायचं नसलं म्हणून काय झालं मोठा हात पाय थोडा चहा घ्या दुसरीकडे कुठेतरी काम शोधा असं घरात हात पाय काढून कसं चालेल मी पण चार घरी जुन्या भांड्यांची कामं मिळतात का बघते नाही तू असं काही करू नको तू घर सांभाळ मी बघतो मला कुठे काम मिळते का त्यानंतर त्या दिवस घरात तसेच निःशब्दपणे कोणी कोणाशी बोलत नाही कोणी कोणावर आवाज करत नाही असे कोण बसलेले वातावरण होते


मुले आपले उठायची आवरायची न बोलता शाळा कॉलेजला जायची शेवटी चौथ्या दिवशी रात्री जेवताना रोहन म्हणाला आई मला उद्या लवकर उठव मी पेपरची लाईन पकडली आहे उद्यापासून पेपर टाकून मगच मी शाळेला जाईल आपल्या कॉम्प्लेक्समधला प्रशांत दादा हजार रुपये देतो म्हणाला आई मी पण पार्ट टाइम जॉब पकडते आहे उद्यापासून मला दोन डबे दे कॉलेजमधून परस्पर एका कंपनीत डेस्कला चार तास बसायचं पाच हजार पगार मिळणार आहे ज्योतीने सांगितले स्वाती आता तू कुठे जाऊ नकोस मला मदतीला घरात थांब मी दोन घरचे जेवण बनवायचे काम मिळवले आहे आई बोलली सर्वांचे बोलणे ऐकून शांताराम मला मनातून लाज वाटले आपल्या घरच्यांनी कोणीही हार पत्करलेली नाही हे सारे लढतात तर मी एकटा का रडत बसू त्याने मनात विचार केला पोरांना मी पण उद्यापासून घरात बसणार नाही मी पण काम शोधायला बाहेर जाईल जर माझी बायकापोरं येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जायला तयार आहेत तर मी पण तुमच्या बरोबर आहे


त्याच्या बोलण्याने तिघांच्या चेहऱ्यावर टवटवी आली बाबा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आपण लढू या त्याला आपल्या कुटुंबाचा अभिमान वाटला गेल्या चार दिवसात एका शब्दाने पण त्याला कोणी काही विचारले नव्हते आणि दुखावले पण नव्हते त्याला हुरूप आला तो मोठ्या उत्साहाने काम शोधायला बाहेर पडला पण नियतीच्या मनात वेगळेच काही होतं बोलणं एवढं सोपं असतं एवढं वास्तव सोपं असतं गेल्या चार महिन्यात त्याने कित्येक कंपन्या मॉल छोटी मोठी दुकाने पालथी घातली पण त्याला कोठेच काम मिळत नव्हतं कारण त्यात वयाचं असं होतं की नवं काही शिकता येत नव्हता कुठे वय आड येईल कुठे शिक्षण घेईल हातात कोणते कोणतेही सर्टिफिकेट नसणाऱ्या ह्या अकुशल कामगारांना कोठेच काम मिळत नव्हते रोज घरी आले की घरच्यांनी याच्याकडे आशेने पाहावे आणि त्याने मान खाली घालून जेवावं असं चाललं होतं हळू हळू जमापुंजी संपत आली कंपनीकडून अजून काहीच मिळालं नव्हतं आणि आता आपण बायको पोरांच्या जीवावर जगतोय ही भावना त्याला कुठेतरी कुरतडून खात होती आजपर्यंत त्याने वॉचमन काम तेवढं करायचं नाही असं ठरवलं होतं पण आता ते देखील करायला तो तयार झाला तो पण त्याने सोडून दिला आणि एका सोसायटी तो वाचकांच्या पदावर रुजू झाला


जाता-येता सभासदांना सॅल्यूट करणे त्याला फार अपमानास्पद वाटेल सेक्रेटरी तर भाजी आणून दे ज्या दुकानातून दूध आणून दे अशी कामे सांगत असत मोठ्या घरातील लाडावलेली कार्टी त्याला पण म्हणूनच बोलत ए वॉचमन म्हणून संबोधत तेव्हा त्याला फार वाईट वाटेल सेक्रेटरी ची मुलगी आईबाप कामावर गेले रे गेले की एका मुलाला घरी घेऊन यायची सोसायटीत काही जणांनी बघितले पण होते पण बोलणार कोण डार्क लिपस्टिक लावणारी तोकडे कपडे घालून टॉप टॉक टॉप टॉक बूट वाजवत तोऱ्याने जाणारी ही मुलगी बघितली की त्याला आपल्या शालीन मुलीची आठवण यायची आणि ज्या ज्या मुली आपल्या कॉलेज करून देखील पार्ट टाईम जॉब करतात आणि घराला हातभार लावतात त्या कुठे आणि ही मुलगी कुठे अशी मनात कंपनी कंपेरे टी तुलना व्हायची ठेवायची शेवटी शांताराम ना काही राहवेना आणि त्याने एक दिवस मनाचा हिय्या करून सारे गोष्ट सेक्रेटरीच्या कानावर घातली बरे झाले शांताराम तू आम्हाला सांगितले इतर कोणाला काही बोलू नकोस आम्ही तिचा बंदोबस्त करतो साहेब मला पण दोन मुली आहेत म्हणून माझा जीव तुटत होता लहान तोंडी मोठा घास घेतला काही चुकले असेल तर माफ करा नाही शांताराम तुझे काही चुकले नाही आमचे चुकले आम्ही मुलीला जास्त स्वातंत्र्य दिला त्यानंतर पंधरा दिवस तो मुलगा पण दिसला नाही आणि मुलगी पण दिसली नाही पण शांताराम मला मात्र कामावरून जाताना 24 मुलानी आडवले कारे वाचमन वाचमन आहेस तर वॉचमनच्या अवकात इ मध्ये राहणार ना इतरांच्या भानगडी मध्ये कशाला नाग खूप असतो असे म्हणून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारले तो तसाच रात्रभर फुटपाथ वरती पडून राहिला. कधीकधी तो डबल ड्युटी लागली तर, तीन पाळ्या करूनच घरी दोन दोन दिवसांनी येत असे. त्यामुळे घरात कोणाला काही विशेष काळजी वाटली नाही. 


त्याला मात्र त्याचा भयंकर अपमान वाटला. मनाला आणि शरीराला दोघांनाही वेदना होत होत्या. तो तसाच दिवसभर फुटपाथवर पडून राहिला आणि तिथेच त्याच्या आयुष्याला टर्निंग पॉईंट लागला. रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्याला भिकारी समजून पैसे टाकले, आणि संध्याकाळी उठेपर्यंत त्याच्या पुढ्यात शंभर दीडशे रुपये जमा झाले. त्या एका घटनेने त्याला धंद्याची नवीन आयडीया दिली .की बाबा ,असे कष्ट न करता जर पैसे मिळू लागले, तर कशाला ती बारा तासाची उभे राहण्याची झक मारी करा. त्याने आठ दिवस हिंडून, फिरून भिकाऱ्यांचा अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आले, त्यांची पण एक टोळी असते, बसायच्या जागेचे भाडे आहे, ते द्यावे लागते . दादा लोक येऊन हप्ता गोळा करतात, तो वेगळाच, त्याशिवाय कोणाला हे लोक असे बसून देणार नाहीत. 


एक दिवस त्याने छक्क्यांचा टोळीला बोलताना ऐकले, त्याने ब्लाऊजमधून नोटा काढताना बघितले, आणि त्याच्या लक्षात आले लोक भिकाऱ्यांना घाबरत नाहीत परंतु छ्छक्यांना मात्र घाबरून पैसे देतात, आणि भिकाऱ्यांचा पेक्षा हिजड्यांची कमाई जास्त आहे ,आपण पण आता हिजडा बनून भीक मागावी का? छे! काहीतरीच काय? आपण कोण? आपले घराने काय? आणि आपण काय असले आहोत का? मग त्याला काय झालं! आपल्याला चांगली तीन मुले आहेत .आपण काही तसले नाही, आणि असा व्यवसाय केल्याने आपण काहीच तसले होत नाही. शिवाय बायका नाही का! पोट भरण्यासाठी धंदा करतात ,मग आपण पोटाची खळगी भरण्यासाठी असे केले तर काय बिघडले. 


भिकच तर मागतो ना! त्याच्या मनात उलटसुलट विचार सुरू होते. तो एका छक्यांच्या टोळीचा रोज पाठलाग करू लागला. त्यांच्या अवती भोवती फिरू लागला, ते त्यांच्या पण लक्षात आले .एका छक्क्या ने 

क्यू बे चिकने! हमारे पीछे पीछे घुमता है/

तुमको क्या चाहिये? बोलो ! 

वो चाहिए? तो कोने मे चलो

खाली किस का, पचास लूंगा/

किधर तो जगह ढूंढते है/


एक छक्का त्याचा हात धरून त्याला ओढू लागला. अरे मुझे छोडो, मै वैसा आदमी नही हू. 

तो हात सोडवू लागला. 


तो फिर चार दिन से क्यू हमारा पीछे क्या कर रहे हो/


 मै भी हिजडा बनाना चाहता हु, मुझे आपकी टोली मे आना है ,मुझे पता है आप मे से आधे लोग मेरे तरह आदमी है. 


लेकीन क्यू? वैसे से क्या हो गया? अच्छे खासे अधेड उमरके आदमी हो/

 हिजडा बनना चाहते हो, अरे नही नही असल मे नही, झुटा हिजडा !नकली हिजडा! 

मग त्याने आपली सगळी हकीगत सांगितली. 


 ऐसे सब जन हिजडे बनके भीक मांगोगे, तो हमे भी भीख कोण देगा ?


त्यांनी त्याला धुडकावून लावले, हाकलून लावले. पण त्याने त्यांचा पिच्छा सोडला नाही. तो घरातून एका थैलीतून आपल्या बायकोची साडी घेऊन आला, टॉयलेटमध्ये जाऊन ती बदली केली आणि त्याने नकली हिजडा बनवून भीक मागायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याला सगळ्यांनी त्रास दिला, हडतूड केले ,हाकलून लावले, त्याचे पैसे हिसकावून घेतले, पण तो पिच्छा सोडत नाही म्हटल्यावरती अखेर त्याला आपल्या टोळीमध्ये सामावून घेतले. 

हळूहळू शांताराम त्यांच्या लकबी शिकला आणि त्यांच्या धंद्यात चांगला रूळला, स्थिरावला, आता हातात बऱ्यापैकी पैसा आला. 


ज्योतीला नोकरी सोडायला लावून अभ्यासावर लक्ष देण्यास सांगितले . रोहनने पण पेपरची लाईन बंद केली . शांताराम च्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळाले. घरच्यांनी कधी त्याला तू काय करतो? कुठे काम करतो? विचारले नाही आणि त्याने देखील काही सांगितले नाही. तो सेंट्रल ला राहायचा तर वेस्ट ला जाऊन भीक मागायचा . त्यामुळे तो काय करतो? कुठे काम करतो? त्याची कोणी चौकशी केली नाही. बघता बघता आयुष्यातली दहा वर्षे निघून गेली .

आता त्याला त्याच्या या कामाची गोडी वाटू लागली.


घरदार नीट चालू होते, मुलींच्या लग्नाला आल्या होत्या, रोहन नोकरीला लागला.ज्योती चे लग्न ठरले.आता त्याला हे काम करायची गरज नव्हती, पण लागलेली सवय सोडता येत नव्हती. हिजड्यांचे आयुष्य त्याने जवळून बघितले होते, त्यांच्यातली हाणामारी, व्यसने, समलैंगिक 💏 संबंध, त्यातून पण पैसा कमावणे,तो मात्र या सार्‍या पासून अलिप्त राहिला. अर्थात सगळेच काही व्यसने आणि धंदेवाले नव्हते.त्यांच्यामध्ये देखील त्यात देखील चांगले लोक होते.त्या दिवशी तो गोरेगावला काम करत होता."इनॉर्बिट मॉल" च्या आसपास तो आणि त्याचे साथीदार भीक मागत होते.नेहमीची ओळखीची गिराईक थांबून हसून भिक देत असत, कारण ते त्या ठिकाणी ठराविक दिवशीच भीक मागत होते.


काही कॉलेजची मुले काही तरी अश्लील बोलून मग भीख देत.

तरीपण हे हिजडे लोक "क्या रे चिकणे? बहुत फडफडा रहा है? असे म्हणून त्यांच्या डोक्यावर हात ठेवत असत. 

एखादे जोडपे दिसले तर, सगळे त्याच्या मागे लागत आणि पैसे मागत. शेवटी ते नवे जोडपे वैतागून पैसे देई. असेच एक जोडपे पाठमोरे चालले होते.

शांताराम केव्हापासून त्यांच्या मागावर होता.


अरे तुम्हारी जोडी भगवान सलामत रखे, तो टाळी वाजवून बोलला, फुलो- पुतो, पैसा दे बेटा, 

मुलाने चालता-चालता दहा रुपयांची नोट काढली.आणि त्याच्या हातात टेकवले.


अरे दस रुपये ते काम नही चलेगा! पुरे सौ चाहिये! 

नया जोडी है ना? 

सदा पुतो- फलो, दूधसे नहाओ

 "तुम्हारा घर बच्चो से भरे"


 आशीर्वाद है बेटा! 

सौ रुपया देदो! 


अरे इतके नको देऊ, त्याला

 काय तो हजार पण मागेल.मुलगी म्हणाली


 अगं जाऊदे गं! त्यांना पण पोट आहे.मजबुरी असते माणसाची, ते बिचारे भीक मागण्याशिवाय काय करणार? मुलगा म्हणाला

 त्याने खिशातून पन्नास रुपयाची नोट काढली व त्याच्या हातावर टेकवली.त्याने दोघांना पण आशीर्वाद देण्यासाठी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, तेव्हा ते दोघे देखील मागे वळले आणि शांताराम एकदम चमकला, 


बाबा तुम्ही? ज्योती चा आवाज त्यांनी ऐकला

 आणि ही धरणी दुभंगून पोटात घेईल तर बरे असे त्याला वाटले.

आज पर्यंत जे घरच्यांपासून लपविण्यात तो यशस्वी झाला होता, ते त्याचे पितळ उघडे पडले, स्वतःच्या मुली समोर आणि जावया समोर त्याची पुरती अब्रू गेली.


आजपर्यंत तो छक्का बनून घर चालवत होता, हे कोणाला देखील कळले नव्हते.त्यामुळे तो घरांमध्ये इज्जतीने वागत होता.इज्जतीने जगत होता, त्याची इज्जत पार धुळीला मिळाली, मातीमोल झाली.


हो पोरी तुझा बाबाच आहे मी! 

 तुमचे पोट भरण्यासाठी, आणि घर चालवण्यासाठी मला हा धंदा करावा लागला.

कोठेही नोकरी मिळत नव्हती ,अर्ध्यामुर्ध्या वयामुळे कष्टाचे काम पण झेपत नव्हते, वॉचमनची नोकरी केली आणि फक्त अपमान आणि अपमान झाला, सेक्रेटरी च्या मुलीचे लफडे उघडकीस केलं म्हणून, तिच्या प्रियकराने आणि मित्रानी मला मार मार मारले.आणि मी ती नोकरी सोडून दिली.पण मी घरात तुम्हाला काय सांगू ?


ज्योती अजून या धक्क्यातून सावरलेली नव्हती, आणि आपल्याबरोबरचा असलेला भावी नवरा काय म्हणेल? याची तिला चिंता पडली. क्षणभर तिच्या नजरेत त्याला तिरस्कार दिसला, आणि त्याचक्षणी शांताराम उलट्या पावलाने धावत धावत मॉलमध्ये शिरला. तिथल्या सिक्युरिटी ने आडवे पर्यंत वरच्या मजल्यावर टेरेस वरती गेला. ज्योती मॉल कडे पाठ फिरवून चालली होती, आणि अचानक धाडकन उडी मारल्याचा आवाज आला.


त्याने स्वतःला टेरेसवरून खाली झोकून दिले होते. अचानक धाडकन आवाजाने ज्योतीने मागे बघितले आणि बाबा$$$ असा टाहो पडत ती त्याच्याकडे धावली शांताराम रक्ताच्या थारोळ्यात निपचित पडला होता.त्याचे प्राणपाखरू केव्हाच उडून गेलं. नियती त्या बाप लेकीला खदाखदा हसत होती, आणि आयुष्यभर कुटुंबासाठी धावलेला, दमलेला, बाबा आता शांत विश्रांती घेत होता.


Rate this content
Log in

More marathi story from Jyoti gosavi

Similar marathi story from Tragedy