End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

Akshata alias shubhada Tirodkar

Inspirational Others


4.0  

Akshata alias shubhada Tirodkar

Inspirational Others


धुरळा

धुरळा

1 min 22.7K 1 min 22.7K

झुळझुळणारी नदी आज शांत वाहत होती. नदीच्या काठी पक्षी बसलेले. तेवढ्यात एक दोन मासे तडफडुन काठावर येऊन पडले. काठावरील एका बगळ्याने एका माश्याला विचारलं "काय भाऊ काय झालं?"

"काय सांगू भाऊ ह्या नदीचे पाण्याची चव दिवसेंदिवस बदलत चालली आहे. आज मला असहाय झालं आणि मी काठावर येऊन पडलो. अहो आम्ही ह्या नदीत वर्षानुवर्षे घालवली पण हल्ली नदीचे स्वरूप बदलत चाललंय"

"स्वरूप बदलतंय म्हणजे आहे तशी वाहत आहे ना ती" बगळेबुवा बोलले

"वाहत आहे पण पाण्याचा रंग पाहिलात का" मासे म्हणाले

"हो हे मात्र बरोबर सांगितलं तुम्ही पण हे असं झालं कसं" बगळा चिंता व्यक्त करत म्हणाला

"मी सांगतो, कावळा म्हणाला पलीकडच्या तीरावर एक नवीन कारखाना सुरू झाला आहे. त्यातील पाणी नदीत सोडल्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले आहे. तुमचं काय त्या भागात आम्हालासुध्दा उडणं मुश्किल झाले आहे. कारखान्यातून येणाऱ्या धुराच्या लोटामुळे आम्हाला उडताना काहीच समोरचं दिसत नाही व त्या काळाकुट्ट धुराच्या वासामुळे त्या भागातील झाडांवर बसणं नकोस झालंय."

"हो म्हणजे हे कारण आहे तर...‌ ही माणसं आपल्या प्रगतीसाठी आमचं जीवन विस्कळीत करत आहेत" बगळा कळवळुन म्हणाला.

"आता काय कारखाने वाढत जातील आपलं मात्र भविष्य धोक्यात आहे. मासा उतरला "

कावळा म्हणाला "आपण काय करू शकतो, आपण देवाला साकडं घालू या की तुझी ही निसर्गाची देणगी जपायला ह्या माणसांना शिकव रे बाबा...हा असह्य असा धुरळा आम्हाला नकोसा झालाय.."


Rate this content
Log in

More marathi story from Akshata alias shubhada Tirodkar

Similar marathi story from Inspirational