Amrut Shivaji Dalvi

Inspirational

4.2  

Amrut Shivaji Dalvi

Inspirational

धोंडू न्हावी! ! !

धोंडू न्हावी! ! !

5 mins
24.4K


"न्हावी!!!" आणि या शब्दाला सार्थ करणारी व्यक्ती आठवताच, डोळ्यांसमोर येते ती ऍल्युमिनियमची दोन टोक असलेली ’कात्री !’ आणि जणू काही तिचा न्हवरा असल्यासारखा तोरा मिरवणारा ’कंगवा !’. न्हावी म्हटलं की माझ्यासमोर येतो तो माझ्या बलपणीचा, गावातला एकुल्ता एक असा ’धोंडू न्हावी’. गावात जरी तो एक्टाच न्हावी असला, तरी धोंडू न्हाव्याला त्याचा कधीच गर्व चडला नाही !!! आहो ! एक कात्री, एक कंगवा, आणि गटारीवर फळी टाकुन उभं केलेलं दुकान ! या जेम-तेम भांडवलाचा कसला आलाय गर्व ??? धोंडू न्हाव्याच्या नावा प्रमाणेच त्याचं दिसणं ही साधं आणि सर्वसामान्यच होतं. . . सावळा वर्ण, कुरळे केस, मुखात नेहमी तम्बाखू मिश्रित पान ठेवलेलं, अंगावर ठरलेला स्वच्छ सदरा आणि लेंगा घालुन, गांधी टोपीत मिरवणारा. . .

केस कापण्याचे पैसे न देता बाबांनी वर्षाला ’तिन पायली भात’ देण्याचा ठराव केला होता. त्यामुळे सकाळी कितीही लवकर गेलं, तरी धोंडू न्हाव्याची भवानी (बोहनी) झाल्याशिवाय आमच्या केसांना काही कात्री लागत नसे. . . बरं !!! ’हेयर-कट’ म्हणाल तर ठरलेला- ’केस असे कपायचे की टक्कलही दिसू नये आणि महीने-दोन महीने पुन्हा कापणीला ही येऊ नये.’ दहावी पर्यन्त आम्हाला ( म्हणजेच विक्कू, बारकू

आणि मला ) केसं विंचरण्याची अशी काही खास गरज भासली नाही. . . कारण कंगवा बसण्याआधी त्यांवर कात्री फिरायची . . .

एकदा काय झालं. . . धोंडू न्हाव्यानं कुठूनतरी एक ट्रिमर आणला. बरं ! हा ट्रिमर ईलेक्ट्रिक नसून कात्री सारखा चालवायचा असल्यामुळे केसे कापली कमी आणि उपसली जास्त जाऊ लागली ! ! ! धोंडू न्हाव्याच्या धाकामुळे होणाऱ्या यातनांना प्रतिसाधात्मकरीत्या रडताही येईना ! ! ! त्यानंतर पुन्हा धोंडू न्हाव्याकडे जायचं नाही अशी शपतच घेतली ! ! ! पण दुसर् याच महिन्यात ती मोडली ! कारण गावात दुसरा न्हावी नाही हे एकच कारण ! ! ! आमच्या विनंतीस मान देऊन ’ते ट्रिमर’ पुन्हा वापरणार नाही असं कबूल केल्यानं तो धाक मोडला. . .

काळानुसार आता दुकान चांगलं सिमेंट-विटांचं बनवलं गेलं. . . दुकानामध्ये पुढच्या आणि मागच्या बाजूला असे दोन चांगले भिंत भरुन आरसे लागले. धोंडू न्हाव्याच्या हाता खाली दोन पोरं ही आली होती ; कारण वाढत्या गर्दीला आता धोंडू न्हव्याचे दोन हात आणि त्याचं ’बिगर स्टाईलचं हेयर-कट’

अपूरं पडू लागलं होतं. . . मी ही कॉलेजला जाऊ लागलो तसं केस-कापणीची वेळ ही सकाळ ऎवजी संध्याकाळ अशी झाली. . .

खर तर धोंडू न्हव्याचं ते गटरीवरचं दूकान म्हणजे एक वेगळंच विश्व होतं. . . आज त्या आठ्वणींमुळे मी जरा भाऊक झालोय. . .धोंडू न्हाव्याचं दुकान म्हणजे मला अजून ही लक्षात असलेलं माझं आवडीच ठिकाण. ठिकाण कसलं ? व्यासपीठच. . .

बाबांनीही आता भात देणं बंद करुन रोख पैसे देणं सुरु केल्याने सकाळी

जाऊन नंबर लावण्याची गरज नव्हती. . . धोंडू न्हावी दोन-तीन वेगवेगळे पेपर मागवायचा . संध्याकाळच्या वेळेस पेपर वाचत बसलं की वेळ कसा निघून जायचा कळयचं देखिल नाही. . . पेपरांच्या जोडीला रॅडियो ही होताच. . . त्या रॅडियोमध्ये ’ऍफ-यम’ ऐवजी ’ए-यम’ चॅनल लागत असल्याने नुसती गाणि नसून, बातम्या, शेती विषयक कार्यक्रम, बाजार-भाव, दिग्गजांच्या मुलाखती अशा कार्यक्रमांची रेल-चेल असायची. . . संध्याकाळ्च्या थंडगार वार्-यात हे सगळं अगदी रम्य वाटायचं. . . आपण तिथच बसून राहाव आणि आपला नंबरच येऊ नये, असं उगाचंच वाटायचं. . .

"अजून किती नंबर हाईत ?", अस कुणीतरी सारखं विचारून जायचं . धोंडू न्हावी वैतागत असे त्यांना उत्तर देताना. यावर उपाय म्हणून धोंडू न्हाव्यान दुकानात पाट्याच लावल्या ! ! ! कुणी विचारलं तर न बोलता त्या पाट्यांकडे बोट

दाखवत आपलं काम सुरु ठेवायचा. . . त्या पाट्यांवरच्या सुचनाही अजब होत्या ! ! !

- ’ कॄपया किती नंबर आहेत ते स्वतः मोजावे !’

- ’ उधारी स्विकारली जानार नाही !’

- ’ नंबर लाऊन जाऊ नये !’

- ’ रॅडियो चॅनल बदलू नये !’

अशा मजकुरामुळे गावकऱ्यांनी धोंडू न्हाव्याचं नामकरण ’पुणेरी न्हावी ’ असं केलं. . . वर्षानुवर्षे येणाऱ्या गिराईकांच्या मतांना सम्मती देणं, हे काम धोंडू न्हाव्यानं चोख बजावलं. . . गावातील सर्पंच असो , शिक्षक असो , चप्राशि असो वा छोटं पोर असो , धोंडू न्हाव्याला सगळे गिराईक सारखेच. . .

" जे काही असल ते नंबरान बगा !" हे हुकुमी वाक्य अख्या गावाला ठाउक होतं . या वाक्यात सामाजीक एकता किती लख्ख पणे दिसून येते नई ? ? ? जातीय व्यवस्था, आरक्षण, अशा आजारांनी ग्रस्त असंख्य सरकारी आणि खाजगी कचेऱ्या असतील पण न्हाव्यांच्या दुकानांला त्याचा स्पर्श देखिल नाही. . . ( आणि सुदैवाने कुणी आक्षेपही

घेत नाही. . .) कारण न्हाव्याला सगळे ’केस’ सारखेच ! ! !

पुढे ईंजिनियरींगसाठी गावाबाहेर पडलो तसा धोंडू न्हाव्याशि संबंध तुटला तो कायमचाच. . .सुट्टीत गावी गेलो तरी गावात न्हाव्याची दोन नवी दुकानं झाल्याने आणि ति अधिक प्रशस्त असल्याने त्यांपैकी एकाकडे जाऊ लागलो. . . धोंडू न्हाव्याकडे कशाला कोन लक्ष देईल ? ? ? माझी ईंजिनियरींग पुर्ण झाली आणि नोकरीच्या

निमित्ताने गावच सुटलं. . . आयुष्याच्या नव्या पर्वात, नवी आव्हानं झेलण्यत इतका गुंग झालो की स्वतःला भेटणं शक्य होत नव्हतं तिथ गावाला काय भेट देणार. . . आता नोकरी फुल-टाईम आणि गाव पार्ट-टाईम अशी गत झाली होती. . .

काही महिन्यानी गावी जायचा योग आला. केस कापण्यासाठी गावात गेलो , तिथं बाळ्या न्हाव्याच्या दुकानात नंबर लाऊन बसला होता. बोलता-बोलता धोंडू न्हाव्याचा विषय निघाला आणि जे ऐकल त्यावर विश्वासच बसेना. . .

"धोंडू न्हाव्याला लकवा लगला होता?" हे विंचरताना मझे कान सुन्न पडले होते . काहीतरी हरवल्या सारख वाटलं. . .

"आता कसा आहे?" मी विचारलं . " आता झालाय बरा ! असल त्याच्या दुकानात!", हे ऐकल्यावर जरा बरं वाटलं. . .

वाट्लं तिथून तडख जावं आणि धोंडू न्हाव्याची भेट घ्यावी. पण त्यानं केस कापायचा आग्रह केला तर ? ? ? असा विचार करत त्याची ’तो’ हेर-कट आठवला आणि मी माझ्या भावनांवर ताबा ठेवायचं ठरवलं. . . तिथचं हवा तसा हेर-कट मारुन घेटला

आणि मग धोंडू न्हाव्याकडे गेलो ! ! !

इतक्या वर्षांनीही धोंडू न्हाव्याची मुर्ती तशीच होती. . . केस मात्र शुभ्र झाले होते ! ! ! धोंडू न्हाव्याचा डावा पाय

लटका पडल्यासारखा वाटत होता. जवळपास त्याच्याच वयाचे आजोबा दाढी करुन घेत होते. . . धोंडू न्हाव्यानं मला बघताच ओळखल आणि माझी विचरपुस करु लागला. मी ही त्याच्या तब्येतीची चौकशी केली. मला उगाचच त्याच्या पाया पडावस

वाटत होतं, पण लोकलज्जेमुळे म्हना किंवा न्युनगंडामुळे, तसं करु शकलो नाही. . .

घरी परतताना कानात धोंडू न्हाव्याच्या दुकानातल्या रॅडियोत वाजणारं गाणं गुण-गुणत होतं - ’मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. . . ’, आणि उगाचच मन त्या गाण्याची, धोंडू न्हाव्याशी तुलना करू लागलं. . .


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational