देवाने जे दिलंय...
देवाने जे दिलंय...
एका 45 वर्षाच्या बाईला हृदयविकाराचा झटका आला. तिला लगेचच हॉस्पिटल मध्ये हलवल आणि तिची ऑपरेशन प्रक्रिया सुरू झाली. तिला गुंगीच इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यात आले.
आता तिची आत्मा स्वर्गाच्या गेट समोर ऊभी होती, तिने हात जोडला व देवाला विचारले, "देवा माझी पृथ्वीवरील वेळ संपली का ?" . देव म्हणाला, "नाही बेटा अजून 43 वर्ष, 8 महीने & 2 दिवस बाकी आहेत."
ऑपरेशन सफल झाले, तिने मनात ठरवले आता राहीलेली जिंदगी फुल जगायची. तिने लगेचच त्याच हॉस्पिटलमध्ये राहायच आणि चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी व सगळी बाॅडीचे कायापालट करुन घ्यायचं ठरवलं. सगळं करुन झाले, त्यानंतर तिने घरुन चांगला ड्रेस मागवला, हीलवाले शूज मागवून घेतले. हॉस्पिटलमध्येच तयार होऊन आता बाहेरच्या हाॅटेलमध्ये जेवायला जायचं ठरलं.
निघाली मॅडम आणि रोड क्राॅस करताना एका ट्रकने तिला उडवले. पुन्हा एकदा ती स्वर्गात देवासमोर उभी होती, तिने परत विचारले, "देवा पण तू तर,".
देवाने तिला अर्ध्यातच थांबवले व म्हणाला, "मला माफ कर बेटा, तू प्लास्टिक सर्जरी केल्यामुळे मी तुला ओळखलेच नाही."
त्यामुळे देवाने जे दिलंय त्यामध्येच समाधान मानून घ्या.
