ƦƲSӇƖƘESӇ M ƘAƊAM PATIL

Drama Romance

3.4  

ƦƲSӇƖƘESӇ M ƘAƊAM PATIL

Drama Romance

अंधार | short story | part1

अंधार | short story | part1

4 mins
526


part 1 


पावसाची मोठी सर येण्याअगोदर वातावरण कुंद व्हावे, आकाशात काळे ढग जमल्यामुळे अंधारल्यासारखे वाटून सारी सृष्टी जणू निःशब्द अन् स्तब्ध व्हावी तसे अनन्याच्या घरचे वातावरण झाले होते.

अनन्याचे बाबा मुकाटपणे घरात फेऱ्या मारत होते,आई विचारमग्न अवस्थेत कपाळाला हात लावून बसली होती तर आजी देवासमोर जपमाळ ओढत बसली होती.अनन्याला हे दृष्य पाहून भडभडून आले.आपल्यामुळे घरात एव्हढा तणाव आला आहे या अपराधी भावनेने ती बेडरूम मध्ये धावली अन् उशीत तोंड खुपसून हमसून हमसून रडू लागली.

'अगं काय सांगू तनया तुला? तुझ्या त्या मकरंद भावजीने अनन्याशी लग्न करायला चक्क नकार दिला.मी तिला फक्त एक 'चांगली मैत्रीण 'म्हणून बघतो म्हणे.मग तीन वर्ष का फिरत होता तिच्या बरोबर? टाईमपास म्हणून? आमचं तर अगदी डोकंच आऊट झालंय बघ!' आई तावातावाने तनयाशी बोलत होती फोनवर.

मकरंद हा तनयाचा मावसदीर. तनयाच्या लग्नात अनन्याची त्याच्याशी प्रथमच भेट झाली.परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आलेला मकरंद एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर काम करत होता. अनन्या अन् मकरंद एकमेकांकडे आकर्षित झाले. भेटीगाठी वाढत गेल्या.दोघेही परस्परांना अनुरूप असल्याने दोन्ही घरातून त्यांना अप्रत्यक्ष संमती होती.

अनन्याचे शिक्षण पूर्ण होऊन ती नोकरीत सेटल झाल्यावर तिचे आई-बाबा विवाहाचा प्रस्ताव घेऊन गेल्यावर मकरंदचे असे घूमजाव? सगळे एकदम चक्रावूनच गेले. ऑफिसमध्ये लंच अवर जवळ आला आणि अनन्याचा मोबाईल वाजला.मकरंदचा फोन होता.अनन्या संतापलीच.सरळ कट करून टाकावा फोन!पण का कुणास ठाऊक,तिने फोन घेतला.

'अनन्या, मला तुझ्याशी बोलायचं आहे.येशील?प्लीज?'

मकरंदच्या आर्जवाला अनन्या नाही म्हणू शकली नाही.तिला पण मकरंदला जाब विचारायचा होताच.अनन्याची पावले आपसूकच नेहमीच्या जागेकडे वळली.

'हॅलो', तनयाचा फोन अनन्याने उचलायला अन् 'अनन्या',तू काय घेणार,कोल्ड कॉफी विथ क्रीम की ग्रीन टी?'असे मकरंदने विचारण्यास एक गाठ पडली.

'अनन्या, तुझ्याबरोबर कोण आहे?' तनयाने संशयाने विचारले.

'ताई, मी जरा बिझी आहे.मग करु का फोन?'असे विचारुन अनन्याने पटकन फोन बंद केला.

'या या अनन्यादेवी,' घरात पाऊल टाकताच तनयाने खोचकपणे स्वागत केले.

'अनन्या, अगं ताई काय म्हणतेय?

तू त्या मकरंद बरोबर होतीस दुपारी?'

अनन्याने नुसतीच मान डोलावली.

'अगं का गेलीस त्याच्याबरोबर? झाली तेव्हढी शोभा पुरे नाही का झाली?'आईने संतापून विचारले.

'त्याला जाब विचारायला', अनन्या तोंडातल्या तोंडात पुटपुटली.

'मग काय म्हणाला तो?'बाबांनी विचारले.

'त्याचा लग्नसंस्थेवर विश्वास नाहीये.हवंतर आपण 'लिव्ह इन रिलेशन मध्ये 'राहूया म्हणतोय तो!'

'काय?'आईबाबा आणि तनया एका सुरात ओरडले.

'त्याच वेळी मुस्काटात का नाही मारलीस त्याच्या?'तनया किंचाळली.

'अनन्या काय म्हणतेय?'सगळेजण एव्हढे अपसेट का झाले ते आजीला कळेना.

'आजी, अगं तो मक्या आहे ना तो हिला म्हणतोय आपण लग्नाशिवाय एकत्र राहू!'

'शिव शिव', आजीने कानावर हात ठेवले अन् ती देवासमोर जपमाळ ओढायला निघून गेली.

'हे बघ अनन्या, मकरंद माझा मावसदिर असला तरी त्यानं तुझा असा अपमान केलेला मी खपवून घेणार नाही.तू त्याला काय सांगितलंस?'

'अजून काही बोलले नाही.' अनन्या गुळमुळीत पणे म्हणाली.

'उद्याच्या उद्या त्याच्याशी संबंध तोडून टाक,'बाबा करडेपणाने म्हणाले.अनन्याने मान डोलावली.

'प्रत्येक घरात डोकावलंस तर तुला हेच दिसून येईल की स्त्री आणि पुरुष हे वेगवेगळ्या तागडीत तोलले जातात.पुरुषांना घरात झुकतं माप दिलं जातं. पण बायका मात्र घर, ऑफिस, नातेवाईक,आला गेला या सर्व आघाड्यांवर झगडत असतात.मला नेमकं हेच डाचतं. लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये दोघेही समान पातळीवर असतात.घरची कामं,फायनान्शिअल डिस्ट्रीब्यूशन....सारे समान! शिवाय नातेवाईक, पाहुणे रावळे यांना घरात स्थानच नाही त्यामुळे वादावादीचे प्रश्न येण्यास वावच नाही.घरात फक्त तू आणि मी.आपलं दोघांचंच राज्य! अजून भारतात ही संकल्पना नवीन आहे,पण फॉरिन कंट्रिजमध्ये पुष्कळ जण असंच रहाणं पसंत करतात.'मकरंदचे हे बोल आठवता आठवता अनन्याला कधी झोप लागली ते कळलंच नाही.

'अनन्या,तू अजून मकरंदला भेटतेस?'तनया तिच्या अंगावर धावून गेली.तनया अतिशय संतापली होती हे तिच्या धपापणाऱ्या उरावरून कळत होते.

'हो',अनन्या शांतपणे म्हणाली.'उद्यापासून मी आणि मकरंद त्याने घेतलेल्या भाड्याच्या घरात रहावयास जाणार आहोत.'

'काय?'आई, बाबा, तनया, आणि आजी

 एका सुरात ओरडले.

'अनन्या',असा आततायीपणा करु नकोस',आई कळवळून म्हणाली.'त्याचे पुढे काय परिणाम होतील याची तुला कल्पना तरी आहे का? आणि आपल्या ताईची तिच्या सासरी किती नाचक्की होईल याचा विचार तरी केला आहेस का?'

'तुझ्या या लिव्ह इन रिलेशनशिपला समाजाची मान्यता नाहीए हे तुला माहीत आहे ना?'आवाजावर शक्य तितका संयम ठेवत बाबा म्हणाले.

'बाबा, तिला कोंडून ठेवा आणि चांगलं फटकवा.त्याशिवाय सरळ यायची नाही ती,'तनया चवताळली होती.

'मी सज्ञान आहे.त्यामुळे कसं रहावयाचं ते ठरविण्याचा मला पूर्ण अधिकार आहे.'

'कशी पोपटासारखी चुरुचुरु बोलतीये पहा,त्या मक्याने पढवलंय वाटतं!'

'तू सज्ञान आहेस ते कायद्याने!पण अनुभवाने, अनेक टक्के टोणपे खाऊन झालेला सज्ञान आणि कायद्याच्या निकषावर ठरवलेला सज्ञान यात जमीन अस्मानाचा फरक असतो अनन्या!'बाबा समजूत घालत म्हणाले.'म्हणून तर वेळ प्रसंगी भल्या बुऱ्याचा अनुभव घेतलेल्या आजीचा सल्ला मी घेत असतो.'

'पोरी माझं ऐक, हवं तर नोंदणी पद्धतीने का होईना,पण लग्न कर.अगं बाईच्या आयुष्याला संरक्षण मिळतं त्यामुळे,'आजीच्या अजीजीच्या स्वराचा अनन्यावर काही परिणाम झाला नाही.ती बेडरूममध्ये निघून गेली.

'हिला वाढवण्यात कुठे चुकलो तेच कळत नाही,'आई डोळे पुसत परत परत तेच म्हणत राहिली.

'उठा राणीसरकार, चहा तय्यार आहे!'मकरंद नाटकीपणे कमरेत झुकून म्हणाला आणि त्याने चहाचा कप अनन्यापुढे केला.अनन्या सुखावली.

मकरंद बरोबर अनन्याचे सहजीवन सुरू होऊन आज एक आठवडा झाला,पण सारे दिवस कसे धुंदित, गंधित झाले होते.मकरंदच्या सहवासात, एकमेकांच्या आवडीनिवडी जपत केलेली भांडीकुंडी, फर्निचरची खरेदी,कामाचे सुयोग्य नियोजन आणि समान वाटणी यामुळे मकरंदच्या उक्तीप्रमाणे वादावादीला खरोखरच जागा नव्हती.अनन्या अन् मकरंदचे रुटीन व्यवस्थित बसले होते.


Part 2 out now......


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama