दॅट्स ऑल युवर ऑनर प्रकरण २
दॅट्स ऑल युवर ऑनर प्रकरण २
प्रकरण दोन
तपनलुल्लाने अंदाज केल्या प्रमाणे दुसरा दिवस स्वच्छ सूर्य प्रकाशाचा होता. पाऊस पूर्ण पणे थांबला होता.आकृतीसेनगुप्ता ने तिची गाडी दुरुस्त करायला माणूस आणला होता. त्याने गाडीचा डिस्ट्रिब्यूटर बदलला आणि गाडी व्यवस्थित चालू केली होती. त्या दिवशी आपले काम ती कृत्रिम पणे करत राहिली. तपन हा एक वाया गेलेला मुलगा होता आणि त्याला धडा शिकवायचाच असा तिने निश्चय केला होता.भले तिला तिची नोकरी गमवावी लागली तरी बेहत्तर. तिने त्याच्या विरूध्द दावा ठोकला असता तरी त्याचा फारसा उपयोग झाला नसता असे तिला वाटून गेले.कारण त्यांनी तिची माहिती गुप्त हेरांकडून मिळवली असती, ती कुठल्या पुरुष बरोबर कधी , कुठे गेली, सगळ सगळ त्यांनी शोधून काढल असत, तिच चारित्र्य बदनाम केले असते. पण असाच विचार करून त्याला बळी पडलेल्या इतर मुली घाबरून काहीच करत नसतील म्हणूनच अशा लांडग्याचे फावत असेल. ते काही नाही त्याला सजा मिळालीच पाहिजे. आणि एका विविक्षित क्षणी तिने अंतिम निर्णय घेतला. पाणिनी पटवर्धन ला भेटायचे !
तिने त्याच्या ऑफिस चा नंबर लावला.ती पाणिनीपटवर्धन ची सेक्रेटरी, सौम्या सोहोनी शी जोडली गेली. तिने आपली ओळख करून दिली आणि पाणिनीपटवर्धन ना सायंकाळी भेटायचे आहे म्हणून सांगितले.सौम्या ने पाणिनीपटवर्धन शी बोलून दुपारी अडीच ला येणे शक्य आहे का असे विचारले. ‘‘ मी जमवते.‘‘ आकृती तिला म्हणाली.
पाणिनी पटवर्धन ने भेटायला मान्यता दिली या जाणिवेनेच तिच्या मनावरचे निम्मे ओझे उतरले. दुपारी दीड वाजता तिच्या ऑफिस मध्ये बरीच खळबळ चालू झाल्याचे तिच्या लक्षात आले.नमनलुल्ला म्हणजे मालक, तपन चा बाप काहीतरी अघटीत घडल्या सारखा चेहरा करून इकडून तिकडे फिरत होता.दुसरा उपाध्यक्ष लुल्ला च्या मागे मागे करत होता.तपन मात्र ऑफिस ला आलेला दिसत नव्हता.
आकृती तिच्या साहेबांकडे गेली. ‘‘ मला आज दुपारी एक तास बाहेर जाऊन यायचं.खूप महत्वाच काम आहे. काल मी जादा वेळ थांबून सर्व काम पूर्ण करूनच गेले घरी. त्याचा कोणताही जादा पगार मी मागितलेला नाही. सवलत देता येत नसेल तर अर्धा दिवस रजा द्या.‘‘ एका दमात तिने सांगून टाकले.
‘‘ ही खूपच विचित्र विनंती आहे आकृती. ‘‘
‘‘ परिस्थिती पण विचित्रच आहे माझ्या समोर. ‘‘ तिने उत्तर दिले.
‘‘ तुमच्या कामाबद्दल काहीच प्रश्न नाहीये आकृती, पण अस आहे की एकदा प्रथा पडली ना की आपल्या पोरी ब्युटी पार्लर मध्ये जायला सुद्धा सवलत मागतील..... पण ठीक आहे या तुम्ही तासाभरात जावून.‘‘
‘‘ दीड तास ‘‘ ती ठाम पणे म्हणाली.
समोरच्या साहेबाने चमकून तिच्याकडे पहिले. थोडेसे नाखुशीनेच तो म्हणाला.‘‘ बर ठीक आहे आकृती ये जाऊन , जेवढे शक्य तेवढे लौकर ये.रजा नाही मांडत तुझी.‘‘
आकृती ने स्वतःची गाडी न्यायाचा अजिबात विचार केला नाही. पार्किग ला जागा शोधण्यात वेळ कोण घालवणार? सरळ टॅक्सी केली आणि निघाली. तिला दीड तासात सर्व काही संपवून परत ऑफिस ला यायचं होत कारण तसं तिने वचन दिल होतं. पण त्याला आता काही अर्थ राहिला नव्हता कारण तिला माहित होत की उद्या सकाळ पर्यंत ती कंपनीच्या नोकरीत राहणार नव्हती.
( प्रकरण दोन समाप्त )
