Gajanan Pote

Horror

3  

Gajanan Pote

Horror

चकवा

चकवा

2 mins
164


मानवी आयुष्य हे विविध प्रसंगांतून प्रसंगांतून जात असते.त्यात काही आनंदाचे क्षण असतात काही दुःखाचे ,काही भितीचे तर काही रोमांच आणणारे प्रसंग. आपण बर्‍याचदा वाटेने जातो पण कधीतरी अचानक वाट चुकतो आणि एखाद्या अनपेक्षित संकटात सापडतो. अशाच एका कल्पनेवर आधारित माझी ही भयकथा "चकवा"....


    कवठेवाडी नावाच एक गाव होत. या गावातील वाटा फार फसव्या होत्या. तेथील लोक हे सर्व शेतमजूर दिवसभर मजूरी करून अंधार होण्याच्या आत घरी यायची.मग कोणीही रात्री बाहेर निघायचे नाही. 

 त्या गावातील रस्त्यावर रात्रीला काही अतृप्त आत्मा भटकायच्या आणि भेटेल त्याला चकवा देऊन दूर घेऊन जायच्या. एके दिवशी त्या गावात चित्रपटाची शूटींग करण्यास काही मंडळी आली. 

       गावात आल्यावर गावातील लोकांनी त्यांच स्वागत केले. सर्व गावकरी मंडळी एक कुतहल म्हणून त्यांच्याभोवती जमली . त्यांन शूटींगवाल्यांन सर्व हकिकत सांगीतली. यावर त्यांचा विश्वास नव्हता. चकवा म्हणजे काय नेमक हेच त्यांना गंमत वाटत होती.

     रात्र झाल्यावर शहरातील ही मंडळी जेवण करून बाहेर निघाली.त्यात अमन हा नायक सिमरन सोबत बाईकवर निघाला. ती रात्र अमावास्येची होती ही दोघे आपल्याच धुंदीत गाडीवर भरदाव निघाले. काही अंतरावर जाताच त्यांना रस्त्यावर पांढरे वस्त्र धारण केलेली सुंदर तरुणी व एक तरुण उभा दिसला त्या दोघांनी अमनला हात दाखवला. अमन थांबला मात्र सिमरनला कोणीच दिसले नव्हते. ती अमनशी बोलत होती पण अमन संमोहित झाल्यासारखा झाला.त्याने त्याची बाईक जंगलाच्या दिशेत नेली.सिमरनला कुणीतरी तिला पकडून ठेवले असे जिणवत होते. तिच्या तोंडातून आवाज निघत नव्हता. 

    त्याची गाडी वर उडत होती जणू कुणीतरी ती उचलली होती आणि दूर जंगलात जात होती. अचानक गाडी खाली आदडली. अमन आणि सिमरनला ओढत घासत नेत होत. एक चेटकीण व एक विदृप तरुण त्या दोघांन उलटा करुन झाडावर टांगत होता. असा चकवा बसला होता की ,त्या दोघांचा जीवन प्रवास तिथेच संपला......


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror