भयाण माळरानावर
भयाण माळरानावर
प्रस्तुत कथा व कथेतील पात्र व ठिकाण काल्पनिक आहेत. याचा वास्तवाशी किंवा अंधश्रध्देशी काहीही संबंध नाही.
अभय, अंकित,रोहन हे तीन खास मित्र होते. वस्तापुर या गावात ते राहायचे. या तिघांची प्रत्येक गोष्ट सारखी असायची .कुठेही गेले तर सोबतच ते जायचे अशी त्यांची मैत्री घट्ट होती. एके दिवशी हे तिघे गावाबाहेर फिरायला गेले. तो अमावास्येचा दिवस होता. हे तिघेजण बिनधास्त होते. नविन विचारसरणीचे त्यामुळे शुभ अशुभ हे ते मानत नव्हते. ते गावाबाहेर एका माळरानावर गेले जिथे गावातील लोक जायला घाबरायचे.
आता बराच वेळ झाला सुर्य मावळला.तो परिसर सुनसान झाला. रात्र व्हायला लागली अभय थोडा घाबरु लागला. तो अंकित आणि रोहनला म्हणाला,"अरे मित्रांनो आता रात्र झाली चला आता घराकडे जाऊ." त्यावर अंकित त्याला म्हणाला ,"अरे थांब रे भावा जाऊ की सवडीने, आता तर चेटकीणीला भेटायचं आहे." हे ऐकताच रोहन फार घाबरला. हे बघून अंकित आणि अभय खो खो हसू लागले. पण त्या तिघांना कुठे ठाऊक होते त्यांची ही मस्करी त्यांनाच भारी पडेल.
चहूकडे अंधार पसरला होता. हे तिघे त्या माळावर बसून बिअर घेऊन चिंग झाले होते. तेवढ्यात गोड आवाजात कोणीतरी गात असल्याचा आवाज त्यांना आला. सोबतच घुंगरांचा आवाजही कानी पडला. बाजूलाच एक पडका पुरातन काळातील किल्ला होता. त्या किल्ल्याकडे यांचे पाय आपोआप वळू लागले. किल्ल्याच्या दाराजवळ पोहचताच अंकित ला एक सुंदरी दिसली. गुलाबी ओठ, मोठे डोळे,सुडौल शरीर असलेली.ती त्याला तिच्याकडे बोलवत होती. हा चकवा बसावा तसा तिच्याकडे जाऊ लागला. रोहन व अभय दोघे मंतरलेल्य अवस्थेत पुढे जाऊ लागले . त्यांच्यावर कोणी जादू केली आणि वशीकरण केल्यागत दिसत होती. ती रात्रच जणू मंतरलेली असावी.
अचानक कोणीतरी रोहनच्या पाठीवर थाप मारली आणि तो बावरला त्याचे डोळे लालबुंद झाले. हाताची नखे मोठाली झाली तो एखाद्या जंगली पशूसारखा करू लागला. दुसरीकडे अंकित त्या तरुणीच्या मिठीत होता. ती त्याच्यावर स्वार झालेली होती. त्याचे चुंबन घेत होती.त्यामुळे त्याच्या ओठातून ,तोंडातून रक्त वाहत होते. आणि ती सुंदरी जशी जशी रक्त पित होती तशी तशी ती विद्रूप दिसत होती. अंकित किंकाळ्या करत होते तशी ती आपले ओठ त्याच्या ओठाला लावायची. तसा रोहन एखाद्या जंगली जनावरासारखा धावत जाऊन त्या चेटकीणीच्या तोंडातील रक्त पिऊ लागला.
आता अभय बाकी होत. चालता चालता त्याला एका दगडाची ठेच लागली तसा तो भानावर आला. त्याने आजूबाजूला बघितले तर सर्वत्र गवत होते ,अंधार होता.त्याने खिशातील मोबाईल काढला व आपल्या मित्रांना शोधू लागला. तेवढ्यात त्याला भयंकर आवाज कानावर आला ,सोबत अंकित च्या किंचाळण्याचा आवाज आला. तो त्या दिशेने धावला. तर पुढचे दृश्य बघून तो घाबरला ,गोंधळला अंकितचा चेहरा रक्ताने माखलेला होता. रोहन एका जंगली पशुसारखा झाला होता. अभयला काय करावे सुचेना. त्याने स्वतःला सावरले.
अभय शरीराने सुदृढ व बलवान होता तो कुस्तीगीर होता. आणि बजरंगबलीचा निस्सीम भक्त होता. कदाचित यामुळेच त्याच्यावर कसलाच परिणाम झाला नव्हता. त्याने मोठ्या हिम्मतीने अंकित जवळ जाऊन त्या चेटकीणीला लाथ मारली व एका हाताने अंकितला उचलून दूर सारले. नंतर रोहनच्या मस्तकावर हात ठेवून श्री हनुमान चालीसाचे पठन करु लागला. तसाच रोहन शांत झाला व पूर्ववत स्थितीत आला व चेटकीण तेथून नाहीशी झाली.
अभयने आपल्या दोन्ही मित्रांना हॉस्पीटलमध्ये ॲडमीट केले व काही दिवसानी ते ठीक झाल्यावर त्यांना घडलेली हकिकत सांगितली.

