Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!
Unmask a web of secrets & mystery with our new release, "The Heel" which stands at 7th place on Amazon's Hot new Releases! Grab your copy NOW!

Gauri Ekbote

Inspirational

1.9  

Gauri Ekbote

Inspirational

बंध

बंध

15 mins
15.3K


एका स्त्री च आयुष्य किती वेगवेगळ्या छटांचं असत ,प्रत्येक बदल काही स्त्रिया स्वीकारता, परिस्थिती वर मात करून परत हिम्मतीने ती पुढे वाटचाल करता एका नवीन सुरुवातीसाठी, अवनी अशीच एक .....

नानासाहेबांना एकुलती एक लेक,,,,, खूप लाडात वाढलेली ... पण लाड हे कधी उतू नाही गेले

नानासाहेबांनी तिला परिस्थितीचे भान, वागणूक, खंबीरपणा पण दिला ... जन्मच्या वेळेलाच आई गेली पण त्यांनी आई ची कमी कधी तिला नाही जाणवू दिली

मुलांच्या बरोबरीने त्यांनी तिला शिक्षण दिलं, स्वतःच्या पायावर उभं केलं. तिला कॉम्पुटर मध्ये आवड असल्यामुळे त्यांनी तिला कॉम्पुटर इंजीनीरिंगला घातलं .

पुढे तिला एका मोठ्या कंपनीमध्ये चांगला जॉब पण मिळाला. सगळं कस छान चाललं होत , पण नियतीने काही वेगळंच वाढून ठेवलेलं होत अवनीच्या आयुष्यात

कंपनी मध्ये काम करत असलेल्या अनुरागला ती खूप आवडायची आणि तिला हि तो .. खूप हिमतीने त्याने तिला propose केलं ,,, आणि तिला हि ते खूप अपेक्षित होत तिने ते स्वीकारलं

खूप थाटामाटात नानासाहेबांनी त्यांचं लग्न लावून दिल . लग्नानंतर अवनीने जॉब सोडून दिला, पुढच्या महिन्यातच अनुराग ला Tech lead म्हणून प्रमोशन मिळालं , सोन पावलांनी सून घरात आली म्हणून आई बाबाना अवनीच खूप कौतुक होत , तिच्या लग्नाच्या एका वर्षातच हार्ट अट्याक मध्ये नानासाहेब गेले , त्यांच्या जाण्याने अवनी ला खूप त्रास झाला , तिच्या साठी ते खूप मोठा आधार होते , नानासाहेब तिचे आई, वडील आणि एक चांगला मित्र हि होते . एखाद वासरू कस त्याच्या आई पासून दुरावला कि कावरबावर होत तशी अवस्था अवनीची झाली होती पण आई बाबानी त्यांची जागा अवनीच्या आयुष्यात घेतली तिला ती एकटी आहे हे जाणवू पण नाही दिल , तिला त्या अवस्थेतून बाहेर यायला आईनी खूप साथ दिली त्या तिची सासू नाही तर आईच झाल्या, स्वतःच्या मुली सारखं ते तिला समजत सून म्हणून कधी अवनी त्यांना वाटलीच नाही . लग्नाला एक वर्ष झालं त्या दिवशीच अनुराग ला पुढचं Architect म्हणून प्रमोशन मिळालं, सगळे खूप खुश होते . असे आनंदात दिवस जात होते , पण ह्या सुखाला कुणाची नजरच लागली जणू , लग्नाला आता २ वर्ष झाली होती काहीतरी गोड बातमी द्या म्हणून अनुराग कडचे मागे लागले होते . पण अनुराग ला अजून नवी जवाबदारी नको होती . त्याला करिअर job वर concentrate करायचं होत , त्याची स्वप्न खूप मोठी होती आणि त्याच्या विरुद्ध अवनी च होत तीच स्वप्न एका छोट्याश्या घरट्याच राजाराणीच्या संसारच होत ,,, अशामुळे अताशा त्यांच्यात भांडण व्हायला सुरवात झाली होती , चीड चीड होत होती दोघांची ,, अनुरागच्या आई वडील ह्यांनी खूप समजावलं म्हणून अनुराग बाळा साठी तयार झाला खरा .....

त्या नंतरचे तीन चार महिने व्यवथित गेले आणि गुड news आली .... अनुराग चे आई वडील खुप खुश होते पण अनुराग अजूनही त्याच्या करिअरच्या मागे होता त्याला abroad settle व्हायचं होत . त्यातून हि नवी जवाबदारी त्याला नको होती , त्याची खूप घालमेल व्हायला लागली होती , खूप उशिरा पर्यंत तो ऑफिस मध्ये काम करू लागला होता , घरी खूप कमी वेळ तो यायचा अवनीला वाटायचं कि बाळासाठी तो खूप मेहनत घेतोय त्याच्या भवितव्या साठी तो हे सगळं करतोय म्हणून ती हि काही बोलायची नाही . अश्याच मनस्थिती मध्ये अनुराग ची ओळख शालिनी शी झाली, शालिनी दिसायला अतिशय आकर्षक वय वर्ष ३०, अविवाहित . तिलाही कुठलीच जवाबदारी बंधन नको होती परदेशात जाऊन राहायचं मज्जा करायची , पार्ट्या करायच्या , आणि मोठे मोठे पैसेवाले लोक फसवून स्वतःच्या इच्छा गरजा पूर्ण करायच्या अशी होती शालिनी. ऑफिस काम ती फक्त असे बडे शिकार शोधण्यासाठी आणि जर कोणी नाहीच मिळालं तर उदरनिर्वाह चालवायचा म्हणून करत होती , ह्यात बडे लोग शोधन हा प्रमुख उद्धेश होता .

एका ऑफिस मीटिंग मध्ये अनुराग आणि शालिनी ह्याची भेट आणि ओळख झाली होती. शालिनीला अनुराग खूप आवडला होता शिवाय त्याच background कळल्यावर तर तिने त्याला सोडलंच नाही , हळू हळू ती त्याच्या जवळ जाऊ लागली , ओळख वाढवू लागली , तो ज्या मीटिंग ला असे तिथे मुद्दाम त्याच्या जवळची जागा बघून बसू लागली , अनुराग ला पण तीच असणं आवडू लागलं ती नसली तर तो बेचैन व्हायला लागला , तिला ऑफिस मध्ये तो शोधू लागला , त्याने तिला त्याच्या प्रोजेक्ट मध्ये सामील करून घेतलं होत

आता अवनीला तीन महिने पूर्ण झाले होते , अनुराग आपल्याला टाळतोय हे आता तिच्या लक्षात यायला लागलं होत ,आता तर तो दिवस दिवस बाहेर राहू लागला होता , रात्री सुद्धा उशिरा येऊन लवकर ऑफिस जात होता . तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयन्त पण केला पण नेहमी प्रमाणे त्याने तिला टाळलं ,

इकडे ऑफिस मध्ये त्याला ६ महिन्यासाठी US मध्ये कॅन्सास ला onsite जायचं होत , नवीन प्रोजेक्ट तिथे सुरुहोणार होता , त्यावर त्याने काम पण खूप केलं होत . आता शालिनी आणि त्याच प्रेम बरच फुललं होत , जसशालिनीला कळलं कि तो आता कॅन्सास ला जाणार ती लगेच त्याच्या कॅबिने मध्ये गेली आणि मला हि घेऊनचल म्हणून मागे लागली , तिच्या लडिवाळ बोलण्याला आग्रहाला अनुराग भुलला आणि स्वखर्चाने तीच पणबुकिंग केलं

जाण्याच्या अगदी आदल्या दिवशी त्याने घरी सांगितलं , अवनीला तर काय बोलू काहीच सुचलं नाही , अनुरागरात्रीच तयारी करून पहाटेच बॅग घेऊन अवनीला न सांगता निघून गेला . सकाळी उठल्यावर तिला आईनीसांगतील तो पहाटेच गेला तुझा डोळा लागला होता . म्हणून त्याने तुला उठवू नको म्हणून सांगितलं . त्या संपूर्णदिवस अवनी ला काहीच सुचल नाही . असं अनुराग का वागतोय तिला कळत नव्हतं . इकडे अनुराग नेशालिनीला pickup करून मुंबई गाठलं होत . त्यादिवशी मुंबई हुन रात्री ३:३०च flight होत , ते दुपार पर्यंतमुंबईत पोहोचले होते , मुंबईतच त्यांनी शॉपिंग च ठरवलं होत , शॉपिंग नंतर ते एका हॉटेल मध्ये मस्त जेवणआणि मग एअरपोर्ट असं प्लॅन प्रमाणे चाललं होत ,

इकडे अवनी च मन कशातच लागत नव्हतं काहींतरी विचित्र होतंय असं सारखं तिला जाणवत होत , पण नक्कीकाय हे काही कळत नव्हतं . रात्री कसतरी करून झोप लागली तिला पण अचानक दचकून जाग आली , स्वप्नखूप घाणेरडं पडलं होत , कुणीतरी अनुरागला तिच्या पासून ओढत दूर नेत होत परत थोडं पाणी पिऊन तीन झोपायचा प्रयत्न केला

असेच दिवस जात होते इकडे अनुराग आणि शालिनी मजेत चाललं होत , अनुराग ला जाऊन तीन महिने झालेहोते

ह्या तीन महिन्यात त्याने एकदाही स्वतःहून कॉल केला नव्हता बाबांनीच त्याला दोन वेळा खुशाली साठी कॉलकेलेला

नंतर त्याने बरयाचदा त्यांच्याशी सुद्धा बोलणं टाळलं . तो परत आलाय आणि दुसऱ्या फ्लॅट वर राहतोय हे त्यांनानंतर कळलंतो असं का वागतोय त्यांना नाही समजलं

अवनीला आता सातवा महिना सुरु होता , आणि अचानक रात्री बाबांच्या (सासऱ्यांचा ) मोबाइल वाजला , अनुरागचा आहे असं म्हणून खूप आनंदाने त्यांनी तो घेतला ते तिघेही खूप खुश झाले अवनीला तर आनंदच मावतनव्हता पण बाबांचा चेहरा फोनवर बोलता बोलता अचानक पडला , काय होतंय हे तिला आणि त्याच्या सासू लाकाही काळात नव्हतं पण काहीतरी विचित्र बोलतोय अनुराग हे मात्र नक्की

आणि थोड्याच वेळात फोन कट झाला बाबांच्या डोळ्यात अश्रू मावत नव्हते काय झालं म्हणून आईनी विचारलंतर बाबा बोलले कि तो दुसरं लग्न करतोय आणि तो अवनीला डिवोर्स ची नोटीस पाठवतो आहे .

हे एकूण तर अवनीच्या पाय खालची जमीनच निसटली, रडणं सुद्धातिला सुचलं नाही , आई बाबा तर खचूनचगेले. दुसरं लग्न , कोणाशी , कोण आहे ती , का , कशाला असे अनेक प्रश्न एकदम अवनीला भेडसावून गेले

ह्या नंतर तिसऱ्याच दिवशी अनुराग ने एका वकील तर्फे अवनीला नोटीस पाठवली . सातवा महिना संपायलाआलेला होता , आणि अवनीला नोटीस बघून खूप त्रास व्हायला लागला आई बाबानी तिला लगेचच दवाखान्यातऍडमिट केलं . ब्लीडींग सुरु झाल्यामुळे डॉक्टर नि तिच ऑपेरेशन च सांगितलं सिझिरेयन करून डिलिव्हरी केली, मुलगी होती , येवडूस बाळ एका पेटीत ठेवलं , अवनीला तर अजून शुद्धच आली नव्हाती . त्या दिवशीअनुरागचा बाबाना कॉल आला तिला पटकन सही करायला सांगा म्हणून , बाबानी बाळच त्याला मुलगीझाल्याचं सांगितलं पण त्याने फोन ठेऊन दिला ,

अवनीला शुद्ध आली बाळ कस आहे तिने विचारल , आईनी सांगितलं मुलगी आहे , बाळ व्यवस्थित आहे . फक्तहे ऐकून अवनीला जरा बर वाटलं

एक आधार वाटला तिला , तिने सगळं बळ एकवटून बाबानं कडून त्या डिवोर्स पेपर वर सही केली , आणि बाबानाबोलली बाबा सांगा त्याला कि तू आता मुक्त आहेस आमची कुठलीही जावबदारी तू मानू नको किंवा आमचाकुठलंही तुला त्रास होणार नाही .

बाबानी खूप दिवसांनी पहिली लग्न करून आणलेली अवनी बघितली , खूप छान वाटलं त्यांना , अवनी बेटा तुलामाझा आणि हीचा कायम पाठींबा असेल , आमच्या पोटच्या पोराने आज हे दिवस दाखवले आम्हाला ,,,, पणवाईट वाटून घेऊ नको तू आमची मुलगीच आहेस

दोन दिवस बाळ खूप छान response देत होत पण तिसऱ्या दिवशी का कुणास ठाऊक बाळाचे ठोके मंद झाले होते , डॉक्टर सर्व प्रकारे प्रयत्न करत होते पण ..... शेवटी व्हायचं तेच झालं ते त्या छोट्याच्या नाजूका ला नाही वाचवू शकले

अवनी वर तर संकट जस काही एक एक करून वारच करत होते , आई बाबा आणि अवनी त्या दिवशी खूप रडले , त्या एका आशेवर अवनी सगळं विसरायला तयार झाली होती , तिच्यात हिम्मत आली होती , पण ती किरण सुद्धा विझली होती देव इतका निष्ठुर कसा होऊ शकतो ,

दुसऱ्या दिवशी आई बाबानी अवनीला घरी आणलं ,,, पण अनुरागच्या आठवणी तिला सतत रडवत होत्या ....

अनुराग मात्र पूर्णपणे शालिनीमय झाला होता , लिव्ह इन रेलशनशिप मध्ये अनुरागच्या पुण्याच्या कल्याणी नगरच्या फ्लॅट मध्ये ती दोघे राहत होती , पैसा तर शालिनी पाण्या सारखा खर्च करत होती

.अनुराग कमावत होता आणि शालिनी उधळत होती ,पण अनुराग च्या डोळ्यावर शालिनीच्या प्रेमाची पट्टी होती

अवनी ला एक एक दिवस युगा सारखा वाटत होता सतत ते बाळ किंवा अनुराग तिला डोळ्यापुठे दिसत होता

तिची अवस्था बघून आई बाबा सुद्धा हळवे झाले होते

पोरीला ह्यातून कस बाहेर काढायचं , ह्याचाच ते विचार करत होते .

अवनीला तर वेळ , दिवस , तारीख , काहीच लक्षात नव्हतं , जेवण पण आई नि बोलावलं तर बाहेर यायची काहीतरी मोजून दोन घास खायची कि परत रूम मध्ये . काय होऊन बसलं हे .. पोर तरी हिम्मतवाली पण एकावर एक घाव कसे सहन करत असेल तीच तिलाच माहित आई आणि बाबा म्हणत

काही तरी करून तिला ह्यातून बाहेर पडायला आपणच मदत करायची असं त्या दोघांनी ठरवलं होत

बाबांचे एक मित्र कुलकर्णी, हे प्राध्यापक होते एकदा असच बोलता बोलता त्यांनी त्यांची हि इच्छा त्यांना बोलून दाखवली , त्यांनी बाबाना सुचवलं कि त्यांच्या कॉलेज मध्ये lecturer साठी जागा आहे आपण तिला मनवू , थोडावेळ हि जाईल आणि मन हि रमेल कामात व्यस्थ राहील ती .

बाबाना हा विचार खूप म्हणजे खूप आवडला .. ते लगेच घरी पोहोचले , आईना त्यांनी त्यांचं आणि कुलकर्णी च बोलणं सांगितलं आई पण खुश झाली पण अवनीला कस तयार करायचं हा मोठा प्रश्न होता .

आई तस तिच्याशी बोलायला तिच्या रूम मध्ये जात असत, आज हि त्या गेल्या थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी त्यांनी केल्या आणि त्या अवनीला बोलल्या "तू ह्यातून बाहेरपड बाळ , तुझं असं एकटं राहणं आम्हाला नाही सहन होत , निदान आमच्यासाठी तरी ... मी एक स्त्री म्हणून तुझं दुखणं समजू शकते .. पण तुझ्या पुढे आजून खूप मोठं आयुष्य आहे ,,, आम्ही काय वय झालेली मंडळी ,, आज आहोत उद्या च माहित नाही .... आहोत तो पर्यंत तुला नक्की साथ देऊ .. तू ह्यातून बाहेर पड मला ह्यांना तुझ्यावर , तुझ्या कर्तृत्वावर खरंच खूप विश्वास आहे ... तू मनातून तयार हो ... उभारी धर ... ह्या आघाताला, तुला त्रास देणाऱ्यांना दाखवून दे .. उठ अवनी झटक हे सगळं ... " आणि त्या निघून जातात .

अवनि हे सगळं फक्त ऐकत असते , त्या गेल्या नंतर ती त्याच्या बोलण्याचा विचार करते .

संध्याकाळी जेवायला आई अवनीला आवाज देतात , टेबल वर आई बाबा तिची वाटच बघत असतात . अवनी येते पान वाढलेली असतात , सगळे सुरुवात करतात , थोड्याच वेळात बाबा हि आईनी बोललेला विषय काढतात ,, अवनी आई तुझ्याशी दुपारी बोलली .... ते खरच आहे ... मला हि तू ह्यातून बाहेर यावं असं वाटत . तुझ्या साठी जे काही आम्हा दोघ म्हातार्यांना करता येईल ते आम्ही करू .. तुला नक्की साथ देऊ बाळ .. तू आमचीच आहेस ...आमच्यासाठी तू उभारी धर ... आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे कि तू नक्की ह्या परिस्थितून बाहेर येशील आणि त्यासाठी मी आज कुलकर्णी शी बोललो त्याच्या कॉलेज मध्ये lecturer ची vacancy आहे . तू विचार करावा ह्याचा असं आम्हा दोघांना वाटत .

अवनी बाबांचं म्हणणं ऐकत असते .. जेवण संपवून ती परत तिच्या रूम मध्ये जाते . आत गेल्यावर तिला आईच बाबाच बोलणं आठवत , तिला नानासाहेब आठवतात त्यांना अवनीच असं वागणं कधीच आवडलं नसत ... त्यांनी सुद्धा जे आईबाबा बोलले तेच तिला सांगितलं असत . रडत बसणं नानासाहेबांना कधीच आवडलं नसत . अवनी रात्रभर ह्या गोष्टीचा विचार करते . दुसऱ्यादिवशीची सकाळ हि अवनी बाबा आई ह्यांच्या साठी एक नवीन सुरुवात घेऊन येते

सकाळी आन्हिक आटोपून न बोलवता अवनी बाहेर येते , ती चहा साठी टेबले वर बसते , आई त्यांचा , बाबांचा आणि अवनीचा चहा आणतात , ती दोघांना सांगते मी तयार आहे interview साठी कधी जायचंय सांगा . आई बाबांसाठी हा खरंच खूप मोठा आनंदाचा क्षण असतो , बाबा लगेचच कुलकर्णी ना फोन लावतात , उद्याची सकाळची ११वेळ ठरते , त्या दिवशी अवनी तिची जुनी पुस्तक चाळत बसते आई ना ते बघून खूप छान वाटत .. पोर बाहेर पडते आहे ,,, हेच त्यांच्यासाठी खूप मोठं असत . सकाळी ती आणि बाबा कॉलेज ला जातात अवनीचा interview होतो , तो पर्यंत बाबा बाहेरच तिची वाट बघत असतात . ती दोन तासांनी बाहेर येते , बाबा खूप उत्सुकतेने तिच्या कडे बघतात ,,, ती उत्सुकता तिला स्पष्ट दिसते ती बाबां जवळ येते आणि सांगते बाबा परवा पासून जॉइनिंग आहे . इतका आनंद बाबाना अनुरागच्या जॉबच्या वेळेस पण नव्हता झाला , जाताना बाबा पेढे घेऊनच घरी जातात आणि आई ने दार उघडल्या उघडल्या त्यांच्या हातावर एक पेढा ठेवतात आई ह्यातच सर्व समजून घेतात आणि अनानंदाश्रूनी दोघांचं स्वागत करतात . आणि अवनीच कॉलेज सुरु होत.

इकडे अनुराग आणि शालिनी च लिव्ह इन सुरुवातीला खूप मस्त मजेत चाललं होत . कुठलाही बंधन नाही , ना कुणाची काही जवाबदारी, ना कुणी प्रश्न विचार होत , हवं ते हवं तेव्हा करता येत होत , सगळं एकदम बिनधास्त चाललं होत , अनुराग शालिनी मध्ये पूर्णपणे गुंतून गेला होता , even तिनेच त्याला गुंतवून घेतलं होत . त्यात तिचा double फायदा होता एकतर त्याच्याकडून हवं तेव्हा पैसे मिळत होते शिवाय वेग वेगळ्या टूर मध्ये त्याच्या बरोबर जाता येत होत . कधी अगदीच नाही जमाल त्याच्या बरोबर जायला तर हिला एक हक्कच घर मिळालं होत जेथे ती आरामात तिच्या गरजा , पार्ट्या मित्र गोळा करू शकत होती .अनुराग ला कामाचा स्ट्रेस खूप वाढला होता , बऱ्याचदा तो ऑफिसमध्ये राही , घरी यायला पण त्याला खूप उशीर होत असे , रात्री आला तरी official कॉल असत त्या मुळे तो शालिनीला वेळ देऊ शकत नव्हता . अशातच शालिनीला राहुल भेटला, राहुल एक businessman होता त्याचा स्वतःचा फॅमिली business होता, शिवाय पिझाच्या रेस्टॉरंट chain होत्या पुणे आणि मुंबई मध्ये , राहुल अनुरागचा शाळेपासून चा मित्र . एकदा असच दमून अनुराग घरी आला तेव्हा शालिनीने खूप हट्ट करून त्याला पिझ्झा खायला जायचं म्हणून मनवला , ते एका छान शॉप मध्ये गेले अनुरागला तर केव्हा एकदाच खाऊ आणि घरी जाऊन झोपू असं झालं होत तो खूप दमला होता , ऑर्डर देऊन ते बसले तेवढ्यात तिकडून राहुल आला , ते त्याचाच शॉप होत , अनुराग ने राहुल शी शालिनीशी ओळख करून दिली , बघताच शालिनीला राहुल खूप म्हणजे खूपच आवडला शिवाय जेव्हा कळलं कि हे शॉप आणि असे chain शॉप त्याने पुणे मुंबई आहेत तिचे तर डोळेच चमकले. त्या नंतर अनुराग ऑफिस ला गेल्यावर त्या शॉप ला जाऊ लागली राहुलशी ओळख वाढवू लागली

असच एकदा अनुराग onsite जावं लागणार होता , त्याला 1 महिन्यासाठी काम होत तिथे , ह्या वेळेला शालिनीने कुठलाही आग्रह केला नाही त्याच्या बरोबर यायचा , तू जा मी थांबते म्हणून ती गेलीच नाही त्याच्या बरोबर , आता तिचा अनुराग मधला इंटरेस्ट संपला होता , तिला राहुल आवडू लागलं होता, .

राहुल स्मार्ट तर होताच शिवाय भरपूर पैसा हि होता त्याच्या कडे . शिवाय आता अनुराग तिला बोअरिंग वाटू लागला होता . ती आता राहुल ला टारगेट करू लागली होती , अनुराग गेला त्या दिवशी तिने राहुला फोन केला कि ती अनुराग नाही तर एकटी आहे , असं ती कधी राहिली नाही , खूप भीती वाटते तू सोबत येशील का , असं काहीतरी कारण सांगून त्याला बोलावून घेतलं , पण राहुल पक्का businessman होता शिवाय शालिनी काय आहे ह्याची त्याला थोडी आयडिया हि होती .

आता हि च वेळ आहे शालिनीला चांगला धडा शिकवायची म्हणून त्याने तीच इन्व्हिटेशन मान्य केलं आणि अर्ध्यातासात येतो म्हणून बोलला , शालिनीला वाटलं लागला मासा गळाला .

एक तास झाला तरी राहुल आला नाही म्हणून शालिनी थोडी अस्वथ झाली , तिला आता कंट्रोलच होत नव्हतं तिने परत त्याला कॉल केला , १०मिनिटात पोहोचतो म्हणून त्याने कळवलं

शालिनी ने त्याला अडकवायची पूर्ण तयारी केली होती , घरात सगळीकडे रेड कलर candels लावलेल्या होत्या, मंद सुवास असलेला रूम फ्रेशनर ऑलरेडी होताच, डिनर ची सगळी तयारी होती घरत एक मंद प्रकाश होता सर्वत्र शिवाय शालिनी कमालीच्या आकर्षक गाऊन मध्ये होती घरातलं वातावरण एकदम रोमँटिक होत .

१०मिनिटातच राहुल तिथे आला आणि बेल वाजली , अगदी आनंदाने रोमँटिक मूड मध्ये शालिनी ने दार उघडलं . दार उघडताच राहुल आत आला , तस शालिनी त्याच्या गळ्यातच पडली ,आणि अगदी लटक्या आवाजात म्हणाली केव्हाची वाट बघत होते मी तुझी dear , किती हा उशीर , किती कंट्रोल करायचं .

अगदी असाच ती अनुरागशी सुद्धा सुरुवातीला पहिल्या भेटीत वागली होती आणि ह्यालाच तो भुलला होता ,

शालिनी मुद्दाम राहुलच्या खूप जवळ जात होती , आणि अश्याच एका क्षणी एकदम बाल्कनी मधून अनुराग फिल्मी style ने आत आला . हे सगळं राहुल च प्लांनिंग होत , त्याला अनुराग ला पटवून द्यायचं होत कि शालिनी कसा त्याचा गैरफायदा घेते आहे

अनुराग च onsite जाणं , पण त्या प्लॅनिंग चा च एक भाग होता , आणि जेव्हा शालिनी त्याच्या बरोबर यायला तयार नव्हती तेव्हा त्याचा ह्या गोष्टीवर विश्वास बसला , राहुलने शालिनीचा आलेला कॉल सुद्धा अनुरागला ऐकवला त्या वेळी अनुराग त्याच्या सोबतच होता . आज शालिनी पूर्ती अडकली होती .. आणि अनुराग चे डोळे खाडकन उघडले होते

त्याला शालिनीचा खूप राग येत होता , तिला मारणार पण राहुल ने त्याला अडवलं , अगदी त्या क्षणी त्याने तिला घरा बाहेर काढला , आणि आत येऊन अनुराग एका लहान मुला सारखा राहुल च्या कुशीत रडला , त्याला तो आई बाबा आणि अवनीशी कसा वागला हे सगळं डोळ्यापुढे दिसत होत . प्रत्येक गोष्टीत तो शालिनीमुळे कसा त्याच्याच लोकांशी चुकीचा वागला हे त्याला जाणवत होत , आता त्याला अवनी आठवण येत होती , आई बाबां चा चेहरा डोळ्यापुढे येत होता पण प्रायश्चित करण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता. सगळं आठवून त्याला अतिशय वाईट वाटत होत आणि रडू अनावर होत होत , त्याला स्वःताचीच लाज वाटायला लागली होती .

दुसऱ्या दिवशी राहुल त्याला आई बाबानं कडे जाऊन माफी मागू म्हणून मागे लागला , पण ते माफ करतील कि नाही , आणि अवनी ,,,,,

कस तरी समजून राहुल त्याला आई बाबानं कडे घेऊन गेला , दाराची बेल वाजवली आई ने दार उघडलं अनुरागला आणि राहुल ला पाहताच तिला थोडा राग आला पण तो घरी आला होता म्हणून तिने त्याला आत बोलावलं , बाबा हॉल मधेच होते , अवनी कॉलेजला होती . बाबा अनुरागला बघून खूप चिडले कशाला आला आता परत ... आता कुठे आम्ही सुरळीत आयुष्य जगत होतो परत का आलास ,,, तुझी हिम्मत तरी कशी झाली घराचा उंबरा ओलांडायची , अरे ज्या अवनीने जीवा पलीकडे तुझ्यावर प्रेम केलं , तिला तू त्या नटवी साठी सोडलं , तू आमचा मुलगा आहेस ह्याचीच लाज वाटते मला , कुठे कमी पडलो आम्ही ,, कधी विचार केला कि अवनी च काय झालं असेल तुझ्या असल्या बेलगाम वागण्यामुळे , तिच्या पोटात वाढत असलेल्या त्या जीवाचा कधी विचार आला तुला , अरे तुला तर ऐकून पण घ्यायला वेळ नव्हता कि तुझं बाळ कस आहे , मुलगा आहे कि मुलगी ... नाही तू निघ इथून असं म्हणून बाबानी एक जोरात अनुरागच्या काना खाली वाजवली ... ज्या दिवशी तू divorce चे पेपर पाठवले त्या दिवशी आपला सुद्धा संबंध संपला . आता काय घ्यायला आलाय .. निघून जा इथून .. असं म्हणून बाबानी त्याचा हात धरून त्याला खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण राहुल ने त्यांना थांबलं आणि सगळं कस घडत गेलं ते सर्व सांगितलं अनुरागने हि माफी मागितली , तो दोषी आहे आणि ह्या साठी ते जी शिक्षा देतील ती भोगायला तयार होता

बाबा नि त्याला सर्वात पहिले अवनीची माफी मागायला सांगितलं आणि जर तिने तुला माफ केलं तर आम्ही पण स्वीकारू म्हणून सांगितलं . हे सगळं सुरु असतानाच अवनी दारात होती , खूप रडू येत होत तिला , अनुराग ने जेव्हा तिला पहिला त्या क्षणी त्याने तिची माफी मागितली ... तू जी शिक्षा देशील ती मला मान्य आहे .... अवनीने त्याला तिथेच थांबवलं . तिने अनुराग वर मनापासून प्रेम केलं होत पण ती आता त्याला एक नवरा म्हणून स्वीकारू शकत नव्हती. तिने त्याला माफ केलं , फक्त आणि फक्त आई बाबां साठी , पण नवरा म्हणून ती कधीच स्वीकारू शकली नाही .


Rate this content
Log in