Ajay Nannar

Tragedy Inspirational

4.0  

Ajay Nannar

Tragedy Inspirational

बजरंगी भाईजान

बजरंगी भाईजान

3 mins
217


वास्तविक पाहता ही घटना खरी आहे. घटना आहे भारत आणि पाकिस्तान मधील .

    मुन्नी पाकिस्तानातील राहणारी लहान मुलगी. एकदा ती तिच्या कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास करत असताना रेल्वे मधी काही वेळ थांबते. मुन्नी बाहेर पाणी आणायला जाते आणि थोड्या वेळाने अचानक रेल्वे पुढे जायला सुरुवात होते आणि मुन्नी मागेच रेल्वेला हात करत असते परंतु रेल्वे निघुन जाते.

मुन्नीच्या आईला जाग येते परंतु मुन्नी कुठेच दिसत नसल्याने तीला आता रडू आवरत नव्हते. मुन्नीचा शोध घेण्यासाठी जवानांनी तपास सुरू केला . मुन्नी भारतातच राहते तिला घरी जायचं असते परंतु तिला कोणताच मार्ग नव्हता. 

    मुन्नी एका हनुमान मंदिराच्या बाहेर फिरत असताना तिच्यावर एका भक्ताची नजर जाते. मुन्नी ने काहीही खाल्ले नसल्याने तो तिला जेवण देतो. त्याचे नाव पवनकुमार चतुर्वेदी. प्रेमाने लोक त्याला " बजरंगी " असे बोलावत असत. पवन हा हनुमानाचा खूप मोठा निस्सीम भक्त होता. मुन्नी ला त्याने एकटे न सोडता तिला घरी नेले. मुन्नीला घरी आणलेलं मात्र बापुजींना अजिबात आवडले नाही. मुन्नीला लवकरात लवकर तिच्या घरी घेऊन जा असा बापुजींचा आदेश होता.

    मुन्नी कुठून आली आहे. तिचे घर कुठे आहे हे पवनला काहीच माहिती नव्हते. मुन्नीला बोलता येत नव्हते. म्हणून पवनने तिला वेगवेगळ्या गावांची नावे सांगायला सुरुवात केली . फरिदाबाद, आसनसोल , पाकिस्तान. पाकिस्तान म्हटल्यावर मुन्नीने होकार देत हात वर केला. मुन्नीला आता पाकिस्तानात सोडवायचे होते. मुन्नीला पाकिस्तानात सोडविण्यासाठी पवनला व्हिजा काढावा लागनार होता परंतु पाकिस्तानात भारतीयांना प्रवेश नव्हता. भारत आणि पाकिस्तान मध्ये बॉर्डर होती. बॉर्डर सोडून आत गेल्यावर त्याला जिवंत सोडत नसतं. म्हणून पवनने मुन्नीला लपून पाकिस्तानात सोडविण्यासाठी एक एजंट ला सांगितले तो हे काम करत असत. परंतु तो एजंट. मुन्नीला पाकिस्तानात नाही तर तिला दुसरीकडे विकुन पैसे मिळवण्यासाठी बसला होता. पवनला कळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पवनने आधी त्या एजंट कडुन मुन्नीला सोडवले आणि घरी आणले.

    आता पवन मुन्नीला घरी स्वतः सोडवणार होता. हा पण च त्यांने केला आणि या कार्यासाठी बजरंगबलीचा आर्शिवाद घेऊन सुरुवात केली. बजरंगबली मदत करेल यावर पुर्ण विश्वास होता आणि सुरुवात केली. मुन्नीला घेऊन पाकिस्तानात जाण्यासाठी खालच्या मार्गाने लपून गेला. पवनला जवानांनी पकडले परंतु मुन्नीला तिच्या घरी सोडल्या शिवाय काहीच नाही. जवानांना पवन पक्का पागल वाटला. जवान थोडे झोपी गेल्यावर पवन तिथून निघून पुढे जाण्यासाठी सुरुवात केली. भारताने पाकिस्तानात जासुस पाठवला आहे असे वाटले परंतु पवन पाकिस्तानात एका मासुम लहान मुलीला तिच्या घरी सोडविण्यासाठी आणि तिला तिच्या कुटुंबाकडे पोहचविण्यासाठी जात होता. कधी ट्रक तर कधी गाडीत बसून जात असतं. पवन मुन्नीला खांद्यावर घेऊन जात असतं. पवनला पाकिस्तानात पकडण्यासाठी जवान व पोलिस तैनात करण्यात आले होते. शेवटी पवन पोलिसांच्या हाती लागला. एका बस मध्ये प्रवास करत असताना त्याला पकडले. परुंतु पवन पळत पळत मुन्नीला खाली सोडले. मुन्नी तिथून घरी गेली. मुन्नीला बघतात तिच्या आईचे आश्रु अनावर झाले आणि ती मुन्नीला मिठीत घेऊन फिरवु लागली. एक रिपोर्टर हे सगळं शुटिंग करत होता. हे टिव्हीवर सगळ्यांना लाईव दिसत होते. 

  पवनला पोलिसांनी पकडले त्याला खूप मारले. परंतु मुन्नीला घरी सहीसलामत सोडल्याचा आनंद होता. 

     नंतर पवनलाही सोडून दिले गेले. 

   ... हा भारत आणि पाकिस्तान मध्ये जोडणारा दुवा होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy