शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

4.0  

शब्दसखी सुनिता

Tragedy Inspirational Others

बीज अंकुरे अंकुरे सुनिता

बीज अंकुरे अंकुरे सुनिता

6 mins
240


     साधारणत: रात्रीचे अकरा वाजले असतील. अश्विनी एक कार्यक्रम आटोपून घरी जाण्यास निघाली होती. थंडीचे दिवस असल्याने रस्त्यावरची वर्दळही कमी झाली होती. अश्विनीने गाडीच्या काचा खाली पाडल्या आणि शॉल अंगावर ओढून घेतली होती. पुढे सिग्नलला तिची गाडी थांबली. सहजच तिचं लक्ष बाजूला फुटपाथला लागून असलेल्या तळ्याकडे गेलं. तिथल्या लोखंडी सळ्यांच्या कडांना धरून एक साधारणतः चोवीस पंचवीस वर्षांची तरुणी त्या तळ्यात वाकून पाहताना तिला दिसली. तिला थोडी शंका आली, त्यामुळे तिने ड्रायव्हर ला गाडी बाजूला घ्यायला सांगितली आणि ती गाडीतून उतरून त्या मुलीच्या दिशेने जायला लागली. ती तरुणी तळ्यात उडी घेणार इतक्यातच अश्विनीने तिचा हात धरून तिला मागे खेचलं. आणि म्हणाली...,

" वेडी आहेस का? आयुष्य का इतकं स्वस्त आहे? जे असं संपवायला निघालीस ते??" अश्विनीचा आवाज ऐकून ती तरुणी जरा दचकली आणि तिने अश्विनी कडे पाहिले. तिला बघून मात्र अश्विनीला धक्काच बसला.

" मंजू तू?? आणि हे काय झालंय तुला??? " अश्विनी म्हणाली. अश्विनी ला बघून मंजू म्हणजेच मंजिरी तिची बाल मैत्रीण तिला बिलगून रडायला लागली.

अश्विनी : " मंजू.. तू शांत हो बघू!! अशी रडू नकोस.. मी आलीय ना आता.., शांत हो बघू.

अश्विनी मंजू चे डोळे पुसत तिला जवळ घेते. आणि ड्रायव्हर ला पाणी आणायला सांगते.

अश्विनी : " मंजू घे पाणी घे थोडं. आणि उठ चल आपण हॉस्पिटल ला जाऊ या. बघ किती तोंड फुटलंय तुझं. कोणी केल हे सगळं..?? आणि तू कुठे होतीस इतके वर्ष..?? किती ग शोधलंय मी तुला..?? "

मंजू : " नको, नको! हॉस्पिटल नको!! तू... तू जा इथून. तो.. तो आला.. त्याने पाहिलं तर तो तुलाही जिवाणीशी मारेल. आशु तू निघ इथनं. मला जगायचं नाही आता... मला सगळं संपवायचं आहे. "

         असं म्हणतं मंजू बेशुद्ध झाली . तिच्या डोक्याला जबर मार लागला होता. तिचे ओठ फुटले होते. नाकातून रक्त वहात होत. हाता पायाला बेल्ट ने मारल्याचे वळ दिसत होते. अश्विनी तिला ड्रायव्हरच्या मदतीने गाडीत टाकते आणि तिला जवळच एका हॉस्पिटल ला घेऊन जाते. अश्विनी पेशाने सोशल वर्कर होती. तिचे पती देखील IPS ऑफिसर होते. मंजू ची अवस्था बघून तिला कल्पना आली होतीच की, ही डोमॅस्टिक व्हायोलन्स ची केस असावी. पण जो पर्यंत मंजू शुद्धीवर येतं नाही तिला काहीच कळायला मार्ग नव्हता. डॉ मंजूला तपासून तिला औषधी आणि इंजेकशन लावतात. त्यामुळे तिला शांत झोप लागली होती . मंजुच्या मनात मात्र असंख्य प्रश्नानी थैमान घातलं होत. पाच वर्षांपूर्वी हरवलेली मंजू तिला आज भेटली होती, आणि ती ही अश्या अवस्थेत. मंजू तिथेच रात्रभर चेअरवर बसून आपल्या मैत्रिणीकडे बघत बसली आणि हळूच भूतकाळात रमून गेली.

          आश्विनी आणि मंजिरी दोघीही जिवलग बाल मैत्रिणी. एकमेकींशिवाय दोघींचही पान हलायचं नाही. मंजिरी अभ्यासातही हुशार होती. तिचा आवजही खूप गोड होता. स्वभावानेही खूप शांत. सगळ्यांना समजून घेणारी. लहानपणीच मंजिरीची आई आजारपणात गेली. त्यानंतर तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यांना बायको तर मिळाली पण मंजिरीला आई मात्र कधीच मिळाली नाही. ती मंजूला खूप त्रास द्यायची. दिवस दिवस उपाशी ठेवायची. मात्र मंजुने कधीही तिच्या विषयीची तक्रार वडिलांकडे केली नाही. मंजूला नृत्याची फार आवड होती. कॉलेज मधे कार्यक्रम असला की ती त्यात आवर्जून भाग घ्यायची आणि पाहिलं बक्षीसही मिळावायची. अश्विनी आणि मंजिरी यांची जोडी तर अख्या कॉलेज मधे फेमस होती. त्या मैत्रिणी कमी आणि बहिणीच जास्त होत्या.

             कॉलेज ला असताना अचानक एक दिवस मंजू गायब झाली ती आज अशी अश्विनीच्या पुढे आली होती. अश्विनीने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, आयुष्यात तिला तिची मैत्रीण अशा अवस्थेत सापडेल. इतक्यात तिला आवाज येतो.., " आशु..., का मला वाचवलस ग? सोडून द्यायचं होत ना ग? मला नाही ग जगायचं आता? " मंजू ला जाग आली होती.

         आशु लगेच डॉक्टरांना हाक देते, आणि मंजू जवळ जाऊन बसते.

आशु : " ए वेडे, असं नाही हं बोलायचं. लवकर बर व्हायचं आहे तुला ओके. आता कुठलाही विचार नाही करायचा. मी आहे ना तुझ्या सोबत. (आशुचे हे शब्द ऐकून मंजूला थोडा धीर मिळतो.) मंजू, काय झालंय तुला? असा जीव द्यायला जात का कोणी?? आणि या जखमा कश्या झाल्यात? कुठे होतीस तू? तुला माहिती आहे मी किती शोधल तुला ते? काय झालंय मला सविस्तर सांग. "

          आशु तिच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तर मंजू कडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू लागली.

मंजू : " आशु, तुला आठवतंय ना! आपली फायनल परीक्षा होती तेव्हाच बाबा गेलेत. त्यानंतर आईने जबरदस्तीने माझं लग्न लावून दिल. ज्या माणसाशी माझं लग्न झालं तो ही राक्षसच होता. वाटल होत लग्नानंतर आपल्याला समजून घेणारी व्यक्ती मिळेल पण... सगळं उलट झालं ग. "

           बोलता बोलता मंजुचे डोळे गळायला लागले होते. इतके दिवस मनात पुरून ठेवलेल्या भावना आज उफाळून बाहेर येऊ लागल्या होत्या. ती तिच्यावर घडलेली परिस्थिती आशूला सांगू लागली. " बाबांच्या निधनानंतर आईने जबरदस्ती माझं लग्न लावून दिल. तो माणुसही खूप व्यसनी होता. रोज पिऊन येणे, मारझोड करणे, जबरदस्तीने जवळीक साधने. अशातच मला दिवसही गेले. वाटल आपलं बाळ येईल आणि काही तरी चांगल होईल. पण एक दिवस हा मानूस खूप पिऊन आला. माझ्याकडे पैसे मागू लागला. मी कुठून देणार? तर याने मला बेदम मारहान केली. त्यात माझं बाळ सुद्धा मी गमावलं ग. इतकं होऊनही त्याला काहीच वाटल नाही. त्याच व्यसन आणि पैश्याच्या हव्यासासाठी त्याने मला एका दलालाला विकून टाकलं. कसा तरी जीव वाचवून तिथून पळाले. घरी गेले. तर... आई आणि सावत्र भावाने मला बाहेर काढून दिल. मला काहीच सुचत नव्हतं ग. वाटल सगळं संपलंय आता. मला नकोय असं लाचारीने जगणं. मला संपवून टाकायचंय ग हे सगळं. "

           मंजुच बोलणं ऐकून आशुचे ही डोळे गळायला लागले होते. अश्विनीने अश्या खचलेल्या, परिस्थिती पुढे हरलेल्या, कित्येत स्रियांना त्यांच्या अधिकार मिळवून दिला होता. तिने कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की, तिची जिवलग मैत्रीण तिला अश्या अवस्थेत मिळेल. पण मनातून ती देवाचे आभारही मानते की, योग्य वेळी त्याने त्यांची भेट घडवली होती. थोडा जारी विलंब झाला असता तर कदाचित आशूने मंजूला कायमच गमावलं असत. या विचारानेच मंजूच्या अंगावर काटा आला होता. आपल्या खचलेल्या मैत्रिणीला धीर देत आशु तिच्या सोबत उभी राहते आणि आपल्या मैत्रिणीला न्याय मिळून देण्याची शपथ घेते.

         अश्विनी मंजिरीला तिच्या घरी घेऊन येते. रात्रभर अश्विनीच्या मनात मंजुचेच विचार घोळत होते. ती रात्री तिच्या नवऱ्याला म्हणजेच राजेशला मंजू वर घडलेला प्रसंग कथन करते आणि आपण तिला यातून सोडवूया असं त्याला सांगते. राजेशही अश्विनीला होकार देत मदत करण्यास तयार होतो. इकडे मंजू मात्र खूप घाबरलेली होती. स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात जाऊन केस वगैरे करणं, तिला सगळं नको वाटतं होत. तिला तिच्या मैत्रिणीला, अश्विनीला आणि तिच्या नवऱ्याला कुठलाच त्रास द्यायचा नव्हता.अश्विनी ला ही मंजिरीच्या मनाची अवस्था समजत होती. मंजिरी मनाने पूर्णपणे खचून गेली होती. तिला गरज होती प्रेमाची, मायेची... जी तिला कधीच मिळाली नव्हती. आईच प्रेम तर तिच्या वाट्याला कधी आलंच नव्हतं. आणि लग्नानंतर नवरा देखील राक्षशी वृत्तीचा. त्यामुळे ती या प्रेमाला मुकली होती. मात्र अश्विनी तिच्यावर जीवापाड प्रेम करायची. आणि म्हणूनच तिने मंजूला या साऱ्यातून सुखरून बाहेर काढण्याचा आणि तिला सक्षम बनवण्याचा निर्णय घेतला होता .राजेश च्या मदतीने तिने मंजिरीचा नवरा दीपक याचा शोध लावला. बायकोचा छळ करणे, तिला आत्महत्येस प्रवृत्त करणे, तसेच पैश्याच्या हव्यासापायी बायकोला विकणे या गंभीर गुन्ह्या खाली त्याला सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.

राजेशने दीपक कडून माहिती काढून बायकांचा व्यवसाय करणाऱ्या त्या दलालास देखील शोधून काढलं. आणि मंजू सारख्याच परिस्थितीने पिढलेल्या कितीतरी बायकांची त्याचा तावडीतून सुटका केली.राजेश आणि अश्विनीच्या रूपाने मंजूला जणू काही देवच मिळाले होते. दीपक नावाच्या वादळातून मंजुची सुखरूप सुटका झाली होती. राजेश ने तर मंजूला लहान बहीणच मानलं होत. इतके वर्ष आपल्यांच्या प्रेमाला मुकलेल्या मंजूला राजेशच्या रूपाने मोठा भाऊच मिळाला होता. आणि अश्विनी जी तिच्यावर जीवापाड प्रेम करायची तिच्या रूपाने तिला आई, बहीण आणि मैत्रिण या तीनही नात्यातील प्रेम एकवटून मिळालं होत.अश्विनीने मंजिरीच्या खचलेल्या मनात आत्मविश्वासाचे बी प्रेरणे सुरु केले. तिचं मनोबल, मनोधैर्य वाढावायला सुरवात केली. हळूहळू मंजिरी ही स्वतःच्या पायावर उभी झाली. नृत्याची आवड असणारी मंजिरी पुन्हा नव्याने तिची आवड जोपासायला लागली होती. लहान मुलांना नृत्य शिकवत ती स्वतः आत्मनिर्भर बनली होती. मंजूला सावरताना बघून अश्विनीच्या ही चेहऱ्यावर समाधान झळकत होत. अश्विनीने मंजिरीच्या मनात पेरलेले आत्मविश्वासाचे बीज हळूहळू अंकुरायला लागले होते. आणि बघता बघता त्याच रोपटंही सुंदर बहरायला लागलं होतं .

          आज समाजात मंजू सारख्या अनेक स्त्रिया बघायला मिळतात. काही परिस्थितीशी झुंजतात तर काही हार मानून आयुष्यच संपवून टाकतात. मंजूला अश्विनीची साथ मिळाली म्हणून ती या साऱ्यातून बाहेर पडू शकली. अशा परिस्थितीत कधी कधी आपले नातेवाईक सुद्धा आपल्यापासून लांब पळतात. मात्र मैत्री हे एक असं नातं आहे ज्यात कुठलाही स्वार्थ नसतो. रक्ताचं नसलं तरी खूप घट्ट असं नातं म्हणजे मैत्री.    

                            समाप्त

               



Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy