Abhilasha Deshpande

Horror

3  

Abhilasha Deshpande

Horror

भूत

भूत

3 mins
201


  थोडीशी विश्रांती घेतलेल्या पावसानं जोर धरला होता . चौभोताली नजर फिरवली सगळी कडे हिरवळीची जणू शालचं पांघरल्याची अनुभुती होत होती . सर्व परीसर शांत होता. पावसाळी दिवस असल्याने तशी वर्दळही फारशी नव्हती त्यात ग्रामीण भाग ...! रस्त्याने चालतांना आपण रस्ता खड्ड्यात आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नव्हते. पायातली चप्पल कशी बशी सावरत चिखल माती तुडवित मी वाट कापीत होतो ..! तसं पाहिलं तर फारसं लांब जायचं नव्हतं … पण कधी नवत आल्याने फाट्या पासुन गावाचं अंतर दुर वाटत होतं !

आज ब-याच वर्षा नंतर मी मावशी कडे आलो होतो . घड्याळाकडे लक्ष दिले ३-३० झाले होते म्हणंजे मला परत घरी पोहचायला उशीर होणार होता हे नक्की ....! चिखल माती तुडवित मी मावशी कडे पोहचलो तर दारात माझी वाट पाहत मावशी उभीच दिसली कारण खुप दिवसांनी माझे मावशीकडे येणे झाले होते .

  घरात पाय ठेवताच सर्वांच्या चेह-यावर आंनद ओसंडून वाहत होता . तसा मलाही खूप आनंद झाला होताच ! सर्वांची खुशाली विचारपुस करता करता वेळ किती भरकण निघुन गेला कळलेच नाही पाहतो तर काय ? ८ वाजले होते आमच्या गप्पा रंगल्या असताना मावशी ने जेवणाचा बेत कधी केला मला सुध्दा समजलं नाही .

गप्पा गोष्टी करत बराच वेळ आमची पंगत रंगली होती .…! जेवणं संपली पण गप्पाचा ओघ काही कमी होत नव्हता . शेवटी मीच न राहुन निघायची घाई केली पण मुक्कामाचा सर्वांचा आग्रह काही केल्या कमी होईना .

   पण निघणं भाग होतं म्हणुन उठलो पण मावशीची माया, त्यात खेड्यातील वातावरण मावशी बोललीच " बेटा जा तु ....पण जरा सांभाळून जा ! कारण आज आहे अमावस्या त्यात रात्रीची वेळ , शिवाय घरापासून फाट्या पर्यन्त वाहनाची सोय नाही , त्यात रस्ता हा असा " मी म्हटलो "मावशी काळजी करू नकोस मला सवय आहे " उठलो आणि चालायला लागलो पुन्हा एकदा परत तीच पायपीट पावसाचे दिवस असल्याने रस्ता सामसुम वरुन अमावस्या ....! काळाकुट्ट अंधार हिम्मत करुन कसा तरी फाटा गाठला पण मनातली मावशीनं घातलेली भिती काही केल्या जात नव्हती .....!

कसा तरी फाटा गाठला आणि मुख्य रस्त्यावर येऊन एखाद्या वाहनांची वाट पाहत उभा राहिलो .

बराच वेळ रस्त्यावर उभा होतो पण एकही वाहन थांबायचं नाव घेत नव्हते .... जीवाची तशीही घालमेल वाढली होती .तेवढ्यात दुर एक पार्कींग लाईट चालु असलेली गाडी येताना दिसली गाडीचा वेग कमी असल्याने वाटलं हा सज्जन माणूस आपल्याला नक्कीच लिप्ट देण्यासाठी च गाडी हळु चालवित असावा ... गाडी जवळ येतात मी ती थांबायची सुध्दा वाट न पाहताच मागचा दरवाजा उघडला आणि थेट सिट वर जाऊन बसलो ...! गाडीचा वेग थोडा मंदावला ... हातातली घड्याळ पाहतो तर रात्रीचे बरोबर बारा वाजले होते . पावसाचे दिवस असुनही भीतीने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या , घाम पुसायला खिशातून रूमाल काढला .... तोंड पुसले ... आणि समोर डॉव्हर सिट कडे लक्ष गेले , पाहतोय तर काय .....! सिटवर डायव्हरच नव्हता सात गेले पाचच शिल्लक राहीले ... तेव्हढ्यात खिडकीतून एक काळाभिन्न हात माझ्या जवळ येतांना दीसला ... सन्नकरुण कानाखाली आवाज निघाला "" भडव्या आम्ही ३ कि .मी .पासुन गाडी ढकलीत आणतोय आणि तु आयताच आरामात गाडीत बसला ......!!



Rate this content
Log in

Similar marathi story from Horror