STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Others

2  

Abhilasha Deshpande

Others

गाईचे अन्न

गाईचे अन्न

2 mins
46

आपल्या घरी गाय आली की आपण तिला प्रेमाने पोळी-भाकरी खाऊ घालतो, सणवार असल्यास पुरी व तळलेले पदार्थ गोग्रास म्हणून केळी कर्दळीच्या पानावर ठेवून गाईला भरवण्यात येतात. आजकाल लोक गूळ खायला देतात, गायी सुद्धा प्रेमाने आपण दिलेले पदार्थ खातात! पण वास्तव काही वेगळेच आहे, ते असे की *पोळी, पुरी, गूळ असे पदार्थ गाईसाठी जंक फूड आहे.*


गाईला कृपया पोळी, पुरी, गूळ असे पदार्थ देऊ नका.

सर्वांनी लक्षात घ्यावे , *निसर्गाने गाईला शिजवलेले अन्न खायला बनवलेलेच नाही.*


आपण घरात आणलेल्या पालक, मेथी, कोथिंबीर वगैरे भाज्यांची पाने स्वतःसाठी ठेवतो आणि बाकी राहिलेले देठ, मुळे फेकून देतो. 


तुम्हाला जर गाईला, खायला काही द्यायचेच असेल तर असे उरलेल्या भाज्यांची देठ द्यावीत, फळांच्या साली जसे केळी, आंबा, पपई, कलिंगड खायला द्या, किंवा गवत विकत घ्या आणि खायला द्या. दुसरा पर्याय म्हणजे एक रात्र भिजवलेले हरभरे, गहू, तांदूळ, मूग, मटकी द्यावी. भाजलेले, शिजवलेले, तळलेले, पदार्थ कटाक्षाने टाळावे. 


त्यांना पोळी, भाकरी खायला दिली तर त्यांच्या शेणाचा वास माणसाच्या विष्ठेसारखा येतो. गाईची पचनसंस्था बिघडते, कारण त्यांच्या पचनसंस्थेमध्ये असलेले बॅक्टेरिया असे अन्न पचवण्यासाठी उपयुक्त नसतात तसेच त्या मदत करत नाहीत.


आगीवर स्वयंपाक केल्याने अन्नामध्ये रासायनिक बदल होतो, जो गवत खाणाऱ्या प्राण्यांच्या पचन संस्थेला मान्य होत नाही.


निष्पाप प्राण्यांची सेवा करताना, कळत नकळत, त्यांचे आरोग्य बिघडण्याचे कारण बनू नका.


आपण शिजवलेले अन्न खातो, त्यामुळे विष्ठेची आपल्याला दुर्गंधी येते. जर आपण पण कच्च्या भाज्या, फळे, म्हणजे सर्व काही कच्चे खाल्ल्यास विष्ठेचा वास वेगळा येईल.


मानव प्राणी हजारो वर्षाच्या उत्क्रांतीच्या प्रवासात प्रक्रिया केलेले अन्न खावू लागला आहे, त्यामुळे त्याच्या पचन संस्थेत अनेक बदल झालेले आहेत. तो नियम गाईला लागू होत नाही, म्हणून ईश्वराने गाईचे शरीर ज्या स्वरूपात बनविले आहे, त्यासाठीचे अन्न तिला दिले पाहिजे, त्यात स्वतःला योग्य वाटते म्हणून ढवळाढवळ करू नका.


पुण्य मिळविण्याच्या नादात पाप घडू नये, हे पहा...


ഈ കണ്ടെൻറ്റിനെ റേറ്റ് ചെയ്യുക
ലോഗിൻ

More marathi story from Abhilasha Deshpande

भूत

भूत

3 mins വായിക്കുക

अतिक्रमण

अतिक्रमण

1 min വായിക്കുക

खेळणं

खेळणं

2 mins വായിക്കുക

मदर्स डे

मदर्स डे

7 mins വായിക്കുക

धोका

धोका

2 mins വായിക്കുക

चिरंजीव

चिरंजीव

3 mins വായിക്കുക

बदला

बदला

3 mins വായിക്കുക