STORYMIRROR

Abhilasha Deshpande

Tragedy

3  

Abhilasha Deshpande

Tragedy

सैनिक- अलक कथा

सैनिक- अलक कथा

1 min
142

आज ती सकाळपासून त्याच्या वर रुसली होती. आज तिच्या लग्नाचा ९ वा वाढदिवस होता. पण अजून त्याचा तिला शुभेच्छा देण्यासाठी फोन आला नव्हता. सकाळपासून ती फोनकडे डोळे लावून बसली होती. रात्रीचे 8 वाजले होते. सगळी कामे आवरुन ती लग्नाचा अल्बम उघडून फोटो बघत बसली होती. इतक्यात तिचा 7 वर्षाचा मुलगा तिला पेस्टरीचा तुकडा भरवत बोलला "आई तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा"आणि ती लगेच मुलाला आणि आपल्या शहिद झालेल्या पतीच्या फोटोला छातीशी कवटाळून ढसाढसा रडू लागली.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy