Smita Bhoskar Chidrawar

Tragedy

3  

Smita Bhoskar Chidrawar

Tragedy

भिशी आनंदाची..!

भिशी आनंदाची..!

2 mins
230


रीना आणि तिच्या 'साळकाया माळकाया ' हो हाच शब्द वापरायच्या तिच्या सासूबाई तिच्या मैत्रिणींबद्दल ...तर रीना आणि तिच्या पाच जीवश्च कंठश्च सख्या खूप छान होत्या. या सहजणी कॉलेज पासून च्या मैत्रिणी तश्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या शहरात होत्या पण वर्षातून दोनदा तरी मस्त एकत्र फिरायला जायंच्या, फक्त एकट्या एकट्या हा नो नवरा नो मुलं ...फक्त दोन दिवस पण धम्माल करायच्या ...मुलं लहान होती तेव्हा प्रॉब्लेम होऊ लागले ...मुलांना कुठे ठेवणार ? अश्या वेळी सगळ्या सासवा अगदी न सांगता नो कॉप्रेशन मोहिमेवर जात ( जळफळाट व्हायचा सगळ्यांचा दुसरं काय ...) पण रीना भलती हुशार ...तिने युक्ती काढली तिघी तिघींनी ट्रिप ला जायचं आणि बाकीच्या तिघींनी मुलांना सांभाळायचं. ही युक्ती अगदी नामी ठरली ! एन्जॉय करण्यात या मैत्रिणी जश्या पुढे होत्या तशाच समजसेवेसाठी सुद्धा अग्रेसर होत्या .

नशिबाच्या चक्राने वेगळीच गती घेतली आणि अचानक एका वर्षाच्या आत या सहाही मैत्रिणी एकच शहरात वास्तव्यास आल्या. सहाही जणीच्या नवऱ्यांचीही चागली गट्टी जमली ...मग तर विचारूच नका अशी काही धम्माल चालायची की बास्स . रीना च्या सासूला या गोष्टीचा खूप राग यायचा. पण रीना काही मनावर घेत नसे.

दिवस छान चालले होते ...सगळ्या मैत्रिणींनी मिळून भिशी सुरू केली. या भिशितून जमा होणारे पैसे त्या नेहेमी चांगल्या कामासाठी वापरायच्या. हळूहळू त्यांचा हा भिशी चा ग्रुप खूप मोठा झाला.अनेक स्त्रियांना त्यांनी समाजसेवेच महत्त्व पटवून दिलं आणि सेवा करण अविरत सुरू होतं . वृद्धश्राम , अनाथाश्रम , ब्लड बँक आणि आता एका महिला संस्थेसाठी या ग्रुप च कार्य खूप चांगल्या तऱ्हेने सुरू होतं.

एकदा सगळ्यांनी ट्रिप ला कोकणात जायचं ठरवलं .यावेळी सगळ्यांचे नवरे सुद्धा सोबत होते .सगळ्या मैत्रिणी एका गाडीत आणि मुलं आणि त्यांचे बाबा एका मिनी बस मध्ये असे सगळे निघाले ...खूप धम्माल चालली होती आणि अचानक कसे कोण जाणे बस च्या ड्रायव्हर चा तोल गेला आणि डोळ्याचं पात लावता न लावता बस मोठ्या दरीत कोसळली ...बस मधले सगळे ड्रायव्हर सकट जागच्या जागी गतप्राण झाले !!

सगळ्या मैत्रिणी सैरबैर झाल्या या दुःखातून कसं बाहेर पडायचं ते कळतच नव्हतं ...आता का आणि कोणासाठी जगायचं या नैराश्यातून त्यांनी आत्मघात करायचं पाऊल उचललं ...

जीव द्यायला जाताना तिथे त्यांनी तीन मुलींना जीव देताना पाहिलं आणि वाचवलं ...त्या तिघिंचे आई वडील एका अपघातात मरण पावले होते ...आता सगळ्यांना जगण्यासाठी कारण मिळालं होतं ...

यापुढच सगळं आयुष्य त्या सहाही जणींनी समजसेवेत घालवलं ...पण भिशी सुरू होती त्यांच्या दत्तक मुलींनी त्यांची ही भिशी अविरत सुरू ठेवली .सोबत त्या सगळ्यांना दर महिन्याला एक आनंदाचा वाटा नक्कीच दिला जो त्यांचं आयुष्य समृद्ध करून गेला ...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy