Vishal Patil

Drama Romance

3  

Vishal Patil

Drama Romance

भाग - 4 संवेदनशील प्रश्न !!

भाग - 4 संवेदनशील प्रश्न !!

3 mins
168



"तुला वाटत नाही का ! की तू यांचा खूप खोल विचार करतोय. "नेहा म्हणाली.

"हो, मी खोल विचार करतो. कारण लग्न हा प्रश्न फार मोठाय. लग्न करून आयुष्यभर विचार करनेपेक्षा. विचार करून लग्न करा. लग्न साधारणच असावे. हा नको असलेला सौंग नको. "प्रकाश म्हणाला.

"कोणते सौंग" नेहा म्हणाली.

...

"हेच लाखोंचा खर्च,नवीन Lighting , हे महागडे lawn. आता तर नको तो खर्च वाढलाय. आयुष्यभर कमावलेलं एका दिवसात संपवणून टाकायचं का ?. लग्न साधारणच असायला काय हरकत आहे. खर्च करायाचाच आहे तर लोकांच्या खाण्या-पिण्या मागे करा. लोक घरी गेल्यावर नाव तरी काढतील." प्रकाश म्हणाला.

...

नेहा ने होकारात मान हलवली. इतक बोलून तो थोडा शांत झाला. नेहाला त्याचे विचार पटत होते पण हे असं एका व्यक्ती कडून थांबणार नव्हतं.

...

"एक personal विचारू का तुला ? "नेहा म्हणाली.

"हो विचार ना.आपण यासाठी भेटलोच आहोत की आपण काहीही विचारू शकतो. "प्रकाश म्हणाला.

"तुझ्या जीवनात कुणी होत का ? म्हणजे कुणी जवळील व्यक्ती ?" नेहा हळूच म्हणाली.

" Girlfriend म्हणायचंय का तुला ! "प्रकाश म्हणाला.

"हो तेच "नेहा म्हणाली.

..

"नाही तस कुणी नव्हतंच. खर तर मला तस काही जमलंच नाही. पण एक minute. तुला अस तर नाही वाटत आहे ना की मी कोणत्या मुलींमुळे इथे तुझ्यावर Frustration काढतोय. "प्रकाश म्हणाला.

..

""अरे नाही नाही. मी त्या उद्देशाने नाही विचारल. ते म्हणतात ना जितकं लवकर कळेल तितकाच विचार करायला वेळ मिळतो. "नेहा प्रकाशचच वाक्य म्हणाली. प्रकाश थोडा हसला.

"बरोबर आहे तुझं. पण मला तस कधी करता नाही आलं. मित्रांमुळे गरज नाही पडली. "प्रकाश म्हणाला.

..

"हो खरंय तुझं. मित्रांमुळे खरच गरज नाही पडत कुणाची. "नेहा म्हणाली. थोडे वेळ दोघेही शांत झाले.

"तू मला नाही विचारणार का माझ्या Past मध्ये कुणी होत की नाही ? म्हणजे मूल साधारणपणे हा विषय काढतातच. पण तू या विषयावर काही बोलला नाही. "नेहा म्हणाली.

...

"नाही , मला या गोष्टींचा किव्हा या विषयी काहीही फरक पडत नाही "प्रकाश म्हणाला.

"म्हणजे ? मी पाहिलंय आणि अनुभवलं पण आहे की मूलांना फरक पडतो. ते याविषयी भरपूर संवेदनशील असतात. "नेहा म्हणाली.

..

"हो, मुलांना फरक पडत असेल. पण मला नाही पडत. कारण लग्नाआधी प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणी असतंच. लोक का लपवता हे नाही कळत मला आणि विचारलं तरी ही लोक खर बोलतीलच याचा काय पुरावा. २३ वर्षाच आयुष्य आपण जगून चुकलो आणि त्यात अजून कुणावर प्रेम किव्हा कुणी आवडलच नाही असं शक्य वाटत का ?. थोडं Logic चुकीचं नाही वाटत. लग्नाआधीच्या आयुष्यावर आपला स्वतंत्र अधिकार आहे, पण लग्नानंतर आपण स्वतंत्र नसतो. लग्नानंतरच्या जीवनात पारदर्शिकता असावी,त्यामुळे मनात नको ते प्रश्न येत नाही आणि प्रेम आयुष्यभर राहत. "प्रकाश म्हणाला.

...

"थोडं विचित्र वाटल एकूण की तुला काही फरक पडत नाही आणि तू म्हणाला की प्रत्येकाच्या आयुष्यात कुणी ना कुणी असतेच मग तुझ्या ही आयुष्यात असेल. "नेहा म्हणाली.

..

"होत, म्हणजे मला आवडत होती पण मी कधी सांगितलं नाही आणि आजच्या प्रेमाचा अर्थ वेगळाय. ते कृष्णा आणि राधा सारख नाहीये. त्यामुळे पुढे मला कुणी आवडलाच नाही आणि मी विचारही केला नाही. आपल्यालाच वाटत की आपण एकटे आहोत, कारण आपण समजून घेतो. पण एकटेपणा सारखा शब्द कधी नसतोच. "प्रकाश म्हणाला. नेहा शांत राहिली आणि विचार केला की जर विषय निघालाच आहे तर विचारूनच टाकते.

...

"तुला काही वाईट सवयी ? मला विचारायचा नव्हता हा प्रश्न. कारण यामुळे समोरच्याला वाईट वाटू शकतं. पण तरी ही मी विचारतेय "नेहा म्हणाली.

"हो आहे ना आणि यात वाईट वाटण्यासारखं काय आहे. मुलांविषयी असे विचार येन स्वाभाविकच झालेय. विश्वास भेटणं बंद झालाय आणि भेटला जरी तर फार महाग क़ीमतीत. मी कधीतरी Drink करत असतो. पण फार कमी वेळा कुठल्या Events,Birthdays आणि party. बाकी दुसरी कोणतीही वाईट सवय नाही. "प्रकाश म्हणाला.

..

प्रकाशच्या या उत्तराने नेहा थोडी Nervous झाली. तीला हे अपेक्षित नव्हतं. या एका सवयीवरून ती प्रकाश ला Judge तर करणार नाही ना ?? 

..

नेहाला शांत बघून प्रकाश म्हणाला."जस मूल मुलींच्या Boyfriend विषयी संवेदनशील असतात. तसच मुली ही मुलांच्या वाईट सवयींविषयी संवेदनशील असतात आणि जर या गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे नाही झाल्या तर आपल्याला त्रास होतो. म्हणून मी तुला Boyfriend विषयी आणि Past विषयी नाही विचारल. "प्रकाश म्हणाला.

..

Waitor Next Coffee ची Order त्यांच्या Table वर आणून ठेवतो. दोघांनी आपला Cup घेतला आणि कॉफी पिऊ लागले. Coffee घेतांना मात्र दोघांच्या मनात विचार चालू होते.

..


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama