Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published
Participate in 31 Days : 31 Writing Prompts Season 3 contest and win a chance to get your ebook published

Vishal Patil

Others


3  

Vishal Patil

Others


भाग ३ - स्पष्टता ??

भाग ३ - स्पष्टता ??

4 mins 205 4 mins 205

दोघं Coffee पिऊ लागले. तिथे थोडावेळ शांतता पसरली. आणि नंतर,

...

"हे तुझ्या घरच्यांनी मला कस पसंद केल ! आणि लगेच भेटीसाठी ही, हा प्रकार कळला नाही मला. "प्रकाश म्हणाला.

" खरं तर मलाच भेटावसं वाटलं तुला आणि ही माझीच इच्छा होती. अन मी लगेच आले. "नेहा म्हणाली.

"पण का ?? "प्रकाश म्हणाला.

"का म्हणजे "नेहा म्हणाली.

"म्हणजे फोटो त असं काय पाहिलं की मला लगेच भेटण्याची इच्छा झाली. "प्रकाश म्हणाला.

..

"असच वाटलं. instinct, Sixth Sense म्हणू शकतो. वाटलं की भेटाव तुला आणि जर तुला योग्य वाटत नसेल तर मग मी जाते. "नेहा म्हणाली.

" अग तस काही म्हणायचं नाहीये मला. म्हणजे एखादी मुलगी कसकाय येऊ शकते इतक्या लवकर त्यात मी थोडा घोंधळलो होतो. "प्रकाश म्हणाला.

...

नेहा काहीच बोलली नाही. तिने त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं होत. प्रकाश ने लगेच आपल्या वरच्या खिश्यातून एक कागद बाहेर काढला आणि तो नेहा समोर ठेवला.

" हे काय गुपित आहे आता "नेहा म्हणाली.

" बघ तू स्वतः, कळेल तुला "प्रकाश म्हणाला.

नेहा ने तो कागद उघडून बघितला. तर ती एक salary Slip होती.

"एक salary slip ??. अरे पण मला माहितीय तुझी salary. तू मला नंतर ही दाखवू शकत होतास. इतक्या लवकर काही गरज नव्हती याची. "नेहा म्हणाली.  

..

" मला वाटतं गोष्टी जितक्या लवकर कळाल्या तितकं बर असतं. निर्णय घेण्यास वेळ मिळतो. Attachment झाली आणि नंतर काही गोष्टी कळल्या तर त्या त्रासदायक ठरतात. पहिल्या भेटीत Attachment आणि Emotions काही नसतं. त्यामुळे स्पष्टता आधीच व्हायला हवी. "प्रकाश म्हणाला. तो अजून पुढे म्हणाला.

..

"राहिली गोष्ट तुला माहित असण्याची तर ते फक्त माहित आहे त्याचा काही ठोस पुरावा नाहीये ना !. आता मी तुला त्याचा ठोस पुरावा दिलाय आणि पुस्तकात वाचलेल वास्तविकतेत किती खरं आहे हे माहीत करण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात असते. "

..

"तू इतका स्पष्ट आहेस प्रकाश ?, म्हणजे मी तुझ्या आधी ही २ मुलं बघितलेय ते फार मोजकेच बोलायचे आणि जितकं गरजेचं तितकंच. जस त्यांनी भेटण्या आधी प्रश्नांची यादी तयार केली होती आणि तेवढच बोलायचं. पण तूझे विचार वेगळे य इतरांपेक्षा. आजकल लग्न फार अवघड गोष्ट होत चालली आहे. खर तर लग्न हाच अवघड प्रश्न य "नेहा म्हणाली.

..

" हो खरं म्हणतेय तू, मला ही लग्न आणि त्याच्याशी जुळलेल्या काही प्रथा नाही जमत. अस वाटत की लग्नात २ कुटुंब जुळत नाहीये तर २ व्यवहार होताय. म्हणून मला स्पष्ट राहणे आवडते. लपवेगिरी नाही जमत. "प्रकाश म्हणाला.

..

"कुटुंब जुळत नाही हे कशावरून, ते जुळतात. लग्नाच्या प्रथांमध्ये आनंद ही आहे आणि थोड दुःख ही आहे. एवढ्या ही वाईट नाही जितक्या आपण समजतो. "नेहा म्हणाली.

..

" प्रथा योग्य आहेत ! मग एक सांग. लग्नात नवरी मुलीला इतक्या Makeup- ची गरज का असते. साधा सरळ Make-up पण होतो. ती त्या नवऱ्यासोबत आयुष्यभर Make-up मध्ये राहणार आहे का ? मग कशासाठी स्वतःच सौंदर्य त्या Chemicals च्या मागे लपवयाच? "प्रकाश म्हणाला.

..

"अरे पण मुलींना आवडतं Make-up करणं. सुंदरता कुणाला प्रिय नसते आणि एक दिवस केला तर त्यात काय फरक पडतो. तो तिचा दिवस असतो तर ती तिच्या पद्धतीने सजू नाही शकत का ? "नेहा म्हणाली.

..

"हो सजू शकते ना, तुझं म्हणणं बरोबर आहे. पण आता तूच सांग एखाद्या नवरी मुलीला १० लोकांच्या मध्ये बसवून प्रश्न विचारणे योग्य आहे का ?. ती किती घाबरलेली असते आणि त्यात तिने काही चुकीचं बोलल की लगेच तिला judge करणं सुरू. म्हणून ती आधीच परीक्षेची तयारी करून ठेवते. नापास होण्याचा प्रश्नच नाही आणि काही प्रश्नांची खरी उत्तर कोणालाच कळत नाही. जस काही UPSC चा Interview चालुय."प्रकाश म्हणाला.

..

"अरे हे आधीपासून असच सुरू आहे आणि हा प्रकार थोडा विचित्र आहे. प्रत्येकाला यातून जावच लागत.मग यात तुला काय वाटतं कस व्हायला हवा मुलींचा Interview? "नेहा म्हणाली. 

...

" मुलाला जर मुलीला काही विचारायचं असेल ना तर न सांगता मुलीच्या घरी जायचं. आधीच परीक्षेला तयार असलेला व्यक्ती नापास कसा होऊ शकतो. "प्रकाश म्हणाला.

..

"म्हणजे ? आणि असं न सांगता कसकाय जाणार मुलीकड. आधी सर्व तयारी करावी लागतेच ना. थोड विचित्र नाही वाटणार. "नेहा म्हणाली.

..

" विचित्र काय आहे त्यात आणि तयारी कशाला हवीय. गरज नाहीये तयारीची. आपण असं न सांगता हळूच मुलीच्या घरी जायचं आणि Doorbell वाजवायची. तिने ही हळूच दरवाजा उघडावा. तिचे हाथ पीठाने भरलेले असावे. तिच्या डोळ्या जवळ आलेला तो केस तिने मनगटाने हळूच मागे करावा आणि विचारावं. कोण हवंय तुम्हाला ?" प्रकाश म्हणाला.

" हे filmy होतंय, आणि असं Movies मध्येच होत. Realityt नाही. अजून पर्यंत मी तरी असं कुठे पाहिलं नाहीये. काहीही. "नेहा म्हणाली.

..

"काहीही काय आणि काही filmy नाहीये, हे खरं ही होऊ शकत. बघ ना जर आपण असं न सांगता कुणाच्या घरी गेलो तर आपल्याला त्यांचं खरं रूप दिसेल. ना मुलीने केलेला Make-Up , ना नवीन साडी, ना कुठली तयारी, ना ते सजवलेलं ताट, तो Table. काहीच नाही. ते सर्व नसतांना संवाद करण म्हणजे घरी बसल्या सारखं वाटेल. मुली ही जाऊ शकता मुलाच्या घरी न सांगता. फकत मुलांनीच जावं असं नाही. " प्रकाश म्हणाला. 

..

"विचार छान आहेत,पण हे आपल्या वेळेत नाही जमणार. या Generation मध्ये तर शक्य नाही. असा बदल आपल्या पुढच्या Generation मध्ये होऊ शकतो. आपण जर अस काही केलं तर समोरची माणसं वेळ्यात काढतील. "नेहा म्हणाली.

...

दोघांचा Coffee पिऊन झाला होता. प्रकाश ने Extra Coffee साठी नेहा ला विचारलं आणि ती हो म्हणाली. त्याने पुन्हा २ Coffee Order केल्या. नेहा ला प्रकाश फार स्पष्ट वाटला. त्याचे विचार ही स्पष्ट आणि वेगळे होते. प्रकाश ने तिला ही लग्न प्रथेबद्दल विचार करण्यास भाग पाडलं होत.

                      To be Continued....


Rate this content
Log in