Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.
Ignite the reading passion in kids this summer & "Make Reading Cool Again". Use CHILDREN40 to get exciting discounts on children's books.

Vishal Patil

Others

3  

Vishal Patil

Others

प्रथम भेट - भाग २

प्रथम भेट - भाग २

3 mins
337


प्रकाशने वर-वधूचे पुस्तक उघडले आणि तिची माहिती वाचू लागला. तेवढ्यात त्याला मोबाईल वर message आला,तो बाबांचा होता. त्यांनी WhatsApp ला त्या मुलीचा नंबर आणि फोटो पाठवले होते. प्रकाश ने ते बघितले. मुलगी दिसायला छान होती. पण व्यक्ती नेहमी चांगलेच फोटो पाठवतो. नाहीतर कोणत्या तरी Studio त Editing केलेले. प्रकाश तिच्या नंबर वर गेला आणि विचार करू लागला की मेसेज करू का नको !. करावा तर लागलेच पण काय लिहावं. सर्वात छान म्हणजे. Hii. त्याने Hii लिहून पाठवला. त्याचे पाठवून झाल्यावर लगेच तिकडून... Hii प्रकाश...चा मेसेज आला.

**********Whatsapp Chatting******

"तुला कसं कळाल माझ नाव." प्रकाश ने लिहून पाठवले.

"अरे तुझ्या बाबांनी तुझा नंबर आधीच दिलेला. "तिने लिहीले.

प्रकाश मनातल्या मनात म्हणाला "बाबा पण ना,इतकी घाई"

"Hii मी नेहा,कसा आहेस? " तिचा मेसेज आला.

"Hii नेहा.मी प्रकाश, मजेत आहे आणि तू कशी आहेस?" प्रकाश ने लिहीले.

"मी ही मजेत. मग कधी भेटायचं आपण ?"नेहा ने लिहून पाठवले.

..

प्रकाश काहीच बोलला नाही.तो विचार करू लागला इतक्या लवकर कसं भेटायचं. अजून ओळख ही नाही झालीय बरोबर.

...

"इतक्या लवकर,अजून आपली ओळख ही नाही झालीय. "प्रकाश ने लिहीले.

"हो मग त्यात काय,ओळख वाढवण्यासाठीच भेटत आहोत ना आपण. आणि वास्तविकतेत भेटलेले कधी ही छान. तेव्हा समोरसमोर आपण स्पष्ट संवाद करू शकतो. या Messaging वर जास्त काय कळणार "नेहा ने Reply केला.

...

प्रकाश पुन्हा विचार करू लागला. बरोबर म्हणतेय नेहा. जितकं लवकर भेटणं होईल तितक्या लवकर मला निर्णय सांगता येईल आणि खरही कळेल. मुलगी फार Fast आहे. म्हणजे unpredictable.

" हो चालेल भेटू आपण,पण कुठे ?"त्याने मेसेज केला.

"MacD त कॉफी "नेहा ने suggest केलं.

"हो चालेल,तुझ्या घराजवळच्या MacD त "प्रकाश ने पाठवलं.

"Ok Done ५PM Tomorrow " नेहा ने लिहिलं.

"Ok"प्रकाश ने send केलं. 

        

(Next day AT 5 PM)


प्रकाश MacD त आधीच येऊन बसला होता. त्याच्या आईच्या हट्ट्यापायी त्याने आज लाईट पिवळ्या रंगाचा शर्ट घातला होता. तो थोडा चिंतेत दिसत होता. कदाचित पहिली भेट असावी म्हणून. तो कधी घड्याळाकडे बघायचा तर कधी गेट कडे. तिथले Waitor ही त्याच्याकडे अधून मधून पाहत होते. थोड्याच वेळात नेहा गेट मधून आत येतांना दिसली. प्रकाश तीला बघताच जागेवर उभा राहिला. तिने हिरव्या रंगाचा ड्रेस आणि लाल रंगाची चुडीदार घातली होती. कपाळाला अर्धचंद्राकृती छोटीशी लाल रंगाची बिंदी. आणि नाकात छोटीशी नथ. कानात ही चंदेरी रंगाचे झुमके. ती अस्सल मराठी मुलगी दिसत होती. ती प्रकाश जवळ आली. प्रकाश तिच्या येईपर्यंत तिलाच पाहत होता. तिने त्याला स्तब्ध बघून Smile केली. तो ही तीला बघून हसला आणि थोडा भानेवर आला.

"Hii प्रकाश, उशीर झाला का मला ?"नेहा म्हणाली.

"Hii,नाही मी ही आत्ताच आलो"प्रकाश म्हणाला. हे म्हणताच तिथले Waitor त्याच्याकडे बघू लागले.

"उभा का आहेस बस ना "नेहा म्हणाली.

"हो हो, तू ही बस "प्रकाश म्हणाला. आणि दोघे बसले.

"आधी Order करूया आपण, मग सावकाश बोलू "नेहा म्हणाली.

"हो जस तुला योग्य वाटेल,मी वेटर ला बोलवतो "प्रकाश हसत म्हणाला.

प्रकाश ने वेटर ला बोलावलं. नेहा ने Coffee ची Order दिली आणि प्रकाश ने ही Coffee च घेतला. Order देऊन झाली,वेटर तिथून गेला आणि दोघांनी एकमेकांना पाहिलं. नेहा फार सुंदर दिसत होती,त्याचा मुलींविषयीचा अंदाज चुकतांना दिसत होता.

"मी आधी तुला माझा परिचय देऊन टाकतो, तू वाचालास असशील पण तरीही"प्रकाश म्हणाला.

नेहा ने कोणतीही प्रतिक्रिया नाही केली, ती त्याच्याकडे बघत होती.

"मी प्रकाश सावंत,एक MNC Companyt Software Engineer आहे "प्रकाश म्हणाला.

"हो वाचलंय मी हे पुस्तकात, मला वाटलं तू नवीन काही बोलशील "नेहा म्हणाली.

"हो वाचलं असशीलच तू पुस्तकात, मी स्वतः तोंडून सांगितलेलं योग्य समजल. "प्रकाश म्हणाला.

"तुझ्या Hobbies काय काय आहेत ? याविषयी पुस्तकात काही लिहिलं नव्हतं. "नेहा म्हणाली.

"मला Cricket, Movies पाहणे, आणि Cooking करणे फार आवडतं "प्रकाश म्हणाला.

"Cooking जमते तुला ! "नेहा आच्छार्यात म्हणाली.

"हो त्यात काय विशेष. तुम्ही मुली जर नोकरी करू शकता तर आम्ही मुलं ही Cooking करू शकतो. Equality असायला हवी "प्रकाश म्हणाला.

"बरोबर, छान वाटलं Cooking बद्दल एकूण. "नेहा म्हणाली.

"आणि तुझे Hobbies ? "प्रकाश म्हणाला.

"मला dance आवडतो, Travelling, कधी कधी Reading ही आणि चित्र काढायला. "नेहा म्हणाली.

" वाह ! छान आहेत तुझ्या Hobbies. मला ही आवडतो प्रवास, पण असा प्रवास नाही आवडतं "प्रकाश म्हणाला.

"म्हणजे ? आवडतो की नाही ? "नेहा ने विचारलं.

"आवडतो पण प्रवास नाही. फक्त जागा. प्रवास कंटाळवाणी वाटतो, पण आवडीच्या जागेवर पोहचल्यावर कंटाळा आणि सर्व थकवा लगेच जातो. "प्रकाश म्हणाला..

"हो ते तर आहेच. "नेहा म्हणाली.

थोड्या वेळातच त्यांची Coffee ची Order ही आली होती. Waitor ने त्यांना Coffee दिली आणि ते दोघे ही Coffee पिऊ लागले.


Rate this content
Log in