भाग १- लग्नाची घाई
भाग १- लग्नाची घाई


प्रकाश खोलित पलंगावर निवांत बसला होता.त्याच्या हातात मोबाइल होता आणि तो त्यात का ही तरी करत होता,नवी पीढ़ी नवी साधन.त्याचा आजुबाजूच वातावरण पूर्णपणे शांत होत.न कोणत्या वाहनचा आवाज न ही खेळणाऱ्या पोरांचा आवाज. तेवढ्यात त्याचे बाबा त्याचे नाव उच्चारत त्याच्या खोलीत येतात, आणी ते येऊन त्याच्या बाजूला बसतात.
"प्रकाश अजून एका मुलीचं स्थळ आलंय तुला, आत्ताच मी आणि तुझी आई त्यांच्याशी फोन वर बोल्लो. लोक फार छान वाटली बोलून, आणि आनंदाची बातमी म्हणजे त्यांना तू आवड़लाय. भेटिसाठी सांगताय ते तुझ्या" बाबा उत्साहाने म्हटले.
"बाबा, मी आधी ही सांगितलय तुम्हा दोघान्ना की मी लगनासाठी अजून तयार नाहिये. मी किती वेळा नकार देऊ. आणि मी आधीच या वर-वधु मंडळाच्या पुस्तकात माझे नाव दिन्यास नकार दिला होता, तरी ही तुम्ही दिलच ”प्रकाश चिंतित होऊन म्हटला.
“अरे पण तू लग्न कधी करणार अाहेस मग, तुझ्या सर्व मित्रांचे लग्न झालेय. तुझ्याकडे चांगला Job आहे,घर आहे. मग अजुन कशाची वाट बघतोय??” बाबांन्नी म्हंटले
“बाबा,मित्रांचे लग्न झालेय म्हणजे मी ही कराव. अाणी ते तयार होते लग्नासाठी तर त्यांनी केलं. पण मी अजुन जवाबदारी घेण्यास तयार नाहीये. घर आणि जॉब असल की लग्न करावें हे कोणत्या शास्त्रात लिहिलय. आणि तुम्ही म्हणताय की मी त्यांना आवडलो. तर त्यांना कसा आवडलो??? ”प्रकाश बोल्ला
“कसा आवडलो म्हणजे??” बाबा म्हटले
“म्हणजे, आवड त्यांनी माझे आभासी जग बघून केलिय. प्रत्यक्षात नाहि. थोडकयात म्हटलं तर त्यांनी आधी पुस्तकात माझा फोटो पा असणार, मग माझ शिक्षण नंतर माझा पगार,आणि नंतर तुमची मालमत्ता. हे लग्नय की पैशांचा व्यवहार?? आनि यात खरा मी कुठय!!” प्रकाश म्हटला
“मग तुला काय हवय, हे व्यवहार, प्रथा आधी पासून अशीच सुरु आहे. आमच्या वेळेस ही होती. आणी तुला जर तुझा खरा तू त्यांना दाखवायचा असेल तर भेट त्यांना आणि दाखव.. सरळ मार्ग य!!” बाबा खंबीरतेने म्हटले
“मी विचार करून सांगतो" प्रकाश ने स्पष्ट सांगितले.
“कुणी दुसरं तर नाहीय ना तुझ्या मनात असेल तर स्पष्ट सांगून दे आम्हाला, मला आणी तुझ्या आई ला त्या विषयी काही हरकत नाहीये” बाबा थोड चिन्तित म्हटले.
“नाही तसला काहीही प्रकार अजुन पर्यंत तर नाहिये” प्रकाश म्हटला
"अच्छा. सांग मग विचार करुन तुझ उत्तर,मी आहे अजुन इथे” बाबा म्हटले
"अस लगेच कस सांगु. मला वेळ हवाय,एकान्त हवाय.” प्रकाश म्हटला
“नाही तू आधी ही भरपूर वेळेस अस म्हटलंय. मी चांगलाच ओळखतो तुला, शेवट तू होकार देतच नाही. तुझा काहीही विचार असो. तुला या मुली सोबत भेटवच लागेल आणि मी यात कोणतही कारण एकणार नाहिये. तुझ्या आईला आणि मला मुलगी आवडलीय. तू ही बघून घे page No. 87 वर आहे तिची माहिती” बाबा थोड़े रागात म्हटले
“पण बाबा कशाला हा force” प्रकाश लगेच म्हटला
“मी आता तुझ काहीच एकनार नाहिये, प्रकाश. आणी मला force करावा लागतोय. तु हे करण्यास भाग पाडलय. तुला भेटाव लागेलच, नाहीतर मी तुझ्याशी बोलन बंद करेल” बाबा रागत म्हटले आणि पलंगावरून उठले.
“अहो बाबा ही तर सरळ blackmailing आहे” प्रकाश म्हटला
“हो, कारण तुला समजवण्याचा दूसरा पर्याय नाहीये माझ्याकडे, काय ठरवलय मग. तिला भेटणार आहेस का नाही??” बाबा म्हटले
प्रकाश ला काय करावं काहीच कळत नव्हतं,तो थोडा वेळ शांत राहिला आणि
“ठीक आहे, चालेल. पण मला लग्नासाठी कुणीही Force करणार नाही, कुणीच नाही. मी स्वतः निर्णय घेईल, हे आधीच सांगून ठेवतो” प्रकाश अटीत बोलला.
“हो चालेल तू भेट आधी नंतर ठरवू आपण, मी तुला तिचा No. आणि तिचे Photos WhatsApp ला पाठवतो. तू बघून घे आणि भेटीच ही विचार” बाबा म्हटले आणि खोलितुन बाहेर जाऊ लागले..
“अहो बाबा, गोष्ट इतकी पुढे गेलीय की तुमच्याकडे तिचा No. आणि Photos ही आलेय” प्रकाशने आश्चर्याने म्हटले.
“हो, Technology मित्रा तिची आणि तुझी भेट घडवून आनन् मी ठरवलच होत म्हणून मी इतका पुढे गेलो.आता तुहि थोडा पुढाकार घे” बाबा हसत म्हटले आणि तिथून निघून गेले आणि प्रकाश त्यांना बघतच राहिला