विवेक द. जोशी

Romance Tragedy Classics

4  

विवेक द. जोशी

Romance Tragedy Classics

असं का घडलं ?

असं का घडलं ?

8 mins
286


सायली सोबत सुमिताने हॉस्टेलच्या रुमचा दरवाजा उघडला. पत्राचे एन्व्हलोप समोर पडले होते. ते एन्व्हलोप चटकन् उचलून पलटून पाहिले. त्यावरील सुरेख अक्षर आणि पाठविणाऱ्याचे नाव ``तुझाच विजय’’ पाहून सुमिता मनोमन माहेरली. विजय या मित्राने ती खुपच भारावलेली होती. सुमिताला विजय खुपच आवडायचा. दिसण्यास चार - चौघांसारखा असला तरी विजयचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. तो औरंगाबादला त्यांच्याच देवगिरी कॉलनीत राहत असे. विजयला सुमिता खुपच आवडायची. सुमिता गोरी, नाजूक, सुंदर, अवखळ गोड आवाजाची हुशार मुलगी होती.

विजयचा रस्ता सुमिताच्या घरासमोरुन जात होता. कॉलेजला जातांना-येतांना,क्रिकेट खेळून येतांना ; तो गॅलरीतील सुमिताला, तो टाटा करीत असे. एके दिवशी सुमिताने त्याला गाठून जवळ-जवळ धमकावलेच, ``ए बच्चू, तू मला टाटा करतांना जर तुला कुणी पाहिले तर माझी धडगत नाही अन् तुझी ही धडगत नाही. आमचा हेडमास्तर बाप, खडूस आहे. असली थेरं तो खपवून घ्यायचा नाही. माहित आहे नं तुला ?’’

विजयने कान पकडून, ``सॉरी, सॉरी म्हटले ! सुमिता काय करु, तू मला खुप आवडतेस’’ ! अगदी निरागसपणे तो बोलून गेला. `ओके. ओके.’ म्हणुन सुमिता / निघून गेली.

दुसरे दिवशी कॉलेजला जातांना विजयने गॅलरीत पाहिले. सुमी गॅलरीतील कुंडीतील फूलझाडांना पाणी घालीत होती. विजयने सायकलची ट्रींग - ट्रींग घंटी वाजविली. सुमीने कुंडीतील एक गुलाबाचे फूल तोडून विजयच्या दिशेने भिरकावले. विजयने ते गुलाबाचे फूल अलगद झेलून त्यांचे चुंबन घेतले. सुमी, डोळे वटारुन ओठांचा चंबु करुन त्यावर एक बोट ठेवून `चूप्प’ अशी खुण करु घरात निघून गेली. काही दिवस असेच गेले. सुमीची व विजयची गाढ व मूक मैत्री जमली. एकमेकांना खुणावल्या शिवाय दोघांनाही दिवस जात नसे.

सुमीचे बारावी झाले, आणि सुमीने विजयच्या कॉलेजात अ‍ॅडमिशन घेतले. दोघांच्याही मैत्रीला बहर आला होता. कॉलेजातील रिकाम्या तासाच्या वेळात सुमी व विजय भरभरुन गप्पा करीत असत. विजय, तिच्या सौंदर्याचे वर्णन करणाऱ्या कविता लिहून तिला देत असे. ``विजय, तुझे माझ्यावर प्रेम आहे... माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे... पुढील आयुष्यात हे प्रेम असेच राहो. भविष्य कुणाला माहीत.’’ ? सुमीच्या अशा बोलण्याचा विजयला विरह यातना वाटायच्या. त्याच्या क्रिकेटचे, अभ्यासाचे, कवितांचे सुमिताला खुप कौतुक होतो ; तसेच विजयला सुमिताचा गोरापान वर्ण, सडसडीत बांधा, कमरेखालपर्यंत लांबसडक केस आणि सुमिताचा गाणारा गोड गळा ; याचा खुप अभिमान होता. दोघेही एकमेकांच्या गुणवत्तेवर, यशावर अक्षरक्ष: भाळलेले होते. विजय व सुमिता एकमेकांचे जीवश्च कंठश्च मि त्र झाले होते. त्यांच नातं `पाणी आणि मासोळी’ असच होतं. विजय नेहमी सुमीस त्याची कविता गावयास लावीत असे.

`नाते तुझेनि माझे

साता जन्माचे गीत गाते’

ऑगस्ट महिन्यात त्यांच्याच फस्ट इयरच्या वर्गात सागर नावाचा नवा विद्यार्थी आला. तो खुप शांत आणि हुशार होता...! स्वभावाने अबोल तरी त्याच्या डोळयात हूशा रीची विलक्षण चमक होती. प्रथमसत्र परीक्षेत वर्गात सर्वाधिक मार्क्स घेवुन वर्गावर त्याने विलक्षण छाप पाडली होती. सागरचा आवाज अष्टपैलू व कुठले ही गाणे सहज म्हणण्या इतपत बहरदार होता. तो कुठलेही गाणे सहज गात असे...! कॉलेजच्या गॅदरींगला त्याने `बहोत प्यार करते है,’तुमको सनम’ हे गाणे गावून गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता. तर सुमिताने `तु शायर हे, मैं तरी शायरी...’ हे गाणे गावून मूली तून प्रथम क्रमांक मिळविला होता. गॅदरींगपासून सुमिता आणि सागरची ओळख झाली. सागरला, सुमिताची आणि विजयची मैत्री व प्रेम माहीत असल्यामुळे तो सुमिताशी तटस्थ व परक्या प्रमाणे अंतर राखून बोलत असे ! सुमिताने सागरला सुचिवले विजय नसतांना आपण गप्पा मारत जाऊ ! सुमिता व सागर विजयच्या माघारी गाण्यांवर तासन् - तास् करीत बागेत बसत असत.

आता सुमिताला, विजय इतकाच सागरही आवडू लागला. सुमिताला विजय आणि सागर यांना भेटल्याशिवाय दिवसच जात नसे ...!

कॉलेजच्या मैत्रिणी सुमिताला, `एक फूल दो माली’ म्हणुन टाँट मारु लागल्या. सुमिता बिनधास्त मुलगी होती; ती त्या मैत्रिणींनी म्हणत असे, `पहले तू एक तो माली ढूँड,चल फूट !’

सुमिता मुळातच होती, लावण्यमयी गायिका ! विजय नेहमी सुमिताला म्हणत असे, `लावण्य व गाणं या दोन्हीवर मी आयुष्य ओवाळून टाकलेलं आहे.’ फस्ट इयरचे वर्ष संपले. परीक्षा झाल्या. सुट्ट्यात सुमिता व विजयची भेट होत असे. सुमिता, सागरचीही कधी कधी भेट होत असे.

सेकंड इयरचे वर्ष सुरु झाले आणि काही दिवसात सागरच्या वडीलांची बदली अहमदनगरला झाली. सेकंड इयरच्या वर्गाने सागरला `सेंड ऑफ दिला ...!’ सेंड ऑफच्या कार्यक्रमाला सुमिताने, `इन रस्मोंको’ इन रिश्ते नातों को मै ना भूलॅूंगी...!’ गाणे म्हटले. सुमिताचा एक चांगला मित्र तिला सोडून दुसऱ्या गावी गेला. कॉलेजात सुमिताला खुप दिवस सागरची पत्र येत होती. सुमिता ती पत्रे वाचून विजयच्या भितीने फाडून टाकीत असे.

सुमिताची व विजयची गाढ मैत्री सर्वांना माहित होती. सुमिताचा व विजयचा पुढे विवाह होणार ; इथपर्यंत सर्वजण चर्चा करीत होेते.

सुमिताचे व विजयचे प्रेम, सुमिताच्या आईला कळले. तिने सुमिताची व विजयची मैत्री सुमिताच्या बाबांना सांगितली. सुमिताच्या बाबाने `मूर्ख कुठली’ म्हणुन सुमिताला झापड लगावली. सुमिताचे बाबा सुमिताच्या लग्नाच्या तयारीला लागले. वर्षभरात सुमिताचे लग्न ठरले. सुमिताने नोकरीच्या शोधात असलेला विजयला हॉटेलमध्ये जेवण्यास बोलविले, झालेला प्रकार सांगितला. बाबांनी तिचे लग्न ठरविल्याचे सांगितले. आपले लग्न होवू शकणार नाही या विचारांनी दोघेही खुप दु:खी झाले...`तनसे तनका मिलन ,हो न पाया तो क्या मनसे मन का मिलन कोईकमतो नहीं’ या ओळी ऐकवून सुमिताने विजयचा निरोप घेतला.

घाईघाईने विजयही आयुष्याच्या दु:खद वळणावर दुरवरच्या कुठल्यातरी गावी इतर राज्यात नोकरीत रुजू झाला. सुमिताने विजयला पत्रव्यवहाराकरिता मैत्रीण सायलीचा हॉस्टेलचा पत्ता दिला होता.

सायली सोबत सुमिताने हॉस्टेलच्या रुमच्या दरवाजा उघडला. पत्राचे एन्व्हलोप समोर पडले होते. सुमिता विजयचे सुरेख अक्षर आणि पाठविण्याऱ्याचे नाव `तुझाच विजय’ पाहून सुमिताने घाईघाईने एन्व्हलोप फोडले.

`तु सुखी राहा - विजय’ इतकेच लिहिलेले होते. सायलीने धीराने सुमीच्या खांद्यावर हात ठेवताच अश्रुंचा पूर अनावर होवून सुमिताच्या डोळयातून अश्रु घळाघळा वाहून लागले आणि सायलीला मिठी मारुन सुमी भावनावेगाने ओक्साबोक्सी रडत होती. सायली तिला धीर देत होती.

सागरने ही सुमिताशी पत्रव्यवहार बंद केला. पाहता - पाहता सुमिता विजय आणि सागर ... हे एकमेकांना ओळखतात की नाही अशी स्थिती निर्माण झाली. तिघेही एकमेकांची सतत आठवण करणारे ... आयुष्यभर अनओळखी झाले... आणि तिघेही आयुष्यभर एकमेकांच्या सतत आठवणीत जीवन काढणार हे एकच सत्य शिल्लक राहिले होते. तारुण्य म्हणजे आयुष्यातील मोठी संधी असते. ही संधी साधता आली तर आयुष्याचे सोने होते नसता माती !

-----------------------

सुमिता (मनातल्या मनात)

------------------------

विजय आणि सागर हे दोघेही माझ्यावर खुप प्रेम करायचे. आयुष्यात त्यांनी प्रियकारांचे प्रचंड सुख दिले. दोघांपैकी एकाशीही विवाह झाला असता तरी माझे आयुष्य मनसोक्त आंनदात व तणावमुक्त गेले असते. सागर प्रियकरापेक्षा मित्र म्हणुन अधिक आवडायचा. सागर खुपच भावूक होता, हुशार होता. तर विजयचे माझ्या आयुष्यातील स्थान श्वासाइतके महत्वाचे होते. माझे लग्न कंपनीतील कारकू नाशी, प्रशांतशी झाले. त्याचे कुटूूंब ग्रामीण वळणाचे व पारंपारिक विचाराचे होते. या कुटूंबातील व्यक्तींनी मला `डि.एड्’ करुन शिक्षिकेची नोकरी करण्यास भाग पाडले. नोकरीमुळे माझा वेळ चांगला जात असे. मला क्षणोक्षणी कल्पक विजयची खुप आठवण होत होती. अगदी दररोज क्षणोक्षणी ! माझा नवरा तापट व पारंपारिक विचाराचा असल्याने त्याच्याशी कसे वागावे हे बरेच दिवस कळले नाही. नोकरी व माझ्या सौंदर्यामुळे माझ्यावर सासु-सासरे खुप खुष होते.

नवरा प्रशांतला साहित्य, कला, संगीताची मूळीच आवड नव्हती. कित्येक सुट्ट्या आम्ही बंद खोलीत घालवित असू.

प्रशांतच्या वारंवार स्पर्शची खुप किळस येते, पण करणार काय ? त्याच्यासाठी मी `सुमिता’ इतकच विश्व उरलेलं होतं नवरा - सासु- सासरे म्हणतील ते ऐकुन मी दिवस घालवित असते. कपाळावरील कुंकवा एव्हढे च माझं विश्व संसार हेच आयुष्य ! घड्याळावरील काटयांप्रमाणे सुर्य उगवण्या, मावळण्या इतका रुटीन व संथ आयुष्य जात होतं. प्रिय विजय, तुला व तुझ्या प्रेमाला त्रिवार वंदन, विजू मी तुला कधीच विसरले नाही आणि विसरणारही नाही ! तू माझं पहिलं प्रेम आहेस. विजयशी विवाह झाला असता, तर जिवनाचा प्रेमाचा मोठा विजय झाला असता. किमान सागरशी विवाह झाला असता तरी इतक अवघडलेलं आयुष्य नक्की वाटयाला आलं नसतं.

--------------------------

विजय (मनातल्या मनात)

--------------------------

मी नोकरीत गुरफटलो. सुमिताच्या माझ्या आयुष्यातून जाण्याने माझे सर्वस्व गेले. मी काहीही करतांना प्रत्येक कृतीच्या केंद्रस्थानी सुमिता असे. आता जे करावयाचे ते कुणासाठी ? या प्रश्नाचे उत्तर हरवलेले आहे. सुमिता सारखी दुर्मीळ सौंदर्यांची व गोड गाणारी मुलगी माझ्या आयुष्याचे सर्वस्व होती. पुढे माझे लग्न झाले. संसार चालू आहे. रस नसलेल्या संत्र्या मोसंब्यासारखा ! बायको सविता रुपाने सामान्य व वृत्तीने ही सामान्यच ! मी मूळीच सुखी नाही हे मलाच माहित आहे. समाजाला दिसते मी माझ्या आयुष्याचा सुखाची सुज !

बस्स सुमिताच्या आठवणी आणि संसार ! बिच्चारी सुमी काय करीत असेल ? अशीच तडजोडीने दिवस ढकलीत असेल ! `बेचव जेवणाप्रमाणे.’ बिचारी ! कदाचित सुखात ही असेल ! माझ्याही पेक्षा तिची कदर करणारा चांगला नवराही मिळाला असेल ! खुप सुखात असेल. पण ती माझं प्रेम कधीच विसरु शकणार नाही. माझं आयुष्य म्हणजे `एक सभ्य माणसाचा मुखवटा’ पण आतल्या आत पोखरलेले जीवन जगतोय ! माझं हे असच आयुष्य जाणार, नोकरीच्या नाळेला चिकटून ! सुमिता तु सुखी राहा. तु माझ्या आयुष्यातून गेलीस अन् माझ्या आयुष्यातून कविता आणि प्रणय घेवून गेलीस. मी कविता लिहिल्या त्या फक्त सुमिता तुझ्याचसाठी ! तुच आयुष्याची अंतीम प्रेरणा ठरलीस.

--------------------------

सागर (मनातल्या मनात)

--------------------------

सुमिताला विसरणे अशक्यच, पण विजय हा सुमिताचा प्रियकर होता, मी फक्त मित्र ! सुमिता व विजयचे नक्कीच लग्न झाले असणार. दोघेही स्वप्नवत आयुष्य जगत असतील, अगदी चित्रपटातील यशस्वी प्रेमविवाह झालेल्या नायक - नायिकेप्रमाणे. दोघेही हरहून्नरी, टपोरी, रसिक, निखळ, निरागस, उनाड आणि हुशार. माझी व सुमिताची जोडी जमली ती गाण्यामूळे. माझे आणि सुमिताचे लग्न झाले असते तर आमचा संसार संगीतमय झाला असता. आम्ही यशस्वी गायक-गायिका निश्चितच झालो असतो. आमच्या गाण्याच्या कित्तेक कॅसेट्स , सीडी निघाल्या असत्या, गाजल्या असल्या. आम्ही पैसा व प्रसिध्दी खुप मिळवली असती. पुढे माझं लग्न झालं, रुपाने सामान्य पण प्रेमळ पत्नीही लाभली. ती सासरशी, माझ्याशी एकरुप झाली की नाही हे काही कळत नव्हतं तिचा माहेरचा अनावश्यक ओढा, मला मूळीच आवडला नाही. तिची माहेरच्या नातेवाईकांबद्दलच्या अनावश्यक ओढीने, माझा संताप होत असे. माझी व बायकोची या विषयांवरून अनेक वेळा भांडणं झाली. संसाराच तसं मला फारस आकर्षण राहिलं नाही. मनासारखी बायको मिळाली नाही तर आयुष्याचा नरक होतो !

बस्स ! ऑफिसात बसून जास्तीत जास्त वेळ बसून काढतोय, आयुष्यात फक्त सुमीच आवडली. आयुष्य बहरेल वाटले पण माझं आयुष्य मी दारुत बुडवीलं ! मनासारखं आयुष्य जगता येणं म्हणजे चेष्टा नाही. एखादी मुलगी आवडून तिच्याशी लग्न न होता. दुसऱ्या कुणा अनोळखी मुलीशी संसार थाटून, आयुष्य काढणे तडजोड आहे. जस्ट अ सोशल फॉरमॅलिटी ! चलता है ये भी और एक दिलजले आशिकोंकी दास्तान है. जिंदगी एक है, गम बहोत है. खूप मनाला यातना झाल्याच तर मी गाणं गातो. `कभी - कभी मेरे दिलमें खयाल आता है, कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए ’ !

--------------------------

सुमिताचे आई - बाबा (मनातल्या मनात)

--------------------------


सुमिताचे लग्न आम्ही समजाच्या भितीने घाईघाईने पार पाडले. बिच्चारी सुमी चकार शब्द न काढता ; डोळयातील पाणी आटल्यागत दिवस ढकलेले आहे. विजय खुप गुणवान व चांगला मुलगा होता. तो कसे दिवस ढकलत असेल ? आमचं तरी चुकलं काय ? कधी वाटतं आमचचं चूकलं... तर कधी वाटतं आमचं काही नाही चूकलं ! हे देवा ! आमचं चूकत असेल तर मार्ग दाखवीत जा. आमच्या द्विधा मन:स्थितीला, चूक- अचूकतेला क्षमा कर. शारिरीक आकर्षण. सौंदर्य, प्रेम, बौध्दिक सौंदर्य, व्यवहार, धर्म, जात, जनलज्जा, प्रतिष्ठांच्या, रिती - रीवाजाच्या पांरपारिक कल्पना, सामाजिक बंधनाच्या, खाटीकखान्यात भाव-भावनांच्या खांडोळया होवून ... जगी जगत होती फक्त सुमिता, विजय आणि सागरची जीवंत प्रेत... संवेदनांच्या स्मशानांत !

हे असं का घडलं ?



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance