विवेक द. जोशी

Others

2  

विवेक द. जोशी

Others

द्विधा

द्विधा

3 mins
1.7K


अ‍ॅडव्होकेट कौमुदी कुलकर्णी, श्री. राजध्यक्षांशी बोलत होत्या, ``आपला घटस्फोट कोर्टाने मान्य केलेला असला तरी मानवांना माणुसकीपेक्षा श्रेष्ठ कायदा नाही.'' त्यांनी निकालपत्राची कागदपत्र श्री. राजाध्यक्षांच्या हाती दिले. ``निकाल पत्राच्या एका प्रतीवर सौ. राजाध्यक्षांची स्वाक्षरी आवश्यक आहे.'' अ‍ॅडव्होकेट कौमुदी कुलकर्णींनी सांगितले.


श्री. राजाध्यक्ष बोलले, ``ठिक आहे मॅडम भाग्यश्री राजाध्यक्षांची स्वाक्षरी मिळेलच. कायद्याने तयार केलेल्या जगात आपल्याला औपचारिकाता म्हणुन घटस्फोटांच्या कायदेशीर कागदपत्राची आवश्यकता होती. अर्थात् मी भाग्यश्रीला या बाबत मनाची तयारी करणे किती गरजेचे आहे हे पटवुन सांगितले होतेच.'' श्री. भालचंद्र राजाध्यक्ष निग्रहाने बरच काही मॅडम कुलकर्णींशी बोलत होते.


``राजाध्यक्ष इम्पोर्ट एक्सपोर्ट वर्ल्ड" या जगद्विख्यात उद्योग समुहाचे सर्वेसर्वा श्री. भालचंद्र राजाध्यक्ष ! आजमितीस राजाध्यक्ष परिवारास वंशाचा दिवा देण्यास शारिरिक दृष्ट्या अपात्र असलेल्या सौभाग्यवतींना, भाग्यश्री राजाध्यक्षांना कायदेशीर दृष्ट्या घटस्फोट देऊन आयुष्याच्या उत्तरार्धात - ``राजाध्यक्ष इम्पोर्ट एक्सपोर्ट वर्ल्ड" उद्योग समुहाच्या भविष्य पुर्नबांधणी व दृढीकरणचा धडाका लावला होता.


``थॅन्क यु अ‍ॅडव्होकेट कुलकर्णी मॅडम'' या शब्दात मॅडमचे राजाध्यक्षांनी आभार मानले. अ‍ॅड. कौमुदी कुलकर्णी या राजाध्यक्ष परिवाराच्या हितचिंतक अ‍ॅडव्होकेट म्हणुन सर्व परिचित आहेत. त्यांनी ``राजाध्यक्ष इम्र्पोट एक्सपोर्ट वर्ल्ड" व राजाध्यक्ष कुटूंबीयांची वेळोवेळी कायदेशीर बाबतीत मदत केलेली आहे. आज अ‍ॅडव्होकेट कौमुदी कुलकर्णी राज्यातील श्रेष्ठ वकीलांपैकी एक गणल्या जातात.


सौ. भाग्यश्री राजाध्यक्षांना कोर्टाच्या या महत्वपूर्ण निर्णयाची समाजात, सोसायटीत तसेच उद्योग विश्वात खुप चर्चा होणार याची खुप भिती वाटत होती. या निर्णयाने त्या खुपच गंभीर झाल्या होत्या.


श्री. राजाध्यक्ष खुप जिद्दी आणि कठोर असले तरी सौभाग्यवतींसाठी प्रेमळ होते. श्री. राजाध्यक्षांच्या आयुष्य वेलीवर आपण अपत्याचे फुल फुलवू शकलो नाही, या अक्षम्य मनोअपराधाने भाग्यश्री खचल्या होत्या, आजच्या घटस्फोटाच्या मंजुरीने आणखीनच अगतिक झाल्या होत्या. 


``ये काय हे भाग्यश्री ? इतकं मनावर घेवू नकोस हं '' ! घरी आल्या आल्या श्री. राजाध्यक्ष मोकळेपणा आणण्याच्या दृष्टीने सहजतेने बोलू लागले.


``आणखी मी काय तुम्हाला मदत करु शकत असेल तर सांगा'' या, सौ.भाग्यश्रींच्या वाक्यावर किंचित खुष होऊन श्री. राजाध्यक्ष म्हणाले - ``भाग्यश्री तुझ्याच सहकार्याने मी, आपण व ``राजाध्यक्ष इम्पोर्ट एक्सपोर्ट वर्ल्ड'' जागतिक पातळीवर नावारुपाला आलोत, आपल्या उद्योगाची भरभराट झाली. भाग्यश्री तू माझं भाग्य आहे''!


अपत्य, मुलं या जिव्हाळ्याच्या अपेक्षेवर नियतीनेच घाला घातला, याला जबाबदार शारिरिकदृष्ट्या आपण असलो तरी नियतीने दगा दिला, असं श्री. राजाध्यक्षांना वारंवार वाटत असे. आता राजाध्यक्षांना खुपच अपराध्यासारखे वाटत होते. त्यांना स्वतःचाच राग येत होता. पत्नीनं राजाध्यक्षांवर जवळ-जवळ आयुष्यच ओवाळून टाकले होते. त्यांच्याही मनात पत्नीची जागा देवदेवतांपेक्षाही मोठी होती. ``भाग्यश्री’’ या, भालचंद्र राजाध्यक्षांच्या कॉलेजच्या दिवसांपासुन - एक बुध्दीमान मुलगी म्हणून मर्जीमान्य झाल्या होत्या, भालचंद्र भाग्यश्री ही जोडी कॉलेजच्या दिवसांपासुन लोकप्रिय आहे. ती आजतागायत आहे.


भाग्यश्री, या त्यांच्या गुणवत्तेच्या व भालचंद्राच्या मर्जीच्या दोन्हींच्या आधारे ``राजाध्यक्ष इम्पोर्ट एक्सपोर्ट वर्ल्ड कंपनीत नोकरीस पात्र ठरल्या होत्या. पुढे त्यांनी भालचंद्र राजाध्यक्षांशी विवाह केला. ``राजाध्यक्ष इम्पोर्ट एक्सपोर्ट वर्ल्ड"' मध्ये श्री. भालचंद्र राजाध्यक्ष (मॅनेजींग डायरेक्टर/ मालक) यांच्या पत्नी व कंपनीच्या सेक्रेटरी म्हणुन उद्योग समुहाच्या महत्वाचा सक्रिय घटक झाल्या होता.


राजाध्यक्ष उद्योग समुहाच्या भरभराटीस तसेच सांपत्तिक तडजोडी करिता सौ. भाग्यश्री राजाध्यक्षांना घटस्फोट घेणे कसे महत्वाचे आहे, हे श्री. भालचंद्र राजाध्यक्षांनी पटवून सांगितले होते. सेबीच्या ऑडीट प्रकरणी काट्यावधी रुपयांच्या शेअर्स विकेंद्रीकरणाच्या प्रश्नाचा गुंता सोडविण्याकरिता या घटस्फोटाने मदत झाली होती.


``भाग्यश्री, घटस्फोटाच्या निकालाची प्रत मिळाली म्हणून तुझी स्वाक्षरी हवी आहे'' - भालचंद्र मादर्वाच्या स्वरात बोलले.


``ठीक आहे. कायद्याने आपण वेगळे झालोच आहोत तर वेगळी व्यवस्था करा माझी, कायद्याचा अनादर व्हायला नको.'' निकालाच्या प्रतीवर स्वाक्षरी करीत भाग्यश्री बोलल्या. नंतर त्यांना खूप अस्वस्थ वाटायला लागलं. त्यांना भोवळ आली. त्या सोफ्यातच मान टेकुन पडल्या. त्यांच्या तोंडातून नकळत ``भाल ! मला वाचवं'' असे उद्गार बाहेर पडले. भालचंद्रांनी खूपच घाईने डॉक्टरांना बोलविले डॉक्टरांनी सविस्तर चेकअप केले. भालचंद्र खूपच काळजीच्या दरीत लोटले गेले होते. कदाचित निर्णय तर चुकत नाही ना ? या विचाराने खूपच गंभीर होत होते. त्यांना ही खुपच अस्वस्थ वाटायला लागले होते.


``डॉक्टर एनी थिंग सिरीअस,'' भालचंद्रांनी विचारले?


``यस ! पण काळजी करु नका. मॅडमना शक्य तेव्हढे आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा त्यांना दिवस राहिलेआहेत. त्या आई होणार आहेत. कॉन्ग्रॅच्युलेशन मिस्टर भालचंद्र राजाध्यक्ष'' !


भालचंद्रांचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. खूपच आनंदीत होऊन भावनाविवश झालेले राजाध्यक्ष पुटपुटत होते - ``कुलदेवतेची कृपा आहे ! गॉड इज ग्रेट'' !! भालचंद्रांच्या एका डोळ्यात आनंद अश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात दुःखाश्रू तरळले होते. 



Rate this content
Log in