End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!
End of Summer Sale for children. Apply code SUMM100 at checkout!

anita shinde

Drama


1  

anita shinde

Drama


अशी ही पकडापकडी

अशी ही पकडापकडी

4 mins 1.0K 4 mins 1.0K

मधू उंच, सडपातळ किंचीत सावळी, लांब केसांची. सूधा उंचीला मधूपेक्षा किंचीत कमी, मध्यम, थोडी गोरी, जाड केसांची. मधू कमी बोलणारी, शांत स्वभावाची. सूधा बडबडी, कवितेचा छंद जपणारी, आणि भरपूर मस्ती करणारी. दोघींनाही वाचणाची आवड होती. दोघींचाही कर्ण हा (महाभारतातील) ड्रीम हिरो होता. तरीही दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी होत्या. एकमेकींशिवाय दोघींना करमायच नाही मूळी. दोघींची गट्टी छान जमली होती अकराविपासूनच! तशा दोघी हूशारच होत्या म्हणा. आपल्याच विश्वात मग्न असणाऱ्या दोघींची दोस्ती, मैत्री पूर्ण कॉलेज मध्ये खूप फेमस होती. नवतारूण्याचे मैत्रीचे दिवस भराभर ऊडून जात होते. कॉलेजच शेवटच वर्ष सरत होत. अक्षरशा: जीवावर आल होत हे वर्ष. कारण इथून पूढे वाटा वेगवेगळ्या होणार होत्या दोघींच्या. म्हणूनच दोघींनीही ठरवल होत जमेल तेवढा वेळ एकमेकींबरोबर घालवायचा. म्हणून दोघींनी एक प्लान केला. कॉलेज सूटल्यावर प्रभादेवीला पू.ल. ऍकेडमीत होणारा शस्त्रास्त्र प्रदर्षन सोहळा पहायला जायच. तेही गूपचूप दोघीच. घरातही कळवायच नाही. कारण मग परमीशन मीळणार नाही. म्हणून कोणालाही न कळवता जायच ठरलं. एका आठवड्याच प्रदर्षन होत. त्यातला एक दिवस नक्की करून कॉलेज सूटल्यावर दोघी निघाल्या. घरी पूर्ण दिवस लायब्ररीत बसणार असल्याच कारण सांगीतलच होत. दादरला कोणती बस जाते ते माहीत नव्हत, ट्रेनने कधी प्रवास केलाच नव्हता. तरीही ट्रेननेच जायच ठरवल. झाल दोघींनी टीकीट काढली ५ नंबर प्लॅटफोर्मवर कशाबशा पोहोचल्या. छान गप्पा मारत ऊभ्या होत्याच की तेवढ्यात विरारहून चर्चगेटला जाणारी ट्रेन आली आणि ही गर्दी उसळली. लोकांची चढण्याची आणि उतरण्याची एकच घाई. दोघींनी एकमेकींचा हात घट्ट पकडला आणि चढण्याचा प्रयत्न केला. पण गर्दीने सूधाला मागे ढकलल. मधू कशीबशी ट्रेनमध्ये चढली. सूधाने मधूला हाक मारली. मधूने मागे वळून पाहिल पण तेवढ्यात ट्रेन हलली. दोघी एकमेकींना केवीलवान्या नजरेने पहातच राहील्या. आणि इथूनच सूरू झाला दोघींचा पकडापकडीचा डाव…!


सूधाचे डोळे डबडबले. डोळ्यातून टपाटपा अश्रू ओघळायला लागले. गर्दीचा राग येत होता. काहीच सूचत नव्हत. घरी कळवाव तर खैर नव्हती. सगळीच कोंडी होऊन बसली होती. बाजूच्या प्लॅटफोर्मवर दादर लोकल लागली होती. सूधा जाऊन बसली त्या लोकल मध्ये. तर तीथे काहींनी मधूला कांदीवलीला उतरून बोरीवली लोकल पकडून सूधाला भेटण्याचा सल्ला दिला. झाल मधू बोरीवलीला उतरली आणि सूधा दादरच्या दिशेने निघाली. सगळीकडे पाहील सूधा कूठेच दिसली नाही. नूकतीच दादर लोकल गेल्याच मधूला कळाल. तीने लागलीच चर्चगेट लोकल पकडली. तीथे सूधा दादरला पोहोचली. समोर टीसी दिसताच सूधाकडे तीकीट नसल्याच तीच्या लक्षात आल. कारण दोन्ही तीकीट मधूच्या बॅग मध्येच राहीली होती. तीने लगेच तीकीट कांऊटर कडे धाव घेतली. मधूने दादरला उतरून सगळ्या प्लॅटफोर्मवर सूधाचा शोध घेतला. पण ती काही दिसली नाही. मग मधूने सरळ पु.ल. ऍकेडमी गाठन्याच ठरवलं. कदाचीत तीथेतरी सूधा भेटेल या आशेने. मधूने टॅक्सीला हात दाखवला आणि सूधा तीकीट घेऊन बाहेर पडली. तीनेही सगळीकडे मधूचा शोध घेतला पण मधूही कूठेच सापडली नाही. शेवटी सूधा स्टेशन मास्तरकडे गेली व मधू हरवल्याच सांगीतल. मधूच्या नावाची अनाऊसमेंट झाली पण मधू काही आली नीही. सूधा तीथेच मधूची वाट पाहत बसली. आणि तीथे प्रत्येक दालनात जाऊन मधूने सूधाचा शोध घेतला. पण व्यर्थ. तीथेही सूधा नव्हती. सूधाने खूप वाट पाहीली मधू काही आलीच नाही. नाईलाजाने सूधाने बोरीवली लोकल पकडली. आणि मधू दादर स्टेशनवर उतरली. सगळीकडे नजर फिरवत एका बँचवर मधू उदासवानी बसली. झाल्या प्रकाराच तीला खूप वाईट वाटल. तीनेही मग बोरीवली लोकल पकडली. तीथे बोरीवली स्टेशनवरही मधूच्या नावाची अनाऊन्समेंट झाली आणि सूधा मधूची वाट पहात बसली. संध्याकाळ झालेली. मधूचा काहीच पत्ता लागेना. रडूच कोसळल सूधाला. मनाची तयारी करून ती ऊठली आणि स्टेशनच्या समोरच असलेल्या लायब्ररीच्या कांऊटरवर ठेवलेल्या पीसीओ कडे गेली वहितला नंबर पाहून डायल केला.


समोरून मधूची आई बोलत होती. सूधाने सर्व कथन केल, त्या घाबरल्या. सूधाने त्यांना दिलासा दिला. आणि अजून शोध घेण्याच वचन देऊन फोन ठेवला. खूप रडवेली झाली होती सूधा. इथे मधू ट्रेन मधून उतरली आणि बाहेर जाण्यास निघाली आणि सूधा तीथूनच आत जाऊन बसली. स्टेशन मास्तरला परत एकदा मधूच्या नावाची अनाऊसमेंट करायला लावली. मधू मात्र बसच्या दिशेने धावली. चांगली तासभर मधूची वाट पाहून सूधा वैतागली, रडवेली झाली न राहवून तीने मधूच्या घरी परत फोन केला आणि समोरून मधूचा आवाज ऐकून हरखलीच. दोघींनाही बोलवेना. दोघी एकदम म्हणाल्या तू सूखरूप आहेसना. आणि हसायलाच लागल्या. दोघींनीही सूटकेचा निश्वास सोडला. दूसऱ्या दिवशी मधू क्लास मध्ये सूधाची वाट पहात बसली होती. एव्हाना क्लास भरत आलेला. सूधा क्लास मध्ये येताच दोघींनी एकमेकींना घट्ट मीठी मारली आणि खूप हसल्या. एकमेकींचे डोळे पूसले. पूर्ण वर्ग हे दृश्य पहात होता. पण मधूसूधाला याच भानच नव्हत त्या फक्त एकमेकींमध्येच गूंतल्या होत्या. साक्षीला पाऊस तेवढा पडत होता.Rate this content
Log in

More marathi story from anita shinde

Similar marathi story from Drama