The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

anita shinde

Tragedy Romance

4.0  

anita shinde

Tragedy Romance

एका प्रेमाची चित्तर कथा

एका प्रेमाची चित्तर कथा

13 mins
1.3Kआज बाल्कनीत बरेच गुलाब फुलले होते. ते पाहण्यासाठी कुसुम बाल्कनीत गेली. प्रत्येक फुलांवर प्रेमाने हात फिरवत असताना तीची नजर सोसायटीच्या जाॅगर्स पार्क मध्ये एक्सरसाईज करणाऱ्या तरूणावर खिळून बसली. तो तरूण पस्तीशीच्या आतला असावा. पिळदार बाहू, उंच, गोरा, धिप्पाड. एखादा फील्मी हिरोच जणू! हात गुलाबावर फिरत होता अन् नजर त्या तरूणावर. करंगळीला काटा लागला तेंव्हा कुठे कुसुम भानावर आली. साडेनऊच्या आसपास कुसुमने प्ले ग्रुपची तयारी करायला घेतली. आई शारदाबाई आणि कुसुम दोघी प्ले ग्रुपची खेळणी, ड्रोईंग व पिक्चर बुक्स मुलांच्या छोट्याशा डेस्कवर ठेवत होत्या. तीतक्यात डोअर बेल वाजली. मुलं येण्याची वेळ झालीच होती म्हणून कुसुमने दरवाजा उघडला. दारावर मघाचाच तो तरूण उभा होता. साधारण साडे तीन वर्षाची मुलगी त्याच बोट धरून व तीच्या बाजूलाच तीची आई उभी होती. “शारदाबाईं आहेत का? आम्हाला त्यांना भेटायचं होत”. “हो आहेत. या आत. बसा. मी आईला बोलावते”. कुसुम आत गेली व शारदाबाईला हाॅल मध्ये पाठवून ती त्यांच्यासाठी पाणी आणायला किचनमध्ये गेली.


गीतेश कुसुमच घर न्याहाळत होता. भिंतीवर मिलिट्रीचा युनिफॉर्म घातलेला एक फोटो लावला होता. त्यात मृत्यू दिनांक लिहिला होता. ते कुसुमचे वडिल असावेत हे गीतेशने ताडलं. शारदाबाईला पाहून तीघे उभे राहिले. “नमस्कार. मी गीतेश आपटे. ही माझी मुलगी ईशा आणि ही माझी बायको कंचन. आम्ही चार दिवसांपूर्वीच इथे शिफ्ट झालोय. खाली तूमच्या प्ले ग्रुपचा बोर्ड वाचला. माझ्या मुलीच्या एडमिशनसाठी आलोय”. “अच्छा! काय नाव बाळा तुझं?” “ईशाऽऽ”. “व्हा व्हा छान हं. माझी मुलगी कुसुम एडमिशन बद्दल सांगेल. तीच सर्व पहाते”. बाहेरचं संभाषण कुसुम आतूनच ऐकत होती. तीच नाव निघताच ती पाण्याचा ट्रे घेऊन बाहेर आली. एव्हाना दाराबाहेर मुल लाईनीत उभी होती. गीतेशचा निरोप घेऊन शारदाबाई प्ले ग्रुपच्या खोलीत गेल्या. ती खोली रंगीत चित्रांनी भरलेला, विविध आकारांनी सजलेला व असंख्य कार्टून्सच्या गर्दीने रेखाटलेला एक पसरट क्लास होता. छोट्या छोट्या खुर्च्यांनी, खेळण्यांनी भरून पुरून उरलेला तो क्लास मुलांच्या स्वागतासाठी ऐटीत उभा होता. गीतेशला दोन मिनिटं थांबायला सांगून कुसुमने मुलांचा गालगुच्चा घेत रांगेत आत क्लास मध्ये सोडलं. मुलेही तीच्याशी लगट करतच आत जात होती. “माय टिचर, माय टिचर” म्हणत एकमेकांशी भांडत होती. मोठ्या कौतुकाने गीतेश व कंचन ते दृश्य पाहून हसत होते. सगळ्या मुलांना आतमध्ये पाठवून कुसुमने मोर्चा गीतेशकडे वळवला. ईशाची व त्या दोघांची माहिती व्यवस्थित फोर्ममध्ये भरून घेतली. व त्या दिवसापासूनच ईशाला शांरदाबाईंच्या प्ले ग्रुप मध्ये बसवन्यात आलं. फोर्म भरत असताना कुसुमला गीतेशची सर्व माहिती मिळाली. तो व त्याची बायको कंचन आयटी इंजिनियर होते. दोघांचा प्रेम विवाह झाला होता. लग्नाला फक्त पाच वर्ष झालेली. कंचन नोर्थ इंडियन होती. तीला मराठी बोलता येत नव्हतं व बोललेलं कळतही नव्हतं. तशी ती गप्पच होती. गीतेशच सगळ्या प्रश्नांची उत्तरे देत होता. ईशासाठी कंचन घरी राहूनच काम करायची. तशी तीने परवानगी मिळवली होती. घरकामासाठी व ईशाच्या देखभालीसाठी दोन बायकाही ठेवन्यात आल्या होत्या. एकंदरीत छान सुखी संसार होता गीतेशचा. सहा महिन्यातच ईशा छान रूळली प्ले ग्रुप मध्ये. तीला इतर मुलांप्रमाणेच कुसुमचा व शारदाबाईंचा लळा लागला. ती घरी कंचनला व गीतेशला सतत ‘माझी टिचर अशी, माझी टिचर तशी. आज तीने हे शिकवलं, ते शिकवलं. खायला हा खाऊ दिला तो खाऊ दिला’ म्हणून सांगायची. दिवसभर तीच कुसुम पुराण गीतेश घरी येईपर्यंत चालूच असायचं. 


एक दिवस संध्याकाळी कुसुम बस्टाॅपवर उभी असलेली गीतेशला दिसली त्याने पटकन गाडीचा ब्रेक दाबला व गाडी कुसुम समोर थांबवली. काळ्या रंगाची पैठणी तीचा तांबूस गोरा रंग अक्षरशः फुलवत होती. प्रत्येक जन तीला वळून वळून पहात होता. गीतेशही क्षणभर तीला पहातच राहिला. तीला गाडीत बसण्याचा आग्रह करत तो स्वतः गाडी बाहेर आला. कुसुम संकोचत होती म्हणून त्याने गाडीच दारं उघडून तीला आत बसवलं. गाडी चालू झाली. गीतेशने तीला काॅम्लीमेंट दिली. कुसुमही हळूच थॅक्सं म्हणत सावरून बसली. तीला अस गप्प बसलेलं पाहून गीतेशच बोलता झाला. बोलता बोलता गीतेशने त्याचा जीवनपटच कुसुमला सांगून टाकला. तो एका उच्च भ्रू घरात जन्मलेला एकुलता एक शेंडे फळ होता. आयटी कंपनीत चांगल्या पोस्टवर होता. कंचनही त्याच कंपनीत त्याच्या प्रोजेक्टवर कामं करत होती. पाच वर्षाचं त्यांच प्रेम लग्नात बदललेल. ती ठाकूर हा आपटे म्हणून दोघांच्याही घरच्यांचा विरोध होता. म्हणून मग दोघांनीही घर सोडलेल. आणि मुंबईत आपला वेगळा छोटासा संसार फुलवलेला. घरच्यांनीही कायमचे नाते तोडून टाकलेले. बोलता बोलता सोसायटीत गाडी शिरली. “अरेच्चा! कधिपासून मीच बोलतोय, तुम्ही गप्पच? कुठे गेलेलात इतकी सुंदर साडी नेसून? तुम्हाला सांगायच असेल तरच सांगा. अदरवाईस”, “तस काही नाही. अॅक्चुअली मी लाॅ काॅलेज मध्ये प्रोफेसर आहे. आज काॅलेज मध्ये ट्रॅडिश्नल डे होता म्हणून ही पैठणी साडी नेसून गेले होते”. “अच्छा, आणि प्ले ग्रुप?” “तो माझी आई चालवते मी फक्त तीला मदत करते. ओके बायऽऽ, उशिर होतोय”. म्हणत कुसुमने त्याच्या प्रश्नापासून स्वतः ला सोडवून घेतल. तोही तीला बाय करून गाडी पार्क करायला गेला. असाच कधीमधी कुसुमला गीतेश भेटायचा. छान गप्पा रंगायच्या. कुसुम गप्पच असायची. दोघात मैत्री देखील वाढलेली. त्यांच्या मैत्रीचा ईशा हा समान धागा होता. भेटले की, ईशा बद्दलच भरभरून बोलायचे. कंचनही कुसुमची चांगली मैत्रीण झाली होती. गीतेशच्या आवडीचे बरेचसे महाराष्ट्रियन पदार्थ कंचनने कुसुमकडून शिकून घेतले. बोलता बोलता कंचन तीच्या लग्ना विषयी बोलून गेली. तशी कुसुम गप्प झाली. लग्न हा विषय तीच्या मन पटलावरची एक खोल जखम होती जी ती कोणापुढेही खोलू पहात नव्हती. कंचनने मग कधीच तो विषय काढला नाही.


एक दिवस कंचनचा एक लांबचा नातेवाईक तीला शोधत शोधत तीच्या घरी आला. त्याचं नाव अमित होतं. तो व कंचन लहानपणापासूनचे मीत्र होते. भातुकलीच्या खेळात कायम तीच त्याची बायको व्हायची. आठवणींना उजाळा देत दोघे चहा पित आठवांच्या हिंदोळ्यावर झोके घेत एकमेंकांना टाळ्या देत खिदळत होते. गीतेश ऐकत बसलेला. मध्ये मध्ये दाद द्यायचा. नंतर तो ईशाबरोबर खेळण्यात रमला. रात्रीच्या जेवना नंतर अमित जायला निघाला. तेंव्हा कंचनच्या आग्रहा खातर तो थांबला. मुंबईत तो नवीन असल्याने येवढ्या रात्री तो कुठे जाईल, या तीच्या विचाराला गीतेशनेही दुजोरा दिला. अमितलाही निमीत्तच हव होतं, तो थांबला. दुसऱ्या दिवशी कंचन व अमितने खूप गप्पा मारल्या बोलता बोलता अमितने कंचनवर असलेल्या प्रेमाची कबुली दिली. त्याचं बालवयापासून असलेलं तीच्यावरच प्रेम व्यक्त करताना तो जराही डगमगला नाही. तीच्यासाठी त्याने लग्नही केलं नव्हतं. आजूनही तो तीची वाट पहात होता. हे सर्व ऐकून कंचन स्तब्ध झाली. कधी काळी तोही तीला आवडत होता. मात्र नियतीचे फासे हे असे पडले होते. अमित निघून गेला. मात्र कंचनच्या मनात त्याच्या विषयी एक साॅफ्ट कोर्नर निर्माण करून गेला. त्याने अजून तीच्यासाठी लग्न केलं नव्हतं. ही एकच गोष्ट कंचनला पुन्हा पुन्हा आठवत होती. जाताना अमित कंचनला त्याचा अॅड्रेस व काॅन्टेक्ट नंबर देऊन गेला. तो एका हाॅटेल मध्ये थांबला होता. कंचन त्याला भेटायला गेली. बऱ्याच वेळा नंतर ती घरी गेली. कंचनच्या वागण्या बोलण्यात गीतेशला फरक जाणवला. काही विचारता सोय नव्हती ती फक्त त्याला टाळत होती. ईशा व गीतेश दोघांकडे ती दुर्लक्ष करत होती. कुसुमनेही तीला बाहेर जाताना बऱ्याच वेळा हटकलं. मात्र कंचनने ढुंकूनही पाहिलं नाही. ती घरात काहीही न सांगता निघून जायची उशीराने घरी यायची. विचारल्यावर एक तर भडकायची किंवा थातूर मातूर कारणं द्यायची. 


प्रोजेक्ट सक्सेस झाल्याची पार्टी गीतेशच्या बोसने एका माॅल मध्ये ठेवली, व फॅमिली सोबत येण्याचं निमंत्रण गीतेशसहित सर्वांना दिलं. कंचनने महत्त्वाचं काम असल्याच सांगून येण्यास साफ नकार दिला. गीतेश तरीही तीची विनवणी करत होता. सकाळ होताच कंचन तयारी करून बाहेर निघून गेली. गीतेश व ईशा दोघे पार्टीसाठी गेले. जाताना ईशाने कुसुमला आवर्जुन बाय केलं. गीतेशची उदासीनता कुसुमला जाणवली. माॅलच्या एका प्रशस्त हाॅल मध्ये पार्टीच आयोजन केल होतं. सगळेच कंचन का नाही आले ते विचारत होते. वैतागलेला गीतेश ईशाला घेऊन बाहेर आला. टाय लूज करत तो इथे तीथे पहात होता. तेवढ्यात ईशाला लीफ्ट मध्ये कंचन दिसली. तीने 'मम्मीऽऽ' अशी जोरात हाक मारली. गीतेशनेही कुठे आहे म्हणत सगळीकडे पाहिलं. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कंचन अमित बरोबर प्राईम शो बघायला थिएटर मध्ये शिरली. रागारागाने गीतेश तीच्याकडे जायला निघाला तशी मागून हाक आली. नाईलाजास्तव तो पुन्हा हाॅल मध्ये गेला. प्रोजेक्ट वर्कसाठी खूप मेहनत घेतली म्हणून त्याचा खास सन्मान करण्यात आला. असवस्थ विचारात गीतेशने थरथरत्या हाताने सन्मान स्विकारला. ईशा मात्र उड्या मारत टाळ्या पिटत होती. तीच्या पप्पाला बक्षिस मिळाल्याचा आनंद तीच्या डोळ्यात दिसत होता. तर तीथे गीतेशच्या डोळ्यातून संतापाच्या ठीणग्या बाहेर पडत होत्या. ईशाला भरवताना प्रत्येक घास गीतेशला कडवट लागत होता. त्याने सरांची परवानगी घेतली अन् सरळ कुसुमच्या काॅलेजवर गेला. खरं तर त्याला तीथल्यातीथे अमितच्या मुस्क्या आवळाव्याशा वाटत होत्या. मात्र ईशा व ऑफीसच्या पार्टीचा विचार करून तो गप्प बसला. कुसुमची वाट बघत तो गाडी बाहेर उभा होता. ईशा गाडीत झोपली होती. सहा वाजता कुसुम काॅलेज मधून निघते हे त्याला माहीत होतं. म्हणून तो तीची वाट बघत गाडी बाहेर थांबला. पांच एक मीनीटात कुसुम बाहेर आली. गीतेशला पाहून किंचीत हसली मात्र, त्याच्या डोळ्यात संतापाच्या लाटा दिसत होत्या. चेहऱ्यावर दुःखी भाव दिसत होते. रागाने लाल झालेली त्याची चर्या पाहून कुसुम थोडी घाबरलीच. त्याचा येवढा उग्र चेहरा तीने आतापर्यंत तरी पाहिला नव्हता. येताच तीने प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिलं. त्यानेही काहीही न सांगता तीला गाडीत बसायला सांगीतलं. ते ही नजरेनेच. ह्याचं काहीतरी बिनसलय. या विचारातच कुसुम गाडीत बसली. ईशाला मांडीवर घेत तीला उठू न देता तशीच थोपटत झोपवली. “काय झालं गीतेश. येवढ्या टेन्शनमध्ये का आहेस?” “सांगतो”. गीतेशने गाडी बिचवर, माणसांच्या वर्दळिपासून लांब उभी केली. दोघेही गाडी बाहेर आले. जवळच वाळूवर बसले. ईशा गाडीतच झोपलेली. एक दिर्घ श्वास घेत गीतेशने कुसुमला कंचन बद्दल सांगीतलं. अमित व तीच्या नात्यात निर्माण झालेली जवळीक ऐकुन कुसुमला धक्काच बसला. “कदाचित हा तुझा गैरसमज असेल गीतेश, त्यांच्यात साधी मैत्री असू शकते”. “आजीबात नाही. चांगले हातात हात घालून सिनेमा हाॅल मध्ये गेले. ईशाने हाकही मारली. पण ती ऐकणार कशी. अमितची धुंदी तीच्या नसानसात भिनलीयेना. गेल्या दोन आठवड्यापासून पहातोय तीच वागणं बोलणं बदललंय. अमित आल्यापासून माझी कंचन हरवून गेली, ईशाची आईसुद्धा हरवलीये. तीने विश्वासघात केलाय माझा, ईशाचा, स्वतःच्या आईपणाचाही! मी नाही राहू शकत अशा बाईबरोबर”. “थांब गीतेश भावनेच्या भरात आणि रागात निर्णय घेण्याची घाई करू नकोस. कुठलाही निर्णय घेण्याधि ईशाचा विचार कर. खरं खोटं काय ते आधि जाणून घे. कदाचित कंचन वाट चुकली असेल. तीला समजून घे”. “अशी कशी वाट चुकली ती? कुसुमऽऽ तीच्यासाठी मी माझं घरदार सोडलं”. “तीनेही तूझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय हे विसरू नकोस”. “म्हणून काय तीने वाट्टेल तसं वागायचं? कोणा बरोबरही फिरायच? माझ्या मनाचे काय हाल होतायत हे तूला नाही कळणार. तू कुणावर प्रेम केलं असतना तर तूला माझ्या मनाला होत असलेल्या दुःखाची कल्पना आली असती. असो कंचनवरच माझ प्रेम व्यर्थ गेलं. चल निघूया”, म्हणत गीतेश गाडीत जाऊन बसला. न कळतच गीतेशने कुसुमला दुखावलं. तीच्या सुकत चाललेल्या जखमेवर त्याने घाव घातला. दोघांमध्ये एक पोकळी निर्माण झाली. तीचं काहीही ऐकून न घेता गीतेशने गाडी स्टार्ट केली. अश्रू पुसून कुसुम गाडीत बसली. ईशाच्या केसांना कुरवाळत कुसुम तीच्या भविष्याचा विचार करत होती. वाऱ्याच्या आणि विचारांच्या वेगावर गाडी चालत होती. काही मीनीटातच गाडी सोसायटीत आली. कुसुम कडून ईशाला घेत गीतेशने कुसुमची माफी मागीतली, “कुसुम आऽएम सॉरी. मला तुला दुखवायचं नव्हतं. मी खूप डिस्टर्ब झालोय गं. कंचनचा राग तुझ्यावर निघाला. प्लीज मला समजून घे”. “मला फक्त इतकंच म्हणायचंय गीतेश, दोघांनीही एकमेकांशी बोला. आणी मगच काय तो निर्णय घ्या. एकदम टोकाचा निर्णय घेऊ नका ज्यामुळे ईशाच भवितव्य धोक्यात येईल. इतकंच. बायऽऽ गुड नाईट”. “बायऽऽ”. 


रात्री साडेदहाच्या सुमारास कंचन घरी आली. गीतेश तीची वाटच पहात होता. त्याने सरळ मुद्यालाच हात घातला. तशी कंचन भाडकली. खूप वाद विवाद झाले दोघांत. शेवटी कंचनने बॅग भरली अन् बाहेर पडली. गीतेशने तीला थांबवण्याचा आजिबात प्रयत्न केला नाही. सरसर पायऱ्या उतरून कंचन खाली आली. कुसुम दारातच उभी होती. तीला अंदाज होताच अस काही होण्याचा. तीने मात्र कंचनला थांबवलं तीच्या प्रेमाची, ईशावरच्या ममतेची तीला आठवन करून दिली. पण व्यर्थ कंचन काही थांबायला तयार नाव्हती. तीच्या मागे मागे कुसुम गेट पर्यंत गेली. तरीही कंचन थांबली नाही. गीतेश बाल्कनित उभा राहुन कुसुमची केविलवाणि धडपड पहात होता. कुसुम धावत पळत गीतेशकडे गेली. ईशाने दार उघडलं आणि कुसुमच्या गळ्यात पडून हुंदके देऊ लागली. गीतेशच्या केसांवरून हात फिरवत तीने त्याच सांत्वन केलं. त्या स्पर्शाने गीतेश थरथरला. कुसुमला बिलगून तो खूप रडला. कंचन नात्याचे सगळे धागे तोडून गेली, म्हणत त्याने कुसुमच्या कुशीत स्वतःच तोंड लपवलं. बराच वेळाने तो कुसुमच्या बाहूतून बाजूला झाला. त्याला धिर देत कुसुम ईशाला आपल्या घरी घेऊन गेली. अंगाई गाऊन ईशाला झोपवून कुसुम रात्रभर विचार करत राहिली. तीथे गीतेशही जागाच होता. जगाला काय तोंड दाखवायचं? कंचन अशी धोकेबाज निघेल असं स्वप्नातही त्याला कधी वाटलं नव्हतं. तीने ईशाचा सुद्धा विचार केला नाही. धिक्कार करत होता तो कंचनचा. 


सहा दिवस झाले तरी कंचन परत आली नाही. तीने ऑफीसमध्ये तीचा राजीनामा मेल केला व त्यात कायमची कानपूरला जाणार आहे असा उल्लेख केला होता. सगळ्यांनी गीतेशला खोदून खोदून विचारलं मात्र, तो गप्पच होता. त्यालाही जाॅब सोडावासा वाटत होता. सहा दिवसात एकदाही कुसुमला व ईशाला तो भेटला नाही. तो कधी येतो कधी जातो हे सुद्धा कुसुमला माहिती नव्हतं. त्याच्या विचाराने कुसुम खूपच अस्वस्थ होत होती. तो व्यसनाच्या आहारी जाऊ नये येवढच कुसुमला प्रामाणिकपणे वाटत होतं. काहीही करून आज त्याला गाठायचच या विचाराने कुसुम जागी राहिली. त्याची वाट पहात ती हाॅल मध्येच येरझाऱ्या घालत होती. दार कींचीत उघडं ठेवलं होतं तीने. साडे बाराच्या सुमारास गीतेश आल्याची तीला चाहुल लागली. तो जसा वर गेला तशी तीही ईशाला घेऊन त्याच्या मागे गेली. कुसुमला दारात पाहुन गीतेश ओशाळला. ईशाला बॅडरूममध्ये झोपवून कुसुमने गीतेशची चांगलीच कान उघाडणी केली व पित्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. “असा वाहुन जाऊ नकोस. कंचन तीच्या स्वार्था पायी आईच कर्तव्य विसरली. निदान बाप म्हणून तू तरी ईशाच्या पाठीशी खंबीर उभा रहा. दुःखात मजनु होऊन फिरण्यापेक्षा लेकीचा विचार कर. उद्या वेळेवर तीला प्ले ग्रुप मध्ये घेऊन ये. आणि पुरे कर तुझ्या दुःखाचा तमाशा”. जळजळीत अंजन त्याच्या डोळ्यात घालून कुसुम निघून गेली. ईशाचा निरागस निजलेला चेहरा पाहून गीतेशचं काळीज पिळवटून निघालं. त्याला त्याच्या चुकीची जाणिव झाली. तीच्या तोडांवरून हात फिरवताना त्याच्या न कळत, दोन अश्रू त्याच्या डोळ्यातले तीच्या गालावर ओघळले. त्या इवल्याशा बाहुत तो सामावला. कीत्येक दिवसा नंतर लेकीच्या पंखाखाली बापाला शांत झोप लागली. 


वेळेच्या आतच बाप आणि लेक कुसुमच्या दाराबाहेर उभे होते. दोघांना आत घेत तीने त्यांच स्वागत केलं. ईशाला खेळण्यात रमवून कुसुम गीतेशसाठी मसाला चहा घेऊन आली. “गीतेश मला माफ कर मी काल तूला जरा जास्तच सुनावलं. खरंतर मला तूमच्या दोघात आजिबात पडायचं नाहीये. तो तूमचा पर्सनल मॅटर आहे. पण तू ईशाकडे दुर्लक्ष करत होतास आणि ती सारखी तूमच्या दोघांसाठी बिलखत होती. म्हणून मला हा स्टॅडं घ्यावा लागला. खरंच साॅऽरी”. “उलट मीच तुझी माफी मागतो. ह्या दिवसांत मी माझाच राहिलो नव्हतो. तू मला भानावर आणलंस. तू नसतीस तर ईशाच काय झालं असतं? मला उमगलयं आता इथून पुढे मी फक्त ईशाचाच विचार करेन. थॅक्सं कुसुम”. एक दिर्घ श्वास घेऊन कुसुम म्हणाली, “तो समोर फोटो दिसतोय ते झाझे बाबा आहेत. आज आपल्यात नाहीत. एका दहशतवादी हल्ल्यात आठ वर्षापूर्वी ते व प्रभाकर शहीद झाले”. “प्रभाकर?” “माझा होणारा नवरा होता. बाबांनीच माझ्यासाठी निवडलेला. खूप आवडायचा तो बाबांना. मला सुखी ठेवेल या विचाराने त्यांनी आमचं लग्न ठरवलेलं. प्रभाकरला आणि त्याच्या घरच्याच्यांनाही मी खुप आवडले होते. आमचं लग्न पक्क करूनच बाबा व प्रभाकर सिमेवर गेले होते. आणि जेव्हा परतले तेंव्हा तिरंग्यात लिपटुनच! मनोमन मी प्रभाकरला माझं सर्वस्व मानलं होतं. म्हणून मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. कोणावर प्रेमही करावस वाटलं नाही. आणि म्हणूनच कदाचित मला तूझ्या मनाचे होणारे हाल कळले नसतील". “कुसुम प्लीजऽऽ रिअली साॅरी! मला तुझ्याविषयी खरंच ठाऊक नव्हतं. नाहीतर मी तूझं इतकं मन दुखावलं नसतं. खरंच मला क्षमा कर”. गीतेशच्या मनात कुसुम विषयीचा आदर दुणावला! घृणा वाटली त्याला कंचनची क्षणभर आणि लाजही वाटली स्वतःची. किती जपत होती कुसुम तीच्या प्रेमाला. आणि एक कंचन काल भेटलेल्या मुलासाठी संसारावर पाणि फेरून निघून गेली. किती मोठा फरक होता कुसुम व कंचन मध्ये याची प्रचिती आली गीतेशला. मनोमन काहीतरी ठरवूनच तो घरी गेला. बरोबर बारा वाजता गीतेश ईशाला घ्यायला कुसुमच्या घरी गेला आणि आश्चर्याच्या धक्क्याने तीथेच थीजला. समोरच सोफ्यावर त्याचे आई वडिल ईशाला मांडिवर बसवून खेळवत होते. गाय दिसताच वाट चुकलेल वासरू जस गाईला बिलगतं, तसाच गीतेश आईच्या कुशीत शिरला. वडिलांच्या राठ हातांचा हळुवार ओलावा त्याच्या पाठीवरून फिरत होता. भरकटलेलं पाखरू पुन्हा घरट्याकडे वळल्याच पाहुन कुसुम व शारदाबाईंना अपार आनंद झाला. 

खरंतर कुसुमने गीतेशच्या आयुष्याचा पट शारदाबाईंजवळ उलगडला तेंव्हा त्यांनीच मध्यस्थी करून त्याच्या आई वडिलांना इथवर आणलं. सत्य परिस्थितीची जाणीव करून देत, सध्या गीतेशला त्यांची खूप गरज असल्याच सांगून, नातीचा विचार करायला भाग पाडत दोघांना त्या घेऊन आल्या. ते दोघेही झालं गेल विसरून मुलासाठी व नातीसाठी आले. चार वर्षात प्रथमच ईशा तीच्या आजी आजोबांना भेटली होती. त्यामुळे ती खूप आनंदात होती. गीतेशला माय लेकींचे आभार कसे मानावेत तेच कळत नव्हतं. कुसुमने सगळ्यांसाठी जेवणाचा बेत केला होता. कितीतरी दिवसांनी गीतेश पोटभर जेवला. त्याच्याच आवडीचे सगळे पदार्थ कुसुमने बनवले होते. प्रत्येक घासागणिक कुसुमच्या मनात त्याच्याविषयी असलेलं प्रेम गीतेशला जाणवलं. फक्त आता शब्दरूप देण्याची गरज होती. कुसुम तर ते देणार नाही हेही त्याला ठाऊक होतं. म्हणून आता त्यालाच पुढाकार घ्यावा लागणार होता. 


आई- वडिलांच्या आग्रहा खातर गीतेश आणि ईशा त्यांच्यासोबत कायमचे जाणार होते. सामानाची आवरा आवर चालू होती. जड अंत:करणाने कुसुम त्याला मदत करत होती. गीतेश कुसुमला न्याहाळत होता. आणि गालातल्या गालात हसत होता. वडिल फोनवर बिझी होते. दोघीं छोट्या मोठ्या वस्तू बॅगेत गप्पा मारत भरत होत्या. ईशा त्यांना मदत करत होती. एक मुलगा गीतेशसाठी कोर्टाची नोटीस घेऊन आला. कंचनने गीतेशला डिवोर्सची रितसर नोटीस पाठवली होती. ज्यात तीने कसलीही पोटगी मागीतली नव्हती कींवा ईशाचा ताबाही मागीतला नव्हता. ती फक्त गीतेशच्या बंधनातून मुक्त होऊ पहात होती. तीच्या अप्पलपोटी वागण्याची गीतेशला चीड आली. त्याला धिर देत सगळे त्याच्या पाठीशी उभे राहिले. त्याने सही करून नोटीस त्या मुलाच्या हातात दिली. खूप मोकळं वाटलं गीतेशला. सामानाची आवरा आवर करून झाल्यावर सगळ्यांनी चहा घेतला. काही वेळाने ईशा व गीतेश जाणार या विचाराने कुसुमची वाढलेली घालमेल गीतेशला दिसत होती. त्याने सगळ्यांसमोर कुसुमला मागणी घातली. गीतेश असं काही बोलेल याची कल्पनाच नव्हती कुसुमला. तीच्या मनाचं पाखरू आनंदाने फडफडत होतं. तीतक्यात ईशाने तीला मीठी मारत तीची आई होण्याच वचनं मागीतलं. तीला कडेवर घेत कुसुमने शारदाबाईंकडे पाहिलं. भरलेल्या डोळ्यांनी त्यांनी तीला सहमती दर्शवली. ईशाला मीठीत घेऊन कुसुमने गीतेशला साश्रू नयनांनी होकार दिला. वडिलांनी गीतेशची पाठ थोपटली. दोघांना थोडा वेळ एकटं सोडून तीघे ईशाला घेऊन कुसुमच्या घरी गेले. कुठून तरी रेडिओवरच्या गाण्याचा आवाज येत होता. "किसिकि मुस्कुराहटो पे हो निसार, किसिका दर्द मिल सके तो ले उधार, किसिके वासते हो तेरे दिल मे प्यार.....जिना इसि का नाम है!" पुढे हेच गाणं गुणगुणत गीतेश कुसुमच्या आणखीन जवळ गेला.Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy