असे जुळले तारे .......
असे जुळले तारे .......
काल यु ट्यूब वर एका वयस्कर दांपत्याची मुलाखत बघितली , दोघांचे साधारण ७ ५ ते ८ ० च्या मानाने वयोमान असेल .मुलाखतीत मुलाखत घेणाऱ्याने आज्जींकडे पाहत विचारले , तुमचे लग्न कसे जुळले हे आम्हाला ऐकायला आवडेल, कारण तुम्ही सोलापूरच्या आणि हे रत्नागिरीचे ! "त्याचे असे झाले" ... हसत हसत त्या म्हणाल्या माझे वडील सरकारी सेवेत होते आणि त्यांची बदली काही दिवसांसाठी रत्नागिरीला झाली . ओळख होता होता ह्यांच्या वडिलांशी ओळख झाली , त्यांच्या घरी माझ्या वडिलांचे येणे जाणे सुरु झाले . हे पण लग्नाचे आहेत असे कळल्या बरोबर एका शनिवारी वडील सोलापूरला घरी आले आणि म्हणाले , आपल्याला मुलगा बघायला रत्नागिरीला जायचे आहे.उद्याच जायचे आहे तसे मी त्यांना सांगून आलो आहे , मुलगा आणि ते कुटुंब उत्तम आहे काळजी नको ,आपली सरिता सुखात नांदेल . आम्ही मायलेकी यावर काय बोलणार , तरी आई पुट्पुटलीच , एवढ्या लांबचे स्थळ ,त्यावर वडील गरजले हे बघा तुम्हाला काय हवं आहे मुलगी लांब देऊन सुखात नांदताना बघायची आहे कि शेजारी देऊन रोज रडतांना बघायची आहे . वडिलांचा मुद्दा मला पटला होता . बघण्याचा कार्यक्रम होऊन पसंती झाली आणि आमचे लग्न झाले , तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, मघापासून तुमच्या बोलण्यात मी गावात राहते म्हणून मला खूप गोष्टी sacrifice कराव्या लागल्या असे तुम्हाला वाटत असेल तर पूर्णपणे चुकीचे आहे , मुळात लग्न ठरताना ह्यांनी सांगितले होते कि आज जरी आम्ही शहरात असलो तरी लग्न झाल्यानंतर मी गावीच स्थायिक होणार हि गोष्ट माझ्या वडिलांना फारशी मान्य नव्हती , कारण आम्ही शहरात वाढलेले मग मुलीचे कसे होणार हीच वडिलांना काळजी पण मी हे स्वतःहून मान्य केले. आव्हानां ना सामोरे जाणे हि आई वडिलांनी लहानपणा पासूनच शिकवण दिलेली . स्वतः निर्माण करण्याची जिद्द होती, मुलींना खूप काही त्याग करावा लागतो , त्यांना परिस्थितीशी बरीच तडजोड करावी लागते . तसे माझ्या बाबतीत काहीही झालेले नाही . किंबहुना लग्न झाल्यानंतर हि पन्नास पंचावन्न वर्ष कधी आणि कशी गेली हेच मला कळलं नाही .आणि मुलांच्या बाबतीत विचाराल तर शालेय शिक्षणा पासूनच ती आमच्यापासून दूर आहेत त्यामुळे आता जरी मुलं लांब असली तरी काही वाटत नाही , कारण मुलं हि आमच्या सारखी सुखाने राहत आहेत . दोघांचे हसरे चेहरे पाहत मुलाखत संपली . वाईट या गोष्टीचे वाटते कि आव्हानां ना सामोरे जाणे, आणि स्वतः निर्माण करण्याची जिद्दअसेल तर आपण सुखी होतो पण हे विचार आजच्या प्रतिशिल पिढीला माहीतच नाहीत . …………..क्षितिजा
