अपुरं पुस्तक
अपुरं पुस्तक
पुष्पक वाघ गेल्या तीन वर्षात साहित्य क्षेत्रात प्रसिद्धीच्या झोतात आलेलं नाव ..अवघ्या पंचविसाव्या वर्षी बरसणाऱ्या पावसाच्या श्रावण सरींगत त्याच्या शब्दांची जादू कागदावर उमटून वाचकाला भुरळ पाडत होती. ' ओथंम्बलेल्या अश्रूंन आडच रहस्य ' या पुस्तकाच् प्रकाशन लोणावळ्या मध्ये त्याने सुरू केलेल्या काव्य दालनात होणार होत..हिरव्या गर्द झाडीनी चौबाजूनी वेढलेला लोणावळा शहर , हाकेच्या अंतरावर ओसंडून वाहणारा भुशी डॅम आणि तिथेच टायगर पॉइंटच्या कुशीत धुक्यात वसलेलं एक छोटंसं काव्य दालन..! सर्वाना या पुढच्या आवृत्तीत काय असेल याची प्रचंड उत्सुकता शिगेला लागली होती.नियमित वाचकांची गर्दी लाक्षणिक होती कोणी आधीच ऍडव्हान्स बुकिंग करून घेत होत..सर्व पत्रकार मंडळी येऊन थांबली होती..प्रत्येक जण आपलाच कॅमेरा मुंबईच्या लोकल सारख घुसल्या सारख पुढे ढकलत होत..तर कोणी बरसणाऱ्या सरींचा गुलाबी शहारा अंगावर घेत गरमा गरम भज्यांवर ताव मारत होत..आहा..! क्या बात है..म्हणत रट्टा चालूच होता..रावी ही तिथे एव्हाना पोहचलीच होती..कारल्यावरून येताना पाऊस सरींचा सामना करत तिने ट्रॅफिक चा ही सामना करत पोहचली होती..( रावी पुष्पकच्या प्रत्येक पुस्तकाची नेहमीची वाचक ..) हुश्श..एकदाच पोहचलो म्हणून तुने सुस्कारा टाकला..तेवढ्यात पुष्पक वाघ याच आगमन झाल सर ऑटोग्राफ ..सर सर..पण सर्वांनी वेढा टाकला होता..तसा खिशाला असणारा पारकर काढून सह्यांचं आवरत घेतलं..आणि एक स्मित हास्य करत पुढे सरसावले..रावीला यावेळेसही ऑटोग्राफ मिळाला न्हवता.चलो फिर कभी..म्हणत तिने हिरमुसलेला चेहरा सरळ केला. हाताला आडोसा करत डोक्यावर धरला ( बाहेर रिमझिम सरी कोसळत होत्या ..)आणि ती आत काव्य दालनात गेली ..
आत आल्यावर पुस्तकाचं प्रकाशन चालूच होत.. थोड्याच वेळात पुस्तक प्रकाशन सोहळा आटोपला..कुणाला काही प्रश्न म्हणून पुष्पक ने विचारलं..तसा एक राविचा हात वर गेला.. '' हा येस you '' पुष्पक म्हणाला तस रावी थोडीशी थबकली काय विचारावं मनात फार मोठं कोड होत..आपण काहीतरी बोलणार होतात..पुष्पक म्हणाला सर्व दालन आता तिच्याकडे पाहत होत.तशी टचकन ती उभी राहिली. '' सर , खरतर पुस्तक जस वाचावं तस त्यात गुंतत जात आपलीच कथा आहे की काय असं वाटत..अजूनही भरपूर वाचण्याची इच्छा आहे..आणि ही मागील पुस्तकाची उर्वरीत कहाणी तर पुढची कथा कोणती याबद्दल उत्सुकता होती..एवढंच.." रावी कशी बशी बोलून गेली ..आता पूर्ण सभागृह उत्तराच्या प्रतीक्षेत होत..सर्वांच्या नजरा पुष्पक कडे वळल्या.." खरतर माझं हे शेवटचं पुस्तक ..होय शेवटचं "..मागच्या पुस्तकाची अपूर्णता मी या आवृत्तीत पूर्ण केली आहे..आणि इथेच मला थांबवास वाटत..का माहीत नाही पण हेच सत्य आहे.." पुष्पक पाणावले डोळे करत थांबला..शेवटचं ..सगळं दालन कुजबुज लागलं..काय बोलतोय हा माणूस..रावीला तर हे मान्यच न्हवतं ऐन प्रसिद्धीच्या काळात असताना एखाद्या लेखकानं लिखाण थांबणं अस पहिल्यांदाच घडलं असावं..काय असावं या मागच कारण .? ही मस्करी वगैरे तर नसेल ना..छे छे मस्करी कसली..आता रावी पूर्ण गोंधळून गेली होती..तेवढ्यात एका पत्रकाराने पुष्पक ला प्रश्न केला..
ऐन प्रसिद्धीच्या झोतात असताना नंतर आपण ही प्रसिद्धीच गमावून बसवू याची भीती वाटतीये का..? "पत्रकाराने खोचक प्रश्न केला.."प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते कदाचित त्यामुळे तुम्ही असा प्रश्न केला असावा..पण तसं काही नाहीये ". पुष्पक उत्तरला. तोच दुसरा पत्रकार उठून बोलू लागला.." तुम्ही म्हणता या लिहलेल्या कथा काल्पनिक आहे..पण कुठेतरी याचा वास्तवाशी संबंध जाणवतो. कोण आहे ते खऱ्या जगातल तुमच्या आयुष्यातलं स्त्री पात्र काही सांगू शकाल ..? " राघव टचकन पानवला.." I AM SORRY , मी या विषयावर काही बोलू इच्छित नाही..माझ्या सर्व गोष्टींची उत्तर तुम्हाला या पुस्तकात मिळतील. धन्यवाद ! " आणि तडक पुष्पक दरवाच्या दिशेने सरसावला..रावी मात्र कोड्यात पडली होती.आपण जे पुस्तक वाचतोय ते काल्पनिक न्हवतच म्हणजे वास्तवाशी संबंध आहे तर..तो पुस्तकातला मुलगा म्हणजे पुष्पक सर पण ती मुलगी कोण असेल..आता रावीला या पुस्तकाविषयी रुची आणखीनच वाढली होती..पुष्पक ने सांगितलं प्रमाणे काही पुस्तकातही लिंक सापडेल आपल्याला आधी ते वाचून काढुया.. दालना मधून तिने एक नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक काढलं..
ओथंम्बलेल्या अश्रूंन आडच रहस्य या पुष्पकने लिहलेल्या जादुई कादंबरीत होत त्याची शाब्दिक जादू यापूर्वही मनाला भावत होती. आणि कथा वास्तविक आहे म्हटल्यावर रावीचा उत्साह गगनात मावत न्हवता.. थोड्याच वेळात तीही दालनाबाहेर पडली..रिमझिम बरसणाऱ्या पावसानं टायगर पॉईंट वर धुकं पसरवला होत..काय मौसम होता तो जणू स्वर्गच..इंद्रधनुष्याच्या विरुद्ध बाजूला डोंगरकुशीत वसलेल्या भुशी damchya पाण्यात कोवळं ऊन सोनेरी कुंडलागत दिसत होतं..आणि समोरच उभं होत कारल्याच लेन आणि एकविरेच मंदिर..ती घराकडे जायला निघाली. scooty ची चावी फिरवत धुक्याना मागे सारत नागमोडी वळणे घेत कशीबशी कारल्यात पोहचली. पावसाच्या सरींनी अंग थोडं भिजवल होत..पण पुस्तक मात्र डिकी मधे सुरक्षित होत..एक गरमागरम वाफाळता चहा तयार केला..वाह क्या बात है..! गरमा गरम चहाचा आस्वाद लुटला.अंगावरचे ओलसर कपडे तिने बदलेले..दरवाच्याच्या मागे लतकवलेला टॉवेल घेतला आणि केस पुसत बाहेर आली..तेवढयात तिची नजर पुन्हा त्या पुस्तकावर पडली.नक्की कोण असेल ती मुलगी तिला स्वस्थ बसून देत न्हवती..आणि शेवट कसा घडला असेल..? या लेखकांच आयुष्यच वेगळं जग असत अस मनातल्या मनात हसत गालावर नाजूक स्मित हास्य उमटलं..तशी ती समोरील खुर्चीवर बसली.तिने पुस्तक न्याहाळत बसली..पुस्तवक तिने हातात घेतला अलवार हात फिरवत पुस्तकाच्या पृष्ठ पानावर पाहिलं एका सुंदर तरुणीचा फ़ोटो होता तो..पण डोळ्यात थोडस पाणी होत..तिच्या मनात आतल्या गोष्टींविषयी जास्तच कुतुहल निर्माण झालं ..तस तिने पुढचं पान उचकल..पहिल्याच पानावर " तिच्या कानातील कर्णकुंडल , गुलाबी गालांवर असणार रांजण खळग आणि भुरभरत्या केसांना कानामागे सारत जाणारी ती घराकडे वळताना दिसली " असा उल्लेख होता सुरुवात तर जादुई शब्दांची होती . आता पुढे काय म्हणून ती पुढे वाचू लागली..
पुष्पक तिचा पाठलाग करत करत जोश्यांच्या वाड्याजवळ असणाऱ्या आडापर्यंत आला होता..त्याची ही पहिलीच वेळ न्हवती या आधीही त्याने अस बऱ्याचदा केला होत.एव्हाना तिला सर्व गुपित कळल होत म्हणून तर तिने एक गोड स्मितहास्य दिल होत. पुष्पक च्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होता.याआधीच तिच्या प्रेमात तो क्लीन बोल्ड झाला होता..दुसऱ्या दिवशी कॉलेज मध्ये ती येणार होती खरतर उजव्या बाजूला असणाऱ्या सेमिनार हॉल मध्ये कवितांचा काहितरी कार्यक्रम होता एवढंच त्याला कळलं होतं..तीला यासगळ्यात खूप रस म्हणून त्यानेही त्यात भाग घेण्याच ठरवल खरतर धाडसच होत हे..तडक घरी निघून आला सायंकाळचे सहा सात वाजले असावेत.फ्रेश होऊन सर्व आटोपल आणि काहीतरी लिहावं यासाठी वहीचचा कागद अर्धवट फाडला..त्यावर दोन ओळी लिहल्या काहीतरी चुकल म्हणून परत फाडला..असे एक झाला दोन झाले बघता बघता विशीक कागदांचे बोळे घरभर पसरले.. हे आपलं काम नाही बुआ याची चुणूक कुठे त्याला जाणवली होती..हे लेखक कवी कसे जुळवत असतील देव जाणे..आपलं काम नाही आपण कुठून तरी कविता मिळवूया..म्हणून त्याने नेट चालू केल..गूगल वर मराठी कविता म्हणून type केलं ..कितेकश्या कवितांचा ढिगारा त्याच्यासमोर येऊन ठेपला..बऱ्याचश्या कविता त्याने चाळल्या ..त्यात एक कविता खूप भावली ..मग काय नेटवरून भराभर कॉपी पेस्ट मारत कागदावर उतरऊन घेतली..हुश्श.. झालं एकदाच उद्या कॉलेज मधे तिच्यासमोर कविता करून आपलं तिला इम्प्रेस करू कोणाला खबर नाही लागणार की कोठून आपण मिळवली आहे ते..मनातल्या मनातच हसत बसला.
सकाळी जागेतून खाडकन जागा झाला .देवा रे..! 9 वाजले होते आणि 10 : 30 ला कार्यक्रम होता..आता काय करावं कस बस त्याने उरकत घेतलं धड नाशता ही केला नाही..सरळ bikela किक मारली .आणि कार्यक्रमस्थळी पोहचला.. ती एव्हाना येऊन पोहचलीच होती तिची कविताही होऊन गेली होती..तेवढ्यात तिचा कटाक्ष तिच्यावर पडला.. क्षणातच हा घायाळ झाला.तेव्हड्यात पुष्पक च नाव पुढे announce झालं..अरे हा पण कविता करतो की काय ..?ती बुचकळ्यात पडली..खरतरं तिलाही तो आवडायला लागला होता..तो तिच्याकडेच पाहत पुढे गेला ..स्वतःची ओळख करून दिली कवितेचं शीर्षक न सांगताच मी कवितेला सुरुवात करतो अस म्हणाला..टाळ्यांच्या गजरांनी सेमिनार हॉल कडाडला..तसा तो कविता म्हणायला लागला..
क्षणात सारा हिशोब चुकला होता..
मी अमावसेला चंद्र पाहिला होता..
चढणार तुला जहर हे माझे
मी कवितेतून दंश ठेवला होता..
तेवढ्यात सेमिनार हॉल मधून एक मुलगी उभा राहुन उभी राहिली..तडकन बोलायला सुरुवात केली.." हे काय सर..हा तर आम्हा बाकीच्यांचा अपमान..ही स्वरचित कविता नाहीच ही तर संदीप खरे यांची कविता.. हा चोर आहे..चोर " .." " हा हा चोर आहे हा.." मुलीच्या आवाजाला आवाज देत हॉल म्हणत ..मंदेही तर पुरती ठणकलीच होती..पुष्पकच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता..आपण अपराधी आहोत हे त्याला उमगलं होत..सभागृहाचे लालबुंद झालेले विस्तवी डोळे पाहून लाव्हारस बाहेर येणार याची पूर्ण चिन्ह होती..पुष्कपकच्या अंगाचा नुसता थरकाप झाला होता..तेवढयात मंदेही सेमिनार हॉल बाहेर पाणावले डोळे करत बाहेर पडली..
मंदेही कॉलेज बॅग घेऊन तडक घरीच आली होती..कारण सेमिनार हॉल मध्ये झालेला अपेक्षाभंग तिला नकोसा होता..पुष्पक तिला कॉलेजात कॅन्टीन , पोर्च , कलासरूम मध्ये सर्वत्र भिरभिऱ् नजरेनं हुंडकत होता..दोन चार वर्ग मैत्रिनीना विचारले असता माहीत नाही हेच उत्तर मिळाल..आता तो पूर्ण हताश झाला होता..कवितेचा चोरून केलेला वापर , अन उघडकीस आलेली चोरी अन आरोप याचा त्याच्यावर तिळमात्र मात्र फरक न्हवता पण तिला काय वाटलं असेल याची संशयी भीती दाट त्याच्या मनात होती..केसात बोटे फिरवून ओठांना दाबत हताश चेहरा घेऊन रस्त्यात तो उभा होता..डोळ्यांना पाझर फुटण्यास नुकतीच सुरूवात झाली होती..एव्हाना ओघळ गाल भीत पार करून ओठांवर आला होता..त्याचा पूर्ण दिवस याच विचारात गेला होता ..संध्याकाळी मंदेहीच्या घराबाहेर दोन चकरा मारल्या..
पण तिची छबी काय दिसली नाही..सूर्य निळसर आकाशाच्या भूई तुन नाहीसा झाला होता..पक्ष्यांचा थवा घरट्याच्या दिशेने परतीस निघाला होता..पुष्पकनेही अजून वेळ न दवडता घराकडे काढता पाय घेतला..सकाळी कॉलेज मधेच तिची भेट घेऊया अस मनाशी पक्क ठरवलं..अन झोपी गेला..
आज कॉलेजात फारशी गर्दी न्हवती..वाफाळता चहा घ्यावा म्हणून तो कॅन्टीन मध्ये घुसला ..कोवळं सोनेरी ऊन चिंचेच्या झाडातून सभोवार पहुडल होत..बुधवार असल्यानं सगळीकडे रंगीबेरंगी कपडे घातलेलं मुलं मुली बसले होते..समोरच्याच घोळक्यात मंदेही उभी होती..याच्या नजरेनं तिला अचूक हेरलं होत पण तिला याच्या येण्याची चाहुलही न्हवती..पुष्पक घोळक्याच्या दिशेनं सरसावला .." मंदेही मला बोलायचं तुझ्याशी" ..उत्तरला..तेवढ्यात मंदेहीने तोंड फिरवत " पण मला नाही न बोलायचं , अन बोलण्यासारखं काही नाहीच ये " थोड्या चढत्या आवाजात मंदेही बोलली.." जरास ऐकून घेशील का..? हवं तर नंतर नको बोलूस पण एकदा .." आता मात्र पुष्पक केविलवाणा झाला होता.." तस मला बोलायचं नाहीच ये पण लवकर बोल मला वेळ नाहीये.." मंदेही त्याच ठेक्यात होती.."आता मात्र पुष्पक संतापला " म्हणजे तू अजूनही मला गृहीत धरतेस ..मी कविता का म्हणालो..ज्या सेमिनार हॉलच गेली 2 वर्ष तोंडही पाहिलं नाही..तिथे आलो..कोणासठी ? एवढी जाण्याची गरज वाटत नाही..?"मंदेही - कोणासाठी" ? पुष्पक - तुझ्यासाठी .." पुष्पक गठ मनाने बोलून गेला होता..मंदेही" काय माझ्यासाठी ..? " " हो तुझासाठी ..मला आवडतेस तू ..तुला इम्प्रेस करण्यासाठी हा खटाटोप म्हटल तरी चालेल.." पुष्पक बोलला.."मी निघते आपण उद्या बोलूया .." मंदेही लाजेन लाल झाली होती..ती तडक कॅन्टीन च्या बाहेर निघाली ..तिच्या चेहऱ्यावर असणार कालच लालबुंद चेहरा आज गुलाबी होता..पुष्पकही एकदाच बोलून टाकलं म्हणून खुश होता अन तेवढाच चिंतातुर ..तिला काय वाटत असाव ? ही चिंता त्याला आणखीन दाट वाटू लागली..
तिच्या मनामध्ये आपल्या बद्दल काय भावना असेल कुणास ठाऊक ? ती बोलायची तर थांबणार नाही न ..? आज बोलायला नको होतं ? असे अनेक प्रश्न पुष्पकच्या मनात गोंधळ उडवून देत होते.तेवढ्यात मोबाईल रिंग होऊन टेबलवर वाजू लागला तसा पुष्पक हाता मध्ये घेऊन बसलेली उशी फेकत बेडवरून उठून टेबलकडे सरसावला.
जवळ येताच थबकला अन आनंदलाही कारण मंदेहीचा कॉल होता तो उचलू की नको ह्या प्रश्नविचारात तो होता..ठीक ये उचलूया पाहू पुढे.. तसा त्याने कॉल recieve केला..
(समोरून )
मंदेही - हॅलो
पुष्पक - हाय हाय हॅलो ..
मंदेही-मंदेही ही बोलतोय..
पुष्पक - अग ओळ्खळाय मी आवाज बोल न..
मंदेही - ( आवक होऊन ) माझा नंबर पण ..
पुष्पक - अग माग कॉलेज ट्रिपच्यवेळेस नाव रेजिस्टर करताना घेतला सॉरी यार..
मंदेही - इट्स ok त्यात ( काय ..हसत म्हणाली ) उद्या भेटुयात cofeeवर...
पुष्पक -( गालातल्या गालात ) कॉफी..
मंदेही - का ? नाही जमणार का..?
पुष्पक - तस तस नाही भेटुयात की ..
मंदेही - उद्या 11 वाजता
पुष्पक - thiके
मंदेही - ओक बाय भेटुयात ..
(दुसरा दिवस )
एव्हाना पंधरा मिनिटं आधीच पुष्पक येऊन ठेपला होता..मंदेही कधी येतेय याची वाट पाहत दरवाज्याच्या दिशेने त्याचा कटाक्ष होता..तेवढयात मंदेही आली.. पांढरा टॉप,कुरळा केस गालावर येऊन सोंदर्यात आणखीन भर घालत होता..तेवढयात मंदेही हाताने हाय करत त्याच्याजवळ आली तरी तो एकटक तिच्याकडे पाहत होता..मंदेही त्याच्या चेहऱ्यासमोरून हात फिरवत आहेस न..म्हणाली तेवढयात कुठे पुष्पक भानावर आला..अग उभी काय आहेस बस ना ..पुष्पक उत्तरला. मंदेही स्मितहास्य करत चेअर वर बसली..
पुष्पक - काय घेणार..व्हॅनिला की बटरस्कॉच ..? व्हॅनिला करतो ऑर्डर..
मंदेही - अरे माय फेव्हरेट ..तुला कस समजलं ..
पुष्पक - विषय समजण्याचा नसतो समजून घेण्याचा असतो..
मंदेही - अरे वाह..! जमत की बोलायला तुला ..
पुष्पक - माणस जवळची वाटली की नाती खुलत जातात..
अन शब्द जुळले की शब्दवाती जुळत जातात..
मंदेही - जमते की तुला कविता भारीच..हा...
पुष्पक - हरभऱ्याच झाड नाही हा जवळ..
मंदेही- अरे ...
( तेवढ्यात आईस्क्रीम येते )
मंदेही - बर घ्या खाऊन
पुष्पक - बाय the way मला कशासाठी बोलवलं सांगशील..
मंदेही - अरे ते..( आढेवेढे घेत )
पुष्पक - अरे काय..( कुतूहलाने विचारतो..)
मंदेही - मला तू आवडतोस..
पुष्पक - ( हक्का बक्क होत..) मी स्वप्नात तर नाहीये न..
मंदेही - ( त्याला चिमटा काढते )
पुष्पक -( आह हात पकडत ) पटलं पटलं ..
तेव्हड्यात मंदेहीचा सेलफोन वाजतो ..तिच्या बाबांचा कॉल होता तो ..
मंदेही - हा बाबा
बाबा - कुठेयेस तू आताच्या आता ताबडतोब घरी ये..
मंदेही - काय झालं बाबा अस अचानक ..
बाबा - ये म्हटलं न
मंदेही - हो निघते मी
मंदेही - पुष्पक मला निघावं लागेल बाबाचा कॉल आहे urgent जावं लागेल ..
पुष्पक - अग अस अचानक काय झाल..?
मंदेही- का ते मलाही माहीत नाही चल बाय ..
पुष्पक - अग मी ड्रॉप करतो तुला..
पण मंदेही कॅफे बाहेर पडली होती..
पुष्पक प्रश्नब्रम्हत पडला..अस एवढ्या अचानक काय काम असेल..देव जाणे..पुष्पक चेहरा उदासीन करून उभा राहिला..counter वर बिल दिल अन तडक घराकडे निघला..
पुष्पक अजूनही त्याच विचारात होता...तिने सांगायला हवं होतं कारण अस म्हणत पुष्पक बेडवर चिंतातुर बसला होता..एकदा जाऊन यावं तिच्याकडे अस त्याला राहून एकाहून वाटत होतं पण नाही नको तिथे काय परिस्थिती आहे हे माहित हवं..तिला कॉल करूयात का ..? जवळ कोणी नसेल न..पुष्पक प्रश्नवेडा झाला होता बहुदा..
गॅलरीमध्ये येऊन सकाळी डोईवर असणारा सूर्य डुंबत चालला होता..पक्षांचा थवा परतीच्याया दिशेने ओटत5 असताना आकाशी केसरी लाट हुबेहूब रंगचित्राची ओळख करून देत होत..अन एव्हाना गार मंद वारा सुटला होता..
तेवढयात मंदेहीचा कॉल आला...
पुष्पक - हाय..किती काळजी लागून होती..अग तुझ्याच फोनची वाट पाहत होतो..
मंदेही- आता एक काम करशील..यापुढं फोनची वाट पाहणं सोडून दे..
पुष्पक - (हसत ) वेडी आहेस का तू..बर ते सोड एवढी घाईत का निघाली होतीस..?
मंदेही- (समोरून तिच्या रडण्याचा हुंदक्यांचा आवाज येऊ लागला..समोरून शब्द एकही येत न्हवता..)
पुष्पक- तू रडतेस.. काय झालं सांगशील..
मंदेही- माझं लग्न ठरलंय.. आणि उद्याच आम्ही कायमच पनवेलला शिफ्ट होतोय..
पुष्पक- ( अवाक होऊन ) क काय..?
मंदेही- हो खर आहे...
पुष्पक - थांब मी आता तुझ्या घरी येतो..
मंदेही- माझ्या खऱ्या प्रेमाची शप्पत ये तुला..यापुढे कधी भेटू नकोस..आणि फोन पन..मला विसरून जा..हवं तर..आपण नाही एक होऊ शकलो..(हुंदका देत रडत असते ..आणि फोन कट करते..)
पुष्पक- ये एक ना..हॅलो हॅलो..
पुष्पक पूर्णपणे आता खर शॉक झाला होता..मंदेही त्याच्या आयुष्यातून कायम निघून चालली होती..गेली होती..अर्ध आयुष्य सम्पल की काय याचीच भावना त्याला जाणू लागली होती..आखी रात्र याच विचारात चालली होती.. तोच त्याच्या मुखातून काही ओळी बाहेर पडल्या..
जेव्हा तू बोलशील रडू कोसळेल....या निर्जीव हृदयातून...सध्या जे भावना शून्य दिसतंय काहीही सांगण्याच्या मनस्थितीत नसलं तरी एकटं आणि निकामी नक्कीच पडलंय हे मात्र नक्की....! कदाचित तुझा दोष नसेलही...आणि बहुतेक माझाही नसेल पण तू या निर्जीव दगडाला समजुन सांगणं बंद कर...तुला प्रेमाचं नातं तोडता हि नसेल पण मी तोडण्याचा निर्णय कधीच घेतलाच नाही ??? जो आयुष्यात एकटा होता तो एकटाच असा सांगणारा परवा मात्र एकांतात रडलो...कारण आयुष्यात खरं प्रेम करूनही कधी बोलूच शकलो नाही तिच्याशी....सगळं सांगून सुद्धा उमगू शकलो नाही तिच्या त्या ओठांतून...आणि ज्यांच्या भावना कायम जपणारा मी कधीच दुसरं कोणी समजू शकलं नाही ना मला ....कदाचित मीच निकामी होतो..ज्याला जे मनाला येत तो बोलून जातो मी मात्र नेहमी शब्दांन बोलणारा रिताच का ? मला भावना नसाव्यात का ? मी सांगितलेलं योग्य कि त्याने ? जी कधीच उपयोगी आली नाही ती मैत्रीचं काय कामाची ? मग मी एकट्यानं जगायचं घेतलेला निर्णय तुला अयोग्य वाटतोच कसा ????
एवढं एकच उत्तर देशील ना .......?😞
आता सकाळ झाली होती..पुष्पक ने तिला एकदा चोरून पाहायचं ठरवलं..बिछान्यातून तडक उठून तिच्या घराच्या दिशेला निघाला..घराच्या आसपास चोर असल्यागत तो वावरत होता..पण कोणीच तिकडे नसल्याचं जाणवलं..थोडं पुढे जाऊन पाहिलं तर तिच्या घराला कुलूप होत..पुष्पक त्याच क्षणी खाली कोसळला..त्याच अश्रूंचा बांध फुटला रडू लागला..ती कायमची त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती...
रावीच पुस्तक ओथंम्बलेल्या अश्रूंन आडच रहस्य आता पूर्ण वाचून झालं होतं..तिला या पुस्तकाचा शेवट अजूनही अनपेक्षित पणे अपूर्णच वाटत होता..नाही नाही लेखकाने ' अपुरं पुस्तक ठेवलं आहे हे मात्र नक्की..मला हे कळायला हवं..मला एकदा भेटून जाऊन घ्यायला पाहिजे..
तिने तडक पुस्तकांच्या कव्हर वर असणाऱ्या बुक पब्लिशर ला फोन लावला..मला अपुरं पुस्तक या लेखकांचा नंबर मिळेल का..? अशी विचारणा केली..पण तितेही तिच्या पदरी निराशाच बाहेर पडली..तिने पुन्हा लोणावळ्याला जायचं ठरवलं..आपल्या प्रश्नाचं उत्तर नक्की तिथेच मिळेल..म्हणून तीने निश्चय केला अन उद्याच तिकडे मार्गस्थ होण्याचं ठरवलं..संध्याकाळ झाली होती..तीन बिगबिगीन जेवण वगैरे आटपून झोपायला गेली ..पण अजूनही तिच्या मनात काय असावा या ' अपुऱ्या पुस्तकाचा शेवट ' हा प्रश्न तिला स्वस्थ बसू देत न्हवता. अन ती तशीच झोपी गेली
एव्हाना रावी लोणावळ्याला येऊन ठेपली होती.तेच निसर्गरम्य हिरवी शालू नेसलेली निसर्ग नवलाई...पांढरकाळ्या ढगाआड नजरेआड केलेला सूर्यनारायण दिसेनासा होता..पण पाऊसरीसोबत प्रकाशमान झालेलं इंद्रधनू लोणावळ्यातील डोंगराईचं प्रवेशद्वारच बनलं होत जणू..या धुकाटलेल्या गारव्याथंड वातावरणात ती कधी बाहूना पकडत तर कधी हात चोळत ऊब निर्माण करत होती..लेखकानं उभारलेल काव्य दालन नुकतंच उघडलं होत..रावी नजरेस पडताच ती त्या दिशेने सरसावली..आत आल्यावर अगदी प्रसन्न वातावरण होत..तिथे असणाऱ्या ग्रंथपालाची तिच्यावर नजर पडली..कोणतं पुस्तक हवंय का ? अशी त्यांनी विचारणा केली..पण पुस्तक नकोय पुस्तकवाला हवाय अस ती म्हणताच ग्रंथपाल हसू लागला..कारण लेखकाला भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या काही कमी न्हवती.. ती मात्र थोडीशी रागदसुरात त्याच्याकडे पाहत आजतरी मिळेल का वेळ तुमच्या महाशयांना..अस म्हटली..त्यावर प्रत्युत्तर म्हणून ते मी नेमकं काही सांगू शकत नाही आताही येतील किंवा येणारही नाहीत ..आता मात्र ती अवाक झाली..
पण तेवढयात प्रवेशद्वारापाशी कोणी तरीही आलंय याची जाणीव झाली..लेखकच होता तो..लेखक समोर येताच तिचा चेहरा आनंदला..रावी तडक त्याच्या पाठलाग करत ऑफिसकडे सरसावली..येस ..? अस लेखकाने विचारल..मला पुस्तका संदर्भात तुम्हाला बोलायचं होत,खरंतर पुस्तकाचा शेवट काही भावला नाही..आपलेपणा कुठे वाटला नाही..रावी उत्तरली.
लेखक- अस का ?
ती-कारण ती व्यक्ती अजूनही आहे असं जाणवत..कोण होती ती व्यक्ती..? ( प्रश्नार्थक नजरेनं तीन विचारलं )
लेखक - सॉरी मी या विषयावर नाही बोलू शकत..तुम्ही येऊ शकता..
ती - म्हणजे काय ..? मी तुमची नेहमीची वाचक आहे..मला याच उत्तर मिळायला हव..तशी मी इथून जाणार नाही..(जरा चढत्या सुरात ती बोलू लागली )
लेखक - तुम्हाला सांगितलेलं कळतंय का..?
ती - नाही
लेखक - प्लिज वाट सोडा माझी..
ती-अजिबात नाही..मला सांगायला हवं..
लेखक - काय ..?
ती - कोण होती ती व्यक्ती ..??
लेखक - अहो नाही कोनी..(आता मात्र बातचीत वादापर्यंत पोहचली होती..)
ती - नाही काय..असायलाच हव..
लेखक - बस आता हे अति होतय..
ती - सांगा कोण होती ती व्यक्ती..कोण कोण कोण ..?
(तिच्या या प्रश्नाने लेखक गहिवरून आला..नयनातून अश्रू घळ घळ ओघळू लागले..अन लेखक जे सत्य कधी समोर मांडणार न्हवत ते मांडून गेला..)
लेखक- हो आहे ती जिवंत...
नाही देह तुका झाला
नाही प्राण मुका झाला..
जिवंत असूनही मुर्दाड आता..
श्वास माझा सुका झाला..
ती- त्या फक्त सोडून गेली होती न तुम्हाला जिवंत आहे म्हणजे मी नाही समजून शकले..(आता ती पूर्ण थबकली होती..तिच्या मनात तिच्या बद्दलच गूढ, कुतूहल आणखी वाढलं होत..काही क्षणात ते सत्य , कथेचा खरा शेवट तिच्या पदरी पडणार होता..कोण होती ती..अन कुठे असेल ती ..?
अश्या अनेक प्रश्नांनी तिला घेर घेतला होता..तेवढयात गहिवरून आलेला लेखक बोलू लागला...)
शी is इन now महाबळेश्वर..ती महाबळेश्वरला असते..
रावी-मग पुन्हा एकदाही भेटुशी नाही वाटलं तुम्हाला..?
लेखक - वाटलं न..
रावी-मग..
लेखक - पण भेटूनही न भेटल्यासारख असेल तर सारख जाण काय कामाच...?
रावी - acha ..म्हणजे कायमचा दुरावा आला तुमच्यात...
लेखक - मुळीच नाही..अन तो कधी येणारही नाही..
रावी- एकतर्फी प्रेम..?
लेखक - नाही..मी तिला भेटतो बोलतो..पण मी म्हणून नाही..तर एक टुरिस्ट गाईड म्हणून एवढीच काय आमची ती भेट..तिला bramnti करायला आवडत अजूनही..
रावी- का? अस का..?
लेखक - कारण तिला मी लक्षात नाही..
रावी- ( आता अवाक होऊन) काय..?
लेखक - ज्या दिवशी ती इथून निघून गेली.. त्या दिवशी आमची भेट झाली नाही..पण दुसऱ्या दिवशी तिचा घरचा कॉल मला होता..तिने आमच्याबद्दलच सर्व काही सांगितलं होतं.. आणि सर्व काही मनासारखं होत..मलाही येत्या दोन दिवसात त्यांनी घरी बोलवलं होत त्यांच्या..पण नियतीस हे मान्य न्हवत बहुदा..
रावी- म्हणजे पुस्तकाचा शेवट तुम्ही खोटाच केलाय तर..
लेखक-तस म्हणलं तर काही हरकत नाही..कारण मला तीच अस्तित्व मांडुशी वाटलं नाही ..
रावी- काय होत वास्तवता..?
लेखक- ज्या दिवशी मी तिच्या घरी जाणार होतो ..त्यादिवशीही ती माझ्यासोबत होती.. कॉलेज वरून थेट आम्ही तिच्या घरी जाणार होतो..घरी जात असताना तिला वाटेत फुल विकणारी आजी दिसली..ये प्लिज मला गुलाब घेऊन देना अस म्हणाली पण मी अग उशीर होतोय जाऊयात आपण म्हणालो..पण ती जिद्दी होती हट्टी होती..अन ती त्या दिशेने सरसावली पण कोणास ठाऊक जे घडनार होत ते अघटिक झालं..(अन लेखक पुन्हा ढळून रडू लागला..)
रावी - अस काय घडलं..?
लेखक - एका भरधाव येणाऱ्या चार चाकीची धडक तिला बसली अन ती बाजूला फेकली गेली..माझ्या तर काळजाचा ठोकाच चुकला होता..मी ही त्या बाजूने गेलो..आयुष्यभर सोबत देईन म्हनारा मी फुल आणताना सोबत न्हवतो..
रावी- ohh..आता बरी आहे न तबेत त्यांची..
लेखक - हो बरी आहे ..पण तिला डेलमिया ( स्मृती विसरण्याचा रोग) झालाय..नाही मी तिला आठवतो न कोणी..
आता रावीलाही अश्रू अनावर झाले होते..ती घळघलून रडू लागली..एकीकडे पप्रश्नाचं उत्तर मिळाल्याचं समाधान होत..तर एकीकडे लेखकाचं ' अपुरं राहीलेलं पुस्तक ' त्याची प्रेमगाथा..तड रावी डोळे पुसत दालनाबाहेर पडली..अन घराच्या दिशेन परतीच्या वाटेवर निघून गेली...

