STORYMIRROR

suraj suryawanshi

Romance

3  

suraj suryawanshi

Romance

मोरपंख भाग - 1

मोरपंख भाग - 1

2 mins
271

ऑफिसचा पहिला दिवस म्हणून निखिल बसस्टॉपवर सर्व काम आटपून नेहमी प्रमाणे कासव गतीने न येता थोडा लवकरच आला होता.हातात घडयाळ ढुंकून पाहिलं तर 8 वाजले होते..बस येण्यासाठी अजून पाच मिनिटे वेळ होता.नेहमीप्रमाणे शिरूर बस स्टॉप गजबजलेला होता.आजू बाजूला एस.ट्याची ये जा चालू होती त्याच बरोबर गर्दी मोठ्या प्रमाणावर होती.बोअर होऊ नये म्हणून उभ्या असलेल्या निखिल ने खिशातला मोबाइल काढला.


नागमोडी बोट फिरवत कसा तो पॅटर्न उघडला देव जाणे. फेसबुक अपडेट चालत बसला.गालावर मात्र प्रचंड स्मितहास्य जणू हिरवागार पाउस नुकताच पडून गेलेल्या गारव्यात इंद्रधनू उमलाव अगदी हुबेहूब तसच होत काही.बालपणीची मैत्रीण शर्वरीचीच अकाउंट होत ते बहुदा..तिच्याशी तो रोज बोलायचा पण शब्द बोटांपर्यंत यायचे पण ओठापर्यंत आलेले शब्द त्याच्या टायपिंग मधे येत न्हवते.तिला नंबर मागायला तो थोडासा घाबरत असावा बहुतेक..कुणास ठाऊक ..सध्या ती पण पुण्या वरून शिफ्ट होऊन शिरुरला राहायला आली होती कारण तिला पण जवळच एमआयडीसीमधे जॉब मिळाला होता. पण तिचा साधा फोटो पण फेसबुक वॉल वर न्हवता.इकडे त्याची बस लागली त्याची भनकसुद्धा निखिलला नव्हती.


गालातल्या गालात हसत मात्र त्याने नजर थोडीशी वर फिरवली शिरूर - रांजणगाव बस त्याला दिसली..तसा तो मॅरेथॉन मधे पळाव तसा अधश्या सारखा बस कडे पळत सुटला. गर्दीत रेटत रेटत तो पुढे सरकत होता.. गर्दी काही केल्या हटत न्हवती.कसाबसा गर्दीत वाट काढत एस.टी मधे घुसला एक शीट रिकामं होत त्यावर जाऊन अलगद विसावला. जागा मिळाली म्हणून क्षणभंगुर आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता.ये हॅलो मिस्टर..कुणाच्या जाग्यावर बसलाय तुम्ही ? कुणाला विचारून? हे शुक शुक ...समोर ऐन विशीतली पोरगी सलवार कुर्ता घातलेली त्याची बोलत होती बोलत कसली वाद घालत होती.निखिल मात्र तिच्याकडे पाहतच होता..ये कळत नाहीये का तुला?


हात त्याच्या चेहऱ्यासमोरून फिरवत चुटकी वाजवत ती म्हणाली.तिचे ते कुरळे भिरभिरणारे केस गुलाबी रंगावर भाळलेल्या निखिल ला थोडं भानावर आल्या सारख झालं...मी मी पकडली आहे... जागा... निखिल तोटक्या आवाजात बोलत होता... मी मी काय उठ हो बाजूला बघ... निखिल मात्र थोडा भान हरपला असावा बहुतेक. थोडं पुढे वाद नको म्हणून उठला व वरच्या sitrela असलेल्या एस. टीच्या दांड्याला धरून उभा राहिला. ओढणी सावरत ती मात्र तिरका कटाक्ष त्याच्याकडे टाकत काहीतरी रागाच्या स्वरात पुटपुटत बसली. निखिल चोरी नजरेनं अधूनमधून तिच्याकडे पाहत होता ती मात्र मूर्ख आहे हा हा म्हणत असावी बहुतेक रागीट चेहऱ्याने पाहत होती.

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance