STORYMIRROR

suraj suryawanshi

Drama Inspirational

4.3  

suraj suryawanshi

Drama Inspirational

तीन अतिलघुकथा

तीन अतिलघुकथा

2 mins
384

1) राहुल्या - कारे पम्या खूप उदास दिसतोय..

पम्या - काही नाहिरे ती आली होती..

लग्न करायचं म्हणत होती..त्यात मी दिसायला असा ? काय पाहिलंय माझ्यात देव जाणे..


राहुल्या - पम्या..

वरून वरून राऊळ किती विद्रुप दिसली तरी आपली आतील गाभऱ्याशी श्रद्धा कमी होत नाही..

अगदी नात्याचं ही तसच 

माणूस बाह्यरंगी कसा आहे त्यापेक्षा अंतरंगातील मनावर विश्वास ठेवुन नात जोडलं जात..!😊


2) राहुल्या - पम्या ..एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून दुःख निर्माण होत अस का..?


पम्या - कारण एखादी गोष्ट हवी असते ती भेटेल म्हणुन आपण लोभ ठेवतो..जिथे लोभ आला तिथे अपेक्षा आली,जिथे अपेक्षा आली तिथे हव्यास आणि त्या सोबत क्रोध ही आलाच..आणि क्रोधातून अनेक शब्द विनाकारण सुटतात..मग त्याचा पश्चाताप होतो आणि पदरी पडत नैराश्य,दुःख..! 😊



3) राहुल्या - ( स्प्लेंडर आहे जवळ स्वतःची समोरून केटीएम जाते) आयला बस ही गाडी भेटायला पाहिजे आयुष्य एकदम ओके..बरोबर ना ..


पम्या - सुख सजे मनभर अब पास

     तबभी चैन न आवे,

     मन दर भटक भटक

     सैरभैर हो जावे..!


राहुल्या - म्हणजे ?


पम्या - मनभर सुख पायाशी वसलेल असताना कणभर गोष्टीसाठी मन बेचैन होत.कारण तिथे मोह निर्माण झालेला असतो...😊



4) राहुल्या - आर काय रे ? खूप चेहरा पाडून बसलाय..


पम्या - सकाळपासून बसलोय रे भाजी विकायला ..पण कोणी पिकवलेल्या किमतीत भाजी घेईल तर बोल..आयुष्य छळत चाललय लेका..


राहुल्या - शेतकरी ये लेका तू..नेहमी एक वाक्य लक्षात ठेव..


हरलास,घाबरलास मग एक काम कर..

सुन्या पडलेल्या वाटेवरती चालून बघ..

गुलामी नको कोणाची

पोटतिडकीन कमावलेल्या आठ आन्याला बोटान उडवून झेलून बघ..

" शेतकऱ्या " तू किती श्रीमंत माणूस आहेस..!😊


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi story from Drama