STORYMIRROR

Khalida Shaikh

Romance

3  

Khalida Shaikh

Romance

अनपेक्षित

अनपेक्षित

6 mins
241

सरी बरसत होत्या. पाऊस थांबायचं लक्षण नव्हतं...

रीमाला थांबून चालणारं नव्हतं. अनेक इंटरव्ह्यूला नकार...

कंटाळून गेला होता जीव. आज समोरुनच फोन होता... कंपनी मोठी होती. शिवाय अंधेरीला.... चारच स्टेशन बोरीवलीहून... पाउस थांबेल असं वाटतं नव्हतं. वाट बघण्यात ही पॉईंट नव्हता.

शेवटी रीमाने बाहेर येऊन रिक्षा ला हात केला. बोरीवली....

स्टेशनला आठ दहाची लेडिज स्पेशल पकडली... पांढरा रंग... सोमवार असल्याने घातलेली अमेरिकन जाॅरजेट पार भिजून गेली होती.... अंधेरी स्टेशन केव्हा आलं कळलचं नाही. जवळच ऑफिस . रीमाने छत्री उघडली पण वारा खुप असल्याने छत्री बंद करावी लागली... डोक्यावर रुमाल ठेउन प्रवेश केला ऑफिस मधे.. लिफ्ट मधील मिरर मधे बघीतलं. केस लांब सडक एकदम भिजून गेले होते. रीमाने हातानेच केस निट करत घड्याळाकडे पाहिलं. बापरे नऊ वाजून गेले होते... तीने तसचं रिसेप्शनिस्ट कडे जाऊन कुठे आहे इंटरव्ह्यू ते कन्फर्म केले. हातातील रुमालाने अलगद पापणीवर ओथंबलेले पावसाचे थेंब टिपले. आणि मे आय कम ईन सर? उत्तराची

वाट बघत असतानाच आतून सौम्य आवाजात यस ऐकू आलं.. तशी ती आत आली.. समोर चेअर मधली व्यक्ति पाठमोरी होती..

 यू आर लेट....

येस... साॅरी... पण पाऊस..

खुप होता.... रिक्षा ही मिळत नव्हती. 

I am really very very sorry for that... न थांबता एका दमात ती बोलून गेली.

समोरची व्यक्ती खुर्चीतून हलली. खाली वाकली ड्राॅवर उघडल्या चा आवाज आला. आणि परत बंद केल्याचा. त्या व्यक्तीच्या मनात नेमकं काय चाललंय हे कळतं नव्हत. जशी त्याने मान वर केली आणि रीमाची त्याची नजरानजर झाली. रीमा अचंबित झाली. समोर नॅपकिन देणारी व्यक्ती अनिकेत होती.... .रीमा आश्चर्याने बघतच राहिली....... ..

अनिकेत.... हो रीमाला नकार देणारा... कारण सांगीतलं नव्हतं. पण एव्हढचं कळलं होतं. त्याला इतक्यात लग्न करायचः नव्हतं. खरंतर रीमाला फोटोतच आवडला होता. पांढरा शर्ट घातलेला फोटो. त्या शर्ट ची बटणं उघडी असल्याने दिसणारी भारदस्त छाती. कपाळावर असलेला गाॅगल. डिग्री ही यू के ची. रीमाने नाकारण्या सारखं काही नव्हतं...रीमाने स्वप्न सुद्धा विणायला सुरुवात केली होती. बघायला येणार हे देखील ठरलं होतं रविवारी.

पण आचानक पप्पांना फोन आला होता. काही कारणाने मुलाने लग्न करण्यासाठी नकार दिला होता... त्याच्या मम्मीने तर माफी मागीतली होती...सर्वांचीच...... 

रीमा खुप आशा लावून बसली होती.. कारण जाणून घेण्याची खुपच ईच्छा झाली होती... 

फोटोच्या मागे नंबर होता. रीमाने कुणी घरात नाही बघून मोबाईल उचलला. नंबर डायल केल्यावर भारदस्त आवाज आला. हॅलो..... येस.. Who is speaking.... हळव्या आवाजात रीमा ने उतर दिलं.. 

मी रीमा सरदेसाई..... ऐकल्यावर आ..... ओह... ओके ओके. बोला....

मी फक्त आपला थोडासा वेळ घेतेय. मला जाणून घ्यायची ईच्छा आहे. माझा फोटो पाठवल्यानंतर तुमच्या कडून होकार आला होता.... आणि आणि तुम्ही बघायला यायचं ही ठरवलतं. मग अचानक नकार देण्यासारखं काय घडलं..... मला जाणून घ्यायचं आहे... रीमा आपल्या मनातलं बोलून मोकळी झाली..... थोडावेळ शांतता पसरली. आणि मग अनिकेतने सांगीतलं. मी लग्ना साठी प्रिपेर नव्हतो. मम्मी ने आणि पप्पांनी फोर्स केला होता.. मुळातच मी बाहेर जाऊन शिक्षण घेतल्यानंतर मला स्वतःलाच थोडासा स्पेस द्यायचा होता. आणि कंपनीची मोठी पोस्ट.. डायरेक्टर ची.. त्या पोस्ट ला मला न्याय द्यायला हवा होता... आणि म्हणून.. मी....

रीमाने फोन कट केला....

ऊतर मिळालं होतं. अपेक्षाभंगाच दुःख काय असतं अनिकेतला समजणारं नव्हतं. त्या फोटोत रीमाने आपलं मन गुंतवलं होतं.... असं तीला नकार येत नव्हते. पण तीच्या रुपाला शिक्षणाला साजेस स्थळ नसल्याने तीचे पप्पा पुढाकार घेत नव्हते....हे सत्य होत. 

आज अचानक इंटरव्ह्यू ला नेमकं तोच समोर आल्यावर रीमा बावचळून गेली होती.....

अनिकेतने फोटोत पाहून आज अस कसं ओळखलं याच संभ्रमात रीमा होती.... 

घे.. फ्रेश होऊन ये.... What can i order for you... tea or coffee......

रीमा काहीच न बोलता ऊठली. ओले केस वॉशरुम मधे जाऊन पुसले . आरश्यासमोर बघीतल्या नंतर जाणवलं टिकली ही पडली होती. तीने केस अलगद झटकले...... आजचा इंटरव्ह्यू चा निकाल ही निगेटिव्हच असणार.... विचार करत करत ती बाहेर आली.....

अनिकेत तिलाच न्याहाळत होता....

काॅफी घे.... प्लेट्स मधे मारी बिस्किटे होती. रीमाने कॉफी घ्यायला सुरुवात करून मुद्द्याला हात घातला. इंटरव्ह्यू????कधी घेणार? अनिकेतने चेहर्‍यावर नजर रोखून विचारले.. 

 घाई आहे का??? 

अनिकेतने विचारल्यावर तीने काॅफी चा एक एक घोट घेत... नाही म्हणजे जर सिलेक्शन होणारच नसेल तर

 I am going for another interview....... It is today only.... 

डिपेंड रहायला नको. उगाच अपेक्षा ठेवायची आणि..... 

रीमाने अनिकेतकडे कडे रोखून पाहिलं..... 

आणि..... आणि काय????? अनिकेतने रीमाला बोलतं करायचा प्रयत्न केला. ते पाहून रीमाच पटकन बोलून गेली. अपेक्षाभंगाच दुःख पचवताना परत त्रास व्हायचा... रीमा बोलून गेली.

 परत म्हणजे? अनिकेतने अचंबित होतं विचारले. या आधी झाला होता का इंटरव्ह्यू???? तो ही याच कंपनीत? 

रीमा खरतरं रागातच होती.... पण शांतपणे ऊतर दिलं. नाही इंटरव्ह्यू होणार होता... पण झाला नाही. त्या आधीच नकार आला...... 

अनिकेत च्या लक्षात आलं...

 रीमा त्याने दिलेल्या नकारा संदर्भात बोलत होती... 

ओके...ओके.. I understand..... 

अनिकेत ला काही बोलूच द्यायचं नाही ठरवून रीमा तीथून उठली. मला निघायला हवं.... पर्स खांद्यावर अडकवून ऊठली. थॅंक्स फाॅर काॅफी...

So if you are in hurry today. Tommorrow I will call you for interview if you don't mind....

म्हणजे तुमचा नकार नाही का? मला वाटलं....... रीमा थोडीशी गोंधळली होती.... .मी इंटरव्ह्यू घेतला नाही अजून... I think you are not prepared for today..... So will meet tomorrow.. Is that ok.....

हा आवाजात आर्जव होता का?

रीमाने स्वतःलाच प्रश्न केला...

जास्त ताणून धरण्यात काही अर्थ नव्हता. 

रीमाने खिडकीतून बाहेर पाहिलं. आकाश निरभ्र झालं होतं. सरी बरसायच्या थांबल्या होत्या. 

उद्या चं इंटरव्ह्यू साठी अलगद होकार देउन अनिकेत कडे पाहिलं... शार्प टेन... ओके.. रीमा पण ओके म्हणून केबीनमधून बाहेर पडली.....

पाठून एसक्यूज मी म्हणत अनिकेत बाहेर आला होता. हातात रीमाचा रुमाल होता. रीमानेही थॅंक्स म्हणतं लिफ्ट कडे धाव घेतली.

 उगाचंच ह्रदयाचे ठोके वाढलेले वाटले...

बसस्टॉप वर आल्यावर उद्या यायचं का नाही हे विचार घोळवत घरी आली....

झालेला प्रकार पप्पांना सांगीतला नाही. सिलेक्शन झालं की मग बघू.

दुसरा दिवस उजाडला.... काय ड्रेस का साडी.... काय कराव या विचारात 

असताना मम्माची केशरी रंगाची कलकत्ता साडी तिने सिलेक्ट केली. नेसल्या नंतर स्वतःला कितीतरी वेळ तिने स्वतः निरखून बघीतलं. अनिकेतनं नाकारावं अस काही कारणच नव्हतं.

 पण करियर करताना बरीच जण हे नक्कीच बघताना आढळत असल्या चं जाणवलं होतं..... 

दुसरा दिवस... इंटरव्ह्यू साठी वेळेतच पोहोचली. मे आय..... ये रीमा 

waiting for you only...

रीमाला बसायला दिल्यानंतर अनिकेतने ऐनव्हलप काढून रीमा समोर धरलं...

घे..... अनिकेतने पुढे केल्यावर रीमाने प्रश्न केला.

काय आहे त्यात?

बघ की.... म्हणतं अनिकेत हसला... रीमाला पुन्हा एकदा वाटलं

 दिलकी धडकन कभी 

ईतनी प्यारी न थी...

आत चक्क अपॉइंटमेंट लेटर होतं.... अजून तू आय मीन तूम्ही इंटरव्ह्यू देखील नाही घेतला आणि.......

अनिकेत परत हसला अपेक्षाभंगाचं दुःख खुप कठीण असतं नाही का....

कालच तू म्हणालीस ना....

हो ते मी..... मागचं सगळं आठवलं म्हणून.... रीमा वरमली होती. ओके... त्याचीच तर ही भरपाई. आपल्या मुळे कोणाला तरी त्रास झाला हे कालच मला जाणवलं..... आणि त्या चूकीची भरपाई आज मी केली...

तुला नकार दिल्यानंतर मम्माने खुप सिरियसली घेतलं... त्यानंतर तिला पॅरॅलिसिस चा अटैक आला... त्या गडबडीत स्थळ बघणं तर दूरच पण विचार सुध्दा करु शकलो नाही. तुझा फोटो परत करायला दिला होता तो ही तसाच राहिला..... मध्यंतरी पप्पांनी परत एकदा तुझ्या स्थळाबद्ल विचार करायला सांगीतलं होतं.

पण धीर झाला नाही. वाटलं परत बघायला येतो सांगीतलं आणि तू नकारलसं तर? त्यावेळी कळलं अपेक्षाभंग म्हणजे काय असत... खुपवेळा तुझ्या फोटोबरोबर संवाद साधले. माफी ही मागीतली. पण प्रत्यक्षात मात्र धीर झाला नाही.

 पण मनापासून माफी मागीतली की देव देखील माफ करतो. आणि म्हणूनच तू माझ्या समोर अशी अचानक आलीस...

आणि तू गेल्यावर मी हे अपॉइंटमेंट लेटर टाईप करून घेतलं. एकदा वाटलं तू नाही येणार इंटरव्ह्यूला... पण एक मन म्हणतं होतं. तू नक्की येशील...

न थांबता अनिकेत बोलत होता. रीमा त्या लेटरवरील त्याच्या सहीवरून हात फिरवत बसली. हलकेच स्माईल देऊन पप्पांना सांगते म्हणत तीने मोबाईल हातात घेतला.....

अनिकेतने पटकन तिला थांबवलं... थांब एकाच वेळेला दोन गूड न्यूज दे... रीमाने आश्चर्याने अनिकेतकडे पाहिले. भूवयां ऊचांवत काय? असा इशारा केला. 

अनिकेतने उठून जवळ जात माझी जीवनसाथी बनशील का? अलगद त्याने आपला हात रीमाच्या हातावर ठेवला. 

रीमाकडे शब्द नव्हते.... तीने आपली नजर त्याच्या नजरेत मिसळू दिली..आणि मान हलवून होकार दिला.शब्दाची गरज नव्हती... नजरनजरसे हो रही हैं बात प्यार ... 


अनिकेतने संध्याकाळी मी घरी मम्मी पप्पांना भेटायला येतो म्हणून सांग....

रीमाला अनपेक्षितपणे अनिकेत भेटला होता. तिच्या स्वप्नांचा राजकुमार...

सारचं अनपेक्षित होतं.



Rate this content
Log in

Similar marathi story from Romance