STORYMIRROR

Khalida Shaikh

Tragedy

3  

Khalida Shaikh

Tragedy

फेसबुक फेस आणणारा

फेसबुक फेस आणणारा

6 mins
101

नीता खुप वेळ बसून होती... वेळ जाता जात नव्हता. स्वेच्छानिवृत्ती नंतर काही तरी करायची ईच्छा होती.. पण तेही जमलं नव्हतं. आधी आॅफिस घरातलं सर्व करता करता नाकीनऊ यायचे... नंतर विचार करु म्हणतं दोन वर्षे कुठेच गेली होती निघून... समीरला निवृत व्हायला अजून चार वर्षे... बापरे तो सदानकदा बिझी...

मुलाच लग्न नुकतच झालं होतं. 

ते दोघही त्यांच्या कामात बिझी...

कधीकधी वाटत असे उगाच स्वेच्छानिवृत्ती घेतली...

त्या दिवशी तर घरी कोणी नव्हतं. समीरने जातानाच सांगीतलं होतं मला उशीर होणार जेवायला वाट बघत बसू नको म्हणून. मुलगा आणि सून रात्रीचा शो बघून येणार होते....

बापरे! दहा बारा तास एकटं घालवणं कठीण होतं...

नीताने मोबाईल घेउन मेसेज चेक करायला घेतले सुप्रभात Good morning शुभ रात्री सारे वाचून झाले. अगदीच कंटाळा आला... 

सहसा कधी ती फेसबुकवर जास्त नसल्याने तीलाही त्यात स्वारस्य नव्हतं... 

पण त्या दिवशी का कोण जाणे 

फेस बुकवर एक फ्रेंड रिक्वेस्ट कुणीतरी पाठवली असं दिसताच तिने ओपन करुन पाहिल..

 विलियम्स डिकोस्टा... तीने भराभर प्रोफाईल बघायला सुरूवात केली. दोन गोंडस मुलं बाजूला असलेला फोटो.. मुलगी पाच सहा वर्षांची असावी. निळसर डोळे आणि सोनेरी केस.. आणि मुलगा छोटा चार वर्षांचा तरी असावा. दोघही त्या व्यक्तीला बिलगून बसलेली. रिक्वेस्ट पाठवणारा हॅन्डसम दिसत होता. इंजिनियर... करु का एक्सेप्ट विचार करता करता नीताने रिक्वेस्ट अक्सेप्ट केली.... 

थोड्याच वेळात मेसेंजर वर मेसेज आला. 

Hi. Good morning dear. Can you pl give me your no?

नीताने थोडासा विचार करुन ओके म्हणत नंबर देऊन टाकला.. आज एक वेगळा अनुभव घ्यायला ती तत्पर झाली होती... 

थोड्याच वेळात दिलेला नंबर सेव्ह करून whats app वर फ्रेंडने चॅटिंग ला सुरुवात केली होती... नीताकडे आज वेळच वेळ होता... त्याने मुलीचे मुलाचे फोटो पाठविले. गोंडस मुलं कुणीही प्रेमात पडेल अशी... नीताला मुलीची खुप आवड असल्याने तीने त्या दोघांची नांव विचारुन घेतली... आता थोडासा मोकळेपणा आला होता... त्याने सांगीतलेली हकीकत अशी की त्याची पत्नी कॅन्सर ने मागील वर्षी गेली होती. आणि तो एकटाच या दोघांचा सांभाळ करत होता. 

नीता दुःखी झाली. तीच्या मधली आई जागी झाली. तिने त्याला दुसरं लग्न कर म्हणून उपदेश ही दिला... आजचा वेळ मस्तच गेला होता.. जर्मनी आणि इंडिया. कितीतरी तासांचा फरक.. पण तरी Good night dear.. Sweet dreams... म्हणून मेसेज बघून ती जेवून झोपायला गेली.


सकाळी पुन्हा तेच रुटीन. सर्वांची पळापळ... पुन्हा तोच रिकामी पणा...

तीने पुन्हा मेसेज वाचायला घेतले..

नविन मित्राचा मेसेज... Nice DP..

नीताने लगेच थॅंक्स.. म्हणत good morning...मेसेज केला. खरतरं तिकडे संध्याकाळ....

पुन्हा चॅटिंग ला सुरुवात... नीताला समीरने कधी डिअर म्हटल्याचं आठवलं नव्हतं. Pl send some photos... नीता थोडाशी चक्रावली.... असं कधी मैत्रीणींशिवाय फोटो पाठवल्याचं आठवत नव्हतं...

 No...

Why

I don't know

Hmmm... 


तो दिवस ती विचार करत बसली.. त्या दिवशी तीला मॉलमधे काही गीफ्ट आणायला जायचं होतं... पण बैचैनी कशी काय जाणवतं होती. तयारी करुन तीने मोबाईल पर्स मधे ठेवला. आणि काय मनात आलं परत मोबाईल काढून तीने फेसबुक वर जाऊन त्या फ्रेंडला सरळ ब्लॉक करुन टाकलं..

 न जाणो आपण फोटो दिले नाही तर फेसबुकच्या पेजवरून घेईल. एक ईशारा मनाने दिला... थोड्याच वेळात ती शाॅपिंगमधे व्यस्त झाली.. मुलाला मेसेज करायच राहिला म्हणून मोबाईल घेऊन मेसेज करणार तर whats app facebook phone contacts सारच गुल झालं होतं... कठीण आहे म्हणून तीने दुकानदाराला फोन करुन बघ म्हणून सांगीतले.. रिंग झाली आणि थोड्याच वेळात सर्व अॅप परत दिसले...

मेसेज मित्राचा..

Dear, you block me on Facebook...

Why

नीताने सारवा सारवी करत सर्व अॅप बद्दल घडलेलं सांगीतलं स्वतः हून ब्लॉक केल्याच अजिबातच कबूल केलं नाही...

पण एक सवय झाली होती... मुलांबद्दल विचारायचं. जेवली का...

I will always remember you in my prayer... हल्ली मोडकतोडकं का होईना मस्तच चॅटिंग जमत होतं... कधी कधीतरी एकदा आय लव्ह यू डियर म्हटल्यावर 

वाॅट???

You remarry first म्हणून एक परत संदेश देऊन मोकळी झाली...

एक दिवस my daughter wants to speak with you....

How she knows me...? 

I told her that I have a friend from India... I love her... 

But she is married...

नीता विचारातच पडली. काय माणूस आहे.. त्या दिवशी समीर पूण्याला गेला होता मिटिंग साठी. त्याच दिवशी व्हिडिओ काॅल करु का मुलीला बोलायच आहे म्हटल्यावर तीने दहा मिनिटांनी कर सांगीतलं. घरातला गाऊन... पंजाबी ड्रेस घातला. तेवढ्यात फोन आलाच...

You look younger than me.

Thank you. नीताने उतर दिलं

Where is your daughter...

She is inside...

Ok...your voice is like ice cream... नीताला हे नविन नव्हते.. आवाज गोडच होता.. 

त्याचे डोळे कमालीचे होते.. बघत रहावेसे वाटणारे.. नंतर मुलगी आलीच नाही. आणि दुसरा कॉल येतोय म्हणून त्याने ही फोन कट केला... नीता त्याच्या डोळ्यांचाच विचार करत होती...

सागर सी गहरी तुम्हारी निगाहें

डूंबो दे ना हमको ये लाकर कनारे

गाण्याच्या ओळी आठवून गेल्या. 

परत मेसेज... जास्त बोलता आलं नाही म्हणून..... मेसेज.... ओके... नीताने सांगीतलं pepole says that 

the person having this colour of eyes are cunning.. 

I dont know... but people says....

Yeah!!! I am cunning.

Not for me cause we are best friends forever... नीताने शब्दांची जुळवाजुळव केली होती..

आता इंग्रजीत बोलणं सोप वाटायला लागलं होतं.... You teach me English...

I will teach you hindi n marathi....

शब्दांची देवाणघेवाण यापलीकडे एक काळजी कसं करत असेल मुलांच...

टेक केअर म्हणायला विसरत नव्हती.

बर्थ डेट विचारल्यावर जवळपासचीच तारीख सांगून मोकळा झाला.. अरे दोनच दिवस.. आपण ग्रीटिंग पाठवू या whatsap वर असं तीने ठरविले...

त्या दिवशी तीने मेसेज पाठवल्यावर ओपन पण केल्याच दिसलं नाही. थोडीशी नरव्हस आणि थोडसा राग मनात ठेऊन होती...

संध्याकाळी परत मेसेज मिस कॉल दिसत हैते...

Where r you

.....

You r busy in celebration....

थोडीशी नाराजच होती.

I have a surprise for you. Tomorrow I will tell.

Ok...

Gn..

नीता विचारात पडली येणार असेल तर ईंडियात.. उगाचच मैत्री केली... अस जाणवलं...

दुसर्या दिवशी मेसेज केला....

लेकीबरोबर शॉपिंग केलं. तीला नीताला गीफ्ट द्यायच होतं... असं सांगीतल्यावर नीताने चक्क सांगून टाकलं I dont accept gifts... Sorry. You r unknown person. My family doesn't know you..And I also doesn't met you.. 

तरी मुलीने घड्याळ पर्स वगैरे शॉपिंग केल्याचं सांगीतलं... उद्या पाठवणार आहे... असं सांगितलं 

Pl send your address.. नीताने नाही नाही म्हणत पत्ता दिला. कारण मुलीला वाईट वाटेल असं सांगितलं म्हणून... दुसर्या दिवशी बाॅक्स पाठवल्याचा व्हिडिओ त्याने पाठवला...

नीताने घरात मोकळेपणाने सांगीतलं... फक्त चॅटिंग केलं ते मात्र नाही सांगीतल....

दोन दिवसांनी कस्टम्स आॅफीस मधून फोन... गीफ्ट आलयं त्यात आय फोन घड्याळ पर्स आहे. ड्यूटी ₹३५०००/...भरा...

नीता जाम वैतागली..एक तर पाठवू नको सांगितले तरी जबरदस्तीने पाठवलं. मुलीला वाईट वाटेल म्हणून तीने बॅकेत जाऊन पैसे चेक केले आणि जी पे करते सांगून अकाऊंट नंबर मागवला.... कस्टम आॅफीस चे तोपर्यंत फोनवर फोन येत होते.

नीताने पैसे ट्रान्सफर केले.. दुपारी एक च्या दरम्यान... जेवून मस्त झोपून गेली... फोन सायलेंट वर ठेऊन.. उठून बघते तर दोन मिस कॉल... एकतर भाज्या आणायला निघाली होती.. उतरुन तीने फोन लावला...


कस्टम्स मधून फोन.. You have to pay ₹150000 /...... This is the penalty amount as the sender had kept cash inside the box...

बापरे.... नीता आता मात्र हादरली होती... त्यातून मित्र पण फोन करून pl Pay... MY daughter is asking.... She loved you...


नीता पेचात पडली ज्या व्यकतीला ओळखत नाही त्याच्या कडून ज्वेलरी आयफोन कॅश का म्हणून घ्यायची.. आणि घरातल्यांना काय सांगायचं...


तीने मनाशी पक्का निर्धार केला.... जेवणं आटपली होती... टेंशन आलेलं होतं. मुलाबरोबर झालेला प्रसंग सांगीतला. सूनबाई पण होतीच. दोघांनी ही ऐकून घेतलं. आणि जे सांगितले ते ऐकल्यावर नीताच्या पायाखाली जमीन सरकली.. अग ते स्कम आहे. ती टिम आहे.. लोकांकडून असे पैसे ईमोशनली काढतात...

तरी नीताला विश्वास बसत नव्हता. ती दोन मुलं.. ते केलेलं चॅटिंग. कविता लिहून पाठवलेली. I will daily remember you in my prayers.. नीता ने तर सर्व चांगल्या भावनांनी चॅटिंग केलं होतं. दोन मुलांची वाटणारी काळजी.. आणि त्याने चक्क...

खुप वाईट वाटलं एका नात्याचा एका विश्वासाचा अंत झाला होता. मुलाने फोन हातात घेऊन आलेला प्रत्येक नंबर ब्लॉग केला...

ते डोळे ते चॅटिंग तीला खुप त्रास झाला. फक्त सात दिवसांचा हा खेळ संपला होता. ती निवांत झाली होती. ₹३५०००/... गेलेल्याची खंतही नव्हती. घरादारावरून ओवाळून टाकले म्हणत पुढील ₹१५००००/... वाचले म्हणून देवाला आणि मुलाला धन्यवाद देत होती..


पण तरी खेळ संपला होता????

छे..

एक सवय होती. नीताशी चॅटिग करायची... त्यामुळे त्याला करमत नसावं. वेगवेगळ्या नंबरनी त्याने काॅल करुन बघीतला.. नीता unknown नंबर उचलत नव्हती आणि नंतर प्रत्येक नंबर ब्लॉग करत होती.


Pl. Speak dear.

Your silence will kill me

वेगळ्या नंबर वरून मेसेज होता. त्या नंबर ला पण तीने ब्लॉग करून टाकलं...

नीताला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेला नीताच्या प्रेमात कदाचित अडकला होता....

नीताला खामोशी पिक्चरची वहिदा रहमान आणि धर्मेंद्र आठवले... अगदी तशीच स्टोरी रिपीट झाली होती......

नंबर बदलायचा विचार केला फण मुलाने नको सांगितलं. खुप वर्षांपुर्वी चा आहे. कशाला बदलतेस.....

मग तीने ही विचार केला.. नंबर तोच राहिला.... मित्र म्हणवणारा वेगवेगळ्या नंबरने फोन करतच राहिला.....

नीताला अडकवता अडकवता त्या जाळ्यात तो अडकला होता. आणि त्याची तीच शिक्षा होती. कारण नीताच्या आवाजात कमालीचा गोडवा असल्याने तोच अडकला होता...

पुन्हा हा प्रयत्न करताना थोडासातरी नक्की विचार करेल असं नीताला वाटलं...

वेगवेगळे प्रोफाईल बनवून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होता नीता रिजेक्ट करत होता..

शेवटी अनुभवाने माणूस शहाणा होतो.. नीता आता शहाणी झाली होती... फक्त त्यासाठी ₹३५०००/... मोजावे लागले होते. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy