STORYMIRROR

Khalida Shaikh

Fantasy

3  

Khalida Shaikh

Fantasy

स्वप्न

स्वप्न

1 min
114

कोई आया धड्कन कहती हैं

धीरेसे पलकोंकी ये गिरती उठती चिलमन कहती हैं

कोई आया....


वाह.. आज बघायला येणार.. लग्न स्वप्न सारं काही सत्यात उतरणार....

मनातल्या मनात ज्याच्यावर प्रेम केलं तोच राजकुमार आयुष्यात येणार.

संध्या विचार करत होती कुठली बरं साडी नेसावी. कानात गळ्यात काय घालावं... विचारातच गाणं ही गुणगुणत होती..

लाल नारायण पेठ नेसून संध्या तयार झाली. लांबसडक केसात बकुळीचा गजरा माळला.घरभर त्याचा सुगंध दरवळला.. डोळ्यांत काजळ रेखून झालं होतं. आई हाका मारत होती. किती वेळ लागणार. पाहुणे आलेत.

संध्या ने आरश्यात पाहिलं. हातात परफ्यूम लावलेला रुमाल घेतला.

कर्कश बेल वाजली आणि दचकलीच... सुरेश समोर चहा घेऊन उभा होता...

म्हणजे म्हणजे... संध्या पटकन ऊठून बसली अंथरुणावर...

सुरेशने कप पुढे करत जागतिक चहादिना निमित्ताने मुद्दाम आज रविवार म्हणून चहा बनविलाय.... घे

संध्या ने हात पुढे केला. म्हणजे स्वप्न होतं... ते चहाच्या कपात विरून गेलं.

एफ एम वर गाणं लागलं होतं


सपने वो सपने

कब हुए अपने

नींद खुली और टूट गए....


जागतिक चहादिनाच्या शुभेच्छा. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy