STORYMIRROR

Khalida Shaikh

Tragedy

3  

Khalida Shaikh

Tragedy

अंतिम ईच्छा

अंतिम ईच्छा

5 mins
209

आज श्रावणी सोमवार. अप्पा आणि सुलभाचा उपवास. दरवर्षी नेमाने दोघही उपवास करत. आणि मग देवळात जाऊन येत. वृंदा आणि वृषभला मात्र कधीच उपवास करावेसे वाटले नाहीत. वृंदा घरात सून म्हणून येऊन दोनच महिने झाले होते. तिच्या चेहर्‍यावर नवीनवलाईचं तेज ओसंडून वहात होतं. वृषभही तिचं मन जपत होता. आईवडिलांची एकुलती एक. कोल्हापूरहून मुंबईत लग्न होऊन आल्यावर बावचळलीच होती मुंबईतील अफाट गर्दी बघून. अप्पा आणि सुलभा देखील तिला पोटच्या पोरी सारखंच वागवत होते. सुलभाला मुलीची खुप हौस होती. वृषभच्यावेळेस बाळंत होताना तिला जो काही त्रास झाला होता त्यावर अप्पांनी दुसरं मुलं होऊ न द्यायचं ठरवूनच टाकलं होतं. सुलभाला मुलीची हौस असल्याने ती जरा नाराजच झाली होती.

हळूहळू वृषभला वाढवताना आपल्याला मुलगी नाही हे दुःख ती विसरूनच गेली होती. कॉलेज शिक्षण वृषभचं पूर्ण होऊन आय टी क्षेत्रात जाॅब देखील मिळाला होता. स्थळं सांगून येत होती. पण अजून जरा थांब म्हणून वृषभ पुढे ढकलत होता.

त्यातूनचवृंदाच स्थळ आल्यावर एकमेकांना पसंद करुन योग्य मुहूर्तावर कोल्हापूरला लग्नाचा बार उडवून दिला.

असच श्रावणात एका सोमवारी अप्पा आणि सुलभा सकाळी देवळात गेले. पूजा करून निघत असतानाचत्यांच लक्ष एका ठिकाणी गेलंएक सहा सात वर्षांची मुलगी देवळाच्या पायरीवर बसली होती. तिची नितळ स्कीन लांबसडक केस.. चांगल्या घरातली वाटत होती. तिच्या डोळ्यांत करुणा दिसली. तिचे डोळे कोणाला तरी शोधत होते. डोळ्यांतून अश्रू वहात होते. अप्पांनी तिच्याजवळ जाऊन तिला नांव विचारले...

कुठून आलीस बाळ? तुझ्या बरोबर कुणी आहे का? तिने काहीच ऊत्तर दिले नाही. ती नुसतीच हमसाहमशी रडत होती

सुलभानेही आजूबाजूला पाहिले. हिच्या बरोबर कोणी आहे का ते विचारले.

पण काहीच ऊतर न मिळाल्याने दोघांची ही निराशा झाली. शेवटी सुलभा ने देवळाच्या पुजार्‍याला बोलावून आणले. आणि त्याला या पूर्वी या मुलीला कोणाबरोबर आलेलं पाहिलं का म्हणून विचारलं. पुजाऱ्यानेही नकारच दिला.

शेवटी दोघांनी तिला आपल्या बरोबर घेऊन जायचं ठरवलं. तशी कल्पना ही पुजार्‍याला दिली.

घरी आणल्यावर सुलभाने अप्पांना तिला फ्राॅक आणण्यासाठी पाठवले. तिला अंघोळ घालून तिला नविन फ्राॅक घातल्यावर ती एकदम त्यांच्या घरातलीच दिसत होती.

नाश्ता करून झाल्यावर तिचा चेहेरा अजून उजळून गेला. किती दिवसांची उपाशी होती कोण जाणे. सुलभा मनाशीच पुटपुटली. बोलूही शकत नव्हती. नांव ही सांगता येत नव्हतं. अप्पांनी तिला पेन आणि कागद आणून दिलं आणि बाळ तुझं नावं लिही बरं. असं सांगीतल्यावर तीने कागद पेन तसचं ठेऊन दिलं. एक स्माईल दिलं. आणि शोकेसकडे बघत राहिली. अप्पांना वाटलं कदाचित बोलता येत नाही म्हणून शाळेत गेली नसावी.

कोण असेल बरं कुठून आली असेल एक ना दोन हजार प्रश्न पिंगा घालू लागले.


नंतर दोघांनी तिला घेऊन पोलिस स्टेसन गाठलं. अनेक प्रश्नांची उत्तरे देत पोलिसांच समाधान झाल्यावर तिला आपल्या सोबत ठेवण्याचं पोलिसांना सांगीतलं. जो पर्यत तिचा कोणी शोध घेत येत नाही तोपर्यंत... तसं लेखी ही देऊन मोकळे झाले.

ऑफिसमधून वृंदा वृषभ घरी आल्यावर ती मुलगी जरा भेदरलीच. अप्पांनी घडलेला किस्सा ऐकवला...

वृषभही थोडा सा नाराजच झाला अप्पांवर. पण त्या मुलीचा लाघवी चेहेरा बघूनत्याला ही अप्पांच बोलण पटलं.

चौघांनी मिळून तिचं नांव माया ठेवलं. ए म्हणून कधीपर्यंत हाक मारणार होते. वृषभ आणि वृंदा शी तिची दाट मैत्री झाली. हळूहळू वृंदा तिला एक एक अक्षर गिरवायला देत होती. संध्याकाळी आफिस मधून आल्यावर माया वृंदाला दाखवत होती. आता कुठं ती थोडंथोडं बोलू लागली होती. कदाचित खुप दिवस कोणाशीही संवाद झालेला नसावा म्हणून तिलामकाही बोलणं जमत नसाव असा अंदाज सर्वांनी काढला.

दिवस जात होते. मधून मधून अप्पा पोलिस स्टेशन ला जाऊन चौकशी करुन येत होते. पण काही सुगावा लागत नव्हता.

 एक दिवस पन्नाशीत ला एक गृहस्थ हातात वर्तमानपत्र घेऊन दारात उभा ठाकला. त्याच्या अंगावर धड कपडे ही नव्हते. तो आल्यावर अप्पांनी त्याला विचारले तेव्हा त्याने ते वर्तमानपत्र वाचूनमायाचा फोटो बघून ईथं आलो असं सांगितलं.

त्याने जे सांगितले त्यामुळे अप्पांना धक्का च बसला... मायाचे वडील शेतकरी होते. दोघं शेतीत काम करत. यावेळी दुष्काळ पडला.. पिक ही नाही. त्यात सावकाराचे कर्ज झाले होते. खायचे वांदे झाले होते.. त्या दोघांनी मुलीला देवळाच्या आवारात सोडून घरी चिठ्ठी लिहून ठेवली होती. गळफास लावून आत्महत्या केली होती. आलेला मायाच्या वडिलांचा लांबचा भाऊ लागत होता. त्याने सोबत येताना मुलीचा फोटो आणि आईवडिलांचा फोटो ओळख पटविण्यासाठी आणला होता. तो मायाला न्यायला तयार नव्हता. त्याचेच खायचे वांदे होते...  शेतीची जमीन होती. पण दुष्काळ पडल्याने काही पिक हाती लागलं नव्हतं.

दुसऱ्या दिवशी अप्पांनी सर्व किस्सा पोलिसस्टेशनला जाऊन सांगीतला. आणि दत्तक घ्यायची ईच्छा व्यक्त केली.

मायाने अप्पांना सुलभाला खुपच माया लावली होती.. आता व्यवस्थित जेवण मिळत असल्याने तब्येत ही सुधारली होती. केसाला तेल शॅम्पू लाऊन धुतल्याने वेगळीच चमक आली होती.

वकीलांशी चर्चा करून त्यांनी रीतसर मायाला दत्तक घेतलं. वृषभ वृंदाने ही घरातल्या घरात एक छोटासा कार्यक्रम ठेवला होता. मायाला मस्त फ्राॅक आणला होता... पांढरऱ्या रंगाच्या फ्रॉकमधे ती परीच दिसत होती. मधूनच शाळेत एडमिशन नाकारल्याने वृंदा घरीच तिला शिकवत होती...

दिवाळी ला बाहेरर जायचे सरवांचे प्लॅन होते. पण वृषभला सुट्टी मिळत नसल्याने अप्पांनी आणि सुलभाने कोकंणात जायचे ठरवले. दोघांच मन मायाला सोडून जायला तयार होत नव्हतं.. पण वृषभ वृंदा आहेत म्हटल्यावर त्यांनी कोकंण कन्येची तिकिट काढली.. चारच दिवसांचा प्रश्न होता..

सुरभाने बॅग भरली. बरेच दिवस कोकंणात न गेल्याने शेजारी साफसफाई करून ठेवायला आप्पांनी सांगीतले. ऑक्टोबरचा महिना.. सणावारी कोकंणात जाणारऱ्यांची गर्दी बघून दोघांच मन भरुन आलं.. दुसरऱ्याच दिवशी कुलदैवतेला जायचं ठरवलं..

दादरला ट्रेन पकडली. दोघही सीट शोधून आसनस्थ झाले. ट्रेन सुटायच्या आतचं पोहे चहा ईडलीओरडून कॅंटीनवाला येऊन गेला.. संध्याकाळ होत आली होती. पुढे बोगदा आला होता.. तिने अप्पांचा हात घट्ट दाबून धरला... काहीतरी वाईट घटना घडतेय की काय असा विचारही सुलभाच्या मनात चमकून गेला..

पण बोगद्यातून गाडी बाहेर आल्यावर सुलभाने सुटकेचा निश्वास सोडला. पण काही क्षणापुरतीच... मोठा आवाज झाला. आसमंत किंचाळ्यांनी भरुन गेला. गाडीचे डब्बे रुळावरून घसरले होते... रडणं किंचाळ्या शोधाशोध अ‍ॅम्ब्युलन्स चे आवाज हृदय हेलावून टाकत होतं.. वृषभ वृंदा

 टि व्हि च्या बातम्या बघून घटनास्थळी पोहोचले होते. बॉडीची ओळख पटली होती.. अ‍ॅम्ब्युलन्स सोबत वृषभ हॉस्पिटलमध्ये पोहोचलारीतसर फाॅरम भरुन दोन्ही बाॅडी कोकणांतल्या घरी घेऊन आला.. खरतर आप्पा सुलभा यांची ईच्छा होतीच की अंतिमसंस्कार करायची वेळ येईल तेव्हां कोकणातच दोघांचाही करावा... पण हा विषय निघाला की वृषभ हसण्यावारी नेत असे. पण आता वेळ तशीच आली होती.

अंत्यसंस्कार झाल्यावर दहावं ही तिथेच करावं असंदोघांनी ठरवलं.. माया ह्या प्रकाराने खुपच भेदरली होती. नातेवाईक परतले होते.. आज दहाव होतं. आचारी घरीच बोलावून जेवण करून घेतलं होतं. आई अप्पांच्या आवडींच जेवण 

पुरणपोळ्या बनवून घेतल्या होत्या....

पूजा आटोपल्यावर वृंदानेआणि वृषभनेदोन पांनवाढून बाहेर अंगणातल्या कठड्यावर ठेवली. कावळा येउन जात होता. पण अन्नाला स्पर्श करत नव्हता. तासभर झाला. मुलं भूकेली झाली होती. शेवटी एका वयस्कर आजीबाई ने वृंदाच्या कानात काहीतरी सांगीतले. वृंदाने ते वृषभ ला सांगीतले ... वृषभच्या पटकन डोक्यात प्रकाश पडला. त्याने मायाचा एक हात वृंदाच्या हातात आणि दुसरा हात आपल्या हातात घट्ट धरलाआणि आई आणि आप्पा मी आज तुम्हाला आज वचन देतो. मायाला आम्ही दोघं कधीच अंतर देणार नाही हतिचं शिक्षण पूर्ण करूनतिला तिच्या पायावर उभं करु. चांगलं स्थळ बघून लग्न ही करुन देऊ...

हे वाक्य पूर्ण होताच कावळा येऊन पिंडाला शिवला होता...

सुलभा अप्पांची अंतिम ईच्छा पूर्ण झाली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy