रत्नागिरी.. एक सुखावह भ्रमंती
रत्नागिरी.. एक सुखावह भ्रमंती
काही वेळा खुप काही ठरवतो पण ते साध्य होत नाही... मी पण खुपदा रत्नागिरी ला जायचं ठरवलं आणि योगच आला नाही सात वर्षे... जन्म स्थान रत्नागिरी. एस एस सी पर्यंतच शालेय शिक्षण रत्नागिरीत. आणि मुंबईत आल्यावर पुढील शिक्षण नोकरी लग्न प्रपंचात अडकले.... जाणं झालं नाही... आणि घर कसलं वाडा तिथे बिल्डिंग झाल्यावर तर ईच्छा मरूनच गेली.
तरी थोडसं बरं नाही वाटत म्हणून मुद्दाम रत्नागिरीला आले.. पहिले तीन दिवस मांडवीला सी फॅन्स हॉटेल ला राहिलो...
आणि मन प्रसन्न झालं. प्रचंड थंडी त्यात सकाळी सुर्योदयापूर्वी आकाशातील गुलाबी रंगाची उधळण आणि ते प्रतिबिंबित झालेला तो अथांग सागर.. खरचं स्वर्ग सुख मिळाल्यासारखी मनस्थिती... मग भाटिया.... सुरुबन आणि टायटॅनिक पाॅईंट.. नजरेत साठवून मोबाईल च्या कॅमेर्यात कैद केले.. गोगटे कॉलेज मारूती मंदिर उद्यम नगर.. सर्वत्र फेरफटाका मारला. पोलिस लेन मसुरेकर नगर.. बाजारपेठ.. किती लिहू. मन भरून आलं.नंतय मामांच्या घरी राहिले. मामीने मना सारखं जेवण करून खाऊ घातलं. आई आठवली...
विशेष म्हणजे सर्वांनी अगत्याचे आमंत्रण दिलं होतं... पुस्तकाचं प्रकाशन झाल्यावर एक लेखिका म्हणून ओळख व्हायची होती.....
अनेक जणांनी प्रेमाने अगत्याचे आमंत्रण दिलंं... वल्लभ वणजू यांना प्रथम भेटले... आगाझचं शूटिंग झालं होतं तिथं आम्हाला ते घेऊन गेले. आणि आगाझ पुस्तक घेउन आठवण म्हणून फोटो काढला... रोशन परूळेकरच्या घरी गेले आई बाबांना भेटले. शेशन परुळेकर डिंगणकर वकिल.. अनेकजण भेटले... मैत्रिणींना पंचविस वर्ष भेटले नव्हते त्याही भेटल्या...
प्राथमिक शाळा टि सी एम भग्नावस्थेत पाहिल्यावर मन उदास झालं. जिथे कैर्या दगड मारून पाडल्या होत्या ते चित्र डोळ्यासमोर सरकून बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या.. ए के देसाई माध्यमिक शाळा आता नांव स रा देसाई.. फोटोत कैद केली. कुठे जाऊ. किती लिहू... शब्द कमी पडतील अशी अवस्था...
आरेवारे बीच वरून दिसणार निसर्ग सौंदर्य.... मनात सर्व आठवणींना कैद केलं...मकसुद मुकादम फॅमिलीला भेटले... पुस्तकं भेट दिली... मनात सर्वांना भेटायची ईच्छा होती.. पण ती येन तेन कारणाने पूर्ण झाली नाही... न भेटता ही काहींनी माझ्या कवितेला दाद दिली... शुध्द निखळ मैत्री मनात घर करून गेली.. पु. ल. देशपांडे यांचे मैत्री बद्दलचे सुविचार आठवले.
मैत्री एक सोपी व्याख्या आहे.
रोज आठवण यावी असं काही नाही.
रोज भेट व्हावी असं काही नाही.
एव्हढच कशाला रोज बोलणं व्हाव असं काही नाही. पण मी तुला विसरणार नाही ही झाली खात्री.
तुला याची जाणीव असणं ही झाली मैत्री. शेवटी काय हो भेटी नाही झ्ल्या तरी गाठी बसणं महत्वाचं. ज्यांनी हे जाणलं त्यांनी माणसातलं माणूसपण जाणलं..खरचं गाठी बसणं महत्वाचं.. मला ते अगदी पटलं... मनात सर्व साठवून आनंदाचे क्षण मी परत मुंबईत आले पण मन मात्र तिथेच रेंगाळत राहिलयं.. अजून किती भेटी राहिल्याचा हिशोब करत...
