Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Meena Kilawat

Inspirational


4.3  

Meena Kilawat

Inspirational


अंधारातील दिवा

अंधारातील दिवा

2 mins 8.2K 2 mins 8.2K

    जिकडे तिकडे जगात काळोख पसरलेला आहे. तो काळोख, तो अंधार कसा नष्ट करायचा, तो आपणच ठरवायचा असतो. राजा म्हणाला, अंधार संपवा, जनता लागली कामाला, रोज काहीतरी उचलून दूर सारु लागली. पंरतू अंधार काही संपेना. तेंव्हा एका लहानश्या चुणचुणीत  मुलीने एक दिवा पेटवून त्या खोलीत ठेवला. त्या खोलीतला अंधार संपवला. ही कथा मी कुठेतरी वाचली होती.

       आयुष्य जगत असतांना संघर्षाचा अंधार पसरला आहे. तो आपल्यालानिस्तरायचा आहे. नवीन नवीन अडचणी वळणावळणा वर जेंव्हा येत असतात,

तेंव्हाआशेचा दिवा आपल्या ह्रदयात तेवत असतो. ही जाणीव सर्वांनाच असते. जीवनातले काही दुख इतके भंयकर असते की ते कोणीच कितीही प्रयत्न केला तरी दूर करु शकत नाही.ते दुख भोगल्या शिवाय त्याचे महत्व दुसऱ्यांना कळत नाही.

     दैनंदिन काही घटना जीवनात घडत असतात. त्या पाहून किंवा ऐकून काही बदल करणे आवश्यक असते. अश्या काही व्यक्ती आपल्या अवतिभोवती

असतात. त्यांच्या कडून आपण काही शिकू शकतो. अश्या अनेक व्यक्ती आयुष्यात भेटतात. कुणी भावनाशील, कुणी सहनशील, कुणी धाडसी. कुणी कठोर,

क्रूर अश्या काही व्यक्ती भेटतात. त्यांना भेटतांना जीवनाला एक नवा आकार मिळतो. नव कर्तृत्व करण्याची उमेद मिळते.

     "चांगल ते अंगिकारावे, वाईट सोडून द्यावे" मन हे चंचल असते, त्याला वळवावे लागत असते पण ते ही इतक सोप नसते. पाहिजे तसे वळवणे फार अवघड असते. त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे हे कोण सांगणार? वाचून, ऐकून थोडाफार बदल होऊ शकतो. पण जर का आपण मनात आणले तर जीवनाला नवा अंकूर फुटल्याचा आनंद आपणास जरुर मिळतो. जीवनात नवीनउत्साह येतो. जगण्याला बळ मिळते. कलेकलेने त्यात आपन रंग भरु शकतो. आपल्या सवयी

उच्च दर्जाच्या पाहिजेत. चुकिचा मार्ग धरतांना हजार वेळा विचार करणे. एक वेळ जर चुकीचा मार्ग अवलंबला तर सोडणे अतिशय अवघड असते .अर्थात जे आपणास नाही पटत ते काम करु नये. दारु पिणाऱ्यांलाही दारुचे दुष्परिणाम माहिती असतात. तसेच तो मार्ग चुकीचा होता हेही त्याली कळत असते. तसेच खोटे बोलणाऱ्यांना ही माहिती असते, की खोट बोलण्याचे काय परिणाम होतात, परंतू ती सवय एकदम सूटत नाही. एक दिवस असाही येतो आणि त्यातून आपण निघतो.  तेंव्हा संघर्षातील अश्रूंना वाचा फुटते. सागरातील मोत्यासम एक एक थेंब अती मोलाचा भासायला लागतो. ध्येयाची नवीन दालने, नवीन भांडारे उघडतात. हे अमूल्य मिळालेले व्यक्तीत्व खूप काही देउन जाते. जीवनात आपण कल्पनाही केली नसेल इतके आपल्या झोळीत येवून पडते. आपण नवांकुरा प्रमाणे कोमल,

चमकत्या ताऱ्याप्रमाणे स्वयंप्रकाशित होवून तावून सुलाखून निघतोय, ही गोष्ट जीवनात आल्हाद देणारी असते.   


Rate this content
Log in

More marathi story from Meena Kilawat

Similar marathi story from Inspirational