अगा नवलची घडले...
अगा नवलची घडले...


मन भरून आले....!
कंठ दाटून आला......!
डोळे पाणावले.........!
उर दाटून आला.......!
मन गदगद झाले.......!
स्वर्ग दोन बोटे राहिला.....!
कल्याण झाले........!
जन्म सार्थकी लागला......!
आजकल पांव जमीं पर....!
याचसाठी केला होता अट्टाहास...!
वरील वाक्प्रचारांची अनुभूती काल मला एकाच वेळी झाली. साहित्य क्षेत्रातील सर्व पुरस्कार एकाच वेळी प्राप्त झाले, असेही वाटले...!!
फार कमी लोकांच्या नशिबात हा योग असतो. काय पूर्वजन्मीचं पुण्य होतं काय माहीत....!
तुम्ही म्हणाल असं झालं काय....? तर विषय असा आहे की, काल माझ्या एका कवितेला माझ्या धर्मपत्नीने, असं एक बोट दाखवून कमेंट केली होsss....! एक नंबर म्हणाली. आणखीन काय पाहिजे आयुष्यात..... हे लिहितानासुद्धा माझे हात थरथर कापत आहेत बघा....!
मोठेमोठे लोकं तुमचं कौतुक करतील हो.... पण बायकोने कौतुक करायला खरंच तुमच्याकडे क्वालिटी लागते....!
माझ्या लिखाणावर टीका करणाऱ्या तमाम बुद्धीजीवींना बसलेली ही एक सणसणीत चपराक आहे, असे मी मानतो.....!!
ता. क..... वरील लिखाण पूर्णपणे विनोदी स्वरुपाचे असून, मी आज जो काही आहे तो माझ्या कुटूंबाच्या खंबीर पाठिंब्यामुळेच आहे......! हे या ठिकाणी आवर्जून सांगतो आहे. या वाक्यावर माझा कालही विश्वास होता, आजही आहे, उद्याही राहील.....