kalpana dhage

Inspirational

3  

kalpana dhage

Inspirational

आत्मविश्वास

आत्मविश्वास

1 min
236


साधारण पाच वर्षाची मुलगी. तिचे नाव होते समृद्धी. नावाप्रमाणेच गुणवान होती. आत्मविश्वासाने कोणतीही कामे करायची. कष्टाळू होती. घरच्यांची काळजी घेई. अभ्यासात हुशार होती. शाळेत नंबर १ येत होता. जिद्दी होती. निसर्ग चित्रे सुंदर रेखाटायची. घरातील सर्वाची लाडकी होती.


आता ती २१ वर्षाची झाली. तिच्या आई-वडिलांनी तिचे मोठ्या थाटा - माटात लग्न केले. लग्नानंतर तिचा सुखी संसार सुरु होता. पण अचानक एक घटना घडली. तिच्या पतीने तिच्या हुशारीची दखल न घेता सतत तिला हिणवून बोलणे सुरु केले. वारवार भांडणे होऊ लागली.


दरम्यानच्या काळात तिला १ गोंडस मुलगा झाला. मुलाच्या कोडकौतुकात तिचा वेळ जाई. मुलगा आता मोठा झाला होता. तिच्या पतीने मात्र तिला टोमणे देणे, कमी लेखने या गोष्टी कमी केल्या नव्हत्या. सततच्या हिन वागणुकीला आता ती कटांळली होती.


तिने वर्तमानपत्रात जाहिरात वाचून नोकरी करण्याचे ठरवले. तिला घरच्यांनी विरोध केला, पण तिने विरोधाला जुमानले नाही. कंपनीत तिला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. तिने घरच्यांना आर्थिक आधार दिला. तेव्हा पतीच्या वागण्यातदेखील बदल झाला.


थोडक्यात आत्मविश्वास या गुणाद्वारे तिने पतीच्या स्वभावात बदल घडवून आणला. तिचा संसार सुखाचा झाला. ही पाचा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण. सर्वांनी बोध घ्यावा.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational