राक्षसाचा वध
राक्षसाचा वध


आटपाट नगर होतं. त्या नगरात कुशल मंगल चालले होते. झाडे विपुल प्रमाणात होती. पाणी मुबलक होते. जनावरे, पक्षी खूप होते. तेथील शेतकरी खुशीखुशी आपले आयुष्य जगत होता. निसर्ग पर्यावरण, शुद्ध हवा होती. नगरातील पर्जन्यमान ठीक होते. प्रजा सुखी होती. अचानक काय झाले. माणूसरुपी संशोधनात प्लास्टिकचा शोध लागला. या शोध प्रक्रियेत कोणालाही वाटले नाही एवढा पर्यावरणाचा ऱ्हास झाला. सगळीकडे प्लास्टिकच्या पिशव्या, प्लास्टिक वस्तू यांचा वापर वाढू लागला. मानव, निसर्ग आणि परिसर अशुद्ध हवेमुळे निराश होऊन अनेक आजाराने ग्रस्त होऊ लागला.
हे सगळे घडले प्लास्टिकरुपी राक्षसाने सगळा नाश केला. या राक्षसरुपी प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. आता तरी माणसाने प्लास्टिकचा वापर बंद करून या राक्षसाचा वध केला पाहिजे आणि माणसाचे जीवन सुखी केले पाहिजे. ही पाचा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण उपयुक्तता लक्षात घेऊन वाचून आचरणात आणावी.