kalpana dhage

Others

2.5  

kalpana dhage

Others

मनाची निर्मळता!

मनाची निर्मळता!

2 mins
337


असावे सुंदर आणि प्रसन्न स्वतःचे मन! 

या कथेत प्राधान्य दिले आहे ते स्वतः च्या मनाच्या निर्मळतेला. आटपाट नगर होतं. त्या नगरात सर्व लोक आनंदी होते. निसर्ग फुललेला होता. पशु पक्षी आनंदाने बागडत होती. फुलांच्या सुवासाने बगीचा मोहून टाकत होता. फुलपाखरे स्वछंदपणे वावरत होती. निसर्ग देव प्रसन्न झाले असे वाटत होते. पाऊस मुबलक होता. शेतकरी सुखी जिवन जगत होता. धान्य विपुल प्रमाणात उपलब्ध होते. 

अचानक एक दिवस घटना घडली. कोरोना नावाचा महाकठीण विषाणू ह्या नगरात प्रवेश करतो. होत्याचे नव्हते होते. प्रत्येक व्यक्ती काळजीत होता. पशु पक्षी जिवन जगत होते. त्यांना विषाणू बाबत काही माहीत नव्हते. मानव मात्र चिंता ग्रस्त होता. या विषाणूंचा सामना करणे अनिवार्य होते. आटपाट नगरप्रमुख सर्व जनता वाचविण्यासाठी प्रयत्न करत होता. त्याने काही ठराविक समाजसेवक एकत्र करून त्यांची बैठक आयोजित केली. सर्वानी मिळून वर्गणी गोळा केली. त्यातून गावासाठी कोविड सेंटर सुरू केले. गोर गरीब जनता तिथे जाऊन उपचार घेऊ लागली. तेथील डॉक्टरांनी प्रयत्न करून रुग्ण सेवा करून अनेकांचे प्राण वाचविले. त्या ठिकाणी काही समाजसेवकांनी मनाच्या निर्मळतेचे संकटकाळी दर्शन दिले. त्यांनी त्या ठिकाणी जेवण दान केले. पाणी पुरवठा केला. तेथील परिसर स्वच्छ धुवून काढला. सोडियम हायपोक्लोराईड ची फवारनी केली. सर्वानी मनाचा मोठेपणा दाखविला. रूग्ण याना धीर दिला.स्वताची काळजी कशी घ्यावी लागते याचे शिक्षण रुग्णांना दिले. मेडिसीन वेळच्या वेळी नेऊन दिले. तसेच योगा प्राणायाम याचे धडे दिले. 

या सर्व प्रयत्नांना यश आले. रुग्णालयात उपचार घेणारे लोक लवकर आजारातून मुक्त झाले आणि आनंदाने आपल्या घरी गेले. काही दिवसांनी त्या गावातून कोरोना विषाणू कायमचा गेला. जनता पूर्वी सारखी सुखी झाली. नगर प्रमुख आणि स्वयसेवकांना आणि त्यांच्या महान कार्याला स्थानिक पातळीवर अनेक शुभेच्छा देऊन गौरविले गेले. 


Rate this content
Log in