जिद्द
जिद्द


कविता नावाची सुंदर मुलगी होती. खुप छान आणि स्वभावाने शांत होती. शाळेत खुप हुशार आणि चौकस बुद्धी असणारी कविता तितकीच गांभीर्याने विचार करणारी होती.
तिचे बालपण जरा वेगळ होत. तिच्या कुटुंबात तिची आई, वडील, भाऊ, बहीण, आजी, आजोबा असे सर्व एकत्र राहत होते. आजी, आजोबा तिला गोष्टी सांगायचे. त्यातून तिला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि माहीत झाल्या. आजी गोष्टी सांगताना कविता अगदी मनापासून गोष्टी ऐकायची. अनेक प्रश्न विचारायची. ही अभ्यासू गुणी मुलगी आता शाळेत पहिल्या क्रमांकाने पास होत होती. खेळात पण हुशार होती.
बालपणात एकदम तिच्यावर संकट आले. खेळता खेळता पडली आणि तिच्या हाताला बरी होणार नाही अशी खोल दुखापत झाली. पण कविता मोठी धीराची. रडत बसली नाही. अभ्यासात हुशार तसेच गायनात देखील हुशार. अशी सुंदर भजने, गीत, पोवाडे, गवळण म्हणायची की एकनारे तल्लीन होऊन जायचे.
तिच्या दुखापती कडे लक्ष न देता तिने गायनात लक्ष केंद्रित केले. हळू हळू ती या क्षेत्रात खूप पुढे गेली. स्वताचे गायनाचे कार्यक्रम घेऊ लागली. अनेक मालिका, चित्रपट गाणे साठी तिला बोलविले जाऊ लागले. तिच्या आवाजातील जादु ने तिला यश कीर्ती प्रतिष्ठा मिळवून दिली. पुढे तिला गायन क्षेत्रातील जोडीदार पती म्हणुन लाभला.
तिचे कल्याण झाले म्हणुन आई वडील खुप आनंदी झाले. थोडक्यात आपल्या दुखनार्या हाताकडे पाहून निराश होऊन बसणे योग्य नाही त्यापेक्षा गायन क्षेत्रात अगदी उच्च पारितोषिक मिळविणाऱ्या कविता कडून जिद्दीने आणि मेहनतीने काहीच अशक्य नाही हाच आदर्श सर्वानी घ्यावा आणि आपल्या कलागुणांना अधिक प्रसन्नपणे व्यक्त करण्यात वेळ द्यावा अशी कथेची शिकवण मिळते.