आपला तो बाब्या लोकाचं कार्ट...
आपला तो बाब्या लोकाचं कार्ट...
तो आजही आला होता शेजारच्या घरात,
दुधाच्या पिशव्या पोहोचवायला वय जेमतेम बारा वर्ष,
मनात आलं लॉकडाऊनच्या काळात हा कोवळा जीव,
जीव मुठीत घेऊन करतोय मदत आई-बापाला पोटाची खळगी भरण्यासाठी...
न राहवून शेवटी शेजारणीला विचारलं, तो इतका लहान का हो बोलावता फोन करून, करा की थोडे दिवस सहन.
स्वतःचं काम स्वतः करा,
असू द्या थोडं सामाजिक भान...
शेजारीण म्हणाली,
अहो!!! कोणाला पाठवू मुले आहेत लहान, वाटते भीती...
नवऱ्याला दूध आणायला पाठवणं... आहे कमीपणाचं लक्षण...
आम्ही बाई मोठ्या घरचे, जाणत नाही असली लहान सहान कामं करणं...
इथे एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली त्यांच्या मुलांची वयं आहेत मोठा वीस वर्ष आणि लहान सतरा वर्ष...
काय म्हणाल तुम्ही या मानसिकतेला...?
आपला तो बाब्या लोकाचं कार्ट...