आनंद
आनंद
त्याच्या जन्म झाला आणि नव्या पीडीचा पहिला कुलदीपक म्हूणन गुणगान चालू झाले त्याला पाहायला हॉस्पिटल मध्ये संगेसोयरे जमले घरात तर आनंद पसरला त्याच्या घरी येण्याच्या दिवशी तर घर असं काही सजवलं होत जस काही कसला तरी सण च जणू बारश्या दिवशी तर घर पाहुण्यांनी भरून केलं तयारी हि जोरात चालली होती जो तो त्याच्या जवळ घुटमळ होते आणि त्याचे गालांना हात लावत होते आणि तो मस्तपैकी हसून देत होता
संध्यकाळी चार वाजता कार्यक्रमाला सुरुवात झाली पाळणा हि रंगेबेरंगी फुलांनी सजवला होता बाहेर लाऊड स्पीकर हि मोठ्यात चालू होता त्याला हि मस्त ड्रेस घातला होता लुकलुकीत डोळ्यांनी तो सर्वाना पाहता होता घर अगदी आनंदाने ओसंडून वाहत होत बारश्याच्या रीती चालू झाल्या आणि त्याच्या आत्याने त्याचे नामकरण केले सगळ्याना मनातून आनंद झाला म्हणूंन त्याचे नाव आनंद ठेवण्यात आले
आनंद जसा जसा मोठा होत गेला त्याचे लाड हि तेवढेच वाढले त्याने काही सांगितले आणि त्याला दिले नाही असे कधीच झाले नाही आनंद म्हणजे सगळ्याची कमजोर बाजू त्याच्या डोळयांतून पाणी हि कधीच येऊ दिले नाही अगदी राजेशाही थाट'होता आणि लाडवलेला आनंद ला हि ह्या राजेशाही थाटाची एव्हडी सवय लागली कि कधी कधी त्याच्या गरजापूर्ण करणे म्हणजे घरातल्या साठी मोठे दिव्य उभे असे
अशीच वर्ष गेली आनंद आता कॉलेज मध्ये जाऊ लागला अजूनही त्याचा राजेशाही थाट काही कमी नाही झाला आणि ह्याचंच परिणाम त्याची वाईट संगत असणाऱ्या मुलाशी झाली आणि मग एक एक कारनामे घरी ऐकू येऊ लागले पण आनंद ला विचारण्यास कोणी पुढे येत नसे
एकदा असेच पाणी डोक्यावरून गेले घरी सगळेच तापलेले आनंद येण्याची सगळे वाट पाहत होते आणि आनंद आला सगळ्यांनी त्याचवर प्रश्नाचा भडीमार गेला पण लाडवलेले आनंद ने ते हलक्यात घेतले आणि आपले वागणे तसेच चालू ठेवले
लोकांच्या प्रश्नांना घरातल्याना उत्तर देता देता नाकी नऊ येऊ लागले लोक हि त्याना समज देऊ लागले कि तुमच्या लाडा मुळे तो असा झाला एव्हडा मुजोर झाला घरातल्याकडे ह्याचे उत्तर नसे ज्याच्या जन्मामुळे घरात आनंद पसरला त्याच्या मुळे घरात प्रत्येकाच्या मनात कलह पसरला जो आनंद त्यांना त्याच्या जन्मवेळी झाला होता त्या आनंदावर त्याने विरजण घातले
