आमची स्वप्ने
आमची स्वप्ने
गोष्ट दोन अक्षरांची 'क्ष' 'ण'
एकत्र करुन लिहायचं म्हटलं,
आठवण म्हणून जपायचं म्हटलं तर
'क्षण'...
सहज, अगदी ठरवून! कायमचं विसरुन जायचं म्हटलं तर
'क्षण'...
कधीतरी नकळत पलटावी मागची पाने
ओळी-ओळीवरून फिरावी नजर...
शब्द खूप नाजूक आहे म्हणून पानांना सांभाळावित बोटे.
शब्दाच्या अंगांगावरुन स्पर्श करतांना जाणवाव
लाजाळूच पान मिटण जेवढं हळवं असतं
एवढंच ते कोवळं वय असतं... तेवढाच निरागस आवेग.
तितकाच टोकाचा मत्सर... तसलाच गंभीर आरोप.
आणि तोच निष्ठुर 'क्षण'.
माझा प्रवास, मी...
आणि 'मी' एवढाच असणार कायम 'क्षण'..!