विजयकुमार देशपांडे

Comedy

3  

विजयकुमार देशपांडे

Comedy

"आली लहर..."

"आली लहर..."

1 min
225


ती बिचारी सारखी ह्या कुशीवरून त्या कुशीवर पडून झोपण्याचा प्रयत्न करत होती. पण छे! निद्रादेवी प्रसन्न होण्याचे काही नावच घेत नव्हती. अंथरुणावर पडल्या पडल्याच तिने आवाज दिला - "अहो, तुमची ती कवितांची वही देता का मला जरा इकडे. मला मेलीला झोपच येईना किती वेळ झालं!"

तो खूश झाला आणि स्वत:शीच पुटपुटला - "आपली कवितेची वही सत्कारणी लागणार तर आता एकदाची!"


त्याने आपले लेखन मध्येच थांबवून, कवितेची वही तिच्या हातात दिली. त्याने हळुवारपणे विचारले- "एकदम कशी काय लहर आली ग इतक्या रात्री, माझ्या कविता वाचायचीची?"


ती उत्तरली- "तुमच्या कविता वाचता वाचता तरी, मेली झोप येतेय का नाही, बघते आता मी - शेवटचा उपाय म्हणून!"


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy