अशी दिवाळी माझीही
अशी दिवाळी माझीही


बंगल्यामधुनी समोरच्या
तो आवाज कानी येतो ..
झोपडीतले काम हातचे
सोडून जागा ती हेरतो .. !
माळ हजार फटाक्यांची
आवाज फटाफट घुमतो ..
फुलबाज्या रंगीत अर्ध्या
धूर मस्तसा दिसतो ..... !
सारीकडे चिडीचूप होता
मी कानोसा हळूच घेतो ..
फुसके फटाके वातींचे
एकेक गोळा करतो ..!
अर्ध्या उडलेल्या फुलबाज्या
फाटक्यात साठवतो ..
पणतीवर मी शेजाऱ्याच्या
कागद एक पेटवितो ..!
फुलबाज्या फटाके जमलेले
त्यावर पसरून देतो ..
रंगबिरंगी आवाजाची
दिवाळी साजरी करतो .. !