प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Drama Romance

3  

प्रा.डॉ.नरेश शंकरराव इंगळे

Drama Romance

आजही मी दूविधेतच

आजही मी दूविधेतच

5 mins
110


 प्रेमात सर्व काही क्षम्य असतं.प्रेमाचा साक्षात्कार झाला की,कोणतेही उद्दिष्ट पूर्णत्वास जाण्यास वेळ लागत नाही.इतकेच काय तर कुकर्मी डाकूचे सुद्धा हृदयपरिवर्तन होऊन त्यांच्या भावी जीवनाला निश्चित आकार मिळण्यास मदत होते. त्यातही आधुनिक वर्तमान युगात प्रियकर-प्रेयसी च्या प्रेमाला युवावर्गात अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. इतकेच नव्हे तर युवा अवस्थेतही जीवनाची खरी गरज झाली आहे.पण खऱ्या प्रेमाची माणसाला जेव्हा जाणीव होते तेव्हा मात्र माणसाच्या कोमल मनात अस्थिरता निर्माण होऊन हृदयाच्या स्पंदनाचा वेग झपाट्याने वाढू लागतो.असाच प्रकार सुजलल  सुद्धा अनुभव मिळाला.

    सुजल महाविद्यालयीन जीवन उपभोगत असतांना कुणाच्या समोर प्रेमाचा हात पसरला नाही.मित्राचे अनुभव लक्षात घेऊन प्रेमापासून सदा दूर राहण्याचा त्याचा प्रयत्न राहीला. इतरांप्रमाणे त्यांच्या ही मनाला भूलविण्याचा प्रयत्न केला गेला. सुजलच्या युवावस्थेत प्रेमाची ज्योत जागविण्याचा प्रयत्न झाला असला तरी त्याने कुणालाही सकारात्मक होकार दिला नाही. पण शेवटी तो ही एक हाडामासाचा सर्वसामान्य युवक होता.त्याला ही भावना होत्या.मन होते.एका मुलीला बघून त्याच्या भावना जागृत झाल्या.खऱ्या प्रेमाची जाणीव झाली.युवावस्थेत प्रेमाचा पाझर फुटतो हे त्याला प्रत्यक्षात अनुभवास येऊ लागले.आपल्या विचाराला विचार मिळणारी मुलगी मिळाली म्हणजे भावना आपोआप जागृत होते.त्याला ज्या विचारांची मुलगी आवश्यक होती त्या विचारांची मुलगी त्याच्या समोर होती.त्यांच्या जीवनात आशेचा किरण पडला.काळोखाला प्रकाश मिळाला.तिच्या नावाप्रमाणेच त्याच्या जीवनात किरनोदय झाला. सुंदर,प्रफुल्लित,टवटवीत, नाजूक मनाची,मितभाषी कोकीळ स्वराची,निस्वार्थ,निरागस मन तथा आचार विचारांने प्रभावित झाला. असला तरी सोबत मात्र कसल्याही प्रकारचा संबंध नव्हता.तिच्या प्रेमाविषयी तो केवळ कल्पनेतील स्वप्नात रंगून गेला होता.वस्तुस्थिती पासून कोसो दूर होता.तिला याबाबत कसल्याही प्रकारची कल्पना नव्हती. सुजलचे केवळ एकतर्फी प्रेम होते.एकतर्फी प्रेमामुळे मन विचलित होत होते.जोपर्यंत त्याच्या भावना तिच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत केवळ कल्पनेतच रममाण व्हावे लागत असे.त्याच्या भावना तो स्वतः तिच्यासमोर व्यक्त करण्यास असमर्थ होता. याकरिता त्याला ईतराची मदत घेणे आवश्यक होते.तशा प्रकारचीत्याला मदत सुद्धा मिळत गेली. किरण परगावी शिकायला होती. सुजल सुद्धा त्याच गावाला शिकायला होता.पण प्रत्यक्ष भेटीत सुद्धा समन्वय नव्हता.तिचे वर्ग दुपारी तर सुजलचे वर्ग सकाळी होत असे. केवळ तिचा चेहरा दिसावा, मनाला समाधान प्राप्ती, मन उल्हासित करून घ्यावे हे सुद्धा शक्य नव्हते. म्हणूनच किरणच्या प्रेमाच्या प्राप्तिसाठी त्याने मित्राच्या सर्व अडचणीवर मात करावी लागली. पर्यायाने तिच्या अप्रत्यक्ष भेटीचा प्रतिदिन सारांश सुजलला मिळत असे. कारण तो प्रत्यक्ष बोलण्यास एकाएकी त्यालाही शक्य नव्हते.पण त्याचे संबंध तिच्या घरासोबत घरगुती होते. त्यामुळे क्षणिक समाधान लाभत असे. तरीसुद्धा तिच्यावर प्रेमाने झोप कधीचीच निघून गेली होती. क्षणा-क्षणाला तिच्या आठवणीने तिच्या सहवासासाठी मन गहिवरून येत असे.सुजलचे सकाळी वर्ग असल्यामुळे त्याला दुपारी घरी राहावे लागत असे.पण किरणच्या भेटीसाठी तळमळत राहण्यापेक्षा तिच्या वेळेवर येण्यासाठी आवश्यकता नसताना सुद्धा ४ ते ५ वाजता च्या दरम्यान शिकवणी वर्गाला जाण्यास सुरुवात केली.त्यामुळे अप्रत्यक्ष का होईना भेट होत असे.पण किरण याबाबत अनभिज्ञ होती.याशिवाय शनिवार व रविवार ला क्रिकेट खेळणे सुरू केले.मैदान तिच्या घरासमोर असल्यामुळे नजरेला-नजर मिळत होत्या.योगायोग म्हणजे तो जेव्हा तिथे खेळायला राहायचो तोपर्यंत ती सुद्धा राहायची.जेव्हा सुजल गैरहजर राहत असे नेमके त्याच वेळेला ती सुद्धा घराबाहेर पडत नसे. त्यामुळे सुजल अन त्याच्या मित्राचा परिपूर्ण विश्वास झाला की तिच्याही मनात सुजल विषयी आपुलकी,प्रेम वाटत असावे असा समज होणे सहाजिकच होते.अशा स्थितीत सुजलच्या निर्मळ मनावर एके दिवशी मित्राने आघात केला. क्षणात रंगीन सुखद स्वप्न क्षणातच धुळीस मिसळून टाकले. हा केवळ त्याचा डावपेच होता हे कालांतराने लक्षात आले.पण प्रेमाची सुरुवात होण्यापूर्वीच अंत करून टाकण्यासाठी त्याने गनिमीकावा तयार केला.खऱ्या प्रेमाचा अंत नसून ते अमर असते हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.म्हणूनच किरण सोबत प्रत्यक्ष प्रेम करण्याची संधी मिळाली नसली तरी अप्रत्यक्ष संधी कुणीही हिरावून घेऊ शकणार नव्हते.कारण तिच्या शरीरावर प्रेम नव्हते तर तिच्या सुस्वभावावर होते.तिला कल्पना नसतानाही तिच्यावर अप्रत्यक्ष प्रेम करायचे असे सुजलने निश्चित केले. किरणच्या प्रेमाअभावी मन निराश,उदास आणि नैराश्यपूर्ण वाटत असे.जीवन निरर्थक वाटत असे.अप्रत्यक्ष का होईना सदा जनमानसाच्या पर्यायी तिच्या स्मरणात राहावे यासाठी काही वेगळ्या स्वरुपात राहण्याचा प्रयत्न केला.त्याच वर्षी सुजलची एस.वाय.जे.सी.ची परीक्षा होती. खूप मेहनत,परिश्रम तथा अभ्यास करून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.अन महाविद्यालयातुन दुसरा क्रमांक सुद्धा प्राप्त केला. याची परिणीती तो लोकांच्या आदरास पात्र ठरला.लोकांनी कौतुक सुद्धा केले.किरणने सुद्धा त्याचे कौतुक केले.पण तिला प्रत्यक्ष प्रेमाची कसलीही कल्पना नव्हती.जर तिला अशी कल्पना असती तर------याशिवाय नैतिक आचरणाचा प्रभाव,सामाजिक बांधिलकी  शैक्षणिक प्रगतीने जनमाणसात मानसन्मान मिळत गेला. 

   पती-पत्नीचे नाते सात जन्माचे बंधन असते. देवाघरून हे बंधन बांधले असून अतूट अशा बंधनाला कुणीही विलग करू शकत नाही.प्रेमामुळे ते अधिक मजबूत होतात.अशाच प्रकारची समाजात रुढ म्हणी आहे.पण त्यात कितपत सत्यता आहे? ज्याप्रमाणे पती-पत्नीचे अतूट संबंध एका रेशमी धाग्यात बांधले जाते त्याचप्रमाणे प्रियकर-प्रेयसीचे नाते असावे. असाच साक्षात्कार एके दिवशी सुजलला अनुभवास आला असून त्याचे प्रेम पुनर्जीवित झाले. अचानक किरण अन तिची मैत्रीण सुजल च्या घरी येऊन प्रेमाची हिरवी झेंडी दाखविली.आकस्मिक होकार मिळाल्यामुळे यावर सुजल चा विश्वास वाटत नव्हता.एकाएकी किरणचे मत परिवर्तन कसे झाले? आपल्या भावना तिच्याजवळ कोणी व्यक्त केल्या असाव्या? आकाशातील तारेप्रमाणे नानाविध प्रश्न उभे राहू लागले.प्रश्नाच्या भडीमारातच मन आनंदून किरणला स्वप्नात न्याहाळू लागलो.तो क्षण सुजलला अविस्मरणीय वाटू लागला.पुन्हा दुसऱ्या भेटीची आतुरतेने प्रतीक्षा करीत होतो.एक रात्र कित्येक काळाची वाटत होती.घड्याळेचे काटे संथगतीने फिरत होते.बैचन मन उतावीळ होत होते.त्याच स्थितीत सुजल ला पहिले पत्र  प्राप्त होऊन लगेच भेट घडून आली.आमचे मधुरमिलन घडून आले. विचारांची देवाण-घेवाण,उत्तर,-प्रतिउत्तर एकमेकांना करू लागली.त्यांचे मधुर मिलन घडुन आले.विचारांची देवाणघेवाण, उत्तर-प्रतिउत्तर एकमेकांना करू लागले. प्रतीक्षेनंतरची भेट किती सुखद असते याचा अनुभव प्रथम चाखायला मिळाला.त्यात किती गोडवा असतो.कित्येक तास निघून गेले असले तरी वेळेचे भान अजिबात नव्हते.प्रेमाची फूलबाग बहरली.कुणाची दृष्ट लागावी आणि कुणाला प्रेरणादायी ठरावे अशा प्रेमाचा शुभारंभ झाला. एक एक क्षण आम्हाला दूर ठेवण्यास कमकुवत पडत असे.सुजल च्या प्रेमाचा एक प्रसंग तर त्याला नेहमीच आठवण करून देतो. एक वेळ सुजल आजारी असताना तिने सुद्धा आजाराचे रूप धारण करून अन्नसेवन करणे बंद केले होते.

    इतकेही अतूट प्रेम असून सुद्धा कुणाची नजर लागून अल्पावधीतच आमची ताटातूट झाली. एप्रिल ते मे महिन्याचा कालावधी असावा.उन्हाळ्यात खूप उन्ह तापत असताना त्याचे प्रेम सुद्धा खूपच तापू लागले.उन्ह अंगाला चटके देत असे.पण शरीरावर त्याचा शून्य परिणाम. एकाएकी भेटीगाठीला पूर्ण विराम बसला. पत्रव्यवहार बंद झाला. इतकेच काय तर एकमेकांच्या नजरेला नजर मिळविण्यास उभयंताकडून बंदी वाटत होती. सुजल ची पडछाया तिला अभद्र वाटत होती.असे एक वर्ष निघून गेले तरी भेट नव्हती.अचानक असा प्रसंग का ओढवला?सुजल ने कोणती चूक केली?आदी प्रश्नाचे उत्तराबाबत द्विधा स्थितीत पडला.काही दिवसातच तिचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.पण त्याला बाजू  मांडण्याची संधी दिली नाही. एकाएकी सुजलच्या सहवासातून दूर का गेली? सुजलचे प्रेम तिने का झिडकारले? तिने त्याची चूक लक्षात का आणून दिली नाही? सुजलला भेटण्याचे तिने का नाकारले? त्याला बाजू मांडण्याची संधी का दिली नाही? विवाहाला चार वर्ष होऊन आज सुद्धा का टाळत आहे?दुखावलेल्या अन दुरावलेल्या प्रियकराची आठवण सतावत नाही का?आदी प्रश्नांचे कोडे आजही सुजल समोर आहे. समर्पक उत्तर अभावी सुजल चे मन अखेर दुविधेतच आहे.०८/०१/९४

----------------------------------------



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama